"एक जीभ बाहेर काढलेली स्मायली ! "
लेखनविषय (Tags)
-० स्थळ १ नाना नानी पार्क ०-
कांही जेष्ठांचे चर्चा सत्र
० अॅंड्रॉइड म्हणजे काय?अॅंड्रॉइड स्मार्ट फोन म्हणजे काय?आम्हाला ते शिकायचं आहे! ---- एका जेष्ठ म्हणतो!
० आम्हाला पण!------ दुसरा जेष्ठ
० आम्हाला पण।------ तिसरा जेष्ठ
० पण बाळासाहेबांना त्याची गरज नाही ,त्याना सगळं येतं! --
० ते कसं?
० त्यानाच माहित.
० कांहो बाळासाहेब गप्प कां?
० हं! हं!
० आज काल क्लास असतात. लावला असेल एखादा ,बोलतात कां बघा.
० हं! लावलाय.घरीच येतो एक जण शिकवायला .
० तरीच! आम्हाला शिकवेल? फी?
० रविवारी घरीच या विचारू.
-० स्थळ २ बाळासाहेबांचे घर. सर्व जण गोळा. चहा पोहे उरकलेले. ०-
बाळासाहेब हॅंडसेटशी कांही चाळा करतात.
तोच आतून दहा एक वर्षाचा नातू पळत बाहेर येतो.आणि म्हणतो,
० आजोबा काय हे? व्हॉट्स अॅप वरून अजून तुम्हाला स्माइली सेंट करता येत नाही?
किती वेळा सांगायचं?
बाळासाहेब त्याला जवळ घेतात.
० पुन: नाही चुकणार गुर्जी
असं म्हणून त्याच्या जावळाचा मुका घेतात
आणि गुर्जी ही आपली फी म्हणून त्याच्या हातावर एक कॅडबरी ठेवतात.
आणि जीभ बाहेर काढलेली स्माइली सगळ्याना पाठवायला हॅंडसेट हातात घेतात.
प्रतिक्रिया
पुन: नाही चुकणार गुर्जी
चांगलंय
मस्तं!
Llllllluuuuu
मस्त........
आतून दहा एक वर्षाचा नातू पळत
एक जीभ बाहेर काढलेली स्मायली
आमच्या माहितीप्रमाणं
हाहाहा
यू मीन लैक धिस?
मिपावर या smilies कोठून आणता
१ ) लेखात कुठे स्माइली दिसली
मस्तच दिकु काका ... इवलु