Skip to main content

होऊ द्या खर्च....आपल्याच घरचं..

लेखक अभ्या.. यांनी रविवार, 20/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी बाप्पा यायच्या आधीच एक महिन्यापासून माझ्या हपिसात मंडळासाठी टीशर्ट छापून घेणारे येऊ लागले. आता काय तंत्रज्ञानामुळे हव्या त्या रंगसंगतीचे, अगदी छान छान अशा कापडापासून बनवलेले टीशर्ट अगदी कमी वेळेत मिळू लागले आहेत. मंडळांचे टीशर्ट तर छापून गेले पण आता वाट पाहायची नवरात्रीची. असो, तर माझ्या डोक्यात विचार आला, आपण एवढ्या प्रकारचे रंगीत संगीत डिझाईन फक्त कार्यकर्त्यांसाठी बनवतो (ते मिरवणुकीत अजून काय रंग उधळतात त्यांनाच माहीत) मग आपल्या मिपाकरांनीच काय गुन्हा केलाय. मग म्हणले चला. मिपाकरांसाठी पण टी शर्ट डिझाईन करावा. पण नंतर विचार आला, साला इथे काय एक मेंबर एकसारखाय व्हय. हर एकाची रीत न्यारी, हर एकाची नीती न्यारी. मग ठरवलेच. कुछ चुनिंदा आयडी के लिए खास डिझाइन बनाये जाये. आयडीचा स्वभाव, त्यांचे लेखन, प्रतिसाद याचा विचार करतानाच थोडे गरगरल्यासारखे झाले. लैच व्हरायटी भरुन राह्यलीय राव इथे. सो पेशे मिपाकर सम डिझाइन्स. चांगल्याक कामाची सुरुवात गणेशाने करतात म्हणे. मग आमच्या सुपरशेफ गंपाला इसरुन कसं चालायचं? हे डिझाईन खास त्याच्यासाठीच. t1 नेक्स्ट येताहेत आमच्या मिपाच्या लाडक्या सुगरण, ज्यानी पाण्याला जरी फोडणी दिली तरी ती ग्रेव्ही होते म्हणे, त्याच त्या सुप्रसिध्द मास्टरशेफ सानिकास्वप्निल अन मृणालिनी. ह्यांच्यासाठी हा खास टीशर्ट सेट. एकातच ५ येतील. हे शर्ट वापरुन त्या कायम किचनमध्ये राहतील अन आम्हाला नवनवीन नमुने पेश करतील ह्या अपेक्शेने ही ऑफर आहे. t2 प्रचेतसरावांची सिनेयरिटी हाय पण दगडी डिझाईन शर्टावर छापायचे म्हणजे सोपे वाटले काय. बर्र त्यात सुध्दा ही दर्पण सुंदरी सातवाहनाच्या काळातील नसून वाकाटकाच्या आहे असे लेण्यामृत एकावे लागायचे. यांच्या शर्टवर आख्खी लेणीसुधा छापता आली असती म्हणा पण ती ऑर्डर बुवांकडून येणार आहे असे कळले. t3 प्रचेतसराव म्हणले की बुवा हे उच्चारावेच लागत नाही, लॉरेन हार्डी सारखी यांची जोडी अभेद्य आहे. किंवा टीआगोबा, शर्टात्मा असे म्हणले तरी चालेल. बुवांसाठी हा खास शर्ट. हा रंग त्यांना विषेष प्रिय असल्याचे त्यांनीच दाखवून दिले आहे त्तस्मात दिलाय तो घालावा. बुवा दिवेकरा याहो, स्मायल्या मला भेट द्या हो. t4 वडगावमार्गे पिंचीत आलो मग नाखून काका अन क्याप्टन्याला इसरुन कसे चालेल. हे डिझाईन खास दोघांचाठी. त्यांचे ते ओळखून घेतील. काळजी नसावी. नाखून काका तुमचा स्पेसबार लवकर दुरुस्त करुन घ्या हो. t5 t6 अर्र या मार्गे येतायेता सिंव्हगड रोडच्या दोन सिंव्व्हाना इसरुन चालणार नाही. एक सिंव्ह आध्यात्मिक गुरगुरतो आणि गायला लागला की आनंद शिंदेला घाबरवतो. म्हशींवर विशेष प्रेम आहे म्हणतात. दुसरा सिंव्ह नुसताच घाबरवतो. ह्याच्या सूडबुध्दीमुळेच मिपाचे संस्कार जरासे का होइना टिकलेत असे त्यांचे वैयक्तिक मत आहे. असोत बापडे. कोकण्यांच्या नादी कुणी लागावे. त्यांचे डीझाइन त्यांनी घेतील, चटणीपाकीटासारखा नीचपणा करणार नाहीत हया अपेक्षेने दोन शर्ट देत आहे. t7 t8 ते आमचा टेक्निकल परशान्त (जरा कमी दामले) त्याला तर टीशर्ट मस्ट आणि मस्तच. कधीही भेटो स्वतःच्या दिलखुलासपणाने अन देखणेपणाने दुसर्‍याला कॉम्प्लेक्स देतो. प्रशांता, साह्यबा भारतात कधी असलास तर घाल हो हा शर्ट, t9 मध्येच औरंगाबादच्या शक्तीकेंद्राला विसरुन चालणार नाही. टीशर्ट हा प्राडाँचा आवडता पोषा़ख आहे असे कळलेय. या टीशर्टात ते अजून टेक्नोसॅव्ही दिसतील असा विश्वास आहे. t10 बोकेश अर्थात बोका ए आझमांचे आगमन मिपावर जरी उशीरा झालेय तरी त्यांनी अल्पावधीतच आपल्या दमदार म्यांउने मिपाकरांना जिंकलेय, त्यांच्या या राजेशाही वाटचालीसाठी खास डिझाईन. t11 ब्याटमानापाचा स्नेह काय वर्णावा. त्यांनी म्हणावे अन आम्ही त्यांना टीशर्टावर टीशर्ट पुरवावे. काय करणार बिचारे लॉजिकचा एक सूट चढऊन बसलेत उतरवायलाच तयार नाहीत. असो. t12 आदूबाळाने तर सध्या सगळ्याच मिपाकरांचे इन्क्लुडिंग संपादकमंडळांचे मन जिंकून घेतलेय. या लाडक्या अन अत्यंत गुणी बाळासाठी हा खास टीशर्ट. (मळवलास की आपण दुसरा घेऊ हं) t13 हुशार लोकांची नावे येताहेत तर क्लिंटन ऑर गॅरी ट्रुमन साह्यबांना बोलावलेच पाहिजे. त्यांना त्यांचे मशीन सांभाळू द्या. हिशोबात घोळ होणार नाही. त्यांच्यासाठी अजून एक आम आदमी शर्ट आहे पण तो एके पीएम झाल्यावर देण्यात येईल. t14 क्लिंटनराव अन राजकारण विषय आले की माई येणारच. त्यांच्या ह्यांनी टीशर्ट घालायला परमिशन नाकारलीय म्हणे. असु दे. ह्यांचे मत कधी चुकत असते काय. t15 असेच न चुकणारे अन माईंशी भांडल्याशिवाय न करमणारे एक व्यक्तिमत्व आपल्या मिपाची शान वाढवतेय. विजयादशमीसाठी रा़हून ठेवतील हा शर्ट कदाचित. श्रीगुरुजी, विडंबनापेक्षा मोदींच्या राजकारणात जास्त मज्जाय हो. t16 राजकारण असो की समाजकारण, विज्ञान असो की कला, भटकंती असो की अध्यात्म, प्रत्येक ठिकाणी एक्क्याची भुमिका पार पाडणारे आमचे डॉ. सुहास म्हात्रे यांना त्यांच्या जुन्या आयडीची ओळख कायम राहावी म्हणुन हा शर्ट. t17 च्यामारी हा छॉटासा शर्ट कुणाचाय बरे? एखादी पिवशी आणा अन घेऊन जा. t18 . अरर्रर दमलात काय इतके श्याम्पल पाहून? मंडळी ईतक्यात कार्यक्रम संपणार नाही. अजून बरेच गणमान्य राजमान्य आयडी अन त्यांचे टीशर्ट येणार आहेत. ह्या डीझाईन्ससाठी आम्ही बर्‍याच शक्यतांचा विचार केला आहे. ही व्हरायटी पाहून अजून काही मागण्या आल्यास त्यांचा पण विचार केला जाणार आहे. सो...... स्टे टुन्न्न्न्न्न्ड. कीप वाचिंग.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 28292
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

