मुंबई सायकल कट्टा आणि "फूड सायकल by प्रशांत ननावरे"
.
अंडा बुर्जी
.
.
ऑम्लेट
.
.
मी उगाचच कलात्मकता दाखवत एक फोटो काढला.
.
.
हे सगळे खाणे सुरू असताना गप्पा सुरू होत्याच.. एक दोन पावही मागवून झाले.
.
नंतर सुलेमानी चाय.
.
.
इथे प्रशांत फोटो काढत असताना मी त्याला सांगितले की फोटोमध्ये लिंबू पिळल्यानंतरचा थेंबही येऊदे.. ;)
.
.
मनसोक्त खादाडी झाल्यानंतर आंम्ही बाहेर पडलो. तेथे बाहेर पडताना मला एक पुस्तक दिसले. त्या पुस्तकामध्ये इराणी हॉटेल आणि त्यांचा पूर्ण इतिहास असावा असे वाटले. मी तेथील एकाला पुस्तकाबद्दल विचारले तर त्याने "चाबी नै है" असे सांगीतले. हे सगळे काऊंटरवरून मालक बघत होतेच.. आमचे संभाषण ऐकून ते स्वत: आले आणि पूर्वी कधीतरी लावलेले कुलूप काढण्याची खटपट करू लागले. तब्बल पांच मिनीटे खटपट बघितल्यानंतर "आता राहूदे" म्हणून मी निघालो तर त्यांनी थांबवूनच घेतले आणि यशस्वीपणे कुलूप काढले.
ते पुस्तक खास घ्यावे असे वाटले नाही.
"अरे आपण बिल तर दिले होते.. मग त्या मालकाने तुला का पकडून ठेवले होते..?" असे म्हणून भ.खे. काकांनी माझी खेचायला सुरू केली. :D
नंतर एक कोणतेतरी झाड बघायला आंम्ही चालत चालत बरेच दूरवर कुठेतरी गेलो.. त्या झाडाची माहिती नूलकर काका देतीलच.
त्या प्रचंड झाडाजवळ इरसाल कार्टं...
.
नंतर प्रशांतने आंम्हाला एका ठिकाणी नेले.
शेवपुरी सँडविच.
.
.
तेथून निघून परत आंम्ही मणीज जवळ पोहोचलो. त्या दरम्यान फोनाफोनी होऊन प्रास सायकलवर अवतरले...
मग पुन्हा नवीन विषय आणि नवीन गप्पा सुरू झाल्या...
मणीजची कॉफी..
डावीकडून प्रशांत ननावरे, प्रास, इरसाल कार्टं, सुधांशुनूलकर, भटक्या खेडवाला आणि मोदक
वेळ झाल्याने भ.खे.नी निरोप घेतला.. नंतर थोड्यावेळाने प्रशांतलाही निघायचे असल्याने त्यानेही आमचा निरोप घेतला. परतीची डेक्कन क्वीन दादरला थांबेल अशा आविर्भावात मी निवांत बसलो होतो... तोच नूलकर काकांनी अज्ञानात भर घातली आणि चला CST कडे असे फर्मावले. मग एका ठिकाणी बसची वाट बघून बस मिळाली नाही म्हणून आंम्ही टॅक्सीने फ्लोरा फाऊंटनला गेलो. तेथे पुस्तक खरेदी झाली आणि CST ला पोहोचलो.
झकास मजा आली. नूलकर काका आणि भ.खे.ना पहिल्यांदाच भेटलो... धो धो गप्पा झाल्या.. आता पुढचा कट्टा वाडा किंवा इंदापूर कुठेतरी करायचा असे याच कट्ट्याच्या वेळी ठरले.
**************************
प्रशांतच्या फूड सायकलचे २ एपिसोड -
.
**************************
In reply to शेवपुरी सँडविच. by सावत्या
In reply to इराणी होटॅल कोणते ? by जेदि
In reply to कॅफे कॉलनी by सुधांशुनूलकर
In reply to कॅफे कॉलनी by सुधांशुनूलकर

वदनी कवळ घेता..... अन्न हे पूर्णब्रह्म डावीकडून - भटक्याखेडवाला, मोदक, सुधांशुनूलकर, इरसाल कार्टं, प्रशांत ननावरे. प्रशांतने सायकलप्रेमाला वेगळे आयाम दिले आहेत. लोकसत्तामध्ये एक वर्षभर सायकलविषयक सदर लेखन केल्यावर आता त्या लेखांचं एक पुस्तक प्रकाशित होईल. तसंच, सायकलप्रेमाला खादाडीप्रेमाची जोड देऊन त्याने ‘फूड सायकल’ हा व्हिडिओ उपक्रमही सुरू केलाय, त्याचे दोन व्हिडिओ मोदकने वर दिलेच आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशांतने ‘दो पहिया’ हा सायकलवर आधारित लघुचित्रपटांचा महोत्सवही आयोजित केला होता. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खादाडीसाहित गप्पा झाल्यावर आम्ही चालत चालत माटुंग्याला महेश्वरी उद्यानाजवळ ‘अंदमान पॅडॉक’ हे अजस्र आवळेजावळे वृक्ष पाहायला गेलो. यांना फुलोरा आल्यावर आठ-दहा दिवसात पावसाला सुरुवात होते, असं निरीक्षण आहे. आपण तीन जणांनी हातात हात धरून रिंगण केल्याइतका या एका वृक्षाचा बुंधा मोठा आहे.

In reply to सायकलवेड्यांबरोबर एक दिवस by सुधांशुनूलकर
In reply to मस्त वृत्तांत. मिपाकर by एस
In reply to कट्टा by भ ट क्या खे ड वा ला
क्या बात है! फारच भारी झाला