Skip to main content

"एक जीभ बाहेर काढलेली स्मायली ! "

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी सोमवार, 30/11/2015 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
-० स्थळ १ नाना नानी पार्क ०- कांही जेष्ठांचे चर्चा सत्र ० अॅंड्रॉइड म्हणजे काय?अॅंड्रॉइड स्मार्ट फोन म्हणजे काय?आम्हाला ते शिकायचं आहे! ---- एका जेष्ठ म्हणतो! ० आम्हाला पण!------ दुसरा जेष्ठ ० आम्हाला पण।------ तिसरा जेष्ठ ० पण बाळासाहेबांना त्याची गरज नाही ,त्याना सगळं येतं! -- ० ते कसं? ० त्यानाच माहित. ० कांहो बाळासाहेब गप्प कां? ० हं! हं! ० आज काल क्लास असतात. लावला असेल एखादा ,बोलतात कां बघा. ० हं! लावलाय.घरीच येतो एक जण शिकवायला . ० तरीच! आम्हाला शिकवेल? फी? ० रविवारी घरीच या विचारू. -० स्थळ २ बाळासाहेबांचे घर. सर्व जण गोळा. चहा पोहे उरकलेले. ०- बाळासाहेब हॅंडसेटशी कांही चाळा करतात. तोच आतून दहा एक वर्षाचा नातू पळत बाहेर येतो.आणि म्हणतो, ० आजोबा काय हे? व्हॉट्स अॅप वरून अजून तुम्हाला स्माइली सेंट करता येत नाही? किती वेळा सांगायचं? बाळासाहेब त्याला जवळ घेतात. ० पुन: नाही चुकणार गुर्जी असं म्हणून त्याच्या जावळाचा मुका घेतात आणि गुर्जी ही आपली फी म्हणून त्याच्या हातावर एक कॅडबरी ठेवतात. आणि जीभ बाहेर काढलेली स्माइली सगळ्याना पाठवायला हॅंडसेट हातात घेतात.
लेखनविषय:

वाचने 2761
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

Llllllluuuuu http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-036.gif

आमच्या माहितीप्रमाणं प्रत्येकाला दोन जिभा असतात, एक दाखवायची जीभ व एक खायची (व नंतर गिळायची)(पड)जीभ।

In reply to by दिवाकर कुलकर्णी

हाहाहा ह्या निमित्ताने पडजीभ बाहेर काढलेली स्मायली इमॅजीन करुन पाहिली .... =)))))

In reply to by प्रसाद गोडबोले

यू मीन लैक धिस? ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ =))

In reply to by पर्ण

१ ) लेखात कुठे स्माइली दिसली की स्माइलीच्या आइकनवर जाऊन त्यामागचा कोड कढायचा ( F12 ) बहुतेक.साइट सापडते. २) स्माइलीचा स्क्रीनशॅाट घ्यायचा.तो फोटो आपल्या postimg accountच्या एका अॅल्बममध्ये अपलोड करायचा.त्याची लिंक वापरायची आणि width 50/100/अथवा 10% /20%/ठेवायची. याप्रमाणे ही पहा- याचा कोड- <img src="http://s5.postimg.org/7vhqwscqv/wp_ss_20151201_0001.png" width ="25%"/> ही लिंक माझ्या अकाउंटमधून कोणीही वापरू शकतो. तशी गरज वाटल्यास आपण एक नवीन स्माइलीचे अकाउंट बनवू शकतो मिपासाठी. थेट साइटवरची स्माइली वापरली की लेखनात एका ओळीत येते तशी क्रमांक दोनची येत नाही परंतू मोठे चित्र देता येते हा फायदा. करून पहा.आवडल्यास इतर स्चांगल्या स्माइल्या बनवून घेऊ.