Skip to main content

सेकंड हनीमून

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 16/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सेकंड हनीमून .............................................................. सेकंड हनीमून च्या कल्पनेनं ति मोहोरुन गेली होती. ४२ ची झाली होती ति.. पार्लर मध्ये जाऊन केस ट्रिम केले होते, फेसियल..काय, काय काय चाललं होत तिच.. थट्टेत विचारले त्याने... गप्प रे तुला काही कळत नाही..त्याला गप्प केलं. . हिल स्टेशन च ते रम्य अन शांत वातावरण, सार वातावरण धुंद होते. ति त्याच्या मिठीत पहुडली होती. सार त्याला आठवलं.. ति पहिली भेट..उडालेली तारांबळ.. श्वासांचे तुफान..नजर मीळवण अन चोरण ते वाट पाहणं... सारच रोम्यान्टीक होते.. ते वय वेड होते..ती विशीतली कोवळी कळी होती..त्याची गद्धे पंचविशी नुकतीच संपत होती.. अन दिवस मंतरल्या सारखे झाले. दिवस कसे भराभर सरले ते कळलं नाही.. . तिच्या कडे बघितलं. चेहे~यावर काम धुंद भाव होता. खूप सुंदर दिसत होती.वय झालं वाटत नव्हतं.. छान दिसतेस..चेहे~यावर हात फिरावीत तो म्हणाला हाताच चुंबन घेत तिने होकार दिला. अन एकदम त्याच लक्ष समोरच्या आरशात गेले.. . आपल्या प्रतिमे कडे बघताच त्याच्या मनात विचार आले काय झालं आहे माझ?.तो विचार करत होता जीवनाच्या धकाधकीत पूर्वीचा राहिलो नव्हतो निम्मे केस गेले होते, चश्मा लागला होता, पार बदललो होतो. व्यवसायाचे ताण वणवण..चेहरा रापला होता.. त्याच्या मनांत विचार आला. खरंच मी तिला आवडत असेल?? "तू खूप सुंदर आहेस, पण मी वयस्कर वाटतो.तुझ्या मनाने"...तो म्हणाला.. कॉम्प्लेक्स येतो गं.... थोडंसं ओशाळल्या सारखं झालं होत. त्याला ति खळखळून हसली." वेडा रे" अरे तू तुझ्या नजरेनं मला बघतोस म्हणून मी तुला छान वाटते. तू माझ्या नजरेनं बघ, तुझ्याकडे, मग तुला कळेल. तू होता तसाच आहे ति म्हणाली..’अरे तू मला अजूनही तसाच दिसतोय..प्रथम भेटला तसा बालिश , धांधरट, केस विस्कटलेला, थोडासा बावळट, अन खूप रोमॅंटिक..फक्त माझा.. . ऐकल्यावर खूप हलकं वाटत होते. बराच वेळ ति बाहुपाशात होती... . पहाट केव्हा झाली ते त्यांना कळालच नाही....
लेखनविषय:

वाचने 6732
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

काय मस्त लिहिलय. अक्कू भौ आमचा राम राम घ्या वो...

खुपच छान ! का कोणास ठावुक पण वैजुवैनींची आठवण आली हे लेखन वाचताना ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

अहो पण अत्ताशी कुठे जुळे झालेय ना वैजुवैनींना...जरा विश्रांती तर घेऊ द्यावी की नै माणसाने? चाल्ले लगेच दुस्रा हणिमून करायास =)) शेतजमिनीला देखील विश्रांती लागते म्हणतात, इथे तर....असोच. =)) =)) रच्याकने हनिमूनचे मधुचंद्र हे भाषांतर अगदी शाळकरी असले तरी खुपत नै हे इशेश. (विषयच असा आहे, खुपेल कसा भेंडी?)

In reply to by बॅटमॅन

तसं नाही हो ... अकुंच्या काही कविता वाचुन मला नेहमीच वैजुवनींची आठवण येते मागे ती म्यॅटीनी कविता वाचुनही आलीच होती आठवण ... पण तेव्हा प्रतिसाद आणि आयडी संपादन व्हायची भीती वाटायची म्हणुन प्रतिसाद दिला नव्हता इतकेच =))

In reply to by बॅटमॅन

मास म्हणजे महिना. पाश्चात्त्य कल्पनेनुसार लग्नानंतरचे पहिले एक वा दोन महिने हे मधुर असतात. म्हणून त्यास हनी + मून म्हटले जाते. हनी म्हणजे मध, मून म्हणजे महिना. मंथ ह्या शब्दाला समानार्थी म्हणून मून वापरला जातो. महिना चंद्रावर आधारित म्हणून मून. (यार, काय हे? मी पण साक्षात सुर्याला दिवा दाखवतोय.. काय ब्याटाभाऊ, गंमत करता का गरिबाची..?)

In reply to by संदीप डांगे

१००% बरोबरे ओ तुमचे. उगा चेष्टा करता का गरिबाची. =)) मी आपले लिटरल भाषांतरात होणार नै म्हणत होतो आपले. :) वन्स इन अ ब्लू मून वगैरे वाक्प्रचार आहेतच की तसे.