भाडमें जाए दुनियादारी (शतशब्दकथा)

पगला गजोधर जनातलं, मनातलं
"७ / मार्च / २०१४ वेळ १० रात्री, क्वालालंपूर, …… …… …… अश्यारितीने माझ्या चांगल्या नेचर्-चा दुनिया नेहमीच फायदा उठवत आलीये. पण आज, नव्हे आत्तापासूनच ठरवलंय मी, की 'भाडमें जाए दुनियादारी'. " असं आपल्या डायरीमध्ये, फ्लाईटच्या चेकइन लाइनमधे उभ्याउभ्याच नोंदवून, हळव्या वॉंन्गची त्या दिवसाची भडास थंडावली. "वॉंन्गसर प्लीज, तुमची या फ्लाईटची कन्फर्मसीट तुम्ही स्वेच्छेने त्यागाल काय ? नै काय झालंय की, ओवरबुकिंगमुळे आज थोडा घोळ आहे कॉउंटरवर. तुम्हाला आम्ही चार तासांनंतरच्या फ्लाईटची कन्फर्म सीट फर्स्टक्लास अपग्रेडसकट देवू, शिवाय तोपर्यंत फर्स्टक्लास लाउंजमधे कंप्लीमेंट्री फूड बेवेरेजेसचा आस्वाद घेत, विश्राम करू शकता… " चेकइन कॉउंटरवाल्याने विणवले. "नाही…. " असे ठणकावून, सोपस्कार आटोपून, वॉंन्ग डीपार्चर गेट सी२४ कडे निघाला, मलेशियन ऐअरलाइन्सच्या MH३७० साठी.
वर्गीकरण

26 टिप्पण्या 5,287 दृश्ये

Comments

जडभरत नवीन

चार तासांनंतरच्या फ्लाईटची कन्फर्म सीट फर्स्टक्लास अपग्रेडसकट देवू, शिवाय तोपर्यंत फर्स्टक्लास लाउंजमधे कंप्लीमेंट्री फूड बेवेरेजेसचा आस्वाद घेत, विश्राम करू शकता…
इतकीही वाईट नव्हती ऑफर!

खटपट्या नवीन

In reply to by उगा काहितरीच

येउद्याना राव. छोट्या छोट्या कथातून कधी कधी खूप चांगला आशय सांगीतला जातो. रच्याकने - कथा आवडली..

नाखु नवीन

खटका दिला तो जर्र्रा उशीरा कळला! लगे रहो सफाई येतेय या प्रकारात ! ब्दुल नारायण डिसूझा नाखु

एक एकटा एकटाच नवीन

मस्त जबरदस्त.... शेवटी MH ३७० वाचल्यावर नकळत तोडांतुन "ohh shit" निघाले होते. छान लिहिलीय पुढील लिखाणास शुभेच्छा........

एक एकटा एकटाच नवीन

मस्त जबरदस्त.... शेवटी MH ३७० वाचल्यावर नकळत तोडांतुन "ohh shit" निघाले होते. छान लिहिलीय पुढील लिखाणास शुभेच्छा........

सटक नवीन

सही! आणि चायनीज माणसाला मारायची आयडिआ अजूनच!!

स्रुजा नवीन

छान. आवडली कथा. काही वर्षां पूर्वी ९/११ नंतर अनेक छोटे छोटे आणि वैतागवाणे प्रसंगांमुळे कामावर जायला उशीर झाला आणि म्हणुन च वाचले अशांची उदाहरणं वाचली होती. उलटं उदाहरण पण छान मांडलंत :)

खेडूत नवीन

त्यानं ''为了Bhadmen世俗 '' असं लिहीलं असणार ! (सौ. गूगल)

असंका नवीन

ते तसं बरंच लांबवर घडलं आपल्यापासून, नाही? नै मंजे, कुणाच्या भावना वगैरे गुंतल्या असायचा प्रश्नच नै...!