ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात
कथन – विवेक चौधरी, जळगाव. (नेपाळ यात्रेतील ओकसरांचे सहकारी)
23-26 मार्च 2015 मधे भृगुसंहितेच्या शोधात ओक सरांचे व माझे गमन झाले. त्याचा संक्षिप्त अहवाल आपल्याला अन्यत्र वाचायला मिळेल. त्या प्रवासात ज्या अदभूत घटना घडल्या त्यातील एक होती ती पशुपतीनाथाच्या मंदिरपरिसरात अचानक उद्भवलेले ऑटोरायटिंग...! टीप - आमच्या यात्रेनंतर 25 एप्रिल 2015ला नेपाळमधे धरणीकंप झाला होता. त्याचे असे झाले की आम्ही आमची नेपाळयात्रा संपवून काठमांडौच्या त्रिभुवन विमानतळाकडे जात असताना पशुपती नाथाचे मंदिर लागते तेथे दर्शन घ्यावे असा आमच्या नेपाळ यात्रेतील सनातन संस्थेच्या काठमांडौमधील सानू थापा नामक साधिकेने बेत ठरवला होता. त्यानुसार आम्ही मंदिरातील विविध देवतांचे दर्शन घेऊन पुढे सरकत होतो. या मंदिराच्या शिवांची पिंड नेहमीसारखी नाही ती एक तर खूप उंच आहे शिवाय त्याच्या पिंडीच्या दंडावर चार दिशांच्या व उर्ध्व दिशेला एक आकृती आहे. तिचे दर्शन घेऊन एका यज्ञकुंडापाशी धुनी पेटलेल्या ठिकाणी एक साधू ओणवा पहुडला होता तिथे आम्ही गेलो. तर त्याने तत्परतेने उठून आम्हाला कपाळाला विभूती लावली. जणू तो आमची वाट पहात असावा! ओकसरांची भावदशा पालटली व आम्ही त्यांच्यासह तिथेच एका हिरव्या जाजमावर मांडी घालून बसलो आणि मी ज्या अनुभवाची वाट पहात होतो ते घडले. सर मला म्हणाले, ‘कागद आहे का?’ मी तत्परतेने डायरीतील पाने फाडून त्यांच्या हातात सरकवली व त्यांची हालचाल निहाळत राहिलो. सरांचे पेन डायरीतील पानाच्या सुरवातीला टेकले. थोड्या अवकाशानंतर ते हलायला लागले. गोलगोल फिरत राहिले. व तो गोल मोठा होत होत गेला अन अचानक पेन पुढे सरकले. आणि ॐ ने सुरवात होऊन नमः शिवाय असा मजकूर येऊ लागला. पुढल्या ओळीत ‘अद्यकाले प्रथम दर्शनाय परांन्त त्वाम अहम दर्शनम देश्यामि’ अशी अक्षरे अवतरित होताना पाहून मला खात्रीने वाटले की हे ऑटोरायटिंग चालू आहे. ते सानू थापांना सांगावे, म्हणजे त्यांनाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला मिळेल पण त्या ध्यानावस्थेत गेल्या होत्या. नंतर सावकाश ते लेखन चालू राहिले. ओक सरांचे मराठीतील हस्तलेखन कसे दिसते याची कल्पना मला आहे पण जे लेखन सावकाश चालले होते ते शब्द टप्पोरे व त्यांच्या नेहमीच्या वळणापेक्षा नक्कीच वेगळे होते. एकदम बराच गोंगाट जवळ यायला लागला. एक बाई जोरजोरात ओरडून, असा दंगा करायला लागली की तिच्या आवाजांचा कर्कशपणाने सर्वांची मानसिक शांतता बिघडली. मी सरांकडे यावर काय प्रतिक्रिया होतेय ते पहात होतो. लेखन थांबल्यासारखे वाटले.... ते खरोखरच थबकले .... त्यांचे पुढील शब्द प्रतिक्रियात्मक होते की... अति दूषणाम.... न चलितः जणु असे सुचवत होते की नाडी ग्रंथावरील अशी ओरड हळू हळू कमी होत होत संपुन जाईल जशी त्या कर्कश आवाजाच्या बाईचा दंगा हळू हळू दूर होत संपला होता. या वाक्यानंतर आशीर्वादात्मक हातात दोन फुलाचे दांडी जागा सोडून पेन पुढे सरकले वाटले आता काय लिहिले जाणार? पाहतो तो ते साकार व्हायला लागले, पशुपती नाथांच्या मंदिरातील पिंडीचे प्रतीकात्मक चित्र...