Skip to main content

मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस

लेखक माहितगार यांनी सोमवार, 07/03/2016 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मुर्ती पुजा आणि सगुण पुजे बाबत बरीच उलट-सुलट चर्चा होत असते. भारतात मुर्ती पुजा केली तर जाते पण तत्त्वज्ञानाच्या बाजूला अद्वैतींचे प्राबल्य असल्यामुळे का काय मुर्ती पुजा आणि सगुण पुजेची बाजुने सहसा परंपरेचा हवाला दिला जातो तर्कसुसंगत मांडणी मात्र कमी दिसते, या धागा लेखात मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस म्हणजे सामर्थ्य, दुर्बलता, संधी, जोखीम आणि 'वैशिष्ट्य, ऊपयोग, लाभ' ; शंका निरसन अशा प्रकारे मांडणी करण्याचा प्रयत्न आहे. सामर्थ्य १.१) निव्वळ प्रेरणा घेण्यासाठी, देवघर शेवटी एक आदर्शांचा कृतज्ञता आणि श्रद्धायुक्त अल्बम असते का ? (देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी. ) १.२) प्रेरणा स्रोत म्हणून बर्‍याचदा व्यक्ति पूजेचे स्तोम माजवले जाते आणि त्यांच्या शब्दांची -पुस्तकांची पूजा बांधली जाते प्रत्यक्षात काळ बदलतो तसे नव्या परिस्थितीनुसार व्यक्ति-शब्द-पुस्तक पूजेची मंडळी तेवढीशी बदलत नाहीत आणि त्या व्यक्तीचे जुन्याकाळात उपयूक्त मत नव्या काळातही तसेच लावून धरण्याचा आग्रह धरतात. म्हणजे व्यक्ति पूजा आणि शब्द पूजा करु नका म्हणणार्‍या व्यक्तिंची सुद्धा सातत्याने पूजा काळ बदलल्याचे लक्षात न घेता केली जाते. मुर्तीपूजा हा त्यावर चांगला उतारा आहे की ज्यामुळे त्या व्यक्ति पासून प्रेरणा घेण्याचा मार्ग चालू राहतो पण शब्दपुजेची गरज कमी होते. १.३) समाजातील विवीध व्यक्ती पूजकांचे समुहघटक मुर्तीपुजेतून सहभागी करुन घेऊन समुहांची भावनिक गरज पूर्ण होते. १.४) काही वेळा व्यक्ती पूजकांना रचनात्मक आणि सकारात्मक असे काही जमत नाही, किमान काही विध्वंसक अथवा नकारात्म्क गोष्टीत त्यांनी लक्ष घालण्यापेक्षा मुर्तीपूजा बरी पडते. १.५) नकोशी होणारी व्यक्तीपूजा अथवा शब्दपूजा लादली गेली तर इतरांच्या समाधानापुरता मुर्तीस नमस्कार करता येतो भावना सांभाळून घेता येतात आणि व्यक्ती आणि शब्द पूजेकडे कानाडोळा केल्यास जमून जाते. १.६) अगदी परस्पर विरोधी आचार-विचारांच्या हुतात्मे, प्रतिकांनाही एका रांगेत बसवून भजता येते प्रत्येकातली आपल्याला आवडलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी पासून प्रेरणा घेता येते. २) व्यक्तिस्वांतंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रिडम टू कन्सायन्स, यातील सर्वाधिक मोठा स्पेकट्रम मिळतो ३) संस्कृती आणि परंपरांच्या संवर्धनास मुर्तीपूजा अनुकूल राहतात, ४) कलात्मकतेचे संवर्धन, उत्तेजन आणि जोपासना होते ५) मुर्तीपूजा अमूर्त स्वरुपात सुद्धा शक्य होते जसे की पादूका पुजा, ६) ईश्वर असल्यास त्याने केव्हा कुठे आणि कशात असावे या बद्दलचे इश्वराचे स्वातंत्र्य अबाधित रहाते. ७) सोबत कुणी असल्या प्रमाणे भक्ती साहाय्यक ८) सोबत कुणी असल्या प्रमाणे संवाद साधता येतो ९) सोबत कुणी असल्यास सुरक्षीततेची भावना येते तशी भावना बाळगण्यात साहाय्य होऊ शकते. द्विधा मनस्थिती टाळून जोखीम स्विकारणे सुलभ होते. ७) पावित्र्य मांगल्याची पूर्तीची भावना, मानसिक समाधान आणि उत्साह ८) आदर्शाप्रती आदर व्यक्त करणे ९) उत्सव, संबंधीत व्यवसाय वृद्धींगत होणे, पर्यटन हा लेख एकाच बैठकीत लिहून होण्याची शक्यता कमी आहे तेव्हा टप्प्या टप्प्याने वाढवला जाईल. लेख्नन चालू *दुर्बलता, मर्यादा आणि जोखीम १) यातील विश्वास बर्‍याचदा मिथकाधारीत असतात मिथकांचा आधार नसल्यास अथवा मिथके अपील न झाल्यास विश्वास कमी असू शकतो २) मिथकांवर अंधविश्वास ठेवल्यामुळे व्यक्ती पुजेचे काही दोष जसे की मिथक अथवा मुर्ती विषयाच्या दुसर्‍या बाजू बघायला तयार न होणे , इतर तर्क खुल्या मनाने न अभ्यासणे, संकुचितता ३) व्यवहार्य, तर्कसुसंगत, विज्ञानसुसंगत तोडगे शोधणे आणि वापरण्या एवजी कर्मकांडांचा आधार घेणे ४) कर्मकांडात गुंतून जाणे त्यामुळे रचनात्मक समाज कार्यातील सहभाग कमी पडणे ५) एखादी समस्या समजून घेण्यासाठी श्रोताभिमुखते एवजी कर्मकांड स्विकारणे, ज्यांची समस्या समजून घेतली गेली नाही ते प्रतिक पुजा आणि कर्मकांडावर राग काढू शकतात. ६) काही व्यक्ति समुह अथवा समाज घटकांना सामावून न घेता, दूर ठेवण्याचे प्रयत्न समानतेच्या तत्वाचे उल्लंघन केल्यामुळे नाराजी निर्माण होते. ७) साधन संपत्तीच्या अप्रस्तुत वापराची उदाहरणे जसे की सोने जड जवाहीरांचा वापर, दुधाने न्हाऊ घालणे ८) प्रचितीवाद, नवसाला पावणे, बळी परंपरा इत्त्यादी अघोरी अंधश्रद्धा, इत्यादीचा वस्तुतः केवळ प्रतिक पुजेशी संबंध असण्याचे कारण नाही प्रतिक पुजा न करणारे निर्गुण उपासक ही इश्वराला आवाहने करतच असतात चमत्कारांवर विश्वास ठेवतात पण त्यातील अवैज्ञानिकतेचे खापर मुर्तीपुजकांच्या माथी फोडले जाण्याची परंपरा अधिक दिसते. प्रचितीवाद हि इश्वराच्या निर्गुण आणि सगुण पुजेसंबंधी अनेक नकोशा अंधश्रद्धांना कारणीभूत असला तरीही या पुजा प्रचितीवादामुळेच अधिक जोम धरत असाव्यात. ९) मुर्ती भंजकांसोबतचे परस्पर संघर्ष आणि छळाच्या साशंकता असलेले संबंध *** * मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ? * संत एकनाथांचा प्रतिमा आणि मुर्ती पुजन विषयक दृष्टीकोण * सगुण ब्राह्मण तत्वमिमांसा - * https://en.wikipedia.org/wiki/Agama_(Hinduism) * श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन ? . . * https://www.quora.com/Is-idol-worship-a-part-of-Hinduism-that-is-prescr… * जगभरच्य मुर्तीपूजेचा ऐतिहसिक आढावा
लेखनविषय:

