✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वेगानी पसार

स
सुजल यांनी
गुरुवार, 04/21/2016 - 01:05  ·  लेख
लेख
"नारिता" एयरपोर्ट वर एजंट माझ्या नावाची पाटी घेऊनच उभा होता त्यामुळे त्याला ओळखण सोप्प गेल. मी त्याला माझी ओळख पटवून दिली आणि "तुडतुड्या" चालीने त्याने माझ्या ब्यागा उचलल्या आणि पूर्णपणे आम्ही एयरपोर्ट च्या बाहेर. ताबडतोब त्याने योकोहामा पोर्ट ला जायला ट्याक्सी बुक केली आणि पाच मिनिटात ट्याक्सी हजर. पटापटा त्याने ट्याक्सीत सामान ठेवलं आणि ट्याक्सीचा पुढचा दरवाजा उघडून माझ्या स्वागतार्थ वाकून वाकून त्यांच्या पद्धतीने नमस्कार केला.मला तर पूर्ण पणे गडबडायला झाल. तो इतका वाकून वाकून मला नमस्कार करत होता तर आता आपण पण त्याच्या समोर असाच वाकून वाकूनच नमस्कार करायचा का? असा विचार करण्यातच माझी दोन -पाच सेकंद गेली खरी पण कुठल्याही प्रकारे न वाकता मी भारतीय पद्धतीने नमस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि ट्याक्सीत ड्रायव्हर शेजारी बसले ( म्हणजे त्याचाच शेजारी) कारण ड्रायव्हिंग तोच करणार होता. रात्रीची बारा-साडे बारा वाजले होते.खर तर दिवसभराच्या दगदगीने झोप येत होती पण तरीही डोळे उघडे ठेऊन विस्फारून म्हणा हव तर ) टोकियो सिटीचे गुळगुळीत रस्ते न्याहाळत होते. मध्येच त्याने मला विचारलं " नरिता" एयरपोर्ट ते "योकोहामा" पोर्ट चा अंतर किती आहे माहित आहे का तुला ? आत्ता मला कस माहित असणार? काहीतरीच प्रश्न :) त्याने अगदी मोठ्या तोर्यात सांगितलं खूप आहे अंतर आणि एवढ अंतर मी तुला ड्राइव्ह करून नेत आहे.म्हणजे काहीतरी खूप मोठ्ठ करत आहे असा त्याचा सूर वाटला. मनात म्हटलं मी काय करणार? ते तुझ कामच आहे.गाडीत त्याने मंद आवाजात मुझिक लावलं होत.ते कानाला प्रचंड सुखद वाटत होत. खर पेंग येत होती पण जागी राहण्याचा आटोकाट प्रयत्न चालू होता . शेवटी शांतपणे २ ते ३ तासाचा प्रवास करून एकदाचे आम्ही योकोहामा पोर्ट वर पोचलो.पोर्ट चे सगळे सोपस्कार पार पाडून त्याने शिप च्या ग्यानग्वेवरून माझ्या दोन्ही ब्यागा दोन्ही हातात घेऊन जी काही पळायला सुरवात केली त्याला तोडच नाही. त्याला गाठता गाठता मला नाकी नऊ आली. अरे हळू हळू पण तो ऐकतोय कुठे ? मला तरी त्याच्या बरोबरीने अगदी एवढी धावायची आणि पळायची जरुरी होती का? पण नाही. मी पण मुर्खासारखी धावतेय त्याच्या बरोबरीने. आत्ता पर्यत माझी अशी फरफट कोणीच केली नसेल. ( हाहाहा ) . शेवटी एकदाचे पोचलो जहाजावर आणि मला क्याप्टन च्या केबिन मध्ये शिप वरच्या क्याप्टन च्या हाती सोपून कुठलीही उसंत न घेता उद्या सकाळी व्हिसाच्या कामाला जायचंय तयार राहा म्हणून सांगून हा ज्या वेगानी आला त्याच वेगानी पसार :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
3161 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

टांगा पल्टी घोडं फरार!

एस
गुरुवार, 04/21/2016 - 01:17 नवीन
टांगा पल्टी घोडं फरार!
  • Log in or register to post comments

सुरुवात चांगली

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/21/2016 - 01:43 नवीन
सुरुवात चांगली पण फारच थोडक्यात उरकलेलं दिसत आहे. ही लेखमालिका असणार आहे असे समजून चालतोय.
  • Log in or register to post comments

मालिका आहे का?