उंच पिंड बुडख्यात चौकोनी वरच्याभागी चारी दिशांना शिवांचे मुखवटे आणि शिरोभाग गोलाकाराऐवजी चपटा व त्यावर काही आकृती असा मोहरा असलेले चित्र साकार होता होता, ॐ असे लिहून जरा मोठ्या आकारात शङ्कर शुभाशीषः असे लिहून एक सरळ रेषा येऊन सरांच्या हातातून पेन सटकले. जणू काही गळून पडले. मी ते न्याहाळत असताना माझे लक्ष सानूंकडे गेले. त्या ध्यानसाधनेत इतक्या मग्न होत्या की मगाशी कर्कश्य आवाजाचे त्यांच्यावर काही आघात झाले नसावेत असे वाटले! नंतर सर तर नॉर्मल झालेले वाटले. पण सानूंना डोळे उघडायला पुढे 5 -7 मिनिटे लागली. फारच छान साधनेत आनंद मिळाला असे त्यांनी शांत आवाजात म्हटले. (तिथे फोटो काढायला सक्त मनाई आहे. मी तरीही हिय्या करून ओक सरांचा फोटो काढायला लागलो तर लगेच कोणीतरी फटकारले, ‘ फोटो लेना बंद करो’ कोणी म्हटले तरीही त्या धांदलीत क्लिक झाला) या लेखनाचा सार अर्थ सरांना जो वाटला तो त्यांनी आमच्याशी बोलताना म्हटले की असे संस्कृत मधून प्रथमच लेखन घडले. ते व्याकरणदृष्ट्या किती शुद्ध आहे याची कल्पना नाही. ‘शङ्कर’ असा उल्लेख आला तेंव्हा त्यांना वाटले की ते आदि शंकराचार्य असावेत. नंतर आम्ही शंकराचार्यांनी स्थापलेल्या पीठाच्या परिसरातील आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे दर्शन झाले. मग पक्के झाले की हे लेखन कोण करवते आहे ते. लेखनाचा सार अर्थ - आत्ता पशुपतीनाथाचे प्रथम दर्शन झाल्यावर तुला मी (आदिशंकराचार्य) दर्शन देईन. यानंतर भृगुंचे विराट दर्शन करावे. (दि. 27 ते 29 मार्च या काळात आमच्याकडून भृगु संहितच्या वाचकांच्याशी झालेल्या प्रदीर्घ संवादातून ते भृगु संहितेचे विराट दर्शन झाले.) दीनानाथ म्हणजे (भगवान) रामचंद्रांचे दर्शन झाल्यावर तुझ्या मनातील उद्देश फलित होईल. (ते दर्शन नंतर, 28 मार्चच्या रामनवमीला अनायास घडले.) आता (यापुढेही) अगस्त्यादि अन्य महर्षींचे आशीर्वाद तुम्हाला मिळोत. तुझ्यासाठी जे लोक (नाडी) ग्रंथांच्याप्रती श्रद्धाभावाने मदत करतात अशांच्या मनोकामना पुर्ण होवोत. तुझा महर्षींच्या साहित्यसाधनेप्रती श्रद्धाभाव वर्धित होत जाईल.... खंड पडल्यानंतरचे लेखन.... (आत्ता जसे) अती दूषणे देणे ऐकायला येतयेत क्षीण झाले तसे कालांतराने नाडीग्रंथाना नावे ठेवणाऱ्यांचा कोलाहल क्षीण होत शांत होईल. लेखन असे होते – ॐ नमः शिवाय अद्य काले प्रथमः दर्शनाय परान्त त्वाम अहम् दर्शनम् देश्यामि । उपरांन्ते भृगु विराट दर्शनम् करिष्ये। दीनानाथ दर्शनम् त्वाम मतितः उद्देश्यो फलितस्मि। अथ अगस्त्यादि अन्य महर्षिणाम् आशीर्वादः पान्तु। त्वम् सहितः लोकेण मनोकामनाम फलितः। त्वाम् महर्षीणाम् साहित्य साधना प्रति श्रद्धाभाव वर्धिष्णु..... गताः ।........... अति दूषणाम् चलितः काले काले शान्त करिष्यामिः। ॐ शङ्करम् शुभाशीषः
आशीर्वादात्मक हस्तमुद्रा असून त्यानंतर पशुपतीनाथाच्या शिवपिंडीची आकृती.
