✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हर्बल टी

प
प्रकाश घाटपांडे यांनी
गुरुवार, 05/19/2016 - 09:08  ·  लेख
लेख
मी एकदा गांधीभवन कोथरुड ला निसर्गोपचार आश्रमात एक व्याख्यान ऐकायला गेलो होतो. तिथे पाहुणचार म्हणून मला हर्बल टी दिला. मी प्रथमच तो घेतला. प्यायल्यानंतर तो चांगला वाटला. हा हर्बल टी नेमका काय प्रकार आहे? तो कसा करायचा? तो कुठे मिळतो?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी

प्रतिक्रिया द्या
6293 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

हर्बल टी चे विविध प्रकार

स्पा
गुरुवार, 05/19/2016 - 09:17 नवीन
हर्बल टी चे विविध प्रकार असतात. दुधासहीत, दुधरहीत साखरेसकट,साखररहीत चहापावडर मिक्स असलेले ,चहा पावडर नसलेले फुलांच्या फ्लेवर चे (मोगरा,जाइ, जुइ,चमेली इ.इ) ऒषधी वनस्पती टाकलेले, देशी,विदेशी थोडक्यात आपण ज्याला काढा म्हणतो, तोच विंग्रजितला हर्बल टी तुम्ही स्वतःही घरी बनवू शकता.
  • Log in or register to post comments

मी घेतलेला दुधाशिवाय होता.

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 05/19/2016 - 09:24 नवीन
मी घेतलेला दुधाशिवाय होता. ग्रीन टी व हर्बल टी एकच का? कि वेगळे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ग्रीन टी म्हणजे चहाची प्रोसेस

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 09:25 नवीन
ग्रीन टी म्हणजे चहाची प्रोसेस न केलेली (ऑक्सिडाईज न केलेली) हिरवी पाने. ती वरचेवर खुडून तशीच पॅक केली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

होय ग्रीन टी आणि हर्बल वेगळे

स्पा
गुरुवार, 05/19/2016 - 09:33 नवीन
होय ग्रीन टी आणि हर्बल वेगळे ग्रीन टी मध्ये चहा असतोच हर्बल मध्ये नसतो किंवा अगदी नगण्य मात्रेत असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कुठे मिळतो? (अज्ञानी)

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 05/19/2016 - 09:39 नवीन
कुठे मिळतो? (अज्ञानी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कुठल्याही किराणा दुकानात

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 09:40 नवीन
कुठल्याही किराणा दुकानात किंवा डी मार्ट्/बिग बझार अशा सुपरस्टोअर्स मध्ये दोन्ही प्रकार मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मात्र प्युअर ग्रीन टी अतिशय

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 09:41 नवीन
मात्र प्युअर ग्रीन टी अतिशय कडवट असतो. मध घालूनच प्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हर्बल

नाखु
गुरुवार, 05/19/2016 - 14:23 नवीन
रामदेव्बाबा उत्पादन विक्री केंन्द्रात मिळेल त्यांचा किंवा श्री श्री रविशंकर यांचा तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गणेशपुरी

कवितानागेश
Fri, 05/20/2016 - 19:06 नवीन
गणेशपुरीला मस्त मिळतो. चहा नसलेला आणि भरपूर तुळस घातलेला. थोडा गूळ घालून छान लागतो. मी एकदाच भरपूर आणून पुरवून पुरवून वापरतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

फिटनेस चे फॅड बोकाळल्याने

स्पा
गुरुवार, 05/19/2016 - 09:42 नवीन
फिटनेस चे फॅड बोकाळल्याने हल्ली अगदी वाण्याच्या दुकानात सुद्धा डीप डीप वाले हर्बल / ग्रीन टी मिळतात, शक्यतो चांगल्या कंपनीचे घ्यावेत. आॅनलाइन देखिल मिळतात. बिगबझार/ डी मार्ट सारख्या ठिकाणी अनेक वरायटि उपलब्ध आहेत -- कटिंग प्रेमी स्पा
  • Log in or register to post comments

