नमस्कार मंडळी
बाप्पा यायच्या आधीच एक महिन्यापासून माझ्या हपिसात मंडळासाठी टीशर्ट छापून घेणारे येऊ लागले. आता काय तंत्रज्ञानामुळे हव्या त्या रंगसंगतीचे, अगदी छान छान अशा कापडापासून बनवलेले टीशर्ट अगदी कमी वेळेत मिळू लागले आहेत.
मंडळांचे टीशर्ट तर छापून गेले पण आता वाट पाहायची नवरात्रीची.
असो, तर माझ्या डोक्यात विचार आला, आपण एवढ्या प्रकारचे रंगीत संगीत डिझाईन फक्त कार्यकर्त्यांसाठी बनवतो (ते मिरवणुकीत अजून काय रंग उधळतात त्यांनाच माहीत)
मग आपल्या मिपाकरांनीच काय गुन्हा केलाय. मग म्हणले चला. मिपाकरांसाठी पण टी शर्ट डिझाईन करावा.
पण नंतर विचार आला, साला इथे काय एक मेंबर एकसारखाय व्हय. हर एकाची रीत न्यारी, हर एकाची नीती न्यारी. मग ठरवलेच. कुछ चुनिंदा आयडी के लिए खास डिझाइन बनाये जाये. आयडीचा स्वभाव, त्यांचे लेखन, प्रतिसाद याचा विचार करतानाच थोडे गरगरल्यासारखे झाले. लैच व्हरायटी भरुन राह्यलीय राव इथे.
सो पेशे मिपाकर सम डिझाइन्स.
चांगल्याक कामाची सुरुवात गणेशाने करतात म्हणे. मग आमच्या सुपरशेफ गंपाला इसरुन कसं चालायचं? हे डिझाईन खास त्याच्यासाठीच.
नेक्स्ट येताहेत आमच्या मिपाच्या लाडक्या सुगरण, ज्यानी पाण्याला जरी फोडणी दिली तरी ती ग्रेव्ही होते म्हणे, त्याच त्या सुप्रसिध्द मास्टरशेफ सानिकास्वप्निल अन मृणालिनी. ह्यांच्यासाठी हा खास टीशर्ट सेट. एकातच ५ येतील. हे शर्ट वापरुन त्या कायम किचनमध्ये राहतील अन आम्हाला नवनवीन नमुने पेश करतील ह्या अपेक्शेने ही ऑफर आहे.
प्रचेतसरावांची सिनेयरिटी हाय पण दगडी डिझाईन शर्टावर छापायचे म्हणजे सोपे वाटले काय. बर्र त्यात सुध्दा ही दर्पण सुंदरी सातवाहनाच्या काळातील नसून वाकाटकाच्या आहे असे लेण्यामृत एकावे लागायचे. यांच्या शर्टवर आख्खी लेणीसुधा छापता आली असती म्हणा पण ती ऑर्डर बुवांकडून येणार आहे असे कळले.
प्रचेतसराव म्हणले की बुवा हे उच्चारावेच लागत नाही, लॉरेन हार्डी सारखी यांची जोडी अभेद्य आहे. किंवा टीआगोबा, शर्टात्मा असे म्हणले तरी चालेल. बुवांसाठी हा खास शर्ट. हा रंग त्यांना विषेष प्रिय असल्याचे त्यांनीच दाखवून दिले आहे त्तस्मात दिलाय तो घालावा. बुवा दिवेकरा याहो, स्मायल्या मला भेट द्या हो.
वडगावमार्गे पिंचीत आलो मग नाखून काका अन क्याप्टन्याला इसरुन कसे चालेल. हे डिझाईन खास दोघांचाठी. त्यांचे ते ओळखून घेतील. काळजी नसावी. नाखून काका तुमचा स्पेसबार लवकर दुरुस्त करुन घ्या हो.
अर्र या मार्गे येतायेता सिंव्हगड रोडच्या दोन सिंव्व्हाना इसरुन चालणार नाही. एक सिंव्ह आध्यात्मिक गुरगुरतो आणि गायला लागला की आनंद शिंदेला घाबरवतो. म्हशींवर विशेष प्रेम आहे म्हणतात. दुसरा सिंव्ह नुसताच घाबरवतो. ह्याच्या सूडबुध्दीमुळेच मिपाचे संस्कार जरासे का होइना टिकलेत असे त्यांचे वैयक्तिक मत आहे. असोत बापडे. कोकण्यांच्या नादी कुणी लागावे. त्यांचे डीझाइन त्यांनी घेतील, चटणीपाकीटासारखा नीचपणा करणार नाहीत हया अपेक्षेने दोन शर्ट देत आहे.
ते आमचा टेक्निकल परशान्त (जरा कमी दामले) त्याला तर टीशर्ट मस्ट आणि मस्तच. कधीही भेटो स्वतःच्या दिलखुलासपणाने अन देखणेपणाने दुसर्याला कॉम्प्लेक्स देतो. प्रशांता, साह्यबा भारतात कधी असलास तर घाल हो हा शर्ट,
मध्येच औरंगाबादच्या शक्तीकेंद्राला विसरुन चालणार नाही. टीशर्ट हा प्राडाँचा आवडता पोषा़ख आहे असे कळलेय. या टीशर्टात ते अजून टेक्नोसॅव्ही दिसतील असा विश्वास आहे.
बोकेश अर्थात बोका ए आझमांचे आगमन मिपावर जरी उशीरा झालेय तरी त्यांनी अल्पावधीतच आपल्या दमदार म्यांउने मिपाकरांना जिंकलेय, त्यांच्या या राजेशाही वाटचालीसाठी खास डिझाईन.
ब्याटमानापाचा स्नेह काय वर्णावा. त्यांनी म्हणावे अन आम्ही त्यांना टीशर्टावर टीशर्ट पुरवावे. काय करणार बिचारे लॉजिकचा एक सूट चढऊन बसलेत उतरवायलाच तयार नाहीत. असो.
आदूबाळाने तर सध्या सगळ्याच मिपाकरांचे इन्क्लुडिंग संपादकमंडळांचे मन जिंकून घेतलेय. या लाडक्या अन अत्यंत गुणी बाळासाठी हा खास टीशर्ट. (मळवलास की आपण दुसरा घेऊ हं)
हुशार लोकांची नावे येताहेत तर क्लिंटन ऑर गॅरी ट्रुमन साह्यबांना बोलावलेच पाहिजे. त्यांना त्यांचे मशीन सांभाळू द्या. हिशोबात घोळ होणार नाही. त्यांच्यासाठी अजून एक आम आदमी शर्ट आहे पण तो एके पीएम झाल्यावर देण्यात येईल.
क्लिंटनराव अन राजकारण विषय आले की माई येणारच. त्यांच्या ह्यांनी टीशर्ट घालायला परमिशन नाकारलीय म्हणे. असु दे. ह्यांचे मत कधी चुकत असते काय.
असेच न चुकणारे अन माईंशी भांडल्याशिवाय न करमणारे एक व्यक्तिमत्व आपल्या मिपाची शान वाढवतेय. विजयादशमीसाठी रा़हून ठेवतील हा शर्ट कदाचित. श्रीगुरुजी, विडंबनापेक्षा मोदींच्या राजकारणात जास्त मज्जाय हो.
राजकारण असो की समाजकारण, विज्ञान असो की कला, भटकंती असो की अध्यात्म, प्रत्येक ठिकाणी एक्क्याची भुमिका पार पाडणारे आमचे डॉ. सुहास म्हात्रे यांना त्यांच्या जुन्या आयडीची ओळख कायम राहावी म्हणुन हा शर्ट.
च्यामारी हा छॉटासा शर्ट कुणाचाय बरे? एखादी पिवशी आणा अन घेऊन जा.
.
अरर्रर दमलात काय इतके श्याम्पल पाहून? मंडळी ईतक्यात कार्यक्रम संपणार नाही. अजून बरेच गणमान्य राजमान्य आयडी अन त्यांचे टीशर्ट येणार आहेत.
ह्या डीझाईन्ससाठी आम्ही बर्याच शक्यतांचा विचार केला आहे. ही व्हरायटी पाहून अजून काही मागण्या आल्यास त्यांचा पण विचार केला जाणार आहे.
सो...... स्टे टुन्न्न्न्न्न्ड.
कीप वाचिंग.

वाचने
28292
प्रतिक्रिया
157
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट आहे हा धागा..
अभ्या अभ्या धन्स धन्स धन्स :)
अभ्या, पैली ऑर्डर घे.
दिला.
In reply to अभ्या, पैली ऑर्डर घे. by यसवायजी
कशे डजन दिले? कोठुन उचलले?
एक नंबर भावा. वाट बघायची का?
सही रे सही !
कसला भारी टीशर्ट तो!
सगळ्या मस्त तुमचा टीशर्ट
In reply to कसला भारी टीशर्ट तो! by बोका-ए-आझम
आमचे डिझायनर
In reply to सगळ्या मस्त तुमचा टीशर्ट by मांत्रिक
मस्त डिझ्यायीन.आवड्या.
भन्नाट
अगागागागा _/\_
वाटलच. हिचं कुळ निघणारच. असो.
In reply to अगागागागा _/\_ by प्रचेतस
आवडली हायेच म्हाराजा. :)
In reply to वाटलच. हिचं कुळ निघणारच. असो. by अभ्या..
लै भारी
आनंदराव, तुमचं नाव वाचून
In reply to लै भारी by आनंदराव
अभ्या शेठ
In reply to आनंदराव, तुमचं नाव वाचून by अभ्या..
ओ आमाला पन पायजे!
येणार येणार. अवश्य येणार
In reply to ओ आमाला पन पायजे! by मांत्रिक
अभ्या...?
हाहाहा!
लोल लोल लोल!
हद्द जहाली
काय एकेक डिझाईन्स! सुपर्ब!
लोल .. कहर डीझाईन्स आहेत.
लै म्हंजे लैच भारी कल्पक
भन्नाट
सगळ्यांच अगदी परफ़ेक्ट मेचिंग
ही ही ही ....मस्तं कल्पना!
हायला भारीच!
कस्टम्बाईज्ड कामेच करतो आपण.
In reply to हायला भारीच! by चांदणे संदीप
टी शर्टसवरील सगळी चित्रे
रेवतीम्याडमनी जोड्या लावा
In reply to टी शर्टसवरील सगळी चित्रे by रेवती
सॉरी हां, अभ्या, १०० टक्के
In reply to रेवतीम्याडमनी जोड्या लावा by अभ्या..
अभ्या... कल्पना आणि त्याचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोरया... :- दगडी चाळकल्पना आणि त्याचे प्रकटीकरण
In reply to अभ्या... कल्पना आणि त्याचे by मदनबाण
कुणाला कशाचं तर तुम्हाला
In reply to कल्पना आणि त्याचे प्रकटीकरण by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to कुणाला कशाचं तर तुम्हाला by प्रचेतस
दुत्त हलकट हत्ती!
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
पांडुब्बाने इतक्या दिवसात काय
In reply to दुत्त हलकट हत्ती! by अत्रुप्त आत्मा
पांडुब्बाने इतक्या दिवसात काय
In reply to पांडुब्बाने इतक्या दिवसात काय by अभ्या..
आणि हो.. मला माजा Tशर्ट
In reply to पांडुब्बाने इतक्या दिवसात काय by अत्रुप्त आत्मा
लै भारी...
:)
मस्तच
हाहाहाहा!!! तूफ़ान!!!
अभ्या भौ जब्राट आयड्या मला
कॉन्ट्री काढा आधी. ;)
In reply to अभ्या भौ जब्राट आयड्या मला by कॅप्टन जॅक स्पॅरो
करुयात की काय हरकत नाही.
In reply to कॉन्ट्री काढा आधी. ;) by अभ्या..
सगळेच डिझाईन्स भन्नाट आहेत
सगळे 'श्याम्पल्स' भारी ..
खुप छान. टीशर्ट आवडले.
अभ्या
होऊनघालून फिरायचं का ? त्यांच्या साठी एक डिझाईन करणे. ता;कः "बुवा दिवेकरा याहो, स्मायल्या मला भेट द्या हो" याचे स्टीकर करून हवे आहेत. पुढच्या कट्ट्याला वाटायचे आहेत.आधीक तपशील चिमणकडे आहे. ना द खु ळालैच भारी
आपली आड्डर
चौराकाका
In reply to आपली आड्डर by चौकटराजा
नै वो
In reply to चौराकाका by बोका-ए-आझम
ऑर्डर घेतली आहे पोपटराव. ;)
In reply to आपली आड्डर by चौकटराजा
+++++
व्वा, भन्नाट कल्पना अन फर्मास
क्लास! एक से एक
लै भारी आयडी(या) !!
हाय का? असे कामून इचारतायसा?
In reply to लै भारी आयडी(या) !! by नीलमोहर
अच्छा तुम्हीच का ते ?
In reply to हाय का? असे कामून इचारतायसा? by अभ्या..
होऊ द्या खर्च....आपल्याच घरचं..
+ ३....
तो राजेशाही बोका.......
बोका tshirt खूप आवडला .
आमचा अभ्या ना...
हाहाहा लई भारी !!
अ फ ला तू न !
हाहाहाहा.. मस्तच डिसाईन्स
भन्नाट आहेत. पण तुझा टी-शर्ट
काय करणार पिंगू.
In reply to भन्नाट आहेत. पण तुझा टी-शर्ट by पिंगू
एक नंबर
टीशर्ट लैच आवडल्या गेला आहे.
अॅब्जवाल्या टिशर्ट्चा आयडी
In reply to टीशर्ट लैच आवडल्या गेला आहे. by सूड
मेरा टी शर्ट किधर हय???
In reply to अॅब्जवाल्या टिशर्ट्चा आयडी by अन्या दातार
मस्त मस्त डिझाईन एकएक! माई
झक्कास आहेत एकेक मास्टरपीस.
लग्गेच हो विलासराव. तुम्ही
In reply to झक्कास आहेत एकेक मास्टरपीस. by विलासराव
मस्त लूक दिसतोय कॅफेचा.
In reply to लग्गेच हो विलासराव. तुम्ही by अभ्या..
मस्तच राव!!
In reply to लग्गेच हो विलासराव. तुम्ही by अभ्या..
पोर्ट्रेट पण करतोस का तू?
In reply to मस्तच राव!! by सूड
तसं नाय रे, व्यक्तिचित्र
In reply to पोर्ट्रेट पण करतोस का तू? by अभ्या..
भन्नाट!!!!!!
In reply to लग्गेच हो विलासराव. तुम्ही by अभ्या..
स्वारी, मिपा चेकवलोच न्हवतो
आदूबाळ, माई, श्रीगुर्जी,
जबराटच..