भन्साळीच्या बाजीराव मस्तानी ह्या सिनेमाबद्दल बराच गदारोळ, ह्या सिनेमाचे 'पिंगा' हे गाणे रिलीज झाल्यावर, झाला होता. आंतरजालावर आणि सोशल मीडियावर तर वादळच उठले होते.पेशवेकुलीन स्त्रियांचे आणि एकंदरच इतिहासाचे विकृतीकरण केले गेले असल्याच्या वावड्या उडल्या होत्या किंवा उडवल्या गेल्या होत्या. टीव्हीवर तथाकथित 'मान्यवर, अभ्यासक, इतिहास संशोधक' यांना बोलावून चर्चासत्रांचे रतीब घातले गेले होते. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार (पुण्या-मुंबईत) हे निश्चित होते. तसे झालेही. बऱ्याच व्हॉॅटसअॅप ग्रुप्सवर सिनेमावर बहिष्कार टाका अशा आवाहनांचेही रतीब चालू होते.
ह्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून, काल 'बाजीराव-मस्तानी' पाहिला. प्रचंड आवडला! काय आवडले? तर, पहिला बाजीराव, राऊ म्हणून, मनापासून आणि बेहद्द आवडला.
पहिल्या बाजीरावाबद्दल, तो एक जिगरबाज आणि अपराजित लढवय्या जो मोहिमेवर असताना घोड्यावरच कणसे तळहातावर मळून खायचा असे आणि मस्तानी ही यवनी पदरी बाळगून असलेला अशी प्रतिमा माझ्या मनात लहानपणापासून होती. सलग ४० लढाया जिंकणारा बाजीराव हा रांगडा आणि धडाडीने निर्णय घेणाराच असावा असे मनापासून वाटायचे. त्या प्रतिमेला नुसतेच मूर्त रूप भन्साळीने दिले नाहीयेय तर बाजीराव कसा 'पुरोगामी' होता हे ही त्याच्या व्यक्तीरेखाटनातून सार्थ उभे केले आहे. काही काही वेळा राऊ काहीसा बेफिकीर, आततायी आणि भडक वाटण्याची शक्यता आहे पण चित्रपटाच्या कथानकाच्या प्रवाहात एक रांगडा योद्धा काळाच्या पुढे कसा होता याचेच ते प्रतीक वाटते.
कथानकाच्या नाट्यउभारणीसाठी लागणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कथानकात 'सिनेमॅटीक लिबर्टी'च्या नावाखाली, सढळ हाताने वापरले आहे वापरले आहे, त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण झाले असे वाटूही शकते. पण हा एक सिनेमा आहे व त्यात ठराविक वेळात एका ऐतिहासिक कालखंडातली बरेच गुंतागुंतीचे पदर असलेली प्रेम-कथा बसवायची आहे हे ध्यानात घेतले की सिनेमॅटीक लिबर्टी तितकीशी जाचक न वाटता कथानकाच्या प्रवाहात बसून जाते.
बहुतेक बखरींमधून मस्तानीबद्दलचे उल्लेख जवळजवळ टाळलेले असल्याने तिच्याबद्दलची आणि तिच्या बाजीरावाशी असलेल्या नात्याबद्दल दंतकथा आणि वंदताच जास्त असल्याने ती 'तवायफ' की पत्नी ह्याबद्दल बरेच समज आणि अपसमज आजही असावेत. तिच्याबद्दल असणारे हे समाज अपसमज हे प्रामुख्याने तिचे मुसलमान असणे ह्यामुळे होते. पुण्यातला त्यावेळचा समाज आणि पेशवे घराणे यांचा तिच्याबद्दलचा दुःस्वास आणि तिला 'गाणी बजावणी' करणारी ह्या दर्जाला आणून बसवणारी विचारसरणी ही ती यवनी असल्यामुळे व तिची पर्शियन आई गाणारी असल्यानेही होती. पण ह्यात ती छत्रसाल राजाचे रक्त धमन्यांमध्ये खेळवणारी, शस्त्रपारंगत राजकन्या होती ह्याकडे दुर्लक्ष केले गेले होते.
ह्या सिनेमाच्या कथानकात, तिच्यावर 'तवायफ' ढंगाची राहणी लादली गेल्यावर तिने ज्या राजनैतिक मुत्सद्दीपणे ते ते प्रसंग हाताळले ते जर कोणाला इतिहासाचे विकृतीकरण वाटणार असेल तर वाटो बापडे! ते ज्या पद्धतीने सिनेमात मांडले आहे ते मस्तानीला योग्य ती उंची प्रदान करणारे आहे. आणि ते तसे होण्यास भाग पाडणारा राऊ म्हणूनच मग आद्य पुरोगामी वाटतो.
सर्व कलाकारांनी आपापली पात्रनिवड सार्थ ठरवत समरसून भूमिका केल्या आहेत. रणवीर अक्षरशः भूमिका जगाला आहे. त्याने बेफिकिर, रांगडा, हळवा, प्रेमात बुडालेला भावनाप्रधान योद्धा सार्थ उभा केला आहे. मराठी शब्द्पेरणी असलेला, भाषेचा एक बेफिकीर लहेजा जो त्याने चित्रपटभर पकडला आहे तो बहुतेक प्रसंगात भाव खाऊन जातो. विशेषतः जेव्हा निजामासमोर बसून बोलणी झाल्यावर त्याच्या पुढ्यात जातो तो प्रसंग रणवीर आणि भन्साळीचे चित्रपटाबद्दलचे बाकीचे गुन्हे क्षम्य करून जातो. दीपिका मस्तानी वाटते आणि तिने ती यथायोग्य वठवली आहे. प्रियांका,मिलिंद सोमण, यतीन कारेकर, तन्वी आझमी इत्यादींनी झोकून काम केले आहे.
भव्य-दिव्य न् महागडे सेट्स, चकचकीत व भरजरी पोशाख आणि प्रचंड कॅन्व्हास ही भन्साळीची खासियत आहे (अलीकडे तेवढेच राहिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये). ह्या सिनेमात तो पुणेरी, पेशवाई थाटाचा भव्य आणि ग्लॉसी कॅन्व्हास उभा करण्यात यशस्वी ठरला आहे.
राहता राहिले 'पिंगा' आणि 'मल्हारी' ह्या वादग्रस्त गाण्यांबद्दल. मल्हारी हे गाणे निजामासोबतच्या अतिशय तणावग्रस्त प्रसंगानंतर येते त्यात बाजीरावाची 'तडफदार आणि धडाकेबाज' भूमिका अधोरेखित झालेली असते, त्यानंतर लगेच ते गाणे येते. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. कथानकाबाहेर, संदर्भरहित गाणे बघितल्यास ते चुकीचेच वाटेल. पिंगा गाण्याचेही तसेच. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. मस्तानी तेव्हा शनावारवाडयावरच राहत असते आणि त्या गाण्याच्या आधीच्या दृश्यात काशीबाई तिच्याकडे हळदीकुंकवाला जाऊन तिला शालू देऊन आलेली असते जो ती नेसून पिंगा घालायला येते. दोन्ही गाण्यांचा उगाच बाऊ केला गेला आहे.
बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेला एका आदरणीय स्तरावर नेणारा आणि राऊच्या पुरोगामी रांगडेपणाला नेमके टिपणारा भन्साळीच्या बाजीराव मस्तानी सिनेमा आवडून गेला!
वाचने
33456
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
परिक्षण आवडले.
चित्रपट आणि परिक्षण दोन्ही आवडले
चित्रपट आणि परिक्षण दोन्ही आवडले
परिक्षण आवडले
शिनेमा चांगला आहे वगैरे मीही
मस्त आहे.
मी जालावर बघितला!
जालावर??
In reply to मी जालावर बघितला! by DEADPOOL
म्हणजे बाकी पायरसी तेवढी
In reply to जालावर?? by जिन्क्स
सध्या बिषय चित्रपटाचा चालला
In reply to म्हणजे बाकी पायरसी तेवढी by sagarpdy
ओक्के पहावा लागेल !
अतिशय मस्त परीक्षण
मी पयला..
In reply to अतिशय मस्त परीक्षण by स्पा
अश्याप्रकारे सोत्रिंनी
=)) आम्ही पण येतो , चला
In reply to अश्याप्रकारे सोत्रिंनी by कैलासवासी सोन्याबापु
=)) =))
In reply to =)) आम्ही पण येतो , चला by स्पा
पिंगा आणि मल्हारी गाण्या
बाजीराव खरच जबरा जमलाय.
रणवीर ने सुंदर काम केलंय,
+१
In reply to रणवीर ने सुंदर काम केलंय, by मालोजीराव
मलाही
छान परीक्षण
सोत्रि
आज टीममधल्या लोकांनी
बघताना झोपलो नाही तर
In reply to आज टीममधल्या लोकांनी by शब्दबम्बाळ
हम दिल दे चूके आणि राम-लीला
परीक्षण छान आहे.
छान परीक्षण !अगदी सहमत!
एक बातमी....
परिक्षण आवडलं
भन्साळीचा चित्रपट
छान परीक्षण,
चित्रपट उच्च दर्जाचा आहे,
In reply to छान परीक्षण, by याॅर्कर
http://www.kaustubhkasture.in
In reply to चित्रपट उच्च दर्जाचा आहे, by महासंग्राम
चांगली माहिती
In reply to http://www.kaustubhkasture.in by महासंग्राम
उत्तर भारतीयांकडून काय
In reply to चित्रपट उच्च दर्जाचा आहे, by महासंग्राम
जागेवर सुनावायला पाहिजे होता तुम्ही
In reply to उत्तर भारतीयांकडून काय by मालोजीराव
हम्म
In reply to चित्रपट उच्च दर्जाचा आहे, by महासंग्राम
जरा अतिशयोक्ती वाटते आहे
In reply to हम्म by सोत्रि
एक सांगतो
हायला. मागच्या धाग्यात टीका
अग्गदी सहमत
In reply to हायला. मागच्या धाग्यात टीका by अप्पा जोगळेकर
चांगलं लिहिलं आहे
+१
In reply to चांगलं लिहिलं आहे by पैसा
+१
In reply to चांगलं लिहिलं आहे by पैसा
>> तरीही सिनेमा बघायचा प्रश्न
In reply to चांगलं लिहिलं आहे by पैसा
हाहा!
In reply to >> तरीही सिनेमा बघायचा प्रश्न by सोत्रि
मस्त परिक्षण
काशीबाई आणि बाजीराव नाचताना
आधी काय लिहिले आहे
In reply to काशीबाई आणि बाजीराव नाचताना by प्रदीप साळुंखे
हो खरंच.. आपल्या आक्षेपांना
In reply to आधी काय लिहिले आहे by पैसा
बापरे!!
In reply to हो खरंच.. आपल्या आक्षेपांना by पिलीयन रायडर
मी नीट वाचले आहे
In reply to आधी काय लिहिले आहे by पैसा
मी एकदा शेवटचा ट्राय करते.
In reply to मी नीट वाचले आहे by प्रदीप साळुंखे
ओके
In reply to मी एकदा शेवटचा ट्राय करते. by पिलीयन रायडर
बाकि काही नाही हो, त्या टुकार
In reply to ओके by प्रदीप साळुंखे
टूकार,
In reply to ओके by प्रदीप साळुंखे
अरेरे
सोत्रि :D :D
"बाजीराव मस्तानी" पाहाच.. मी
पेशव्यांच्या बायका कपटीपणाचा
In reply to "बाजीराव मस्तानी" पाहाच.. मी by नासिककर
हौशी इतिहासकार
परिक्षण आवडले.
सोत्रींचा धागा...म्हणून प्रतिसाद....
चित्रपट बघितला गेला आहे;
बिरजूभय्याचा लेख म्हणून
प्रदर्शनाच्या दुसर्याच दिवशी
चित्रपट चांगला आहे
कै नै एवढे प्रतिसाद कसे वाढले
खिक्क =))
In reply to कै नै एवढे प्रतिसाद कसे वाढले by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हहपुवा काय?
In reply to कै नै एवढे प्रतिसाद कसे वाढले by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कालाय तस्मै नम: म्हणायचे आणि
In reply to हहपुवा काय? by पैसा
हहपुवा झाली त्याचं कारण
In reply to हहपुवा काय? by पैसा
??
In reply to हहपुवा झाली त्याचं कारण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शाहुसारखा विलासी राजा आणि
In reply to हहपुवा झाली त्याचं कारण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद आवडला
In reply to शाहुसारखा विलासी राजा आणि by मालोजीराव
आधाराशिवाय लिहित नाही.
In reply to शाहुसारखा विलासी राजा आणि by मालोजीराव
विलासी जगले असं कोणी म्हणतं का ? आणि तमाशा संदर्भ
In reply to शाहुसारखा विलासी राजा आणि by मालोजीराव
दुसरा उल्लेख परशराम (१७५४-१८४४) या शिंपी शाहिराने पहिल्यांदा तमाशातून स्त्रीने पुरुषाचा व पुरुषाने स्त्रीचा वेश घेऊन काम करण्याची प्रथा पाडली.
पोट भराया उभारिला ना तमाशाचा धंदा
महालमोकासे, जहरी वळसे करतील आपुला धंदा
सुई दोर्याला हयात असू द्या तोची इमान मोकासा
निजकर्मी नर रत झाल्यावर काय उणा त्य पैसा
असे उत्तर पेशव्यांना ऐकवून पेशव्यांची वतनदारी त्याने नाकारली आहे. वरील दोन्ही उदाहरणातून जरी काळ हा सतराशे पन्नासच्या पुढे जातो, तरी एकदम तमाशा तेव्हाच अवतरला असे म्हणता येत नाही त्याहीपूर्वी रात्रीच्या वेळी 'गोंधळ' आणि तत्सम कार्यक्रमात असे तमाशावजा कार्यक्रम सादर होत असावेत असे म्हणायला वाव आहे. शाहीरांचे पोवाडे वीररसाऐवजी अधिक शृंगारपूर्ण वर्णन शाहु आणि पेशव्यांच्या काळातच असलेल्या शाहिरांच्या कवनातून दिसतात तशी असंख्य उदाहरणे आहेत.२
होनाजीबाळा (१७५४-१८४४) सगनभाऊशी कलगी तुर्याचे सामने करणारा होनाजी हा कवी. बैठकीच्या लावणीत रागदारीचे सूर असावेत ही बाजीरावांची इच्छा होनाजीने पूर्ण केली. होनाजीनेच पहिल्यांदा वेगवेगळ्या रागदारीच्या चालींवर लावण्या रचुन तमाशाला बैठकी गाण्याची प्रतिष्ठा करुन दिली. होनाजी बाळाने बाजीवार पेशव्यांच्या जीवनावर पोवाडे न लिहिता बर्याच लावण्या लिहिल्या. या होनाजीला तर सरकार वाड्यासमोर तमाशा करण्याबद्दल सालाना तीनशे रुपयाचे मानधन मिळत असे .३
शिवकाळ सोडला तर शाहुंच्या काळापासून पुढे जवळ जवळ संत व पंडित कवींच्यावर असलेले अध्यात्माचे जोखड शाहिरांनी झुगारुन दिल्यामुळे शृंगाराचा अतिरेक होईपर्यंत कोणत्याच मर्यादेचं पालन शाहिरांनी केलेलं नाही. बाकी पोवाड्याचे विषयही होतेच होते. युद्ध, सैन्यप्रकार,तहनामे, दुष्काळ, सण, व्रते, शहर, लोकाचार.इ.इ. जसे. सांगायचा मुद्दा पुन्हा असाच की सतराशे पन्नासच्या पुधे जरी तमाशाबाबत लिखित पुरावे येत असले तरी त्याही पूर्वी पाच पंचवीस वर्ष अगोदर तमाशा होता असे म्हणता येते.