आमच्या हापिसात ४-५ प्रचंड

सतिश पाटील
गुरुवार, 05/19/2016 - 12:53 नवीन
आमच्या हापिसात ४-५ प्रचंड जाडजूड असलेल्या व्यक्ती दिवसभर हे ग्रीन टी घेऊन नाचत असतात. एके दिवशी विचारल्यावर त्यांनी मला प्रचंड ज्ञान दिले कि हे प्यायल्याने वजन आटोक्यात येते वेगैरे वेगैरे.. २ वर्ष झाली तरी मला यांच्या दिसण्यावरून तरी त्यांच्या वजनात काही फरक जाणवला नाही. काढ्याला चहाचे नाव दिले म्हणून या कंपन्यांचा निषेध. -- हापिसात शी शी डी असून देखील त्याकडे ढुंकून न बघणारा आणि बाहेर जाऊन कटिंग पिणारा आणि रोज acidity च्या गोळ्या खाणारा सतिश पाटील.
  • Log in or register to post comments

=)) प्रचंड ज्ञान!!!

असंका
गुरुवार, 05/19/2016 - 16:27 नवीन
=)) प्रचंड ज्ञान!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

ग्रीन टी च्या टी बॅग्स वापरु

पद्मावति
गुरुवार, 05/19/2016 - 14:06 नवीन
ग्रीन टी च्या टी बॅग्स वापरु नये. केट्ल मधे ग्रीन टीची पाने ( loose tea) टाकावी त्यावर गरम पाणी ( पाणी उकळायच्या तापमानापर्यंत जाऊ देऊ नये) ओतावे. हलका रंग आल्यावर प्यावा. ग्रीन टी चे वजन कमी होण्यापेक्षा बाकी फायदे जास्ती आहेत ( anti oxidents). वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पेक्षा ऊलॉंग टी चा फायदा जास्ती होतो.
  • Log in or register to post comments

टी लीफ इनफ्यूज़र टीपॉट्स -

पद्मावति
गुरुवार, 05/19/2016 - 14:13 नवीन
टी लीफ इनफ्यूज़र टीपॉट्स - ग्रीन टी, ऊलॉंग टी किंवा कुठल्याही हर्बल टी करता हे टीपॉट्स उपयोगी असतात.
  • Log in or register to post comments

हर्बल टी याचे दोनतीन प्रकार

कंजूस
Fri, 05/20/2016 - 05:48 नवीन
हर्बल टी याचे दोनतीन प्रकार धरायला हरकत नाही.एकात फक्त चहाची पानेच वापरतात आणि दुध ,साखर याचे पर्याय वापरतात.दुसय्रात चहापानांशिवाय इतर दालचिनी वगैरे टाकतात.तिसय्रात चहापानेच नसतात त्याऐवजी निरनिराळे हर्बच /औषधी/सुगंधी वनस्पती वापरतात.दुध अधिक साखर वापरणे न वापरणे हे सर्वांतच ऐच्छिक असते. तिसय्रा पद्धतीत मी बरेच प्रकार करून पाहिले आहेत.
  • Log in or register to post comments

गवती चहा व पेरुची पाने यांचा

भीमराव
Fri, 05/20/2016 - 16:44 नवीन
गवती चहा व पेरुची पाने यांचा सुद्धा च्या करतात, पन हा हर्बल मधे काऊंट होतो की नाही माहीत नाय
  • Log in or register to post comments

आपण करु हो काउंट फिकिर नाॅट

स्पा
Fri, 05/20/2016 - 19:12 नवीन
आपण करु हो काउंट फिकिर नाॅट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

हर्ब्सजला नेमका मराठी

प्रचेतस
Fri, 05/20/2016 - 19:13 नवीन
हर्ब्सजला नेमका मराठी प्रतिशब्द काय? (औषधी वनस्पती)?
  • Log in or register to post comments

बहुदा जड़ीबूटी, वनौषधी??

पद्मावति
Fri, 05/20/2016 - 21:27 नवीन
बहुदा जड़ीबूटी, वनौषधी??
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण

विकास
Fri, 05/20/2016 - 21:37 नवीन
"वनस्पती चाय पे चर्चा" ;) येकदमच माहितीपूर्ण आहे! गवती चहा पण हर्बल चहाच असतो की हो! हर्बल असतो का ते माहीत नाही, पण काश्मिरी चहा पण चांगला असतो! उकळत्या पाण्यात अगदी चिमूटभर टाकावा लागतो नाहीतर कडवट होतो. नंतर त्यात काश्मिरी लोक्स थोडाफार सुकामेवा अथवा तत्सम घालून "शाही" बनवतात... हर्बल चहा पण उकळत्या पाण्यात थोडाच घालावा.
  • Log in or register to post comments

