मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिकेट रेकॉर्ड - माझी ही एक जिलबी - भाग १ ...

चौकटराजा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत जे जे दारूण पराभव झाले त्यात एक निकष असा धरला की १ डाव व दोनशे धावा अशा किंवा यापेक्षा जास्त दारूण पराभव स्वीकारण्याचे पातक कोणी किती केले आहे ? तर खालील प्रमाणे माहिती मिळते... ऑस्ट्रेलिया - ५ वेळा भारत - ७ वेळा विण्डीज ५ वेळा इंग्लन्ड ४ वेळा बांगला देश ७ वेळा द आफिका २ वेळा पाकिस्तान १ वेळा न्युझीलण्ड ३ वेळा झिम्बाब्वे ६ वेळा श्रीलंका ३ वेळा यात भारताचा जास्तीत जास्त वेळा असा पराभव कोणी करावा ? परम्परागत शत्रू पाकिस्तानने की एके कालच्या बलाढ्य विन्डीजने की सदा सामर्थ्यवादी ऑसीसने .... ? उत्तर आहे ७ पैकी चार वेळा इंग्लंडने . नेव्हील कार्डस म्हणत असत स्कोर बोर्ड हा गाढव असतो. त्याकडे कानाडोळा करून काही निष्कर्श. १. पाकिस्तान मधे खरोखरच किलर इंस्टिन्क्ट आहे. २. द आफिका बरेच वर्ष वाळीत टाकलेले असल्याने त्यांच्या फक्त २ आकड्यामुळे त्यांची वाहवा करायचे कारण नाही. ३. ऑसीसचे पराभव ५ पैकी ३ इंग्लंडने केले आहेत ते १९३८ पूर्वी. ४. श्रीलंकेचे ३ पराभव आहेत सबब ते किलर म्हणून कौतिकास पात्र ठरावेत. ५. बांगला देश व झिम्बाब्वे कमी क्रिकेट खेळूनही अधिक प्रमाणात दारूण पराभव स्वीकारलेले आहेत.

वाचने 1552 वाचनखूण प्रतिक्रिया 4

गामा पैलवान Mon, 02/13/2017 - 00:45
चौरा, हे दारुण पराभव घडवून आणणारे संघ कोणते? बक्कीने किती घडवून आणले? इत्यादि आकडेवारी वाचायला आवडेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकटराजा Mon, 02/13/2017 - 18:14
इन्ग्लन्ड १५ वेळा ऑस्ट्रेलिया ९ वेळा विन्डीज ४ वेळा पाक २वेळा न्यूझीलंड २ वेळा श्रिलंका ६ वेळा भारत २ वेळा द आफिका ५ वेळा सर्वात मोठा पराभव -जेता इन्ग्लंड- पराभूत ऑस्ट्रेलिया - १ डाव व ५७९ धावा चक्क. सर्वात लहान पराभव -जेता ऑस्ट्रेलिया पराभूत इन्ग्लंड- १ डाव व २०० धावा. भारताच्या मोठ्यात मोठ्या दारूण पराभवाचे कारण - सामना १ रोहन कन्न्हाय द्वोशतक गिल्ख्रिस्ट ९ विकेटस सामना २ -डेनिस अमीस १८८ ख्रिस ओल्ड ९ विकेट्स सामना ३ -जो रूट १४९ जोर्डन ६ विकेट्स सामना ४- ऑलिस्टरकुक २९४ , अ‍ॅन्डरसन व ब्रोड ६/६ विकेट्स