शाहुमहाराज औरंगजेबाच्या मृत्युनंतर दक्षिणेत परतले तेव्हा एक तर मराठे सरदार औरंगजेबाच्या सत्तेशी युद्ध करुन करुन कंटाळुन गेले होते. शाहुंना हे सर्व कंटाळलेले मराठे सरदार लाभलेत म्हणन्यापेक्षा शाहुंनी विनंतीकरुन पत्र पाठवून आपण एकत्र राहु आणि इतर आमिशे दाखवून त्यांना एकत्र केलं, तसेही बाकी मराठे सरदार राजे संभाजीच्या मृत्युनंतर खवळुन उठलेच होते त्याचाही फायदा शाहु महाराजांना झाला. रियासतकार लिहितात ' शाहुला जरी प्रारंभी लष्करी बळ फारसे मिळाले नसले तरी महाराष्ट्रच्या नैतिक सहानुभूतीचा पूर त्याजवर लगेच लोटला. हा पाठिंबा नुसता हिंदूचा नसून मुसलमानांचाही होता. औरंगजेबाच्या कारभाराने देशाची कशी नासाडी झाली ही सर्वांस चक्क दिसत होती. मराठ्यांचे पराक्रम व कैक वर्षांचे कष्ट लोकांच्या डोळ्यापुढे होते. बादशहाने यांचा नाहक छळ चालविला आहे अशी सामान्य समजूत प्रचलित होती., तिचा फायदा शाहूस मिळाला ; आणि तो परत निघताच पुष्कळ्से जमीनदार व सेनानायक त्यास अनुकूल झाले."४
शाहुंचे कतृत्व अजिबात कमी करायचे नाही, पण परिस्थिती शाहुंच्या दृष्टीने अतिशय जमेची होती. स्वतःस छत्रपती म्हणवून घेणे वगैरे इत्यादी या सर्व गोष्टी त्यांना सहज मिळत गेल्या. शुर बाजीरावासारख्या सेनापतीने त्यांना सर्व आघाड्यांवर विजय मिळवून दिला. शाहु महाराज अनेकदा युद्धावर आणि तहासाठी गेलेही असतील पण त्यांच्या आयुष्यात इतर मराठे सरदारांमुळे स्वस्थ आणि आरामदायी आयुष्यही होतं, इतर राजांच्या दरबारात गायन, नृत्य हा जसा भाग होता तसे त्याचे चित्रण मात्र तपशीलवार येत नाही, हे तितकेच खरे आहे.
-दिलीप बिरुटे
संदर्भ.
१. रा.श्री.जोग -मराठी वाड्:मयाभिरुचीचे विहंगावलोकन पृ. १०१
२. श.तु. शाळिग्राम - परशराम कवीच्या लावण्या. पृ. ५
३. श.तु. शाळिग्राम - होनाजीबाळाकृत लावण्या पृ.१०
४. गो.स.सरदेसाई -मराठी रियासत खंड तीन. पृ.क्र. ३७.
काही शंका
In reply to विलासी जगले असं कोणी म्हणतं का ? आणि तमाशा संदर्भ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पास
In reply to काही शंका by पैसा
ना-पास...
In reply to पास by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तरं दिली आहेत.
In reply to ना-पास... by सोत्रि
सर नृत्याबद्दल आक्षेप नाहीच,
In reply to विलासी जगले असं कोणी म्हणतं का ? आणि तमाशा संदर्भ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
होत्या....
In reply to सर नृत्याबद्दल आक्षेप नाहीच, by मालोजीराव
कोणत्याही कलेचा उगम होउन
In reply to होत्या.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थ्यांक्स रे अभ्या.
In reply to कोणत्याही कलेचा उगम होउन by अभ्या..
तमाशा शिवकाळापासून अस्तित्वात
In reply to थ्यांक्स रे अभ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग्रेट!!
In reply to तमाशा शिवकाळापासून अस्तित्वात by प्रचेतस
रा चिं ढेरे काय म्हणतात
In reply to ग्रेट!! by सोत्रि
रोचक आहे
In reply to रा चिं ढेरे काय म्हणतात by पैसा