दिवस पहिला:
"आज वेळ आहे थोडा? बोलायचय"
"आज खूप काम आहे, उद्या बोलूया नक्की"
"ओके"
दिवस दुसरा:
रिंग रिंग
रिंग रिंग
रिंग रिंग
"कुठे गायब, कधीची फोन करतीये"
दिवस तिसरा:
"अरे काल अचानक पार्टी ठरली ऑफिसमधे"
"ओके, अजून काही?"
"अजून काही नाही, चल आवरतो, खुप काम आहे"
"के बाय"
"बाय"
दिवस चार:
......
दिवस पाच:
......
दिवस सहा:
व्हाट्सएप्प फॉरवर्ड
व्हाट्सएप्प स्माइली
"आज माझा बड़े आहे"
"मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ़ द डे, थांब फोन करतोय"
"नको नको घरच्यां बरोबर बाहेर आलीये"
"ओके, एन्जॉय"
"थैंक्स बाय"
दिवस सात:
.......
दिवस आठ:
.......
दिवस नऊ:
"आज बोलू शकते"
"मला अजून अर्धा तास आहे घरी पोचायला, तू करतेस का मी करू?"
रिंग रिंग
"हां बोल"
"काही नाही"
"बोलायच होतं ना तुला?"
"तू सुरुवात कर मग मी बोलते"
"काय करतीये?"
"बाहेर आलीये"
"ऑफिस नाही?"
"तुझ्याशी बोलायच म्हणून बाहेर आलीये ऑफिसमधून"
"हं काय केल मग बडेला?"
"काही नाही फ्रेंड्स बरोबर पार्टी"
"गुड, तू बोल ना तू काय बोलतच नाही"
"आता सूचत नाहीये, नंतर करते परत फोन बाय"
"बाय"
दिवस दहा:
"ए कसले पांचट जोक पाठवतो"
"नको पाठवू?"
"......."
दिवस अकरा:
.......
दिवस बारा:
.......
दिवस तेरा:
"बोलणार नाही?"
"खुप काम पडली आहेत"
"ओके बाय"
"बाय"
दिवस चौदा:
......
दिवस पंधरा:
"तू कसा आहेस?"
"मस्त"
"तुझ काय चालु आहे?"
"काही नाही कंटाळा आलाय"
"चल मी निघतोय ऑफिसला"
"के बाय"
"बाय"
व्हाट्सएप्प फॉरवर्ड
व्हाट्सएप्प फॉरवर्ड
दिवस सोळा:
आता सुरु झाला आहे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3566
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवक एक आढवण अश्रु शेवट
प्रतिसादासाठी धन्यवाद , आठवण
In reply to आवक एक आढवण अश्रु शेवट by नीळा
_
वाचकानी आपल्याला हवा तसा शेवट
In reply to _ by जव्हेरगंज
आठवण च म्हणायचे होते
धन्यवाद.
आवडलं...!
कमाल आहे!!
15 दिवस. फकस्त हाय आन बाय..
छान, शेवट केला असता तर अजून
साधारण वय २५ ते २७? अजून
अर्रर्रर्रर्र लैच तुफान आवडलं
आणि पटकन कनेक्ट पण झालं.
In reply to अर्रर्रर्रर्र लैच तुफान आवडलं by महासंग्राम
धन्यवाद सर्वाना