Skip to main content

महिला दिन (शत शब्द कथा)

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
महिलामंडळाने ठाण मांडलय, फाटक्या “चिंधीच्या” तुटक्या झोपडीसमोर, तीन दगडाची चुल, मोडकी ट्रंक, आजारी सासू, तिथेच खेळणारी चिंधीची शेंबडी पोरं तिला जाणीव करून देणार, तिच्या हक्कांची, अधिकारांची आजचा शेवटचा टास्क, सकाळपासुन चार “क्लायंट” केलेत, हा शेवटचाच ! बर्गर, पाच-सहाच इडल्या, सकाळचा ज्युस,बस्स उन्हे तापलीयेत, फ्रीजमधली चिल्ड बिअर वाट पाहतेय… चिंधी कुठे उलथलीय कोण जाणे? एक दिवस नसती गेली कामाला, काय बिघडणार होते? किती वाट पाहायची उन्हात अजुन? उकिरड्याआड लपलेली चिंधी… बाया काय जायाला न्हायी, दाल्ल्याने हाग्यादम भरलाय, गोडधोड कर सांजच्याला येक चिपटीबी आन, सरपनाच्या पैक्यातुन गुत्त्यावरनं नर्सबायनं सांगटलय… म्हैलादिन का काय म्हंत्यात ते हाय म्हनं आज! माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित ! विशाल...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3117
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

कटू वास्तव परिणामकारकपणे मांडलय. अधिक काय लिहिणार... कधी तरी अशा कथा पूर्णपणे काल्पनिक म्हणता याव्यात...

In reply to by श्रीरंग_जोशी

खरोखर समर्पणभावाने, निस्वार्थवृत्तीने काम करणारे/करणार्‍याही आहेत भरपूर, परंतू दुर्दैवाने त्यांची संख्या अशा 'महिलामंडळापेक्षा' कमीच आहे. :(

फोटोपुरती समाजसेवा आणि दाखवेगिरी सगळीकडेच आहे. खरे काम करणारे नेहमी मागेच रहायचे.

छान. शतशब्दकाव्य सुद्धा म्हणता येईल!

गप्राव जरा ! पांढरपेशा
स्वगतः किमान शब्दात सत्य खरव्डलेस.
पंखा नाखु

कटू पण सत्य

_/\_