आपुलकी, जिव्हाळा, दया, माया आणि आल्हादाच्या रेशमी धाग्यांनी नटलेली वास्तू म्हणजे आपले घर असते. अशा घरास गंगेचे पावित्र्य लाभलेले असते. माझे घर छोटे आणि दोन मजली आहे. वरच्या घरात एका कोपऱ्यात माझी एक आवडती खास जागा आहे. ती म्हणजे माझे देवघर!
देवघरात मोजकेच देव आहेत. त्यात गणपती हे माझे आराध्य दैवत आहे आणि रेणुका देवी ही माझी कुलस्वामिनी आहे. या देवांची मी रोज उपासना करते. रोज तीन तासांची माझी उपासना असते. सुख दु:खाला मोकळीक करून देण्याची ही माझी जागा आहे. देवघरात गणपतीची छोटी आणि सुबक अशी मूर्ती आहे. त्याची मी आवर्तने करते. तसेच देवघरासमोर मी ध्यान धारणा करते. त्यामुळे मला शांती लाभते. त्यामुळे जीवन जगण्याची स्फूर्ती येते आणि जीवन जगण्याला उभारी येते आणि एक प्रकारचे स्थैर्य अनुभवास येते. आपण एक लक्षात घेतले पाहिजे की भक्तीशिवाय जीवनाला रंग नाही. भक्ती करून मन शुद्ध होते. मग त्या मनात ईश्वराचे प्रतिबिंब पडते आणि जीवनात अनेक चांगले अनुभव येतात आणि ईश्वरावरील श्रद्धा आणखीनच दृढ होते.
समर्पणवृत्ती आणि सात्विक भाव परावर्तीत होण्यासाठी ही जागा म्हणजे देवघर खूप चांगली आहे. उपासना करतांना आपण जी नामजपाची आणि मंत्रांची आवर्तने करतो त्यातून ज्या ध्वनिलहरी उप्तन्न होतात त्यामुळे मनाला नक्की स्फूर्ती आणि शांतता मिळते, हे नक्की! अशा या पवित्र कोपऱ्यातमी सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळेस रमते.
गणपतीच्या सहवासात असल्याने आपल्या अंगी नम्रता येते आणि अंगी विनयशील वृत्ती बाणावते. तसेच आपला अहंकार दूर होतो. २५ वर्षे साधना करून पवित्र झालेला हा कोपरा मला नवचैतन्य प्राप्त करून देतो. कोपराच नव्हे तर संपूर्ण परिसर पवित्र होतो. श्रद्धेमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे, "अनन्य भावाने जो मला (म्हणजे सर्वोत्तम परमेश्वराला) शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवतो! इतर कोणाही देवाची उपासना केली तरी ती मलाच पोहोचते!" हे लक्षात घ्या की, "न मी भक्तं प्रणश्यति" अशी गोपाळकृष्णाची आन आहे.
साधना करून मला जो आनंद मिळतो त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही. "आनंदाचे डोही, आनंद तरंग!" देणारी अशी ही माझी स्फूर्तीदायी जागा आहे.
- लेखिका: शरयू वसंत वडाळकर, मालेगाव, जि. नासिक
वयः ६६
याद्या
3268
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
छान लिहिलेय. पुलेशु.
लेखमालिका सुरू केली का ?
छान लिहीला आहे निबंध.
मुपी वाटतोय का?
In reply to छान लिहीला आहे निबंध. by सतिश गावडे
भारी !
In reply to मुपी वाटतोय का? by संजय पाटिल
चांगलं लिहिलंय. माझ्या घरातील
मोजकं पण तळापासून
सहमत. अगदी साध्या शब्दांत पण
In reply to मोजकं पण तळापासून by गामा पैलवान
दोन्ही माझीच नावं!
In reply to मोजकं पण तळापासून by गामा पैलवान
मनापासून लिहिलंय
.
In reply to मनापासून लिहिलंय by पैसा
बर्याच काळज्या आणि कटकटी दुसर्याकडे ट्रान्सफर करून निवांत रहाता येतं.बालपणी बहुतेक जण देवाला परीक्षेत पास करायला सांगतात.आणि थोडं मोठं झाल्यावर
In reply to . by संजय क्षीरसागर
सगळ्यांनाच नाही कळत
In reply to आणि थोडं मोठं झाल्यावर by संजय क्षीरसागर
स्थलकालातीत
"न मी भक्तं प्रणश्यति"
म्हणजे
In reply to "न मी भक्तं प्रणश्यति" by सूड
नाही, म्हणजे ही भाषा कोणती
In reply to म्हणजे by संजय क्षीरसागर
ओके
छान लिहिलंय...