अहल्या व शूर्पणखा खरेच अन्यायग्रस्त स्त्रीया ?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
अहल्या व शूर्पणखा अन्याय झाला कां ?
"अहल्येची दुसरी गोष्ट" यावरील सर्वश्री स्पंदना, अवतार व पैसा यांच्या प्रतिसादांवरून जास्त माहिती देण्याची गरज वाटते. म्हणून नवीन धागा काढत आहे. दोघींवर अन्याय झाला असे बरेच जणांना वाटते. बर्याच वेळी मूळ गोष्टच माहीत नसते. ती वाचल्यानंतरही जर तुमचे मत निराळे असेल तर तसे मांडावयास हरकत नाही. पण एक नक्कीच लक्षात ठेवावयास हवे की वाल्मीकि-व्यास या उत्तुंग प्रतिभेच्या महान लेखकांनी त्यांच्या काळास अनुसरून लिहलेल्या लिखाणावर आपण आपल्या कुवतीप्रमाणे आजच्या काळास अनुसरून मत देत आहोत. माझे महाभारतावरील मत हे "शरद याचे, त्याचे घरातील वातावरण शिक्षण, वाचन, पुण्यातील वास्तव्य" अशा बर्याच गोष्टींवर आधारलेले मे २०१५ चे मत असते. उद्या ते तसे असेलच असे अजिबात नाही. म्हणून मी माझे मत देऊं नयेच कां ? तसे अजिबात नाही अह्ल्या व शूर्पणखा यांच्या बाबतीत रामायणात पुरुषी वर्चस्वाची झाक दिसते कां एवढ्यापुरते मर्यादित.
अहल्या :
(१) ब्रह्मदेवाने विश्वातील स्रर्व सौंदर्य गोळा करून अह्ल्या निर्माण केली व ती गौतमाच्या आश्रमात "ठेव" म्हणून ठेवली. सर्व लोकपाल जिच्या प्राप्तीकरता धडपडत होते तिच्या, त्या अहल्येच्या, मोहांत गौतम पडला नाही म्हणून ब्रह्मदेवाने स्वत: त्यांचे लग्न लावून दिले. गौतम कोणत्याही अप्सरेच्या मोहात पडणारा लंपट नव्हता.
(२) अहल्येचा "ज्येष्ठ" पुत्र शतानंद हा जनकाचा पुरोहित होता. म्हणजे अह्ल्या अनेक पुत्र असलेली "लेकुरवाळी" होती.
(३) तपोनिष्ट व इंद्रियदमन करणार्या नवर्याला, काही मुले झाल्यावर, अहल्येने फसवले आहे. त्याबद्दल तिला चूक न वाटता आनंदच वाटतो व इंद्राने गौतमाच्या कोपापासून आपणास वाचवावे असेही ती म्हणते.
(४) कोणत्याही काळात, अगदी आजच्या my choice काळातही, हे नीतीमत्तेला धरून नाही व अह्ल्येला शिक्षा झाली तर तक्रार करण्याचे कारण नाही. यात पुरुष संस्कृतीच्या वरचष्म्याचा प्रश्न उद्भवत नाही.
(५) गौतमाने "तपाने शुद्ध झाल्यावर, माझ्याबरोबर नांदशील" असे सांगण्याचा मोठेपणा दाखविला आहे. शतानंदानेही "मातेचे दुराचरण आपण रामाला सांगितले ना व रामदर्शन झाल्यावर माझ्या मातेचा माझ्या पित्याशी समागम झाला ना ?" असे विश्वामित्राला विचारले आहे. आजच्या काळातही असा मनाचा मोठेपणा पहावयास मिळतो कां ?
(६) आता पुरुषांना अशा प्रसंगी काय शिक्षा झाली ? असा प्रश्न विचारला आहे. प्रथम रावणाचे उदाहरण घ्या. त्रैलोकातील सुंदर स्त्रीयांवर बलात्कार करणे हा उद्योग. एकदा एक अप्सरा कुबेराचा मुलगा नलकुबेर याच्याशी संकेत करून त्याच्याकडे निघाली असतांना रावणाच्या नजरेस पडली. तिने त्याला विनवणी केली की मी तुझ्या पुतण्याकडे पूर्वसंकेताने जात आहे, मला सोड. त्याने ऐकले नाही. नंतर ती रडत रडत नलकुबेराकडे गेली. नलकुबेराने रावणास शाप दिला की "रावण इच्छा नसलेल्या स्त्रीवर बलात्कार करेल तर त्याच्या डोक्याचे तुकडे होतील". तेव्हापासून रावणाने तसले उद्योग थांबविले. सीतेला लंकेत नेल्यावर या भीतीनेच ती वाचली.
रावणासारख्या क्रूरकर्म्याचे सोडा. माझ्या वाचनात ऋषींचे असे वर्तन दोनतीन ठिकाणीच आले. एक विश्वामित्र व अप्सरा. या ठिकाणी अप्सरा त्यांना मोह पाडण्यासाठी योजल्या आहेत.. त्याला बळी पडल्याने फार दोष देण्याचे कारण नाही. दुसरे उदाहरण पराशर-सत्यवती. पराशर सत्यवतीवर मोहित झाल्यावर त्याने तिला उत्तम वर देऊन वश केले आहे. अंधार निर्माण करून तिचा संकोच नाहिसा केला, तिच्या अंगाचा माशांचा वास घालवून तिला सुगंधी केले व प्रसुत झाल्यावर परत कन्यावत्वही दिले. इथेही बलात्कार नाही. एखादे उदाहरण रहिले असेल तर श्री. वल्ली सांगतीलच.
आता शूर्पणखेचा विचार करूं
शूर्पणखा ही रावणाची बहीण. तिचे लग्न मधु नावाच्या एका दानव राजाशी झाले. रावणाने त्रैलोक जिंकण्याच्या नादात मधूवर स्वारी केली व युद्धात त्याला मारून टाकले. मग या विधवा बहीणीची कटकट लंकेत नको म्हणून तिला दंडकारण्य़ात पाठवून दिले व तेथे खर नावाच्या एका राक्षस सेनापतीला, हा त्याचा भाऊ, तिच्या दिमतीस दिले. तेथे शूर्पणखा स्वच्छंदपणे विहरत असे.
राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात रहावयास आल्यावर ही सहज त्यांच्या आश्रमापाशी आली. रामाला पाहिल्यावर ती कामातूर होऊन त्याच्या प्रेमात पडली व तिने त्याची चौकशी केली. आदीकवी वाल्मीकि काय म्हणतात ते बघा .."विक्राळ मुख, मोठे पोट, विरूप नेत्र, ताम्रवर्ण केस, कुरूप मुद्रा, भयंकर स्वर, उग्र स्वभाव, वृद्ध वय, कुटिल भाषण, अतिशय दुष्ट वर्तन्यांनी युक्त असलेली ती राक्षसी कामाधिन होऊन उत्कृष्ट मुख, कृश उदर, विशाल नयन, सुंदर केस ,सुरूप मुद्रा, मंजुळ स्वर, सौम्य स्वभाव, तरुण वय, सरल भाषण, न्यायाला धरून असलेले वर्तन असलेल्या रामाला म्हणाली "तूं कोण ?, येथे कशाला आला आहेस ?" सरळ स्वभावाच्या रामाने तिला उत्तर दिले की " दशरथ राजाच्या आज्ञेवरून मी राम, हा माझा भाऊ लक्ष्मण व ही माझी पत्नी सीता..वनात राहण्यासाठी आलो आहोत." तो नंतर तिला "तूं कोण ?" असेही विचारतो. इथपर्यंत सगळे सौजन्याने चालले होते.
यावर शूर्पणखा त्याला उत्तर देते " मी इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी, शूर्पणखा नावाची, रावणाची बहीण आहे. तू माझा चिरकाल भर्ता हो. सीतेचा तुला काय उपयोग ? ही विरूप, दुराचारी, पोट खपाटीला गेलेली मनुष्य जातीची भार्या व तुझा भाऊ यांना मी भक्षण करून टाकीन व नंतर विषयोपभोगाची इच्छा धरून आपण संचार करू." मग राम न रागावता थट्टा करण्याच्या उद्देशाने म्हणाला, " बाई ग , माझा विवाह झाला आहे. सवतीचे जीवन तुजसारखीला बेकारच. तेव्हा तू माझ्या ऐवजी लक्ष्मणाशीच विवाह कर." रामाला सोडून शूर्पणखा लक्ष्मणाला म्हणाली " माझ्या सारखी श्रेष्ठ स्त्री तुझ्या रूपाला योग्य भार्या आहे." मग लक्ष्मण म्हणतो " मी तर दास. माझ्या ऐवजी हा रामच तुला योग्य.. तुझ्या सारख्या सुंदर स्त्रीला सोडून हा कशाला या कुरूप मानवी स्त्री बरोबर संसार करेल?" मूर्ख शूर्पणखेला ते पटले व ती रामाला म्हणाली " या तुझ्या भार्येवरील प्रेमाने तू माझा अव्हेर करत आहेस. तिला मी तुझ्या समक्ष भक्षण करून टाकीन व मग तू सवत नाहिशी झालेल्या माझ्याबरोबर संचार कर." असे म्हणून ती सीतेला खावयास तिच्या अंगावर धावून गेली. मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून ठार केले नाही.
वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही.
शरद
प्रतिक्रिया
अमान्य
मुळात रामायण हा आर्य आणि
संस्कृती
असेही चालेल
आर्य अनार्यात सुंदर कोण होते ?
संस्क्रूती मधील स्क्रु टंकणे
:):)
गैरसमज
आर्य आणि अनार्य संघर्ष- हे
कफ्यूजन
????
कंस आणि रामामध्ये गोंधळ
अगदी अगदी ;)
रामाचेही चुकलेच
गोष्ट कुठे
शुर्पणखा
त्राटिका वध
मग रामाने लक्ष्मणाला सांगितले
नंतर ती रडत रडत नलकुबेराकडे
आजच्या my choice काळातही, हे
माझ्या मनात कायम एक शंका आहे
पण या सर्व भौगोलिक
धागे वाचले. छान माहिती. आता
काव्य साहित्य आहे त्याला तेच ठेवावे, उगाच त्याचा ओढून ताणून
येस्स!!
छान. थोडक्यात, इराण हा परत
अहिल्या
हो. इंद्रियदमन करणार्याने
आपल्याकडे होतं हे...
शुध्ध य्झ पणा आहे तो
ते शंभर शकले प्रकरण मागाहून
सर्वश्री या उपाधीने
हा
स्त्रीला जर काम भावना झाली तर
अहो,
-१
शोध
हा हा हा ;)
माहिती आहे
मुळात अहिल्या म्हणजे काय
माझा मुद्दा तो नाही
बरोबर आहे. तिने त्याग करायला
हाहा!
हम्म! अहिल्येला फार कडक
:)
मनीषा यांच्या प्रश्नाबद्दलः
:)
दोन अनाहिता सुखसंवाद करत
अस वाटतयं वानखेडे वर
फुल फेका फेकी
फुल फेका फेकीराम ! राम !! राम !!! +DPagination