मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुणे कट्टा २०१६ - रविवार २० मार्च २०१६ . पाताळेश्वर मंदीर , जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर पुणे ५

शान्तिप्रिय · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
।। जय शिवराय ।। मित्र मैत्रिणीनो येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती. कट्ट्यावर: १. सर्वांचा संक्षिप्त परिचय २. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा ३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ ४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा ५. अनौपचारिक गप्पा ६. बालगंधर्व कलादालनास भेट कट्टा यशस्वी करण्याचा प्रयत्न करुया. आपला शांतीप्रिय भ्रमणध्वनी - ९००४७४१२१५.

वाचने 30177 वाचनखूण प्रतिक्रिया 117

नाखु Mon, 03/14/2016 - 15:11
सोयीची जागा आहे. :)
सोयीच्या जागी आठवणींची असं वाचलं आणि ........ बाकी अभ्या बोर्ड करताना आम्ची कुठेही शाखा नाही, असे नाही ,असे नक्की नाही, असे समजू नका. हे लिहिणे.

भाऊंचे भाऊ Mon, 03/14/2016 - 15:13
- 1. आधार कार्ड 2. मतदान ओळखपत्र 3. ड्राइविंग लैसेंस 4. शाळा सोडल्याचा दाखला 5. राशन कार्ड 6. रहीवासी दाखला 7. 7/12 उतारा 8. शाळा/ कॉलेज/ कंपनी/ संस्थेचे ओळखपत्र इ. ** ;)

In reply to by भाऊंचे भाऊ

चौथा कोनाडा Mon, 03/14/2016 - 15:46
अहो, भाभासाहेब, ब्लडग्रुप वैद्यकिय प्रमाणपत्र अन विजय मल्ल्यायांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत असे कोणत्याही नॅशनलाईझ बॅंके चे प्रमाण पत्र हे राहिलेच की ! हौ द्या कट्ट्याच्या धाग्यात धुराळा!

In reply to by सूड

प्रचेतस Mon, 03/14/2016 - 18:22
तिसरा कशास निघेल? त्यांनी अगदी वेळ, तारीख, ठिकाण अगदी सुस्पष्ट लिहिलंय. इतर चर्चेस वावच नाही. मी तर येणारचे.

In reply to by मुक्त विहारि

सूड Tue, 03/15/2016 - 14:09
अगदी, एका धाग्यात ठरेल तो कट्टाच काय!! कटट्याचे काही खरे नाही, आमच्या वेळी असं नव्हतं बरं!!

In reply to by अभ्या..

कपिलमुनी Tue, 03/15/2016 - 15:38
सासवड सध्या फेमस आहे. लौकरच सिंहगड रोड ते सासवड मेट्रो सुरू करावी अशी मागणी आहे. तर मुख्यमंत्र्यांनी सासवड लाच विमानतळ होणार असून त्याचे नाव दु दु विमानतळ ठेवणार आहे असे कळवले आहे.

In reply to by तुषार काळभोर

अभ्या.. Tue, 03/15/2016 - 16:49
पीपीडिओपी येरपोर्ट. ;) हाय का कोन पीपीडीओपी हाय का कोन पीपीडीओपी . (अध्यक्षः अ.पु.सा.ह.टमटम चालक मालक संघटना)

कलंत्री Mon, 03/14/2016 - 16:04
२० मार्चच्या कट्ट्याला शुभेच्छा. मिपाच्या सभासदांशी चर्चा / गप्पा / मतभिन्नता या सगळ्यात एक आगळी वेगळी मजा असते. येणार.....

रेवती Tue, 03/15/2016 - 04:16
ऑफ बीत काळीज गलबलले की हो! ;) (आम्हाला येता येणार नसल्याने चुका काढण्याचा क्षीण प्रयत्न, बाकी कै नै!)

In reply to by अजया

मुक्त विहारि Tue, 03/15/2016 - 08:56
जरा थांबा.... अज्जून २ धागे येतीलच. "जागेवरून सूचना" ह्याबद्दल एक धागा आणि "वेळ" ह्या बाबतीत मात्र नक्कीच यायला पाहिजे. (हे पुणेकर तसे वेळेच्या बाबतीत पक्के हां. सकाळी ९ची वेळ दिली की. दुपारी १२-१ पर्यंत जमतात.)

In reply to by यशोधरा

मुक्त विहारि Tue, 03/15/2016 - 15:54
यांबूकर, डोंबूकर आणि झालच तर पिंचिकर, सिगकर (सिंहगडकर) पुणेकरांच्या कट्ट्याच्या धाग्यावर लक्ष ठेवून असतात. असली पुणेकर दुपारी १ ते ४ झोपतो.त्याला सुखाची झोप मिळावी म्हणून दुकाने पण बंद ठेवली जातात. तसेच, पुणे कट्ट्याचे किमान ३ धागे निघाले तरच नीट आयोजन होते. एका धाग्यात कट्ट्याचे आयोजन, हे पुणेकरांना जमले तर उत्तम.म्हणजे पुणेकर आता उणेकरांसारखेच आयोजन करायला लागले, असे म्हणता येईल.