वाचने 29027
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

जास्त खोल न जाता वर वर जरी विचार केला तरी सर्वच धर्मात मूर्ती पूजा होते . मूर्ती म्हणजे ईश्वराचे प्रतीक अशी मूर्तीची व्याख्या केली की खूप प्रश्न न पडता एकच प्रश्न उरतो ख्रिस्त धर्मात येशू आणि मेरी ही ईश्वराची प्रतीक आहेत आणि त्यांची मूर्ती सुधा असते . मुस्लिम धर्मात मक्केत जे काही आहे ते ईश्वराचे प्रतीक च आहे आणि 786, हा आकडा सुधा ईश्वराचा प्रतीक च आहे म्हणजे मूर्तीच. बौध्द धर्मात गौतम बोद्ध ह्यांच्या घरोघरी फोटो आहेत आणि त्याची पूजा . तसेच जैन,shikhपारशी सर्व धर्मात प्रतीके आहेत . असा एक ही धर्म नाही जो मूर्ती पूजा करत नाही

In reply to by माहितगार

सर्व धातू घन स्वरूपात असतात आणि पारा फक्त द्रव स्वरूपात असतो असे वर्णन करता येईल त्या प्रकारच्या लोकांसाठी . पाणी धातू हा शब्द घन स्वरूप च दर्शवतो द्रव स्वरूप नाही

सर्व जगात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देव ही संकल्पना आहे . प्राचीन हस्त लिखित आहे,चित्र स्वरूपात पुरावे आहे . रचना आहेत त्या मुळे देव नाकारणे ही गोष्ट सहज पचनी पडणारी नाही . आपण आताच्या काळातील उदाहरण घेवूया . चंद्रा वर माणूस जावून आला आहे . त्या चंद्राचे वातावरण विज्ञान चा वापर करून राहण्या योग्य कधी तरी माणूस करेल . पृथ्वी वरून सर्व प्राणी ,वनस्पती तिथे घेवून गेल्यावर आणि ते तिथे स्थिर झाल्यावर .पृथ्वी नष्ट झाली काही कारणांनी तर चंद्रा वर वाढणारी मानव जात जी प्राथमिक अवस्थेत असेल ती त्यांचे बाप कोणाला मानतील . पुरावे तर देवू शकणार नाहीत पृथ्वीचं नष्ट झाल्यावर पुरावे कुठे मिळणार. अशीच घटना पृथ्वी वर सुद्धा होवून गेली असेल अशी शक्यता नाकारता येत नाही .

In reply to by Rajesh188

या धागा चर्चेत नास्तीकांना मज्जाव नाही त्यांच्या टिकेचे स्वागतच आहे पण नास्तीकता अथवा इश्वराचे अस्तीत्व या धागा चर्चेचा अनुषंगिक असेल पण मुख्य विषय नाही. मुर्तीपुजेसाठी पावित्र्य गृहीत धरणे पुरेसे ठरते, त्यात ईश्वर अस्तीत्व असणे अत्यावश्यक बाब नाही.