या धाग्यात आणखी २० टीशर्टची भर घातली जाऊन धाग्याची दखल घेतली जावी अशी विनंती. नेहमी काय शिरेस? दखल घेण्यासारखाच धागा आहे असं आमच्या हिच्या त्याच्या तिच्या ह्याचं मत. ;). कं बोल्ता? ऑन शिरेस नोटः उत्तम कल्पनाशक्ती, सूक्ष्म निरीक्षण आणि उत्कृष्ठ सादरीकरण तसेच कुणालाही न दुखावता त्या आयडीच्या नेमक्या गोष्टींचा घेतलेला चित्ररुपी आढावा यामुळे हा धागा दखल घेण्यास पात्र ठरतो आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

का हो? धाग्याचं नाव काय आहे पहा की जरा.

In reply to by प्यारे१

च्यामारी लावला का ह्याण्डब्रेक. जरा चांगले चाललेले बघवत नाही. छचोर धागा असला म्हणून काय झाले सेंचुरी तरी होऊ दे.

In reply to by प्यारे१

उत्तम कल्पनाशक्ती, सूक्ष्म निरीक्षण आणि उत्कृष्ठ सादरीकरण तसेच कुणालाही न दुखावता त्या आयडीच्या नेमक्या गोष्टींचा घेतलेला चित्ररुपी आढावा +१०००

हे सगळे कपडे कुठुन मागवायचे? माल घरपोच मिळेल का? किमान किती घ्यावे लागतिल? माल आल्यावर पैसे दिले तर चालेल का? बापरे! खूप प्रश्न विचारले मी. इथेच थांबतो. दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत. हा धागा आवडला हेवेसांनल.

प्रचंड आवडले हे डीझाईन्स !!!

व्वा. अगदी वेगळाच कल्पक, कलात्मक धागा. अतिशय सुंदर. सर्वच टीशर्टं बहारदार. अभिनंदन.

In reply to by चित्रगुप्त

येस्स्स्स्स्स्स्स्स.

चीज झाले धाग्याचे. चित्रगुप्तजी तुमच्या शर्टाचे डिझाइन पुढील भागात आहे बरं का. :)

ह्ये डिझाईन खास सेन्च्युरीसाठी. t20 आमच्या वेळंचं काही राहिलं नाही म्हणत बध्द्कोष्ठी पिंका टाकत सगळीकडे फिरणार्‍या पण हिकडे न फिरकणार्‍या माझ्या लाडक्या ज्येष्ट, श्रेष्ठ, आजी माजी हुच्चभ्र्हु सदस्यांना सप्रेम भेट.

In reply to by कोमल

खुश खुश. सध्यातरी. :) या मदतीसाठी आगामी व्हिआयपी कोट्यातला पहिला टीशर्ट तुमचा डिझाईन असेल. एकदम यूआरएल डिझाईन आहे. खुश?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भिकबाळी पण प्रिंट करायची त्याच्याबरोबरचं :)!! 3D प्रिंटर असेल तर ते पण करता येईल, हाकानाका ! ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

३डी प्रिंटिंग ला हरकत नाही पण ती अंगावर घालायची गोष्ट असल्याने टोचली तर लफडं होईल =))

In reply to by प्यारे१

टी शर्ट नको तसला. लंगोट च डिज़ाइन कर भारीपैकी. सूड ची आठवण म्हणून वापरायला होईल लोकांना.
आगागागागागा! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

In reply to by प्यारे१

कर डिझाईन!! शिवथरघळीतल्या कट्ट्याला ऐनवेळी कोणाला मिळाला नाही लंगोट, तर त्यांना द्यायला होईल. चिमणूची कल्पनाशक्ती भारी आहे. फक्त ते आपल्या धार्मिक उद्देशाला बाधा आणू शकतं. ;)

In reply to by असंका

सगळ्यांनी त्यांचेच कौतुक केले पण दोघेही धाग्याकडे फिरकले नाहीत हो. फार वाईट वाटतेय. :( एकमेकाचे डूआयडी तर नव्हेत? ;)

In reply to by अभ्या..

कल्जी नको माई (त्यांच्या) यांना विचारल्याशिवाय येणार नाहीत. आणि ते आल्याशिवाय गुरुजी फिरकत नाहीत असा प्रवाद आहे. तू यांचे परवानगीसाठी काही प्रयत्न करून पहा. ना खु

अफलातून डिझाईन्स्.. लै अावड्या..

अगागागा !! पार टीशर्टाचा बाजारच उठवलाव मांडलाव की !! सर्व मिपाकरांना घालता येइल असे टीशर्ट डीजाईन कराना राव.

भन्नाट निरीक्षण.. माई, श्रीगुरुजी, गंपा, सानिकास्वप्नील हे टीशर्ट खासच... अजुन येउद्या.. होउ द्या खर्च..

विविध आयडींसाठी नि:स्वार्थ भावाने टी-शर्ट बनवून देणार्‍या मा.श्री अभ्यादादा यांच्यासाठी हा विशेष टी-शर्ट, अखिल मिपापरिवारातर्फे सप्रेम भेट !! ab

In reply to by नीलमोहर

ले बटे. सगळ्यात भारी अभ्याच दिसतंय आता....

In reply to by नीलमोहर

एकच नंबर डिझाईन. सगळ्या शर्टात हाच भारी दिसतोय. कलर्स लै आवडले. थान्कू थान्कू. म्या मंडळाचा आभारी हाय.

In reply to by अभ्या..

आवडला ना.... मग बरंय, हापिसात काम थोडं बाजूला ठेऊन, बाजूवाल्यांच्या चौकशा + चौकस नजरांकडे दुर्लक्ष करून, साहेब यायच्या आत एवढा उपद्व्याप केल्याचं चीज झालं. (चीज काय आता भूक लागली काय ?? चीज नव्हे ... टी-शर्ट झाला !!) बरेच दिवसांनी काहीतरी वेगळं केल्याचं समाधानही मिळालं, मजा आली. बाकी कल्पना मुळात तुमचीच होती, आम्ही फक्त सर्वांना आनंद देणार्‍याला थोडं खुश करण्याचा प्रयत्न केला एवढंच.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

येणारे येणारे. गणमान्य राजमान्य लोकांची डिझाईन्स दुसर्‍या भागात आहेत. आणि बिकासर तुम्हाला सोडून मिपाला शर्ट देत बसण्यात कै अर्थय का?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका मालक, तुम्हाला नाराज करणार नै. ते परवडणार पण नै. ह्या धाग्यावरचा १५० वा प्रतिसाद. खास तुम्हच्या शर्टासहित. ;) t21 आवडल्याचे कळवणे.

In reply to by अभ्या..

बिकांच्या टीशर्टसाठी अगदी हेच्च डिझाईन परफेक्ट बसेल असं वाटलं होतं. बादवे, ती उंटांची माळफुले राहिलीत. ती बॅकसाईडला गेली असावीत असा कयास आहे! ;-)

In reply to by अभ्या..

मस्त डिझाईन. फक्त काळ्याऐवजी हिरव्या रंगाच्या छटा जास्त शोभून दिसल्या असत्या ;) :)

एकाहून एक छान आहेत टी शर्ट . निरीक्षण शक्तीची कमाल आहे. हॉटेलात येणाऱ्या सगळ्याना तयार करून द्या असे टी शर्ट

भारी म्हणजे काय लैच भारी मला पण हवाय ऑर्डर घेऊन टाक अकौंट नंबर देऊन टाक .. लग्गेच करून घेऊ :D