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा Tue, 03/15/2016 - 16:19
तोडा फोडा नीती वापरून बघताय काय? वापरा, जमायचे नाय आणि उपयोग पण नाय.काय? =))

In reply to by यशोधरा

मुक्त विहारि Tue, 03/15/2016 - 16:37
अजिबात नाही.... पुण्यात कट्टा असेल तर....पिंपरी-चिंचवडकर नाराज. सिंहगडरोडला कट्टा ठेवला तर, पुणेकर नाराज. पिंपरी-चिंचवडला कट्टा ठेवला तर, सिंहगडरोडवाले नाराज. ते हडपसरला राहणारे, एक्का काका मात्र पुणे परीसरातील बर्‍याच कट्ट्यांना हजेरी लावू शकतात. असो, पिंपरी-चिंचवडवाल्यांनी, हे पुणेकर, कट्ट्याला येत नाहीत, म्हणूनच वेगळी "मनपा" स्थापन केली असावी, असा संशय आहे. आता ह्याच न्यायाने बहूदा, सिहगड मनपा, कोथरूड मनपा, हडपसर मनपा पण स्थापन झाल्या तर नवल नाही.

In reply to by यशोधरा

मुक्त विहारि Tue, 03/15/2016 - 19:17
कट्ट्याला हजर राहता येत नाही ही खंत.... ती काढून टाकयाला इनो पेक्षा डोंबूत अज्जून एखादा कट्टा करणे योग्य.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मुक्त विहारि Wed, 03/16/2016 - 10:40
कशाला? त्यापेक्षा आम्हीच तिखट-मिठाचे चिरोटे घेवून येतो की. मस्त चिरोटे खाऊ, चहा पिवू आणि वल्ली बरोबर पाताळेश्र्वरची लेणी बघू.

In reply to by मुक्त विहारि

बोका-ए-आझम Wed, 03/16/2016 - 11:45
या निमित्ताने एक डोंबिवली-कळवा-ठाणे-पनवेल-मुंबई-नवी मुंबई असा कट्टा होऊन जाऊ दे. नंदी पॅलेस त्याचसाठी बांधलंय ना जगन्नाथ पाटलांनी!

मुक्त विहारि Tue, 03/15/2016 - 17:00
१. सर्वांचा संक्षिप्त परिचय ===> किती वेळ? कारण एक्का काका आणि प्रचेतस ह्यांचीच संक्षिप्त माहिती दोन-दोन तास चालते. २. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा ====> ??????????? ह्यावर तर धाग्यांवर धागे निघतात आणि तरी पण अज्जुन काही एकमत होत नाही.ही चर्चा बरीच वेळखाऊ असल्याने, तुम्ही पुढील कार्यक्रम करण्याची शक्यता फारच कमी. तरीही त्या शंका विचारून घेतो. ३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ ====> इथे नक्की काय खाणार? पाणीपुरी (कुठल्या गाडीवर?), भेळपूरी (कुठल्या गाडीवर?), पावभाजी कुठल्या हॉटेलांत, ह्या अशा मार्मिक चर्चा करता-करता दुसरा दिवस उजाडेल. ४. पुण्यातील ऑफ बीट ठीकाणांबद्दल चर्चा ====> ही खाता खाता करायचीच गोष्ट आहे.कारण पुणेकर अशा ठिकाणांबद्दल फक्त चर्चाच करतो. ५. अनौपचारिक गप्पा =====> २ मराठी माणसे भेटली की त्या होताततच. ६. बालगंधर्व कलादालनास भेट. =======> कशासाठी? आम्हा उणेकरांच्या शंकाच फार.

In reply to by सूड

नाखु Tue, 03/15/2016 - 18:17
आधी फक्त संशय होता मुवींना विजुभाऊ भेटले असतील (इतक्यातच आणि पार्टी पण दिली असावी) अता खात्रीच पटली आहे. पुण्यातल्या+कोल्हापुरच्या+(घारापुरी) मुंबईच्या कट्ट्यालाही हजर राहणारा सख्खा पुणेकर शेजारी.

In reply to by नाखु

मुक्त विहारि Tue, 03/15/2016 - 19:19
तुम्ही हजर असणारच.... पण पार हडपसर पासून डॉ. म्हात्रे येतात. पण पुण्यातले मिपाकर जवळपास जायला तयार होत नाहीत, ह्याचे कौतूक वाटते.

शान्तिप्रिय Tue, 03/15/2016 - 17:14
मुद्द्याचं बोलुया जे मिपाकर येणार आहेत त्यांनी त्यांची हरकत नसल्यास आपला भ्रमणध्वनि व नाव (मिपावरील नाव ) माझ्या भ्रमणध्वनिवर लघुसंदेश करुन कळवावा.