सेकंड हनीमून
..............................................................
सेकंड हनीमून च्या कल्पनेनं ति मोहोरुन गेली होती.
४२ ची झाली होती ति..
पार्लर मध्ये जाऊन केस ट्रिम केले होते,
फेसियल..काय, काय काय चाललं होत तिच..
थट्टेत विचारले त्याने...
गप्प रे तुला काही कळत नाही..त्याला गप्प केलं.
.
हिल स्टेशन च ते रम्य अन शांत वातावरण,
सार वातावरण धुंद होते.
ति त्याच्या मिठीत पहुडली होती.
सार त्याला आठवलं..
ति पहिली भेट..उडालेली तारांबळ..
श्वासांचे तुफान..नजर मीळवण अन चोरण
ते वाट पाहणं...
सारच रोम्यान्टीक होते..
ते वय वेड होते..ती विशीतली कोवळी कळी होती..त्याची गद्धे पंचविशी नुकतीच संपत होती..
अन दिवस मंतरल्या सारखे झाले.
दिवस कसे भराभर सरले ते कळलं नाही..
.
तिच्या कडे बघितलं. चेहे~यावर काम धुंद भाव होता.
खूप सुंदर दिसत होती.वय झालं वाटत नव्हतं..
छान दिसतेस..चेहे~यावर हात फिरावीत तो म्हणाला
हाताच चुंबन घेत तिने होकार दिला.
अन एकदम त्याच लक्ष समोरच्या आरशात गेले..
.
आपल्या प्रतिमे कडे बघताच त्याच्या मनात विचार आले
काय झालं आहे माझ?.तो विचार करत होता
जीवनाच्या धकाधकीत पूर्वीचा राहिलो नव्हतो
निम्मे केस गेले होते, चश्मा लागला होता, पार बदललो होतो.
व्यवसायाचे ताण वणवण..चेहरा रापला होता..
त्याच्या मनांत विचार आला. खरंच मी तिला आवडत असेल??
"तू खूप सुंदर आहेस, पण मी वयस्कर वाटतो.तुझ्या मनाने"...तो म्हणाला..
कॉम्प्लेक्स येतो गं....
थोडंसं ओशाळल्या सारखं झालं होत. त्याला
ति खळखळून हसली." वेडा रे"
अरे तू तुझ्या नजरेनं मला बघतोस म्हणून मी तुला छान वाटते.
तू माझ्या नजरेनं बघ, तुझ्याकडे, मग तुला कळेल. तू होता तसाच आहे
ति म्हणाली..’अरे तू मला अजूनही तसाच दिसतोय..प्रथम भेटला तसा
बालिश , धांधरट, केस विस्कटलेला,
थोडासा बावळट, अन खूप रोमॅंटिक..फक्त माझा..
.
ऐकल्यावर खूप हलकं वाटत होते.
बराच वेळ ति बाहुपाशात होती...
.
पहाट केव्हा झाली ते त्यांना कळालच नाही....
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
लय भारी :)
लय भारी :)
फारच छान आहे ही कथा! मस्त.
फारच छान आहे ही कथा! मस्त.
वाह
काय मस्त लिहिलय.
अक्कू भौ आमचा राम राम घ्या वो...
सुंदर! सुंदर! सुंदर!
सुंदर! सुंदर! सुंदर!
खुपच छान !
खुपच छान !
का कोणास ठावुक पण वैजुवैनींची आठवण आली हे लेखन वाचताना ;)
अहो पण अत्ताशी कुठे जुळे
In reply to खुपच छान ! by प्रसाद गोडबोले
अहो पण अत्ताशी कुठे जुळे झालेय ना वैजुवैनींना...जरा विश्रांती तर घेऊ द्यावी की नै माणसाने? चाल्ले लगेच दुस्रा हणिमून करायास =)) शेतजमिनीला देखील विश्रांती लागते म्हणतात, इथे तर....असोच. =)) =))
रच्याकने हनिमूनचे मधुचंद्र हे भाषांतर अगदी शाळकरी असले तरी खुपत नै हे इशेश. (विषयच असा आहे, खुपेल कसा भेंडी?)
तसं नाही हो ... अकुंच्या काही
In reply to अहो पण अत्ताशी कुठे जुळे by बॅटमॅन
तसं नाही हो ... अकुंच्या काही कविता वाचुन मला नेहमीच वैजुवनींची आठवण येते मागे ती म्यॅटीनी कविता वाचुनही आलीच होती आठवण ... पण तेव्हा प्रतिसाद आणि आयडी संपादन व्हायची भीती वाटायची म्हणुन प्रतिसाद दिला नव्हता इतकेच =))
खी खी खी =))
In reply to तसं नाही हो ... अकुंच्या काही by प्रसाद गोडबोले
खी खी खी =))
मला तर त्या संदर्भात नेहमीच एका मचाककथेची अठवण येते. =)) =))
हनिमून = मधुमास?
In reply to अहो पण अत्ताशी कुठे जुळे by बॅटमॅन
हनिमून = मधुमास?
मूनचं मास कसं काय झालं?
In reply to हनिमून = मधुमास? by संदीप डांगे
मूनचं मास कसं काय झालं?
हे मास म्हणजे महिनाभर ना?
In reply to मूनचं मास कसं काय झालं? by बॅटमॅन
हे मास म्हणजे महिनाभर ना?
आता तो मास मराठीतला की
In reply to हे मास म्हणजे महिनाभर ना? by जातवेद
आता तो मास मराठीतला की इंग्रजीतला त्यावर आहे.
मास म्हणजे महिना. पाश्चात्त्य
In reply to मूनचं मास कसं काय झालं? by बॅटमॅन
मास म्हणजे महिना. पाश्चात्त्य कल्पनेनुसार लग्नानंतरचे पहिले एक वा दोन महिने हे मधुर असतात. म्हणून त्यास हनी + मून म्हटले जाते. हनी म्हणजे मध, मून म्हणजे महिना. मंथ ह्या शब्दाला समानार्थी म्हणून मून वापरला जातो. महिना चंद्रावर आधारित म्हणून मून.
(यार, काय हे? मी पण साक्षात सुर्याला दिवा दाखवतोय.. काय ब्याटाभाऊ, गंमत करता का गरिबाची..?)
१००% बरोबरे ओ तुमचे. उगा
In reply to मास म्हणजे महिना. पाश्चात्त्य by संदीप डांगे
१००% बरोबरे ओ तुमचे. उगा चेष्टा करता का गरिबाची. =))
मी आपले लिटरल भाषांतरात होणार नै म्हणत होतो आपले. :) वन्स इन अ ब्लू मून वगैरे वाक्प्रचार आहेतच की तसे.
अरे शेतजमीन काय???? उद्या ७
In reply to अहो पण अत्ताशी कुठे जुळे by बॅटमॅन
अरे शेतजमीन काय???? उद्या ७/१२ काढायला लावशील
खुपच छान !
खुपच छान !
सुन्दर
सुन्दर
सुंदर..
सुंदर
सुरेख
मस्त
छान!
छान!
मस्तच अक्कुअण्णा!
मस्तच अक्कुअण्णा!
झकास
झकास
छानच जमली आहे !
छानच जमली आहे !