पैसा
गुरुवार, 04/21/2016 - 09:30 नवीन
मालिका आहे का? लिखाण आवडलं. अजून लिहा.
  • Log in or register to post comments

लिखाण आवडलं.अजून मोठा भाग

नूतन सावंत
गुरुवार, 04/21/2016 - 09:45 नवीन
लिखाण आवडलं.अजून मोठा भाग येऊदे.क्रमशः लिहायचं राहिलंय का?
  • Log in or register to post comments

काहीतरी कमी पडलंय यात...

असंका
गुरुवार, 04/21/2016 - 12:24 नवीन
काहीतरी कमी पडलंय यात... पण लिहिलंय ते चांगलं लिहिलंय. रच्याकने, पूर्णपणे आम्ही एअरपोर्टच्य बाहेर म्हणजे काय म्हणायचंय नक्की?
  • Log in or register to post comments

पूर्णपणे म्हणजे सगळ्या

सुजल
गुरुवार, 04/28/2016 - 13:26 नवीन
पूर्णपणे म्हणजे सगळ्या फोर्मलिटीज उरकून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

लेख आवडला.

उल्का
गुरुवार, 04/21/2016 - 12:32 नवीन
पुस्तक असते तर पान पलटुन बघितले असते. उत्कन्ठा वाढली आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

वेगानी पसार झालात तुम्ही तर..

उगा काहितरीच
गुरुवार, 04/21/2016 - 13:38 नवीन
वेगानी पसार झालात तुम्ही तर... ;-)
  • Log in or register to post comments

बुलेट ट्रेन

सुनील
गुरुवार, 04/21/2016 - 13:48 नवीन
असं आहे होय! मला वाटलं बुलेट ट्रेन प्रवासासंबधी काही असेल!! असो, ते क्रमशः दिसलं नाही शेवटी?
  • Log in or register to post comments

क्रमशः

प्रदीप
गुरुवार, 04/21/2016 - 14:05 नवीन
एका जुन्या लेखानंतर सतत येत असलेल्या 'पुढे काय झाले?' ह्या प्रश्नाचा आता येथील लेखकांनी इतका धसका घेतलाय, की ते असे 'ओपन' ठेऊन जातात! उग्गाच थाटात 'क्रमशः; वगैरे लिहायचं आणि मग पुढे लिहीण्याचं सुचत नसलं (कारण तसे खरे तर 'पुढे' काही सांगण्यासारखे नव्हतेच!) तर उगाच उत्कंठा वगैरे नको. नो कमिट्मेंट्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

कदाचीत

नाखु
गुरुवार, 04/21/2016 - 14:24 नवीन
एखाद्याने या लेखांचे पुढे काय झाले. (पक्षी कथा पुढे अशी असेल असे विडंबन टाकले तर मूळ लेखक येऊन धागापुर्ती करेल) असे वाटते. म्हणजे एखादा धाग्याचा पुढचा भाग एक महिन्यात नाही आला तर विडंबकाने/जोडकाम जुळ्यार्यांनी आपली कल्पनाशक्ती लावून दुसरा भाग खो-खो पद्धतीने लिहायचा. बरेच अडलेले-तुंबलेले भाग मार्गी लागतील. उदा :धमाली परावलंबी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

हे काय होते?

मृत्युन्जय
गुरुवार, 04/21/2016 - 17:10 नवीन
हे काय होते?
  • Log in or register to post comments

बरं मग ?

जव्हेरगंज
गुरुवार, 04/21/2016 - 21:44 नवीन
बरं मग ?
  • Log in or register to post comments

जव्हेरगंज मग काहीच नाही :)

सुजल
गुरुवार, 04/28/2016 - 12:45 नवीन
जव्हेरगंज मग काहीच नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मालिका नाहीये. अनुभव. असेच

सुजल
गुरुवार, 04/28/2016 - 12:43 नवीन
मालिका नाहीये. अनुभव. असेच छोटे छोटे अनुभव लिहिले आहेत :)
  • Log in or register to post comments

अरे काय!

चांदणे संदीप
गुरुवार, 04/28/2016 - 13:13 नवीन
वाचायला घेतला लेख तर वेगानी पसार झाला. =)) असो, पुलेशु! Sandy
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा