Skip to main content

I Love You

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 01/04/2017 या दिवशी प्रकाशित केले.
" यार आज १ एप्रिल आज कुणालातरी मस्त april fool बनवूया . " " अरे आज बघू कोण कुणाला सगळ्यात भारी fool बनवतंय . " " अरे कोण काय काय करतंय ते बघू तर . " " चल कोण कुणाला सगळ्यात भारी बनवतय त्यावर winner ठरवू काय. जिंकेल त्याला मानलं . " " अरे हर जगह सुमित भाई हि आगे रहेगा आज भी और कल भी . " " ए सुम्या बस कर हा तुझी पोपटपंछी अरे इथं सगळ्याला माहित असत " " तरीपण आपणच winner होणार सुमित पाटील is the winner . " " ए बस झालं हा तुझं . " " अरे त्याच काय घेऊन बसलाय ते नुसतंच मोठमोठ्या बाता मारत असत चल जाऊ आपण . यार राहुल चल ना . आर लक्ष कुठं आहे राव तुझं . अरे इथं चालय काय आणि तू करतोय काय . चला रे . " सगळ्यांच्या डोक्यातून नवीन नवीन कल्पना निघत होत्या . पण राहुल स्वतःतच मग्न होता त्याच्या डोक्यात दुसरच काहीतरी चाललं असावं असं . ============================================================ " माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग . मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत . इतके दिवस मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही सांगता आलं ग . आज सांगतोय I Love You... !!! I Love You Swati....!!! I Love You.... !!!! " का थांबलास इतके दिवस ? माझे कान आतुरले होते हे ऐकण्यासाठी . I Love You too...!!" तिच्या डोळ्यात आभाळ दाटून आलं होत आणि ती त्याच्या डोळ्यात खोल बुडत चालली होती . इतक्यात " यो... राहुल, तू तर कमालच केलीस राव आम्हा सगळ्यांपेक्षा भारी केलस. आजचा winner तू आहेस . The Best of the Best . " " अरे याला कुणी तरी सांगा नको तिथं इंग्रजी झाडत असत . " सगळे जमा झाले होते तिथं आणि प्रत्येकाला काहीतरी बोलायचं होत . सगळा गोंधळ गोंगाट चालला होता . तिच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत न्हवते . तिला काय करावं ते सुचत न्हवत . राहुलला मित्रांनी खांद्यावर घेतलं . त्याला काहीतरी बोलायचं होत पण कुणी त्याच ऐकतच न्हवत . शेवटी न राहवून तो ओरडला, " थांबा मी नाहीये आजचा winner आणि मी खोट बोलून तिला फसवलही नाही . मला गेले कित्तेक दिवस तिला हे सांगायचं होत पण न्हवत जमत . आज खूप प्रयत्न करून हे बोलू शकलो . पण नंतर तर तुम्ही माझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी टाकायला निघाला . माझं खरंच प्रेम आहे तिच्यावर I Love You Swati आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग . मला या जगात दुसरं काही नको आहे मला फक्त तू हवी आहे . तुझी साथ हवी आहे . देशील ना मला साथ . तिच्या डोळ्यात वाहणारे अश्रू तसेच होते सोबत तिच्या ओठावर हसूही होत . त्याने आपला हात पुढे केला . देशील ना मला साथ तिनेही हात पुढे करून त्याच्या हातात दिला आणि मानेने हलकेच होकार दिला . त्याने पुढे होऊन तिला मिठीत घेतलं तीही आवेगाने त्याला बिलगली . सर्वानी एकच गलका केला . आजचा 1st April ' April Fool ' नाही तर ' Cool ' ठरला होता ...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1517
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया