ढग, पाउस, आठवणी आणि भावना यांच्यात काही नाते आहे का?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
औरंगाबादला सकाळपासूनच आभाळात काळसर ढगांची गर्दी झालीये... बऱ्याच दिवसांनी कम्प्युटरवर काम करत असताना खिडकी बाहेर दुपारच्या ३ वाजताही अगदी संथपणे वाहणाऱ्या थंड वाऱ्यावर झुलणारी नारळाची पाने खूपच सुखद वाटली. मग काम बंद करून बाहेर येउन बसलो.एरवी मला लहानपण, शाळा, पाऊस यांच्याविषयी बोलणं भावनाप्रधान आणि मूर्खपणाच वाटतं पण या प्रचंड शहरात, माणसांच्या गर्दीत, आठ-आठ दहा-दहा मजली इमारतींमध्ये, आपण येउन पडलो हे वाईट कि चांगले हे कळायला मार्ग नाही.
हि झाडं, जमीन, माती, पक्षी, प्राणी, घरातल्या साखरेच्या डब्ब्याला लागलेल्या मुंग्या यांनाही माझ्यासाराखच श्वास कोंडल्यासारखं वाटत नसेल का हा विचारही मनाला चाटून गेला. खरं तर आपणही या निसर्गाचाच एक भाग.. अगदी या नारळाच्या झाडासारखं पण याच्यात आणि आपल्यात एक फरक आहेच, हे माझ्यापेक्षा कितीतरी निरागस आहे, लहान मुलासारखं. राग, लोभ, मत्सर, वासना, तिरस्कार, एकटेपणा, धिक्कार, स्वाभिमान, दुख, आनंद, इच्छा, अपेक्षा, दया असल्या कितीतरी अर्थशून्य आणि अस्सल मानवी भावना आपला पिच्छा स्वप्नातही सोडत नाहीत.
जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात जपून ठेवलेला, लहानपणीचा रम्य गाव नुकत्याच उगवलेल्या गवताच्या हिरवट पोपटी पात्यांसारखा डोळ्यासमोर येऊ लागतो. आई, आजी, भाऊ, शेणाने सारवलेल्या ओसरीत बसून पेरणीची चर्चा करणारे काका आणि आजोबा, घरातला स्वयंपाकाचा धूर, धगधगणारी चूल, घरात आणि पटांगणात वावरणाऱ्या त्यावेळच्या भावाबहिणींचे चेहरे, शेजारपाजारच्या आज्या, एकत्र जमून पापड्या, कुरडया, शेवया करणाऱ्या प्रेमळ बाया, उगाच माझा गालगुच्चा घेऊन मला चिडवणारी त्यावेळची ती अनोळखी बाई, गावातल्या मारुतीच्या पारावर जमणारी माणसे आणि त्याचं हसणं खिदळणं..असं ते नितांत सुंदर आणि शुद्ध पवित्र असं जग चित्रपटाप्रमाणे डोळ्यापुढे येत
खरं म्हणजे या निवडक आठवणी सोडल्या तर आपल्याजवळ काहीच नाही, मग कशाला हा लहानपणीचा भव्य डोलारा डोळ्यासमोर आणून आठवून आठवून बाटवून टाकायचा? तापेक्ष्या त्याला जपून ठेवावा.. आठवणींच्या सुन्न काळोखात... झाडांच्या मुळासारख आणि त्यापासून ओलावा घेत जगत राहावं या असल्या भावनेचा दुष्काळ असलेल्या दरिद्री शहरातले निरर्थक उपद्व्याप करत...
तासभरनंतर परत उन पडायला सुरवात झाली आणि राहिलेलं काम करण्यासाठी हातातला थंड झालेला कपभर चहा संपवून परत कामात बुडून गेलो..
(शीर्षक सुचत नव्हते.. म्हणून शेवटच्या क्षणी जे सुचले ते टाकले)
प्रतिक्रिया
सुंदर रे भावा........
चांगलं लिहिलंय
मान्य आहे..
मला ओलम्हणायचे होते :-)
मला ओल म्हणायचे होते :-)
मोकळ्या माळातुनी वाहतो वारा
गावात तेव्हां लाईट गेली होती.
गावाकडची एक संध्याकाळ... ढग
मनाचं आणि निसर्गाचं काही नातं नसतं
धन्यवाद
मनाचं आणि निसर्गाचं नातं असतं
हाहा
नातं नसतं
डीबी अण्णा...
असं का बुवा ?
:(
वावा! प्राध्यापक डॉक्टर संपादक दिलीप बिरुटे साहेब!
डी.बी. सर काय तुम्हीपण नवीन
कुत्सित नाही
प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब!
अरे यार झोपू की नको.
वावा! प्रतिसाद आवडला!
प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे असे म्हणा हो..
हो
पटले पटले!
कसं काय होत असावं हे सगळं? नै
काहो गावडे साहेब,एक सांगा
प्रेयसीची आठवण येऊ द्या नायतर
तेव्हाच तर बिरुटे साहेब
जेपीशी सहमत आहे. एखादी
म्हणजे प्रेयसी ही भीतिदायक
ते ढग कुठल्या दिशेने येतात
आणि पाऊस पडलाच नै तर?
आठवणी येणार नाहीत; ओल्या
कोरडं कोरडंच वाटून राहील का
होय...
=))
किंवा
नाखुण अंकलना अता चाहत्यांच्या
नाखुण अंकलना अता चाहत्यांच्या
च्छ्या
तुमच्या चारोळ्यांमुळे तुम्ही
आम्च्या साध्या
सतिश गावडे - Thu, 25/02/2016
सतिश गावडे - Thu, 25/02/2016 - 09:51 जेपीशी सहमत आहे. एखादी प्रेयसी करून स्वतःच अनुभव घ्या. ;डोळे ओलावले..;)जेपी तात्या तुम्हाला
भावना आणि व्याकरण यांच्यात काही नाते आहे का?
प्रयत्न सुरूच आहेत.