Skip to main content

उडत्या तबकड्या आणि कर्णमय

लेखक दिनु गवळी यांनी सोमवार, 17/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - (उडत्या तबकड्या - काल्पनिक कथा) मुंबईला गेलेला करण अजून आला नाही, म्हणून त्याच्या घरचे सर्व जण काळजी करत अंगणात बसले होते. तेवढ्यात करणच्या येण्याची चाहूल लागली. सर्व जण उठून उभे राहिले. करण आल्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला. त्याचे बाबा सदानंद त्याला म्हणाले, "एवढा उशीर का बरं झाला?" तेव्हा करण म्हणाला, "बाबा, आमची बस वाटेत पंक्चर झाली होती, म्हणून यायला उशीर झाला." मग सर्व जण घरात आले. जेवण वगैरे आटोपून सर्व गप्पा मारीत बसले. तसे पाहता करणच्या घरात त्याचे आजोबा, बाबा, आई आणि एक लहान भाऊ दिनू. हळूहळू सर्व जण झोपायला निघून गेले. करण मात्र एकटाच गच्चीवर झोपायचा, म्हणून तो त्याचा बिछाना घेऊन गच्चीवर झोपायला गेला. गच्चीवरुन त्याचे गाव खूपच सुंदर दिसत होते. करणचा बंगला तसा गावाच्या बाहेरच होता. शेती करण्याच्या उद्देशाने त्याच्या वडिलांनी आपला बंगला शेतातच बांधला होता. करण तसाच अंथरुणावरून आकाशाकडे बघत होता. अचानक त्याला आकाशात दोन विमाने दिसली. ती एकमेकांचा पाठलाग करत असल्याचे करणने लगेच ओळखले. पण ... निरीक्षण केल्यावर त्याला समजले की ती विमाने नव्हती, ती वेगळ्याच प्रकारची यांत्रिक याने होती. तो क्षणभर हे सगळे बघून दचकला. बघता बघता ती याने त्याच्या गावाच्या शेजारील जंगलात उतरली व कुठेतरी अदृश्य झाली. हे सगळे बघून त्याला तिथे जाण्याचा मोह झाला. पण एवढ्या रात्री एकट्याने जाणे बरोबर नाही, म्हणून सकाळी जाऊ असा विचार करत तो झोपी गेला. क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3601
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

माझी कथा आधीच प्रकाशीत झाली आहे . शतशब्द

ती हो , दोघंजण वाघ शोधायला जातात ती . ती कुठं पूर्ण झालीय ? होईल हो

मोजींनी आपलं शुद्धलेखन सुधारलं वाटतं ?

तसे पाहता करणच्या घरात त्याचे आजोबा, बाबा, आई आणि एक लहान भाऊ दिनू. हळूहळू सर्व जण झोपायला निघून गेले.
ही दोन वाक्य मागोमाग किमान दहा वेळा वाचली. पण लिंक लागत नाही दोन वाक्यांची.
अचानक त्याला आकाशात दोन विमाने दिसली. ती एकमेकांचा पाठलाग करत असल्याचे करणने लगेच ओळखले.
एवढ्या लांबवरून त्याला हे लगेच कळलं? सॉलिड आहे. असो. प्रयत्न ठीक आहे. एक सल्ला देईन. हा इतकाच उतारा पुन्हा 'हा' न बघता लिहून बघा. आणि नंतर दोन्हींची तुलना करा. बघा.