मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात. पण तरीही काही मूलभूत गोष्टी ज्या वाईट असतात हे सर्वमान्य आहे, त्या गोष्टीही लोकं अगदी समजून-उमजून करताना दिसतात तेंव्हा उद्विग्न व्हायला होतं. आणि तेवढंच करू शकतो आपण, याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा अजून जास्त उद्विग्न व्हायला होतं.
उदाहरणार्थ चोरी. चोरी म्हणजे एखादी वस्तू उचलून खिशातच टाकायला हवी असं नव्हे. चोर कृतीपेक्षा विचाराने आधी चोर होतो. कार्यालयीन जीवनात अशा चो-या अनेकदा बघायला मिळतात. कार्यालयीन चोर्यांची उदाहरणं म्हणजे, न केलेल्या मेडिकलच्या खर्चाची बिलं दाखवून त्या पैशाचा परतावा घेणे, बसने जाऊन टॅक्सीच्या बिलाचे पैसे घेणे, सेकंड क्लास ने प्रवास करून फर्स्ट क्लासचे पैसे घेणे, कंपनी मोबाईल बिलं भरते म्हणून त्या नंबरवरून बिनधास्त एसटीडी, आयएसडी कॉल करणे, इंटरनेट बेछूट वापरणे, इत्यादी.
'कंपनी देतेय!', 'पण मी एलिजिबल आहे' अशी स्पष्टीकरणं याबद्दल विचारणा केल्यास ऐकायला मिळतात. एलिजिबल आहे म्हणून टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे ९० रुपयांची चोरीच आहे. पण हे करणा-या माणसाला तो त्याचा हक्क वाटतो. इंग्लिशमधे एक शब्द आहे Integrity; तिचा अभाव या लोकांमधे असतो. चोरी पकडेपर्यंत जरी चोर चोर नसला, तरी त्याच्या मनाला ठाऊक असतं की तो चोर आहे. या लोकांनाही ते ठाऊक असतं, पण जगाला ते कसं बरोबर आहे हे पटवून द्यायचा त्यांचा अट्टाहास बघितला की कीव करावीशी वाटते. बरं, हे असं करणारी मंडळी बहुतेक वेळा बक्कळ पगार घेणारी मंडळी असतात, कमी पगारावर काम करणारे बहुतांशी या बाबतीत सज्जन असतात असं दिसतं. शेवटी जास्त मिळायला लागलं कीच हाव निर्माण होते, कमीच असतं तिथे फक्त गरज असते.
मला लाकूडतोड्याची गोष्ट आठवते अशी उदाहरणं बघितली की. तो सुद्धा सोन्याच्या, चांदीच्या कुर्हाडीसाठी एलिजिबल ठरलाच होता की!, पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला तो त्याचा 'हक्क' वाटला नाही. शेवटी वृत्ती असते एकेकाची, आणि ती अशा प्रसंगातून दिसते. असं चोरासारखं वागणार्या व्यक्तीने त्याच्या प्रमोशनची पार्टी अगदी 'हक्काने', दिलदारपणाचा आव आणून दिली तरी त्याचं कौतुक वाटत नाही. पण त्या व्यक्तीच्या १०% पगार असलेल्याने मुलगा पास झाल्याचे वाटलेले पेढेही कौतुकासाठी अधिक 'एलिजिबल' ठरतात.
'Everybody has a Right to Earn; but very few Earn it Right.'
ब्लॉग दुवा
मिपाकरांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
वाचने
27802
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
असमानांची लढाई आहे.
In reply to अगदी बरोबर by वेल्लाभट
या धाग्यात बर्याच लोकांच्या
सहमत !
In reply to या धाग्यात बर्याच लोकांच्या by सुबोध खरे
गोष्ट १ आणि २
ती पर्सनल दिवा अन सरकारी
In reply to गोष्ट १ आणि २ by विटेकर
थोडा सापेक्ष विचार पण हवा.
''Its my responsibility to
सहमत
आपल्याला कंपनी किंवा सरकार
लैच प्रॅक्टीकल आणि योग्य असा
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
टोटली
In reply to लैच प्रॅक्टीकल आणि योग्य असा by तर्राट जोकर
दळभद्री
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
मस्तच...
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
ढिश्क्यांव!!
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
छान
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
तीव्र सहमत. अलीकडे जेंव्हा
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
सहमत
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
काहींनी लावून धरलेली
आज माझी इज्जत गेली.
भारीच ना
...
In reply to भारीच ना by इरसाल
मी च एक शहाणा!
चोरी ..