‘राणी……! '
तिने फक्त आपल्या ओल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिलं .
‘मला ना तुझ्या पायाचे हे ठसे बुजवायचे नाहीत!
'ये ना यार’
'हो, येते! अन ती त्याच्या पायाच्या ठश्यावर पाय देत चालू लागली . तिच्या पायांना जणू स्वर्गसुख लाभत होत , तिला त्याच्या पायाचे ठसे तोडायचे नव्हते ! अन ती शेवटी त्याच्याजवळ पोहोचली .
‘बघ, जात वेगळी असली तरी आपण असंच एकत्र राहू - अन तिच्या डोळ्यात एक हसू उमललं!
क्षणातच , त्यांच्या पायाला मोठ्या लाटेचा झटका बसला ! तिने घाबरून मागे बघितले .
त्यांच्या एकजीव पायांचे ठसे लाटेने वाहून नेले !
दोघांनी एकमेकांकडे पहिले अन दोघांचेही डोळे पाझरु लागले !
वाचने
2537
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही कुठल्या फोटोवरची कथा आहे?
बहुतेक समुद्र किनारा
चांगली आहे
+१
मस्त