आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती?
माझ्या घरापासून शाळा ४-५ किलोमीटर अंतरावर होती. शाळेतली शेवटची ३ वर्षे म्हणजे ८ वी, ९ वी आणि १० वी मी सायकलने ये जा केली. रोज जाता येता बरेच मित्र सोबत असायचे आणि गप्पा मारत जायला यायला मजा यायची. विषय पण १४-१५ वर्षाच्या मुलांच्या नेहमीच्या विषयांसारखेच असायचे; म्हणजे अभ्यास, शाळा, सर, मॅडम, सायन्स ईतर शाखांपेक्षा किती भारी आहे, कॉम्पुटर गेम्स, मुली वगैरे. या वयात आपण श्रीमंत व हुषार मुलांना रोल मॉडेल समजत असतो आणि त्यांचं अनुकरण करायला बघत असतो. असाच एक हुशार मुलगा माझ्याबरोबर होता; अगदी इतर पालकांना हेवा वाटवा असा. तो रोज नवनविन आणि रोमांचकारी माहिती सांगायचा. यात काय नसायचं? जगात कोठे काय चाललय, नविन कॉम्पुटर गेम्स, शिक्षकांच्या-मुलींच्या खाजगी गोष्टी, नवे चित्रपट, हिरॉईन्स सर्वकाही. त्याच्या ज्ञानापुढे आणि आत्मविश्वासापुढे आपण म्हणजे कःपदार्थ.
एके दिवशी मला त्याने भलतीच गोष्ट सांगितली. त्याने नुकतीच बीअर टेस्ट कशी केली याची कहाणी तो सांगू लागला. बीअर कुठल्या दादाने आणली होती, ते सगळे त्याच्या गच्चीत बसून कसे प्यायले, त्याला दरदरून घाम कसा फुटला, रात्री गार वारा कसा वहात होता, एकदम भारी कसं वाटलं वगैरे. मला थोडा धक्काच बसला. घरचे संस्कार तर दारू ही नेहमी वाईट कशी असते असेच होते. त्यावेळी दारूचे दुष्परिणाम माहिती नव्हते पण दारू पिणार्यांचा तिरस्कार कसा केला जातो हे माहित होते. आणि ईथे मी ज्याचे अनुकरण करायचो, ज्याच्या प्रत्येक गोष्टीचे अप्रुप वाटायचे तोच दारू प्यायची तारीफ करतोय! अमुक प्रकारची पुस्तके किंवा सीडी त्याने कशी मिळवली, ती कशी कुठे वाचली, पाहिली हे त्याने आधिही सांगितले होते. पण एक म्हणजे ह्या गोष्टी वाईट आहेत हेच माहित नव्हते कारण ह्यावर मोठ्यांकडून कधिच काही ऐकले नव्हते आणि दुसरे म्हणजे अशा गोष्टींचे कुतूहल. त्यामुळे त्याचे काही विषेश वाटले नव्हते. तेव्हा ऐकावं ते नवलच असं वय आणि एवढा भारी पोरगा दारूची तारिफ करतोय म्हणल्यावर दारू पिणे कदाचित चांगलेच असेल असे वाटणे साहजिक आहे. पण एक मन हे सर्व वाईट आहे असे ठणकावून सांगत होते. हा दारू पितो म्हणल्यावर याचा आदर्श ठेवावा कि ठेवू नये आणि याच्याबरोबर रोज शाळेत ये जा करावी का या विचारात मी पडलो. शेवटी असे ठरवले कि, काही असले तरी तो माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्यामुळेच माझे ज्ञानवर्धन भरपूर होते आहे तेव्हा आता याचे अनुकरण करण्याची काही गरज नाही पण हे वगळून त्याची संगत करायला काही हरकत नाही. त्यानंतरही त्याने त्याच्या पहिल्या सिगरेटचा किस्सा सांगितला, पहिल्यांदा तंबाखू खाल्याचा किस्सा सांगितला. मी त्याच्या ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि दिनक्रम चालू ठेवला. त्याने हे किस्से बर्याच मित्रांना सांगितले असणार कारण त्यांचा एक चांगला ग्रुप जमला जे हे प्रकार सर्रास करू लागले. त्यालाही त्याच्या कुठल्याश्या मित्राने स्वतःचा अनुभव सांगितला असणार आणि माझा मित्र त्याला बळी पडला असणार. हि साखळी अशी किती लांब चालत आलेली आणि अशी किती लांब जाईल कोणास ठाऊक. त्या ग्रुपमधले काहीजण पुढे जाऊन मुलींची छेडही काढू लागले. त्याचीही एक साखळी तयार होतच असणार.
आजचा विचार करता, तो मुलगा स्वतः व्यसनांच्या आहारी गेला का? तर मला तसं वाटत नाही; यापुढे कधी जाईल का? सांगता येत नाही.
या साखळीत त्याला ज्यांनी गोवले, त्याने ज्यांना गोवले असेल तर त्यातली कोणी व्यसनांच्या आहारी गेली असतिल का? निश्चितच.
'रेगे' हा या विषयावरचाच चित्रपट आला होता पण त्यामधे वाईट गोष्टींच्या आहारी जाण्यात मित्र-मैत्रिणींच्या संगतीचा जो सहभाग आहे तो फारसा दाखवण्यात आला नाही. तर नायक हा स्वतःहूनच गुन्हेगारी विश्वाकडे कसा आकर्षित होतो हे दाखवले होते. 'बालक-पालक' मधे मात्र हे अतिशय योग्य पद्धतीने दाखवले आहे.
जिज्ञासा म्हणलं तर चांगली, म्हणलं तर वाईट गोष्ट. ती चांगल्या गोष्टीत दाखवली तर तुम्हाला मोठा संशोधक करू शकते तसच वाईट गोष्टीत दाखवली तर तुम्हाला व्यसनाधिन किंवा गुन्हेगारही बनवू शकते. दारू, स्मोकिंग अशा समाजात वाईट समजल्या जाणार्या गोष्टींचे समर्थन करणारे सुद्धा असतील. पुढे महाविद्यालयात शिक्षण घेताना बरेचजण केवळ गंमत म्हणून हे सर्व चालू करताना पाहिलय (त्यातले कित्येक हातात पैसा खेळूलागल्यानंतर दर आठवड्याला बसू लागले). कोणतही व्यसन हे तसं वाईटच पण ८ वी-१० वी एवढ्या कोवळ्या वयात जेव्हा यांच्या दुष्परिणामांची माहितीदेखिल नसते तेव्हा यात ओढल्या जाण्याचं कोणीच समर्थन करू करणार नाही.
वाचने
21794
प्रतिक्रिया
99
मिसळपाव
प्रतिक्रिया
:'(
अप्रतिम लेखन. वाक्यावाक्याशी
माझ्या बहुतांश मित्रांना दारू
उत्तम विषय आणि मांडणी. धागा
हम्म..नाजुक वयाचा विषय. अवघड
दारू पिणं :मर्दाचं लक्षण.
या वयात माझ्या सोबत असणारे ९९
बापरे
In reply to या वयात माझ्या सोबत असणारे ९९ by उगा काहितरीच
खरंच ! यात काहीही अतिशयोक्ती
In reply to बापरे by जातवेद
कोवळे वय म्हणजे किती ? व्यसने वाईटच असतात काय ?
बरबाद झाले कोण म्हणतय
In reply to कोवळे वय म्हणजे किती ? व्यसने वाईटच असतात काय ? by हेमन्त वाघे
व्यसनाच्या व्याख्येतच
In reply to कोवळे वय म्हणजे किती ? व्यसने वाईटच असतात काय ? by हेमन्त वाघे
data मिळाला तर काय analysis
In reply to कोवळे वय म्हणजे किती ? व्यसने वाईटच असतात काय ? by हेमन्त वाघे
मनाचे भरकटलेपण....
अय्यो पर्सनल अट्टैक
In reply to मनाचे भरकटलेपण.... by प्रभाकर पेठकर
गैरसमज नसावा.
In reply to अय्यो पर्सनल अट्टैक by जातवेद
गैरसमज नाही
In reply to गैरसमज नसावा. by प्रभाकर पेठकर
तुम्ही मांडलेली मते एका
In reply to गैरसमज नाही by जातवेद
चांगल्या वाईटाची नेहमीच चर्चा
In reply to तुम्ही मांडलेली मते एका by प्रभाकर पेठकर
काका सार्या चांगल्या
In reply to तुम्ही मांडलेली मते एका by प्रभाकर पेठकर
काळ बदलला आहे.
In reply to काका सार्या चांगल्या by आनन्दा
पैसा दारू वगैरे ठीके पण
In reply to काळ बदलला आहे. by प्रभाकर पेठकर
सवलत.....
In reply to पैसा दारू वगैरे ठीके पण by बॅटमॅन
धन्यवाद सरजी.
In reply to सवलत..... by प्रभाकर पेठकर
+११११११११११११११११११११११११११११
In reply to पैसा दारू वगैरे ठीके पण by बॅटमॅन
हुषार ठिक आहे पण श्रीमंत
In reply to मनाचे भरकटलेपण.... by प्रभाकर पेठकर
कदाचित अभ्यासक्रम वेगळा होता.
In reply to हुषार ठिक आहे पण श्रीमंत by सूड
मे बी!!
In reply to कदाचित अभ्यासक्रम वेगळा होता. by प्रभाकर पेठकर
सिगरेट पिऊन आवाज सुधारतो
हो... उषा उत्थुपचा आवाज हे
In reply to सिगरेट पिऊन आवाज सुधारतो by असंका
_/\_ :-)) :-))
In reply to हो... उषा उत्थुपचा आवाज हे by आदूबाळ
अय्यो
धूम्रपान... चालेल?
In reply to अय्यो by इरसाल
सुंदर लेख!! लिहीत राहा.
सुंदर लेख
प्रभाकर पेठकर काका
मार्मिक शेरेबाजी.
In reply to प्रभाकर पेठकर काका by हेमन्त वाघे
पण लेखात म्हंटल्याप्रमाणे
In reply to मार्मिक शेरेबाजी. by प्रभाकर पेठकर
व्यसन नाही.
In reply to पण लेखात म्हंटल्याप्रमाणे by टवाळ कार्टा
मिपाला व्यसन समजल्यास तर मी
In reply to व्यसन नाही. by प्रभाकर पेठकर
कोणीही आपला वैयक्तिक अनुभव
पहिल्या वेळेचा का?
In reply to कोणीही आपला वैयक्तिक अनुभव by आदूबाळ
पहिल्या वेळेचाच असं नाही,
In reply to पहिल्या वेळेचा का? by जातवेद
तंबाखू हे मृत्यूचे जगातील
डॉ साहेबांचा हा प्रतिसाद
In reply to तंबाखू हे मृत्यूचे जगातील by सुबोध खरे
स्वानुभव जास्त रंगवून सांगता
जवळ जवळ प्रत्येकाला कुठलेही
परा, आपण ८ वी - १० वी च्या
In reply to जवळ जवळ प्रत्येकाला कुठलेही by परिकथेतील राजकुमार
परा, आपण ८ वी - १० वी च्या
In reply to परा, आपण ८ वी - १० वी च्या by जातवेद
बायकांचा नाद
In reply to परा, आपण ८ वी - १० वी च्या by बिपिन कार्यकर्ते
मुनीवर, सगळे तपशील इथेच लिहू?
In reply to बायकांचा नाद by कपिलमुनी
७वी मधल्या मुलाला सिगरेट
In reply to परा, आपण ८ वी - १० वी च्या by बिपिन कार्यकर्ते
पहिले म्हणजे, तो विकतच आणत
In reply to ७वी मधल्या मुलाला सिगरेट by जातवेद
अगदी अगदी!!!!
In reply to पहिले म्हणजे, तो विकतच आणत by बिपिन कार्यकर्ते
हे ही वाईट आणी ते ही वाईटच!
In reply to पहिले म्हणजे, तो विकतच आणत by बिपिन कार्यकर्ते
परा, आपण ८ वी - १० वी च्या
In reply to परा, आपण ८ वी - १० वी च्या by जातवेद
सध्या ५७-५८ वयाच्या असलेल्या
In reply to परा, आपण ८ वी - १० वी च्या by परिकथेतील राजकुमार
धाडस? :D
In reply to जवळ जवळ प्रत्येकाला कुठलेही by परिकथेतील राजकुमार
त्यांची कोणाकडून काही अपेक्षा
In reply to धाडस? :D by शब्दबम्बाळ
आले बापले! अच्च का?
In reply to त्यांची कोणाकडून काही अपेक्षा by परिकथेतील राजकुमार
आले बापले! अच्च का?
In reply to आले बापले! अच्च का? by शब्दबम्बाळ
ओ काका, थंड घ्या!
In reply to आले बापले! अच्च का? by परिकथेतील राजकुमार
दोन्ही प्रतिसादात मी वैयक्तिक
In reply to ओ काका, थंड घ्या! by शब्दबम्बाळ
च्यायला!
In reply to दोन्ही प्रतिसादात मी वैयक्तिक by परिकथेतील राजकुमार
वरच्या दोन प्रतिक्रिया
In reply to च्यायला! by परिकथेतील राजकुमार
वरच्या दोन प्रतिक्रिया
In reply to वरच्या दोन प्रतिक्रिया by शब्दबम्बाळ
पूर्वपरिक्षण? =)) ते तरी कधी
In reply to वरच्या दोन प्रतिक्रिया by परिकथेतील राजकुमार
पूर्वपरिक्षण? =)) ते तरी कधी
In reply to वरच्या दोन प्रतिक्रिया by परिकथेतील राजकुमार
असं आडून आडून पराशेट तरूण
In reply to पूर्वपरिक्षण? =)) ते तरी कधी by बॅटमॅन
हम्म
In reply to पूर्वपरिक्षण? =)) ते तरी कधी by बॅटमॅन
भौतेक त्याला आण्भवी गायडन्स
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
मी ए एफ एम सी मध्ये असताना
+११११
In reply to मी ए एफ एम सी मध्ये असताना by सुबोध खरे
स्मार्ट असे नाही पण सिगारेट
In reply to मी ए एफ एम सी मध्ये असताना by सुबोध खरे
नाही
In reply to स्मार्ट असे नाही पण सिगारेट by कानडाऊ योगेशु
हातात सिगारेट असलेला भिकारी
In reply to स्मार्ट असे नाही पण सिगारेट by कानडाऊ योगेशु
आमच्या घराजवळ राहाणारा माझा
+११११११११११
In reply to आमच्या घराजवळ राहाणारा माझा by बिपिन कार्यकर्ते
+१११
In reply to +११११११११११ by टवाळ कार्टा
व्यसने करणारी माणसे यशस्वी
अर्थातच डॉक. व्यसने आणि
In reply to व्यसने करणारी माणसे यशस्वी by सुबोध खरे
सिगरेट विथ चहा
त्याने फुफफुसातला टार धुतला जात असावा :)
In reply to सिगरेट विथ चहा by याॅर्कर
टारसर्पवियोग =))
In reply to त्याने फुफफुसातला टार धुतला जात असावा :) by जातवेद
चहा डायट
In reply to टारसर्पवियोग =)) by बॅटमॅन
=))
In reply to चहा डायट by जातवेद
वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांची
मित्रांसोबर बिअर प्यायलोय
In reply to वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांची by चतुरंग
हा हा हा!
In reply to मित्रांसोबर बिअर प्यायलोय by परिकथेतील राजकुमार
=)) =)) =)) =)) =))
In reply to हा हा हा! by चतुरंग