✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पावडर कथेला विलंब

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 11/24/2015 - 21:30  ·  लेख
लेख
नमस्कार, गेले काही दिवस मला सातत्याने 'पावडर' कथेच्या दुसर्‍या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी कथा पुढे सरकवण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी ही कथा सुरु केली तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील लेखनापासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले नेटीझन्स अशा प्रकारच्या माहितीसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो. वर्षभरात बरेच काही नेटवरती घडले. कुठेतरी नेट साक्षरता, सुरक्षीतता ह्यात प्रगल्भता वाढली आहे असे मला मनोमन कुठेतरी जाणवले आणि मी पुन्हा ह्या लेखनाला हात घातला. मात्र अशा लेखनाची दखल तातडीने घेतली गेली आणि पुन्हा एकदा माझ्या लेखनाला चाप बसली आहे. खाली काही बातम्यांची कात्रणे देतो आहे. मी कथेचा पहिला भाग प्रकाशित करताच दोनच दिवसात हे घडणे हा योगायोग नक्कीच नाही. डार्कनेट विषयी पुढे लिहीण्या आधी मला स्वतःला ह्या संदर्भात कायदा नक्की काय सांगतोय ते जाणून घ्यायचे आहे. कारण मला स्वतःला आणि मुख्य म्हणजे मिपाला कोणत्याही संकटात पाडण्याची इच्छा नाही. अर्थात, इंग्रजी तसेच अन्य बर्‍याच भाषांमध्ये ह्या विषयावरती अगदी अ ते ज्ञ माहिती उपलब्ध आहे. मात्र अपल्याकडेच हे का रोखले जात आहे ह्याची कल्पना नाही. खरेतर एका वेगळ्या धोक्याची ओळख आणि प्रगल्भता वाढवणे आणि मनोरंजन हेच उद्देश्य ह्या लिखाणामागे होते आणि राहतील. कथेचा आत्मा सोडून किंवा बदलून लिखाण करण्यात मला स्वारस्य नाही आणि वाचकांची फसवणूक देखील करायची नाही. तरी योग्य ती माहिती घेऊन आणि पूर्ण कायदेशीर समाधान झाल्यावरच पुढचे लिखाण करण्याचे योजले आहे. मिपाकर अडचण समजून घेतील आणि पाठींबा देतील ही आशा आहेच. धन्यवाद. a b
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध
माहिती

प्रतिक्रिया द्या
10200 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

डार्कनेट वाईटच आहे. जर ते

मांत्रिक
Tue, 11/24/2015 - 21:38 नवीन
डार्कनेट वाईटच आहे. जर ते चुकीच्या हातात पडले तर सत्यानाशच आहे. तुमचा निर्णय योग्य वाटतो. हे ज्ञान चुकीच्या हातात नको पडायला!!! सहमत पराण्णा!!!
  • Log in or register to post comments

डार्कनेट वाईटच आहे. जर ते चुकीच्या हातात पडले तर

पीके
Tue, 11/24/2015 - 23:51 नवीन
आणि योग्य हातात पडले तर काय कल्याण होइल?. मुळात अश्या गोष्टी निर्माण कोण करतो आणि का? याचा विचार करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

हम्म

पैसा
Tue, 11/24/2015 - 21:39 नवीन
मिपा बरेच जण वाचत असतात. कालच एका सदस्याकडे श्री आणि सौ च्या संपादकांनी मिपावर प्रसिद्ध लेखाची मागणी केली असे कळले. बर्‍याच जणांचे मिपावर प्रसिद्ध झालेले लेख बाहेर दिवाळी अंकांमधे येऊन गेले आहेत, येत आहेत. त्यामुळे मिपावर कथा येताच असे लिखाण दोन दिवसात पेपरांमधे आले यात काही नवल वाटले नाही. यामागे बरीच कारणे असू शकतात. मात्र डार्कनेटबद्दल नेमके काय लिहिले तर ते प्रसार स्वरूपाचे समजले जाईल याबद्दल कोणा तज्ञ माणासाने सांगावे. सायबर क्राईमशी संबंधित, वकील लोक सांगू शकतील.
  • Log in or register to post comments

डार्कनेट मुख्यतः ऑनियन अॅप

मांत्रिक
Tue, 11/24/2015 - 21:46 नवीन
डार्कनेट मुख्यतः ऑनियन अॅप आहे. युजरचा ट्रेस न लागू देणे हे वैशिष्ट्य. चुकीचे ठरू शकते हे. चुकीचेच आहे. कायद्याप्रमाणे यूजर आयडेंटिटी हिडन राहणे हे बेकायदेशीरच कृत्य आहे. डार्कनेट त्यालाच पाठिंबा देते हे दुर्दैव!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ह्म्म..

स्वाती दिनेश
Tue, 11/24/2015 - 21:41 नवीन
डार्कनेटबद्दल नेमके काय लिहिले तर ते प्रसार स्वरूपाचे समजले जाईल याबद्दल कोणा तज्ञ माणासाने सांगावे. सायबर क्राईमशी संबंधित, वकील लोक सांगू शकतील. ज्यो शी सहमत. स्वाती
  • Log in or register to post comments

आमाला अजुन नेट च कळत नै,तर

जेपी
Tue, 11/24/2015 - 21:53 नवीन
आमाला अजुन नेट च कळत नै,तर डार्कनेट कुठुन कळणार. असो याबाबतीत काहितरी सकारात्मक घडो ही भावी संपादक पदी प्रार्थना..
  • Log in or register to post comments

निर्णय पटला. सर्वथा अनुमोदन.

संदीप डांगे
Tue, 11/24/2015 - 22:34 नवीन
निर्णय पटला. सर्वथा अनुमोदन. बिटकॉइनच्या संदर्भात डार्कनेटबद्दल दोन वर्षांआधीच इत्थंभूत अभ्यास केला असल्याने याबद्दल अज्ञानी किंवा उत्सूक लोकांना उगाच माहिती होणे त्यांच्यासाठीच घातक ठरू शकते हे माहित आहे. जसे अंडरवर्ल्ड सामान्यांपासून दूर राहणे आवश्यक, नाहीतर त्याचा 'रेगे' होतो, तसंच हेही आहे. आपल्या निर्णयाबद्दल धन्यवाद! इच्छुक आपल्या जबाबदारीवर अधिक संशोधन करू शकतात.
  • Log in or register to post comments

तुला योग्य वाटेल तेंव्हा

रेवती
Tue, 11/24/2015 - 23:01 नवीन
तुला योग्य वाटेल तेंव्हा पावडर लिही पण अधेमधे दुसरं काहीतरी लिही की!
  • Log in or register to post comments

+१

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/25/2015 - 05:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

है श्या

चिंतामणी
Wed, 11/25/2015 - 13:58 नवीन
पण अधेमधे दुसरं काहीतरी लिही की! हे जास्त महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हो ना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/25/2015 - 14:01 नवीन
किती दिवस खरडवह्या भरवणार लोकांच्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

अनुमोदन

महेश हतोळकर
Tue, 11/24/2015 - 23:05 नवीन
निर्णय पटला. पण मग बाकिच्या अर्धवट लिखाणाचं काय? निदान भन्नाट तरी पूर्ण कराच.
  • Log in or register to post comments

हल्लीचे वार्ताहर आळशी झाले

pacificready
Tue, 11/24/2015 - 23:17 नवीन
हल्लीचे वार्ताहर आळशी झाले असल्यानं असं झालं असावं असा प्राथमिक कयास आहे. इकडचं तिकडचं उचलतात आणि छापतात. इस्पिकचा एक्का यांची व्हिएटनाम सिरीज आली त्यानंतर थोड़याच दिवसात मटा की सकाळ मध्ये जवळपास त्याच माहितीसह लेख आला होता. त्यामुळे त्याबाबत फार विचार करु नये असं वाटतं. बाकी लेख कथा पूर्ण करण्यासाठी याचा फ़क्त पार्श्वभूमी म्हणून विचार करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

हल्लीचे वार्ताहर?

सागरकदम
Wed, 11/25/2015 - 00:49 नवीन
हल्लीचे वार्ताहर? अहो सगळे नाही पण बर्यापैकी हेच करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

व्हिएतनाम ची लिंक आहे का

महासंग्राम
Wed, 11/25/2015 - 01:49 नवीन
विएतनाम च्या धाग्याची लिंक असेल तर नक्की द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

परा

होबासराव
Wed, 11/25/2015 - 01:03 नवीन
ह्यावर एक छान मालिका येवुन गेलीय सोनी टिव्हि वर.
  • Log in or register to post comments

लिही रे....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/25/2015 - 07:04 नवीन
दूसरा भाग मला व्य नि कर.मी कोणालाच सांगणार नाही. लोक डार्कनेट कड़े वळुन गुन्हेगारी जगता कड़े वळु नये हा विचार पटला. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

च्यायला

चाणक्य
Wed, 11/25/2015 - 07:58 नवीन
डेंजर दिसतय. पराला अनुमोदन.
  • Log in or register to post comments

बिनशर्त अनुमोदन

नाखु
Wed, 11/25/2015 - 08:34 नवीन
पण मग बाकिच्या अर्धवट लिखाणाचं काय? निदान भन्नाट तरी पूर्ण कराच.

अखिल मिपा "क्रमशः सांगून मध्येच लटकविलेल्या कथा मालीकांचा , अर्धवट ठेवलेल्या लेखांचा" वाचक-आस्वादक संघाकडून जोरदार मागणी

  • Log in or register to post comments

परा साहेब - टोरंट हा ह्या

प्रसाद१९७१
Wed, 11/25/2015 - 09:23 नवीन
परा साहेब - टोरंट हा ह्या डार्क नेट मधलाच एक प्रकार आहे का? अगदी खूप धोकादायक नसेल कदाचित पण डार्कनेट मधे कॅटेगराइझ करता येइल का टोरंट ला?
  • Log in or register to post comments

काय हे! श्या... :(

असंका
Wed, 11/25/2015 - 09:30 नवीन
काय हे! श्या... :(
  • Log in or register to post comments

सोरी हां साहेब!! निराशाच

असंका
Wed, 11/25/2015 - 11:00 नवीन
सोरी हां साहेब!! निराशाच तेवढी व्यक्त झाली... आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

चला माझी शंका खोटी ठरली.

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 11/25/2015 - 09:33 नवीन
पावडर वाचताना माझ्या मनात अभद्र शंका डोकावुन गेली होती की परा बदलला तर नाहीये ना? पण नाही परा उतला नाही, मातला नाही, कथा मालिका अर्धवट ठेवण्याचा वसा पराने सोडला नाही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे या वेळेला त्याच्या कडे काहीतरी कारण आहे कथा अर्धवट ठेवण्याचे. पराशेठ आपण आपल्या वाचकांना कारण कळवण्याच्या घेतलेल्या या तसदी बद्दल समस्त समस्त वाचकवर्ग आपला आजन्म ऋणी राहिल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आता परत लिखाण चालू केलाच आहे

अद्द्या
Wed, 11/25/2015 - 10:12 नवीन
आता परत लिखाण चालू केलाच आहे तर बाकी उरलेलं पूर्ण करा कि राव तोपर्यंत
  • Log in or register to post comments

अस

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 11/25/2015 - 13:11 नवीन
असं करा, ती कथा लिहून पूर्ण करा आणि व्यनि करा सगळ्यांना.. हा हा हा...
  • Log in or register to post comments

पराला

चाणक्य
Wed, 11/25/2015 - 13:29 नवीन
पराला तुरूंगात डांबण्याचा तुमचा हेतू कळला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

पराला

चाणक्य
Wed, 11/25/2015 - 13:29 नवीन
पराला तुरूंगात डांबण्याचा तुमचा हेतू कळला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

असो.

आतिवास
Wed, 11/25/2015 - 13:40 नवीन
प्रत्यक्ष वापर आणि काल्पनिक लिखाण - या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. क्रिएटिव रायटिंगला नियम लावायचा म्हटलं तर किमान ५० टक्के चित्रपटांवर बंदी घालावी लागेल. असो. अवांतर - अन्य कुणीतरी हे कारण दिलं असतं तर तुम्ही काय प्रतिसाद दिला असता हेही जाणून घ्यायला आवडेल. ;-)
  • Log in or register to post comments

+१ अन्य कुणीतरी हे कारण दिलं असतं

रुस्तम
Wed, 11/25/2015 - 14:02 नवीन
+१ अन्य कुणीतरी हे कारण दिलं असतं तर तुम्ही काय प्रतिसाद दिला असता हेही जाणून घ्यायला आवडेल. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

हाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/25/2015 - 14:05 नवीन
>>>>> अवांतर - अन्य कुणीतरी हे कारण दिलं असतं तर तुम्ही काय प्रतिसाद दिला असता हेही जाणून घ्यायला आवडेल. ;-) हाहाहा क्या सॉलीड मारा. परा म्हटला असता अशा लोकांना अरबी समुद्रात बुडवलं पाहिजे. वगैरे कै तरी, पण त्या लेखकाला नक्की चावलाच असता बाकी, मस्त प्रश्न हं. लाईक. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

ठ्ठो =)) =)) =)) क्या मारा

बॅटमॅन
Wed, 11/25/2015 - 14:18 नवीन
ठ्ठो =)) =)) =)) क्या मारा क्या मारा =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

हा पण यान्गल विचारात

संदीप डांगे
Wed, 11/25/2015 - 14:23 नवीन
हा पण यान्गल विचारात घेण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

अन्य कुणी

आदिजोशी
Wed, 11/25/2015 - 15:23 नवीन
अन्य कुणी अशाच एका विषयावरील लेखमाला अशाच कारणांसाठी थांबवल्याची नोंद मिपाच्या इतिहास आहे. त्याबाबत, पुणेकर असूनही पराने मतप्रदर्शन केले नव्हते हे ही आमच्या ध्यानात आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

लोल!

आदूबाळ
Wed, 11/25/2015 - 16:07 नवीन
लोल! "क्रिएटिव रायटिंगला नियम लावायचा म्हटलं तर ..." याच्याशी सहमत आहे. "पावडर"बाबत फार उत्सुकता होती. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

वेल...

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/25/2015 - 22:07 नवीन
वांतर - अन्य कुणीतरी हे कारण दिलं असतं तर तुम्ही काय प्रतिसाद दिला असता हेही जाणून घ्यायला आवडेल. ;-)
मी प्रतिसाद दिलाच नसता हे नक्की. मुख्य म्हणजे मी माझ्या लेखनात नमूद केले आहे :-
मला स्वतःला आणि मुख्य म्हणजे मिपाला कोणत्याही संकटात पाडण्याची इच्छा नाही
हे लेखन बहूदा नीलकांत ही वाचत असेल. त्याची परवानगी असेल, तर मी पुढील लेखनाला नक्की तयार आहे. माझी सुरक्षा मी बरोब्बर करेनच. आपला मामाच बसलाय मुख्यमंत्री पदावर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

नो प्रॉब्लेम

आदिजोशी
Wed, 11/25/2015 - 14:32 नवीन
ह्या कारणामुळे लेखन थांबवत असल्याने काही प्रॉब्लेम नाही. पण लोकांनी वर सांगितल्याप्रमाणे बाकीचं बरंच लिखाण लटकलेलं आहे, ते पूर्ण करायचं मनावर घ्या.
  • Log in or register to post comments

"काल्पनिक" असा शिक्का मारलेले

उगा काहितरीच
Wed, 11/25/2015 - 18:17 नवीन
"काल्पनिक" असा शिक्का मारलेले सत्याच्या जवळपास जाणारे लेखन बहुधा कायद्याच्या कचाट्यात सापडत नसावे . तरीही योग्य शहनिशा करूनच लेखन प्रकाशीत करावे . उगाच आम्हाला वाचनाची मेजवानी देण्याच्या नादात तुम्हाला वैयक्तिकरित्या काही नुकसान होऊ नये असे वाटते . तरी शक्य असल्यास (आपल्याला कुठलाही त्रास न होता) पुढील भाग प्रकाशीत करावेत . ही नम्र विनंती .
  • Log in or register to post comments

क्रमशः वर मी काही बोलणं

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/26/2015 - 13:06 नवीन
क्रमशः वर मी काही बोलणं म्हणजे माझ्यावरच उलटण्याचा धोका आहे खरा... पण बोलतोच... परा, बात कुछ जम्या नै भौ!
  • Log in or register to post comments

पटलं..

चिगो
गुरुवार, 11/26/2015 - 17:29 नवीन
पटलं, पराशेठ.. मग एकच विनंती आहे. जरा ते 'भन्नाट', 'गुलजार नार' कडे लक्ष द्या की..
  • Log in or register to post comments

परा साहेब त्या 'भन्नाट' ला पूर्ण करा ना!!!

DEADPOOL
गुरुवार, 11/26/2015 - 19:52 नवीन
परा साहेब त्या 'भन्नाट' ला पूर्ण करा ना!!!
  • Log in or register to post comments

आणि हो

DEADPOOL
गुरुवार, 11/26/2015 - 19:55 नवीन
ते torbot, torbrowser, tornet, एल्लिगल असेल तर गूगलच्या खेळाच्या दुकानातून काढायला पाहिजे, नाही का?
  • Log in or register to post comments

गोष्ट लिहायला हरकत अजिबात

आनंदी गोपाळ
गुरुवार, 11/26/2015 - 20:14 नवीन
गोष्ट लिहायला हरकत अजिबात नाही. अ‍ॅक्च्युअल कोणते ब्राऊजर्स वापरावेत. ते कसे वापरावेत. ते वापरून शोध कसा घ्यावा याबद्दल माहिती न देता, तिसरेच शब्द [उदा. कांदा. ;) ] वापरून कथा पूर्ण करता येईल.
  • Log in or register to post comments

तुमच्या निर्णयाला अनुमोदन

एक एकटा एकटाच
Fri, 11/27/2015 - 00:09 नवीन
तुमच्या निर्णयाला अनुमोदन पण एक चांगली सुरुवात झालेली कथा पुर्ण होणार नाही ह्याबाबत हळहळ वाटते
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा