मुर्तीपुजेचे स्वॉट अॅनालिसीस
मुर्ती पुजा आणि सगुण पुजे बाबत बरीच उलट-सुलट चर्चा होत असते. भारतात मुर्ती पुजा केली तर जाते पण तत्त्वज्ञानाच्या बाजूला अद्वैतींचे प्राबल्य असल्यामुळे का काय मुर्ती पुजा आणि सगुण पुजेची बाजुने सहसा परंपरेचा हवाला दिला जातो तर्कसुसंगत मांडणी मात्र कमी दिसते, या धागा लेखात मुर्तीपुजेचे स्वॉट अॅनालिसीस म्हणजे सामर्थ्य, दुर्बलता, संधी, जोखीम
आणि 'वैशिष्ट्य, ऊपयोग, लाभ' ; शंका निरसन अशा प्रकारे मांडणी करण्याचा प्रयत्न आहे.
सामर्थ्य
१.१) निव्वळ प्रेरणा घेण्यासाठी,
देवघर शेवटी एक आदर्शांचा कृतज्ञता आणि श्रद्धायुक्त अल्बम असते का ?
(देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी. )
१.२) प्रेरणा स्रोत म्हणून बर्याचदा व्यक्ति पूजेचे स्तोम माजवले जाते आणि त्यांच्या शब्दांची -पुस्तकांची पूजा बांधली जाते प्रत्यक्षात काळ बदलतो तसे नव्या परिस्थितीनुसार व्यक्ति-शब्द-पुस्तक पूजेची मंडळी तेवढीशी बदलत नाहीत आणि त्या व्यक्तीचे जुन्याकाळात उपयूक्त मत नव्या काळातही तसेच लावून धरण्याचा आग्रह धरतात. म्हणजे व्यक्ति पूजा आणि शब्द पूजा करु नका म्हणणार्या व्यक्तिंची सुद्धा सातत्याने पूजा काळ बदलल्याचे लक्षात न घेता केली जाते. मुर्तीपूजा हा त्यावर चांगला उतारा आहे की ज्यामुळे त्या व्यक्ति पासून प्रेरणा घेण्याचा मार्ग चालू राहतो पण शब्दपुजेची गरज कमी होते.
१.३) समाजातील विवीध व्यक्ती पूजकांचे समुहघटक मुर्तीपुजेतून सहभागी करुन घेऊन समुहांची भावनिक गरज पूर्ण होते.
१.४) काही वेळा व्यक्ती पूजकांना रचनात्मक आणि सकारात्मक असे काही जमत नाही, किमान काही विध्वंसक अथवा नकारात्म्क गोष्टीत त्यांनी लक्ष घालण्यापेक्षा मुर्तीपूजा बरी पडते.
१.५) नकोशी होणारी व्यक्तीपूजा अथवा शब्दपूजा लादली गेली तर इतरांच्या समाधानापुरता मुर्तीस नमस्कार करता येतो भावना सांभाळून घेता येतात आणि व्यक्ती आणि शब्द पूजेकडे कानाडोळा केल्यास जमून जाते.
१.६) अगदी परस्पर विरोधी आचार-विचारांच्या हुतात्मे, प्रतिकांनाही एका रांगेत बसवून भजता येते प्रत्येकातली आपल्याला आवडलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी पासून प्रेरणा घेता येते.
२) व्यक्तिस्वांतंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रिडम टू कन्सायन्स, यातील सर्वाधिक मोठा स्पेकट्रम मिळतो
३) संस्कृती आणि परंपरांच्या संवर्धनास मुर्तीपूजा अनुकूल राहतात,
४) कलात्मकतेचे संवर्धन, उत्तेजन आणि जोपासना होते
५) मुर्तीपूजा अमूर्त स्वरुपात सुद्धा शक्य होते जसे की पादूका पुजा,
६) ईश्वर असल्यास त्याने केव्हा कुठे आणि कशात असावे या बद्दलचे इश्वराचे स्वातंत्र्य अबाधित रहाते.
७) सोबत कुणी असल्या प्रमाणे भक्ती साहाय्यक
८) सोबत कुणी असल्या प्रमाणे संवाद साधता येतो
९) सोबत कुणी असल्यास सुरक्षीततेची भावना येते तशी भावना बाळगण्यात साहाय्य होऊ शकते. द्विधा मनस्थिती टाळून जोखीम स्विकारणे सुलभ होते.
७) पावित्र्य मांगल्याची पूर्तीची भावना, मानसिक समाधान आणि उत्साह
८) आदर्शाप्रती आदर व्यक्त करणे
९) उत्सव, संबंधीत व्यवसाय वृद्धींगत होणे, पर्यटन
हा लेख एकाच बैठकीत लिहून होण्याची शक्यता कमी आहे तेव्हा टप्प्या टप्प्याने वाढवला जाईल. लेख्नन चालू
*दुर्बलता, मर्यादा आणि जोखीम
१) यातील विश्वास बर्याचदा मिथकाधारीत असतात मिथकांचा आधार नसल्यास अथवा मिथके अपील न झाल्यास विश्वास कमी असू शकतो
२) मिथकांवर अंधविश्वास ठेवल्यामुळे व्यक्ती पुजेचे काही दोष जसे की मिथक अथवा मुर्ती विषयाच्या दुसर्या बाजू बघायला तयार न होणे , इतर तर्क खुल्या मनाने न अभ्यासणे, संकुचितता
३) व्यवहार्य, तर्कसुसंगत, विज्ञानसुसंगत तोडगे शोधणे आणि वापरण्या एवजी कर्मकांडांचा आधार घेणे
४) कर्मकांडात गुंतून जाणे त्यामुळे रचनात्मक समाज कार्यातील सहभाग कमी पडणे
५) एखादी समस्या समजून घेण्यासाठी श्रोताभिमुखते एवजी कर्मकांड स्विकारणे, ज्यांची समस्या समजून घेतली गेली नाही ते प्रतिक पुजा आणि कर्मकांडावर राग काढू शकतात.
६) काही व्यक्ति समुह अथवा समाज घटकांना सामावून न घेता, दूर ठेवण्याचे प्रयत्न समानतेच्या तत्वाचे उल्लंघन केल्यामुळे नाराजी निर्माण होते.
७) साधन संपत्तीच्या अप्रस्तुत वापराची उदाहरणे जसे की सोने जड जवाहीरांचा वापर, दुधाने न्हाऊ घालणे
८) प्रचितीवाद, नवसाला पावणे, बळी परंपरा इत्त्यादी अघोरी अंधश्रद्धा, इत्यादीचा वस्तुतः केवळ प्रतिक पुजेशी संबंध असण्याचे कारण नाही प्रतिक पुजा न करणारे निर्गुण उपासक ही इश्वराला आवाहने करतच असतात चमत्कारांवर विश्वास ठेवतात पण त्यातील अवैज्ञानिकतेचे खापर मुर्तीपुजकांच्या माथी फोडले जाण्याची परंपरा अधिक दिसते. प्रचितीवाद हि इश्वराच्या निर्गुण आणि सगुण पुजेसंबंधी अनेक नकोशा अंधश्रद्धांना कारणीभूत असला तरीही या पुजा प्रचितीवादामुळेच अधिक जोम धरत असाव्यात.
९) मुर्ती भंजकांसोबतचे परस्पर संघर्ष आणि छळाच्या साशंकता असलेले संबंध
***
* मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ?
* संत एकनाथांचा प्रतिमा आणि मुर्ती पुजन विषयक दृष्टीकोण
* सगुण ब्राह्मण तत्वमिमांसा -
* https://en.wikipedia.org/wiki/Agama_(Hinduism)
* श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन ?
.
.
* https://www.quora.com/Is-idol-worship-a-part-of-Hinduism-that-is-prescribed-in-the-Vedas-and-other-religious-scriptures
* जगभरच्य मुर्तीपूजेचा ऐतिहसिक आढावा
वाचने
28988
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
विवेकानंदांच्या प्रवचनात
In reply to विवेकानंदांच्या प्रवचनात by आनन्दा
सामान्य माणूस आपल्या
In reply to सामान्य माणूस आपल्या by सतिश गावडे
"देव नाही" असं सांगणार्या
In reply to "देव नाही" असं सांगणार्या by मितभाषी
त्यांना विष्णूचा अवतार
In reply to त्यांना विष्णूचा अवतार by मितभाषी
हिंदू धर्म त्यांना आपलासा
In reply to हिंदू धर्म त्यांना आपलासा by आनन्दा
=))
मानला तर देव नाही तर दगड हे
In reply to मानला तर देव नाही तर दगड हे by प्रकाश घाटपांडे
हा विवेकानंद व खेतडिचे महाराज
In reply to मानला तर देव नाही तर दगड हे by प्रकाश घाटपांडे
एक कोणतं तरी पक्क करा.
In reply to एक कोणतं तरी पक्क करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटते...
In reply to मला वाटते... by विकास
+१००
In reply to मला वाटते... by विकास
ईश्वर वा मरणोत्तर आयुष्य
In reply to मला वाटते... by विकास
+१
In reply to एक कोणतं तरी पक्क करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.म्हणजे मी योग्य
विद्वान लोकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत
जे मूर्तिपूजा करतात अशा
ईश्वर असल्यास त्याने केव्हा
मी फक्त परमात्मा मानतो
अजून एक मर्यादा
In reply to अजून एक मर्यादा by झेन
तुमच्या जन्मात तुमचे contribution काय ?
In reply to तुमच्या जन्मात तुमचे contribution काय ? by भाऊंचे भाऊ
प्रतिसाद आवडला.
In reply to प्रतिसाद आवडला. by सतिश गावडे
प्रतिसाद आवडला नाही.
In reply to प्रतिसाद आवडला नाही. by भाऊंचे भाऊ
परिणामी आपली " निसर्ग नियम "
In reply to परिणामी आपली " निसर्ग नियम " by सतिश गावडे
नाही
In reply to नाही by भाऊंचे भाऊ
अप्रतिम बोलताय भाऊ.
In reply to प्रतिसाद आवडला. by सतिश गावडे
मनाचे व्यवस्थापन - संजय पंडित
In reply to मनाचे व्यवस्थापन - संजय पंडित by प्रकाश घाटपांडे
हे पुस्तक अप्रतिम आहे. मात्र
समाजातल्या स्पेशल लोकांनी
मुर्तीपुजा ही वैयक्यिक
In reply to मुर्तीपुजा ही वैयक्यिक by चौथा कोनाडा
मुर्तीपुजा ही सामाजिक पातळीवर
गरुड़पुराण
In reply to गरुड़पुराण by विकास
विकास राव आम्हाला ही देवांची
In reply to विकास राव आम्हाला ही देवांची by मितभाषी
बर्र! ;)
In reply to बर्र! ;) by विकास
असं असूनही भारतातील काही
In reply to असं असूनही भारतातील काही by सतिश गावडे
१. कळतंय पण वळत नाही.
In reply to असं असूनही भारतातील काही by सतिश गावडे
बर्याच लोकांचा मंदिर या घटका बाबत गैरसमज आहे
In reply to बर्याच लोकांचा मंदिर या घटका बाबत गैरसमज आहे by भाऊंचे भाऊ
+1 झकास प्रतिसाद...
मला आस्तिक / नास्तिक "असणे"
In reply to मला आस्तिक / नास्तिक "असणे" by अत्रे
सॉरी, चुकीचा धागा। हे त्या
आयला, काय परिस्थिती आली आहे...
In reply to आयला, काय परिस्थिती आली आहे... by अर्धवटराव
+१
In reply to आयला, काय परिस्थिती आली आहे... by अर्धवटराव
+२
लोकसत्तेतला लेख
In reply to लोकसत्तेतला लेख by विकास
सांस्कृतीक एकात्मता बाळगतानाच
"स्व" गवसणे अथवा "निराकार" अवस्था
In reply to "स्व" गवसणे अथवा "निराकार" अवस्था by होबासराव
इस्कटून सांगा
SWOT
In reply to SWOT by जॉनविक्क
:-)
In reply to :-) by राघव
पुरावा देण्याचा अधिकार.
In reply to पुरावा देण्याचा अधिकार. by जॉनविक्क
कदाचित पुरेसे स्पष्ट झाले नसेल तर मला इतकेच म्हणायचे आहे
In reply to कदाचित पुरेसे स्पष्ट झाले नसेल तर मला इतकेच म्हणायचे आहे by जॉनविक्क
ते तर मी आधीच सांगीतलेले आहे,
In reply to ते तर मी आधीच सांगीतलेले आहे, by राघव
हीच तर खरी गम्मत आहे, आपण लायक नाही सर्व जाणतात(मी सुध्दा)
भगवद्गीता हे प्रत्यक्ष
In reply to भगवद्गीता हे प्रत्यक्ष by nishapari
भगवद्गीता माझ्या मनात बेसिकमधेच गल्लत करते :(
In reply to भगवद्गीता माझ्या मनात बेसिकमधेच गल्लत करते :( by जॉनविक्क
बाप स्त्रीसंग करतांना दिसला तर ....
In reply to बाप स्त्रीसंग करतांना दिसला तर .... by गामा पैलवान
गामा पैलवांन
In reply to गामा पैलवांन by जॉनविक्क
आईला विचारायचं असतं ....
In reply to आईला विचारायचं असतं .... by गामा पैलवान
कुंती आईच होती
In reply to कुंती आईच होती by जॉनविक्क
@ जॉनविक्क, कोणत्याही
In reply to @ जॉनविक्क, कोणत्याही by माहितगार
क्या बात है
In reply to क्या बात है by जॉनविक्क
माझं प्रगल्भत्व
In reply to माझं प्रगल्भत्व by गामा पैलवान
गौतम बुद्ध असेच होते
In reply to कुंती आईच होती by जॉनविक्क
भूक लागली पाहिजे
In reply to भूक लागली पाहिजे by गामा पैलवान
ओह हे मात्र खरं.
तुकाराम म्हणतात,
जॉनविक्क आणि नीशापरी
In reply to जॉनविक्क आणि नीशापरी by माहितगार
कर्म सिद्धांत नीट समजून
In reply to कर्म सिद्धांत नीट समजून by राघव
धागाचर्चेच्या कक्षेच्या मर्यादा
In reply to धागाचर्चेच्या कक्षेच्या मर्यादा by माहितगार
खरंय, पण तुम्हीच वरील
In reply to कर्म सिद्धांत नीट समजून by राघव
राघवजी अहं ब्रम्हास्मी. (सेक्रेड जेम सीजन दोन मोड़ ऑफ)
जास्त खोलात न जाता
In reply to जास्त खोलात न जाता by Rajesh188
व्यक्तिगत पातळीवर सर्वच
In reply to व्यक्तिगत पातळीवर सर्वच by माहितगार
मान्य आहे असतात अश्या व्यक्ती
सर्व जगात देव ही संकल्पना आहे
In reply to सर्व जगात देव ही संकल्पना आहे by Rajesh188
या धागा चर्चेत नास्तीकांना