काढा म्हणजे कोणत्याही औषधी

सुबोध खरे
Sat, 05/21/2016 - 13:01 नवीन
काढा म्हणजे कोणत्याही औषधी वनस्पतीची पाने उकळून तयार केलेला अर्क चहा हे पेय पारंपारिक व्याख्येप्रमाणे Camellia sinensis या चहाच्या झाडाच्या कोवळ्या पानांचा केलेला काढा. शिवाय चहा (किंवा कॉफी) पिण्याचे मूळ कारण त्यात असलेले कॅफीन हे द्रव्य. या द्रव्यामुळे आपला मेंदू तरतरीत होतो आणी अधिक क्षमतेने काम करू लागतो. https://en.wikipedia.org/wiki/Caffeine चहाचे अनेक प्रकार आहेत परंतु आपल्याला सर्वात जास्त परिचयाचे म्हणजे पांढरा चहा, ग्रीन किंवा हिरवा चहा, उलॉंग चहा, ब्लैक किंवा काळा हा आपण रोज पितो तो चहा आणी पाचवा म्हणजे हर्बल किंवा वनौषधी चहा. खरं तर हर्बल टी किंवा वनौषधी चहा म्हणण्याला काहीच अर्थ नाही. कारण यात चहाची पाने नसतातच आणी त्यामुळे यात कॅफीनहि नसतेच. याला खरं तर काढाच म्हणायला हवे. ज्यांना संध्याकाळी/ रात्री "चहा" पिऊन झोप येत नाही अशा लोकांनी हा "चहा" घ्यावा. या "चहा" त गवती चहा पात, आलं, दालचिनी, लवंग, पुदिना, हळद, जास्वंद अशा अनेक वनौषधी वापरल्या जातात आता आपण प्रत्यक्ष चहा कडे वळू. पांढरा चहा चहाची कोवळी पाने तोडली आणी त्यावर जवळ जवळ कोणतीही प्रक्रिया न करता नुसतीच वाळवून घेतली आणी त्याचा चहा बनवला तर यात कॅफीन नसतेच आणी ANTI OXIDANT द्रव्ये भरपूर असतात. पण याला कळत नकळत/ फिकट चहाचा स्वाद असतो. यानंतर येतो हिरवा/ग्रीन टी हा थोडीशीच (OXIDATION) प्रक्रिया केलेला असतो आणी त्यामुळे यात कॅफीन १ % इतके कमी असते. अजून जास्त प्रक्रिया केल्यास तो उ लॉंग चहा होतो ३-४ % कॅफीनचे प्रमाण आणी पूर्ण प्रक्रिया केल्यास काळा चहा होतो ८-१२ % कॅफिन जाता जाता हिरवा चहा किंवा काळा चहा याचे आरोग्यासाठी मिळणारे लाभ हे सारखेच असतात. ग्रीन टी म्हणून त्यात ANTIOXIDANT जास्त असतात असे नाही. ग्रीन किंवा हर्बल चहा मुळे वजन कमी होते हि अंधश्रद्धा आहे. हा विषय फारच मोठा आहे आणी यासाठी एक पूर्ण लेखच लिहावा लागेल.
  • Log in or register to post comments

मी डॉ जयस्वाल निसर्गोपचार

प्रकाश घाटपांडे
Sat, 05/21/2016 - 13:27 नवीन
मी डॉ जयस्वाल निसर्गोपचार केंद्र गांधीभवन कोथरुड यांना भेटलो व त्यांच्याकडून तो हर्बल टी घेतला. एका कपासाठी पाव चमचा पाण्यात टाकून उकळायचा व त्यात थोडा गूळ टाकायचा. काल प्रयोग केला. चांगला लागला. पण बायकोला फार आवडला नाही. ती अट्टल चहाडी आहे. या लोकांना तो 'नीट' चहाच लागतो.
  • Log in or register to post comments

हर्बल काॅफी मिळते का कुठे ?

सस्नेह
Sat, 05/21/2016 - 16:06 नवीन
हर्बल काॅफी मिळते का कुठे ? किंवा चहाचा स्वाद अगर वास मुळीच नसणारा हर्बल चहा ? किंवा वजन कमी न करणारे हर्बल पेय ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा