भन्साळीच्या बाजीराव मस्तानी ह्या सिनेमाबद्दल बराच गदारोळ, ह्या सिनेमाचे 'पिंगा' हे गाणे रिलीज झाल्यावर, झाला होता. आंतरजालावर आणि सोशल मीडियावर तर वादळच उठले होते.पेशवेकुलीन स्त्रियांचे आणि एकंदरच इतिहासाचे विकृतीकरण केले गेले असल्याच्या वावड्या उडल्या होत्या किंवा उडवल्या गेल्या होत्या. टीव्हीवर तथाकथित 'मान्यवर, अभ्यासक, इतिहास संशोधक' यांना बोलावून चर्चासत्रांचे रतीब घातले गेले होते. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार (पुण्या-मुंबईत) हे निश्चित होते. तसे झालेही. बऱ्याच व्हॉॅटसअॅप ग्रुप्सवर सिनेमावर बहिष्कार टाका अशा आवाहनांचेही रतीब चालू होते.
ह्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून, काल 'बाजीराव-मस्तानी' पाहिला. प्रचंड आवडला! काय आवडले? तर, पहिला बाजीराव, राऊ म्हणून, मनापासून आणि बेहद्द आवडला.
पहिल्या बाजीरावाबद्दल, तो एक जिगरबाज आणि अपराजित लढवय्या जो मोहिमेवर असताना घोड्यावरच कणसे तळहातावर मळून खायचा असे आणि मस्तानी ही यवनी पदरी बाळगून असलेला अशी प्रतिमा माझ्या मनात लहानपणापासून होती. सलग ४० लढाया जिंकणारा बाजीराव हा रांगडा आणि धडाडीने निर्णय घेणाराच असावा असे मनापासून वाटायचे. त्या प्रतिमेला नुसतेच मूर्त रूप भन्साळीने दिले नाहीयेय तर बाजीराव कसा 'पुरोगामी' होता हे ही त्याच्या व्यक्तीरेखाटनातून सार्थ उभे केले आहे. काही काही वेळा राऊ काहीसा बेफिकीर, आततायी आणि भडक वाटण्याची शक्यता आहे पण चित्रपटाच्या कथानकाच्या प्रवाहात एक रांगडा योद्धा काळाच्या पुढे कसा होता याचेच ते प्रतीक वाटते.
कथानकाच्या नाट्यउभारणीसाठी लागणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कथानकात 'सिनेमॅटीक लिबर्टी'च्या नावाखाली, सढळ हाताने वापरले आहे वापरले आहे, त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण झाले असे वाटूही शकते. पण हा एक सिनेमा आहे व त्यात ठराविक वेळात एका ऐतिहासिक कालखंडातली बरेच गुंतागुंतीचे पदर असलेली प्रेम-कथा बसवायची आहे हे ध्यानात घेतले की सिनेमॅटीक लिबर्टी तितकीशी जाचक न वाटता कथानकाच्या प्रवाहात बसून जाते.
बहुतेक बखरींमधून मस्तानीबद्दलचे उल्लेख जवळजवळ टाळलेले असल्याने तिच्याबद्दलची आणि तिच्या बाजीरावाशी असलेल्या नात्याबद्दल दंतकथा आणि वंदताच जास्त असल्याने ती 'तवायफ' की पत्नी ह्याबद्दल बरेच समज आणि अपसमज आजही असावेत. तिच्याबद्दल असणारे हे समाज अपसमज हे प्रामुख्याने तिचे मुसलमान असणे ह्यामुळे होते. पुण्यातला त्यावेळचा समाज आणि पेशवे घराणे यांचा तिच्याबद्दलचा दुःस्वास आणि तिला 'गाणी बजावणी' करणारी ह्या दर्जाला आणून बसवणारी विचारसरणी ही ती यवनी असल्यामुळे व तिची पर्शियन आई गाणारी असल्यानेही होती. पण ह्यात ती छत्रसाल राजाचे रक्त धमन्यांमध्ये खेळवणारी, शस्त्रपारंगत राजकन्या होती ह्याकडे दुर्लक्ष केले गेले होते.
ह्या सिनेमाच्या कथानकात, तिच्यावर 'तवायफ' ढंगाची राहणी लादली गेल्यावर तिने ज्या राजनैतिक मुत्सद्दीपणे ते ते प्रसंग हाताळले ते जर कोणाला इतिहासाचे विकृतीकरण वाटणार असेल तर वाटो बापडे! ते ज्या पद्धतीने सिनेमात मांडले आहे ते मस्तानीला योग्य ती उंची प्रदान करणारे आहे. आणि ते तसे होण्यास भाग पाडणारा राऊ म्हणूनच मग आद्य पुरोगामी वाटतो.
सर्व कलाकारांनी आपापली पात्रनिवड सार्थ ठरवत समरसून भूमिका केल्या आहेत. रणवीर अक्षरशः भूमिका जगाला आहे. त्याने बेफिकिर, रांगडा, हळवा, प्रेमात बुडालेला भावनाप्रधान योद्धा सार्थ उभा केला आहे. मराठी शब्द्पेरणी असलेला, भाषेचा एक बेफिकीर लहेजा जो त्याने चित्रपटभर पकडला आहे तो बहुतेक प्रसंगात भाव खाऊन जातो. विशेषतः जेव्हा निजामासमोर बसून बोलणी झाल्यावर त्याच्या पुढ्यात जातो तो प्रसंग रणवीर आणि भन्साळीचे चित्रपटाबद्दलचे बाकीचे गुन्हे क्षम्य करून जातो. दीपिका मस्तानी वाटते आणि तिने ती यथायोग्य वठवली आहे. प्रियांका,मिलिंद सोमण, यतीन कारेकर, तन्वी आझमी इत्यादींनी झोकून काम केले आहे.
भव्य-दिव्य न् महागडे सेट्स, चकचकीत व भरजरी पोशाख आणि प्रचंड कॅन्व्हास ही भन्साळीची खासियत आहे (अलीकडे तेवढेच राहिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये). ह्या सिनेमात तो पुणेरी, पेशवाई थाटाचा भव्य आणि ग्लॉसी कॅन्व्हास उभा करण्यात यशस्वी ठरला आहे.
राहता राहिले 'पिंगा' आणि 'मल्हारी' ह्या वादग्रस्त गाण्यांबद्दल. मल्हारी हे गाणे निजामासोबतच्या अतिशय तणावग्रस्त प्रसंगानंतर येते त्यात बाजीरावाची 'तडफदार आणि धडाकेबाज' भूमिका अधोरेखित झालेली असते, त्यानंतर लगेच ते गाणे येते. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. कथानकाबाहेर, संदर्भरहित गाणे बघितल्यास ते चुकीचेच वाटेल. पिंगा गाण्याचेही तसेच. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. मस्तानी तेव्हा शनावारवाडयावरच राहत असते आणि त्या गाण्याच्या आधीच्या दृश्यात काशीबाई तिच्याकडे हळदीकुंकवाला जाऊन तिला शालू देऊन आलेली असते जो ती नेसून पिंगा घालायला येते. दोन्ही गाण्यांचा उगाच बाऊ केला गेला आहे.
बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेला एका आदरणीय स्तरावर नेणारा आणि राऊच्या पुरोगामी रांगडेपणाला नेमके टिपणारा भन्साळीच्या बाजीराव मस्तानी सिनेमा आवडून गेला!
वाचने
33512
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
परिक्षण आवडले.
चित्रपट आणि परिक्षण दोन्ही आवडले
चित्रपट आणि परिक्षण दोन्ही आवडले
परिक्षण आवडले
शिनेमा चांगला आहे वगैरे मीही
मस्त आहे.
मी जालावर बघितला!
जालावर??
In reply to मी जालावर बघितला! by DEADPOOL
म्हणजे बाकी पायरसी तेवढी
In reply to जालावर?? by जिन्क्स
सध्या बिषय चित्रपटाचा चालला
In reply to म्हणजे बाकी पायरसी तेवढी by sagarpdy
ओक्के पहावा लागेल !
अतिशय मस्त परीक्षण
मी पयला..
In reply to अतिशय मस्त परीक्षण by स्पा
अश्याप्रकारे सोत्रिंनी
=)) आम्ही पण येतो , चला
In reply to अश्याप्रकारे सोत्रिंनी by कैलासवासी सोन्याबापु
=)) =))
In reply to =)) आम्ही पण येतो , चला by स्पा
पिंगा आणि मल्हारी गाण्या
बाजीराव खरच जबरा जमलाय.
रणवीर ने सुंदर काम केलंय,
+१
In reply to रणवीर ने सुंदर काम केलंय, by मालोजीराव
मलाही
छान परीक्षण
सोत्रि
आज टीममधल्या लोकांनी
बघताना झोपलो नाही तर
In reply to आज टीममधल्या लोकांनी by शब्दबम्बाळ
हम दिल दे चूके आणि राम-लीला
परीक्षण छान आहे.
छान परीक्षण !अगदी सहमत!
एक बातमी....
परिक्षण आवडलं
भन्साळीचा चित्रपट
छान परीक्षण,
चित्रपट उच्च दर्जाचा आहे,
In reply to छान परीक्षण, by याॅर्कर
http://www.kaustubhkasture.in
In reply to चित्रपट उच्च दर्जाचा आहे, by महासंग्राम
चांगली माहिती
In reply to http://www.kaustubhkasture.in by महासंग्राम
उत्तर भारतीयांकडून काय
In reply to चित्रपट उच्च दर्जाचा आहे, by महासंग्राम
जागेवर सुनावायला पाहिजे होता तुम्ही
In reply to उत्तर भारतीयांकडून काय by मालोजीराव
हम्म
In reply to चित्रपट उच्च दर्जाचा आहे, by महासंग्राम
जरा अतिशयोक्ती वाटते आहे
In reply to हम्म by सोत्रि
एक सांगतो
हायला. मागच्या धाग्यात टीका
अग्गदी सहमत
In reply to हायला. मागच्या धाग्यात टीका by अप्पा जोगळेकर
चांगलं लिहिलं आहे
+१
In reply to चांगलं लिहिलं आहे by पैसा
+१
In reply to चांगलं लिहिलं आहे by पैसा
>> तरीही सिनेमा बघायचा प्रश्न
In reply to चांगलं लिहिलं आहे by पैसा
हाहा!
In reply to >> तरीही सिनेमा बघायचा प्रश्न by सोत्रि
मस्त परिक्षण
काशीबाई आणि बाजीराव नाचताना
आधी काय लिहिले आहे
In reply to काशीबाई आणि बाजीराव नाचताना by प्रदीप साळुंखे
हो खरंच.. आपल्या आक्षेपांना
In reply to आधी काय लिहिले आहे by पैसा
बापरे!!
In reply to हो खरंच.. आपल्या आक्षेपांना by पिलीयन रायडर
मी नीट वाचले आहे
In reply to आधी काय लिहिले आहे by पैसा
मी एकदा शेवटचा ट्राय करते.
In reply to मी नीट वाचले आहे by प्रदीप साळुंखे
ओके
In reply to मी एकदा शेवटचा ट्राय करते. by पिलीयन रायडर
बाकि काही नाही हो, त्या टुकार
In reply to ओके by प्रदीप साळुंखे
टूकार,
In reply to ओके by प्रदीप साळुंखे
अरेरे
सोत्रि :D :D
"बाजीराव मस्तानी" पाहाच.. मी
पेशव्यांच्या बायका कपटीपणाचा
In reply to "बाजीराव मस्तानी" पाहाच.. मी by नासिककर
हौशी इतिहासकार
परिक्षण आवडले.
सोत्रींचा धागा...म्हणून प्रतिसाद....
चित्रपट बघितला गेला आहे;
बिरजूभय्याचा लेख म्हणून
प्रदर्शनाच्या दुसर्याच दिवशी
चित्रपट चांगला आहे
कै नै एवढे प्रतिसाद कसे वाढले
खिक्क =))
In reply to कै नै एवढे प्रतिसाद कसे वाढले by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे