सेकंड हनीमून
सेकंड हनीमून
..............................................................
सेकंड हनीमून च्या कल्पनेनं ति मोहोरुन गेली होती.
४२ ची झाली होती ति..
पार्लर मध्ये जाऊन केस ट्रिम केले होते,
फेसियल..काय, काय काय चाललं होत तिच..
थट्टेत विचारले त्याने...
गप्प रे तुला काही कळत नाही..त्याला गप्प केलं.
.
हिल स्टेशन च ते रम्य अन शांत वातावरण,
सार वातावरण धुंद होते.
ति त्याच्या मिठीत पहुडली होती.
सार त्याला आठवलं..
ति पहिली भेट..उडालेली तारांबळ..
श्वासांचे तुफान..नजर मीळवण अन चोरण
ते वाट पाहणं...
सारच रोम्यान्टीक होते..
ते वय वेड होते..ती विशीतली कोवळी कळी होती..त्याची गद्धे पंचविशी नुकतीच संपत होती..
अन दिवस मंतरल्या सारखे झाले.
दिवस कसे भराभर सरले ते कळलं नाही..
.
तिच्या कडे बघितलं. चेहे~यावर काम धुंद भाव होता.
खूप सुंदर दिसत होती.वय झालं वाटत नव्हतं..
छान दिसतेस..चेहे~यावर हात फिरावीत तो म्हणाला
हाताच चुंबन घेत तिने होकार दिला.
अन एकदम त्याच लक्ष समोरच्या आरशात गेले..
.
आपल्या प्रतिमे कडे बघताच त्याच्या मनात विचार आले
काय झालं आहे माझ?.तो विचार करत होता
जीवनाच्या धकाधकीत पूर्वीचा राहिलो नव्हतो
निम्मे केस गेले होते, चश्मा लागला होता, पार बदललो होतो.
व्यवसायाचे ताण वणवण..चेहरा रापला होता..
त्याच्या मनांत विचार आला. खरंच मी तिला आवडत असेल??
"तू खूप सुंदर आहेस, पण मी वयस्कर वाटतो.तुझ्या मनाने"...तो म्हणाला..
कॉम्प्लेक्स येतो गं....
थोडंसं ओशाळल्या सारखं झालं होत. त्याला
ति खळखळून हसली." वेडा रे"
अरे तू तुझ्या नजरेनं मला बघतोस म्हणून मी तुला छान वाटते.
तू माझ्या नजरेनं बघ, तुझ्याकडे, मग तुला कळेल. तू होता तसाच आहे
ति म्हणाली..’अरे तू मला अजूनही तसाच दिसतोय..प्रथम भेटला तसा
बालिश , धांधरट, केस विस्कटलेला,
थोडासा बावळट, अन खूप रोमॅंटिक..फक्त माझा..
.
ऐकल्यावर खूप हलकं वाटत होते.
बराच वेळ ति बाहुपाशात होती...
.
पहाट केव्हा झाली ते त्यांना कळालच नाही....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
लय भारी :)
फारच छान आहे ही कथा! मस्त.
वाह
सुंदर! सुंदर! सुंदर!
खुपच छान !
अहो पण अत्ताशी कुठे जुळे
तसं नाही हो ... अकुंच्या काही
खी खी खी =))
हनिमून = मधुमास?
मूनचं मास कसं काय झालं?
हे मास म्हणजे महिनाभर ना?
आता तो मास मराठीतला की
मास म्हणजे महिना. पाश्चात्त्य
१००% बरोबरे ओ तुमचे. उगा
अरे शेतजमीन काय???? उद्या ७
खुपच छान !
सुन्दर
सुंदर..
सुरेख
छान!
मस्तच अक्कुअण्णा!
झकास
छानच जमली आहे !