हाक! (शतशब्द्कथा)..भाग २
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
पहिला भाग शतशब्द्कथा स्पर्धेसाठी लिहिला होता. खालील दुवा बघावा..
http://www.misalpav.com/node/32313
"आई...........आई...बाळाला काय झालंय? तो का उठत नाहीये ? रागावलाय का तो ? मी तर भांडलो पण नाही त्याच्याशी आज..भांडणारही नाही कधी..त्याला उठायला सांग ना आई......सगळे खेळणे त्याचे.....त्याचीच पहिली बॅटिंग!...सांग ना त्याला..
बाबा..तुम्ही सांगा ना काय झालंय? आजी बघ ना आपल्या बाळाकडे...तुझा जास्त आवडता आहे ना तो..चालेल मला..मी नाही चिडणार
बाळा..रोज किती वेळा हाका मारतो मला 'दादा दादा' म्हणून..आता मी हाका मारतोय तर का उठत नाहीये तू?
बाबा..बाळाचा हात हालतोय बघा..आई बघ ना...काका डॉक्टरांना बोलवा बाळा उठतोय......
आई मी हाक मारल्यावर उठलाय बघ तो..मी परत हाक मारू का?”
"हो रे सोन्या...बाळा शुद्धीवर आलाय ..मार तू हाक.. मला ऐकायचीये ती हाक"
"चि...........ना............र !!!!!!!!!!!!!!!
(सत्यकथा)
प्रतिक्रिया
शेवट चांगला केलात
प्रतीक्रियेसाठी धन्यवाद..
आवडली कथा. शंभर शब्दात बसवणं
धन्यवाद!
मस्तं!
धन्य्वाद...