Skip to main content

हाऊ मेनी कॉलम्स डिड ही गेट?

लेखक अजिंक्य विश्वास यांनी बुधवार, 07/10/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
’How many columns did he get?’ व्हीनस - २००६ ऑस्कर कधी कधी खूप कद्रूपणे वागते. अर्थात हा कद्रूपणा ऑस्करची उंची कमी करतो. त्या व्यक्तीची नाही , ज्याला इतकी नामांकने मिळूनदेखील एकही ऑस्कर कधी मिळाले नाही. (नाही म्हणायला, लाईफ टाईम अचिव्हमेंट देऊन आपला खुजेपणा तेवढा दाखवला. "Always a bridesmaid, never a bride - my foot!" - ही त्याची ७५व्या ऑस्करच्या वेळेस अ‍ॅव्हॉर्ड मिळतानाची प्रतिक्रिया!) पीटर ओ’टूल ’लॉरेन्स ऑफ अरेबिया’चा हा नायक इतका देखणा होता की, नोएल कॉवर्ड त्याला गंमतीत म्हणाला होता, ’तू जर अजून देखणा असतात तर ती फिल्म ’फ्लॉरेन्स ऑफ अरेबिया’ म्हणून देखील चालली असती.’ शांत करारी आवाज, चमकदार निळे डोळे आणि प्रभावशाली देखणेपण घेऊन आलेला नट अभिनयातदेखील तोडीस तोड होता. त्याच्या गाजलेल्या चित्रपटांची नावे जरी अशीच आठवत गेलो, तर तो डोळ्यांसमोर सहज उभा राहतो. लॉरेन्स ऑफ अरेबिया, बेकेट, हाऊ टू स्टील अ मिलीयन, लायन इन्‌ द विन्टर, द रूलिंग क्लास, व्हॉटस्‌ न्यू पुसीकॅट, गुडबाय, मि. चिपस्‌, मर्फीज्‌ वॉर अशी कित्येक नावे सहज डोळ्यांसमोर येतात. तशी त्याची ओळख १० वर्षांपूर्वी मी कॉलेजमध्ये नुकताच गेलो होतो, तेव्हा झाली होती. ’लॉरेन्स ऑफ अरेबिया’ आणला होता आणि पहिली ५ मिनिटस्‌ पाहून ठेवून दिला होता, इतकीच. तसा तो इतर चित्रपटातून देखील दिसत आणि जाणवत होता, फक्त तेवढा जवळचा नव्हता. ट्रॉय, स्टारडस्ट, रॅटॅटुई इ. ३ वर्षांपूर्वी त्याचा ’हाऊ टू स्टील अ मिलीयन’ पाहिला आणि हा नट कमालीचा लक्षात राहिला. तसे चित्रपट पाहताना नट उजवा आहे की, डावखोरा हेच चाचपण्याचा जास्त प्रकार होतो, आणि ह्या बाबतीतसुद्धा त्याने मला लक्ष देऊन पाहण्यास भाग पाडले. ( कॅथलिक असल्यामुळे लहानपणी नन्सने त्याला मारून मारून डावखोरेपणा घालवायचा प्रयत्न केला होता). चित्रपट पाहण्याचे खरे कारण ’रोमन हॉलिडे’ ची ऑड्रे हेपबर्न होते हे निराळे. पण त्यानंतर झपाटल्यासारखे त्याचे बेकेट, लायन इन्‌ द विंटर, लॉरेन्स ऑफ अरेबिया, कॅलिगुला, व्हीनस, द रुलिंग क्लास असे चित्रपट पाहिले. इतके सुंदर चित्रपट देऊनही त्याचे आणि ऑस्करचे नेहमीच व्यस्त प्रमाण राहिले. आजपर्यंत ८ वेळा नामांकन होऊन देखील त्याला एकदाही ऑस्कर मिळाले नाही. त्याच्या ’बेकेट’ मधील सहकलाकार , मित्र आणि ७ वेळा ऑस्कर नामांकने मिळूनदेखील ऑस्कर न मिळालेल्या रिचर्ड बर्टन सारखेच. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, १४ डिसेंबर २०१३ ला त्याचे निधन झाले. माझी बसलेली दातखीळ आज कुठे निघाली , तेव्हा त्याच्या आठवणीत हे लिहिण्याचा प्रपंच मांडला आहे. इतके देखणे टॅलेंट विस्मृतीत कधीच जाणार नाही, पण माझ्यासारखी आजच्या पीढीला त्याची ओळख व्हावी इतकीच छोटी इच्छा आहे, बस! तसेही ’व्हीनस’ मध्ये मॉरिस मेल्यावर त्याचे मित्र न्यूजपेपर मध्ये आलेला त्याचा फोटो आणि बातमी पाहात असतात, तेव्हा एक मित्र विचारतो, ’ किती कॉलम मिळाले त्याला?’ आणि तिथलीच वेट्रेस मॉरिसच्या मित्राला विचारते, ’तुमचा मित्र आज आला नाही?’ मित्र न बोलता आलेला हुंदका आवरत तिला त्याची पेपरात आलेली बातमी दाखवतो. ’गॉड, ही वॉज गॉर्जस’ . ती उद्गारते. :)  --------------------------------------------------------- बहुतांश माहिती स्त्रोत- IMDB.COM
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5566
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

त्रोटक वाटला. लॉरेन्स ऑफ अरेबिया बघायचा राहून गेलाय. रोमन हॉलिडे तर अफलातूनच आहे. ऑड्री हेपबर्नसाठीच अर्थात बघितला गेला; पर्यायाने नायकाकडे फार लक्ष गेले नाही.

In reply to by अन्या दातार

रोमन हॉलिडे चा उल्लेख अनुषंगिक आहे...त्याचा हिरो ग्रेगरी पेक आहे. पीटर ओ टुल त्यात नसावा.... आणि असे लेख त

In reply to by अन्या दातार

त्रोटक आहे , कारण त्याच्या अभिनयाबद्दल लिहायला वाव ठेवला आहे. बेकेट, आणि लायन इन्‌ द विंटर येईलच थोड्या दिवसात. रोमन हॉलिडे मधली ऑड्रे हेपबर्न इतकाच ग्रेगरी पेकसुद्धा प्रभावी होता. त्यात पीटर ओ’टूल नाहिये. जाता जाता अवांतर- ऑड्रे हेपबर्न रोमन हॉलिडेमध्ये जेवढी सुंदर दिसली आहे, तेवढी सुंदर ती मला फक्त सॅब्रीना मध्ये दिसली होती. बाकी कुठल्याच नाही.

पीटर ओ टूलच्या कुठल्या कुठल्या भूमिका नामांकनं मिळालेल्या होत्या ते पाहू, सोबत अन्य नामांकन मिळालेले अभिनेते आणि विजेत्याचं नाव. १९६४, १९६८ आणि १९६९ वगळता अन्य वर्षी समोर जबरदस्त ताकदीचे आणि विविध छटा असलेल्या भूमिका साकारणारे नट होते. मला स्वतःला हॅरिसन आणि जॉन वेन फारसे भावले नाहीत, चार्ली विषयी फार काही माहित नाही. 1962 O’Toole- Lawrence of Arabia | Gregory Peck – To Kill a Mockingbird - winner Burt Lancaster – Birdman of Alcatraz | Jack Lemmon – Days of Wine and Roses Marcello Mastroianni – Divorce Italian Style 1964 O’Toole - Becket | Rex Harrison – My Fair Lady - winner | Richard Burton – Becket| Anthony Quinn – Zorba the Greek Peter Sellers – Dr. Strangelove 1968 O’Toole - The Lion in Winter | Cliff Robertson – Charly - winner Alan Arkin – The Heart Is a Lonely Hunter | Alan Bates – The Fixer Ron Moody – Oliver! 1969 O’Toole - Goodbye, Mr. Chips | John Wayne – True Grit - winner Richard Burton – Anne of the Thousand Days| Dustin Hoffman – Midnight Cowboy Jon Voight – Midnight Cowboy 1972 O’Toole - The Ruling Class | Marlon Brando – The Godfather (declined) - winner Michael Caine – Sleuth | Laurence Olivier – Sleuth Paul Winfield – Sounder 1980 O’Toole - The Stunt Man | Robert De Niro – Raging Bull -winner Robert Duvall – The Great Santini | John Hurt – The Elephant Man Jack Lemmon – Tribute 1982 O’Toole - My Favorite Year | Ben Kingsley – Gandhi - winner Dustin Hoffman – Tootsie | Jack Lemmon – Missing - winner Paul Newman – The Verdict 2006 O’Toole - Venus | Forest Whitaker – The Last King of Scotland Leonardo DiCaprio – Blood Diamond | Ryan Gosling – Half Nelson Will Smith – The Pursuit of Happyness

In reply to by अभिजितमोहोळकर

७२ चे वर्ष तर खूप धूमधामीचे गेले. मी स्ल्यूथबद्दल लिहिणारच आहे. पण त्याला लायन इन्‌ द विंटरचे मिळायलाच पाहिजे होते, ह्या ठाम मताचा मी आहे. बाकी १९६२, १९८० आणि १९८२ टफ होतेच. स्ल्यूथ, बेकेट, लायन इन्‌ द विंटर हे स्वतंत्र लेखाचे विषय आहेत. :)

In reply to by अभिजितमोहोळकर

ग्रेगरी पेक - टू किल अ माॅकिंगबर्ड, मार्लन ब्रँडो - गाॅडफादर, राॅबर्ट डी नीरो - रेजिंग बुल आणि बेन किंग्जले - गांधी - हे सोडले तर बाकी वेळा पीटर ओ टूलला आॅस्कर मिळायला खरंच हरकत नव्हती. बेकेट साठी तर ते मिळायलाच हवं होतं. असंच दुर्दैव दिग्दर्शकांमध्ये आल्फ्रेड हिचकाॅकचं आहे. सायको, रिअर विंडो, व्हर्टिगो, थर्टीनाईन स्टेप्स, डायल एम फाॅर मर्डर, नाॅर्थ बाय नाॅर्थवेस्ट - हे चित्रपट गाजले. अँथनी पर्किन्ससारख्यांना आॅस्करही मिळालं पण हिचकाॅकला एकही आॅस्कर मिळालं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

हिचकॉक सारखे लोक ऑस्करपेक्षा लै मोठ्ठे आहेत हो. आता मला सांगा २००२/०३ अथवा १९९४ साली कोणाला ऑस्कर मिळालेले असेल त्यांची नावे लोकांच्या लक्षात तरी आहेत काय? पण हिचकॉकला बाप माणूस मानतातच ना अजून पण. :)

Charly Gordon (Cliff Robertson), who has an IQ of 69, is constantly derided by his boss and fellow employees at the bakery where he works. His efforts to read and write prove fruitless. But when Dr. Straus (Lilia Skala) offers Charly an opportunity to participate in a radical medical experiment, he becomes a certified genius. The newly educated Charly develops feelings for his teacher, Alice Kinian (Claire Bloom), but their happiness is threatened by an unforeseen complication. अर्थात वरील यादी आणि हा तपशील आंतरजालावरून साभार

In reply to by तर्राट जोकर

शम्मी सारखा राजबिंडा हिरो दुसरा नाही बॉलिवूडात.

In reply to by तुषार काळभोर

शम्मी सारखा राजबिंडा हिरो दुसरा नाही बॉलिवूडात.
एक सजेशन. राजबिंडा या ऐवजी राजधोंडा म्हंटले तर योग्य होईल

In reply to by तुषार काळभोर

शम्मी देखणा होताच तरी शशी अधिक देखणा होता. पण शम्मीची एनर्जी शशीत नव्हती. शिवाय तो मेन-स्ट्रीम किंवा समांतर-प्रायोगिक या कल्पनांमध्ये गोंधळला. ना धड धंदेवाईक, ना धड प्रायोगिक. त्याची अशी शैली त्याला डेवलप करता आली नाही. शम्मीकपूरचा ओवर-मेक्अप त्या काळच्या ईस्टमन किंवा गेवा किंवा टेक्नि जो काही होता त्या कलरमध्ये अजिबात चांगला दिसत नसे. ते रंगवलेले ओठ...खालच्या फोटोतही आहेतच.