वेळ : आणीबाणीची
काळ : प्यायला उठलेला
स्थळ : जागतिक खंड्या पक्षी पालक श्री श्री विजु भौ
आपल्या भव्य राज प्रासादात चकरा मारताना
विजु भौ : ए कोण आहे का रे तिकडे ???? इकडे आमचा ग्लास रिकामा झाला तरी कोणाच लक्ष नाही. खंड्या ग्लास भर माझा जरा, श्या आजकाल बियर पण गोड लागत नाहिये....
खंड्या : ओ बाबा ते नाही जमणार आता!!!!
विजु भौ : (बुचकळ्यात पडून) का म्हणून ??? का म्हणून नाही जमणार, हाय रे दैवा काय आमच नशीब
ज्यांना आम्ही मोठ करण्यासाठी दिवसाची रात्र करू खस्ता खाल्ल्या.
जिथे पाण्याची बियर करून समस्त तहानलेल्या जनतेची तृष्णा भागवली ते हे दिवस पाहण्यासाठी. अरे हेच का ते अच्छे दिन. एवढे अत्याचार सहन नाही होत रे आता. उचल रे देवा आता मला उचल आणि नेऊन टाक गोव्यात.
खंड्या : पपा, तुम कायको टेंशन लेरे मै हूँ ना !!
विजु भौ : तू आहेच म्हणून तर टेंशन आहे रे बाळा, जेव्हा पासून तू उद्योगात् लक्ष घातलं, माझं आयुष्यातलं लक्ष उडून जायची पाळी आली आहे.. इथून जायलाच हवं आता, पण जाणार कुठे सगळ्या देशात हिच बोम्बाबोम्ब आहे
खंड्या : डोंट वरी पपा मी एक ठिकाण शोधुन काढलंय जिथे आपल्याला कोणी कोणी काही नाही करू शकणार
विजु भौ : कुठे ते ???
खंड्या : त्या रवी अंकल नी किनै यमुनेच्या तिरावर एक सांस्कृतिक महोत्सव भरवला आहे. तिकडे ते
'Art of leaving' शिकवतात आहे म्हणे !!!
वाचने
4800
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके हे डेक्कन पुस्तकाच्या
भाऊ
In reply to ओके हे डेक्कन पुस्तकाच्या by भाऊंचे भाऊ
त्यांनी "ब्रिटीश नंदीं"ची कॉपी मारलीय पण..
In reply to भाऊ by महासंग्राम
कथाबिज छान होतेच पण पुरेसे न
In reply to त्यांनी "ब्रिटीश नंदीं"ची कॉपी मारलीय पण.. by बबन ताम्बे
➕ १. चांगला आहे.कमी शब्दातला
In reply to त्यांनी "ब्रिटीश नंदीं"ची कॉपी मारलीय पण.. by बबन ताम्बे
=))
फक्त शाब्दिक कोटीसाठी काढलेला
थोड्यात गोडी
उचल रे देवा आता मला उचल आणि
करा चैन...
In reply to उचल रे देवा आता मला उचल आणि by टवाळ कार्टा
Art of Loving...
"विजु भाऊ"
"विजु भाऊ"
हा आयडी हरकत घ्यायची शक्यता आहे भालेराव साहेब !! :द बाकी भारी जमले आहे!हेहेहेहे
In reply to "विजु भाऊ" by नाना स्कॉच
'Art of leaving' चे मठाधिपती
खरय
In reply to 'Art of leaving' चे मठाधिपती by डॉ सुहास म्हात्रे