समाप्त.
ओक सर गेली कित्येक वर्षे ऑटो रायटींग करतात. पुर्वी ते शिकवतही असत परंतु आता त्यांना ऑटोरायटींगमधून आलेल्या आदेशा अनुसार ते सध्या थांबवले आहे. त्यांच्या या ब्लॉगवर काही अधिक माहिती मिळते. त्यांचे अन्य 14- 15 ब्लॉग या वेब साईटवरून पाहता येतात. त्यातील काही मी ही अद्याप पाहिलेले नाहीत.
वाचने
9624
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
राग मानू नका, पण ही शुद्ध
+१
In reply to राग मानू नका, पण ही शुद्ध by एस
+ १
In reply to राग मानू नका, पण ही शुद्ध by एस
धन्यवाद
!!!!!!!!!! !!!!!!!!!!
माझ्या परीक्षेचे पेपर कोणीतरी
सी.ए.चे पेपर शुद्ध संस्कृतमधे
In reply to माझ्या परीक्षेचे पेपर कोणीतरी by आदूबाळ
ऑटोरायटींगमध्ये "स्पिरिट"
In reply to सी.ए.चे पेपर शुद्ध संस्कृतमधे by कॅप्टन जॅक स्पॅरो
वर गेल्यावर खंपल्सरी संस्कृत
In reply to ऑटोरायटींगमध्ये "स्पिरिट" by सतिश गावडे
पाणिनीलाकौटिल्याला रिकॉल करणार नाहित का =))पाणिनी व्याकरणकार होते.
In reply to वर गेल्यावर खंपल्सरी संस्कृत by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्वारी स्वारी. कौटिल्याचे.
In reply to पाणिनी व्याकरणकार होते. by सतिश गावडे
विनोद बाजूला, यावर एक पुस्तक
In reply to स्वारी स्वारी. कौटिल्याचे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
पीडीएफ असेल तर द्याल का?
In reply to विनोद बाजूला, यावर एक पुस्तक by सतिश गावडे
अशा जागी
मात्र ऑटो रायटिंग आणि ते
प्लँचेट?
In reply to मात्र ऑटो रायटिंग आणि ते by सतिश गावडे
पैसाकका, तू गांधीजींना
In reply to प्लँचेट? by पैसा
ह्या:!
In reply to पैसाकका, तू गांधीजींना by कवितानागेश
ऑटो रिटर्न
In reply to प्लँचेट? by पैसा
खिखिखि!
In reply to ऑटो रिटर्न by विकास
ऑटोरायटिंग काय प्रकार आहे...?
प्रकरण काय आहे
In reply to ऑटोरायटिंग काय प्रकार आहे...? by योगविवेक
बादरायण संबंध...
माझा ह्याच्यावर अनुभव घेतला
In reply to बादरायण संबंध... by विशाखा पाटील
मनोरंजन झाले.
काहीच समजले नाही
अच्चा अचं जालं तल ! =))
In reply to काहीच समजले नाही by स्पा
+१
In reply to अच्चा अचं जालं तल ! =)) by प्रसाद गोडबोले
यमक ? ते विसरलास मेल्या?
In reply to +१ by बॅटमॅन
अर्र हो की! धन्यवाद!
In reply to यमक ? ते विसरलास मेल्या? by सूड
मामा गागा नाय हो...लेडी गागा.
In reply to अर्र हो की! धन्यवाद! by बॅटमॅन
हा स्पिरिट अंगी संचारल्याचा
In reply to मामा गागा नाय हो...लेडी गागा. by स्वप्नांची राणी
नाहि हा झोप संचारल्याचा
In reply to हा स्पिरिट अंगी संचारल्याचा by सतिश गावडे
गोविंदाग्रज गडकरी १९२० सालीच
In reply to मामा गागा नाय हो...लेडी गागा. by स्वप्नांची राणी
व्याकरणशिरोमणीपंडितरावबॅट्टुक
In reply to अर्र हो की! धन्यवाद! by बॅटमॅन
जे 'ऑटो' आहे, ते शिकवता येऊ
टॅक्सी रायटींग बद्दल कोठे
मला विमान रायटिंग बद्दल हवंय,
In reply to टॅक्सी रायटींग बद्दल कोठे by स्पा
माझा इथला एक प्रतिसाद
प्रतिसाद उडवला ही अंधश्रद्धा आहे
In reply to माझा इथला एक प्रतिसाद by सतिश गावडे
गल्ली चुकलीच.
In reply to प्रतिसाद उडवला ही अंधश्रद्धा आहे by पैसा
इतकं 'स्पिरिट' अंगात 'घेणे'
In reply to गल्ली चुकलीच. by सतिश गावडे
हे जब्राट होतं.
In reply to इतकं 'स्पिरिट' अंगात 'घेणे' by डॉ सुहास म्हात्रे
माझे प्रतिसाद हे इतरांना
In reply to इतकं 'स्पिरिट' अंगात 'घेणे' by डॉ सुहास म्हात्रे
आयडीचे स्पिरिट?
In reply to माझे प्रतिसाद हे इतरांना by सतिश गावडे
मला एक प्रश्न आहे? आयडीचा
In reply to आयडीचे स्पिरिट? by पैसा
कोण धन्या? धन्यवाद.
In reply to मला एक प्रश्न आहे? आयडीचा by सूड
ब्लॅक होल थिअरीचा इथे काय
In reply to मला एक प्रश्न आहे? आयडीचा by सूड
ब्लॅक होल थिअरीचा इथे काय संबंध आहे? फार फार तर थिअरी ऑफ रिलेटीव्हिटीचा थोडासा रेफ्रंस घेता येईल. बाकी कांदा स्वस्त झाला हे ऐकुन फार बरं वाटलं बघं.चायला कैच्या कै लिहिलं जात हल्ली आपोआप ;)ब्लॅक होल थिअरी आणि थिअरी ऑफ
In reply to ब्लॅक होल थिअरीचा इथे काय by कॅप्टन जॅक स्पॅरो
बोलविता धनी असा एक वाक्प्रचार
In reply to आयडीचे स्पिरिट? by पैसा
ते "लिहविता पेनी" असं अधिक
In reply to बोलविता धनी असा एक वाक्प्रचार by कॅप्टन जॅक स्पॅरो
तसबी चाललं.
In reply to ते "लिहविता पेनी" असं अधिक by सतिश गावडे
सुरस अन चमत्कारीक !
खंडोबाचं लगिन झालं म्हनं
In reply to सुरस अन चमत्कारीक ! by चौथा कोनाडा
वाईच थांब...आत्ताशी दुस्रे
In reply to खंडोबाचं लगिन झालं म्हनं by कॅप्टन जॅक स्पॅरो
आत्ताशी नाय रे, बानूशी दुस्रे
In reply to वाईच थांब...आत्ताशी दुस्रे by टवाळ कार्टा
भृगुसंहितेचं काय झालं?
शङ्करम् शुभाशीषः
फारच
सगळंच कसं
In reply to फारच by विकास
आधी मला वाटल, नेपाळ मध्ये