किडे करणे हा स्वभाव...घराचे ग्रील रंगवणे हि गरज..कालदिन एक रंगाचा डबा ब्रश पोलिश पेपर घेऊन आलो.सकाळी सकाळी कामाला लागलो ...थोडे रंगवल्यावर हातातील मोज्याचा रंग ग्रील ला पुसल्यावर मेंदू लहर आली व सरळ हातानेच रंग चोपडू लागलो...अरे वाह वेळ वाचू लागला ...पण हातमोजा फाटला ...बरबटलेल्या हाताने (किटलेल्या कानाने..."तुझे नस्ते उद्योग..हे तुझे काम आहे का ?..हे नंतर कोण आवरणार ?वगैरे वगैरे ' ) काय करावे असा विचार करत होतो तेवढ्यात आमचे वाचमन थोरात काही कामासाठी आले माझ्याकडे विचित्र नजरेने बघत बघत बोलू लागले ...आणि तेवढ्यात .."कपड्याच्या तुकड्याने रंग लावावा" हे वाक्य त्यांच्या तोंडून व माझ्या मनात अक्षरशः एकाच वेळी उमटले...
मग काय दणादण रंगकाम पुढे सुरु केले...:) १० मिनिटात ग्रील रंगाने 'पुसून' काढले...काम उत्तम झाले आहे अशी प्रशस्ती वाट्याला (कधी नाही ती) आली आहे...रोकेल नि हात धुवून चहा व चैतन्य कांडी चा आस्वाद घेत थोडी विश्रांती घेतोय ...म्हटलं हा कृतार्थ क्षण सांगावा तुम्हाला...
तात्पर्य : ग्रील रंगवतांना ब्रश पेक्षा फडक्याने रंग चोपडणे सोपे असते (ह्यालाच बहुदा 'पुन्हा चाक शोधणे' reinventing the wheel म्हणत असावेत..)
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
शोध छान
बाकी चैतन्य कांडी सोडायचा मनावर घ्या
हो ..
In reply to छान by कपिलमुनी
बरेच दिवस झाले सोडून :)
खरं आहे.
जिव्हाळ्याच्या विषयावर धागा काढलांत. मी तर हाऊस आणि फर्निचर पेंटिंग/स्टेनिंगचा कोर्सही केला आहे! काही नाही, एक आपला उगाच छंद म्हणून! :)
आणि रंगाच्या पुढे जाऊन माझा अनुभव असा की जर लाकडाला स्टेन (किंवा पॉलिश) करायचं असेल तर कापडाच्या (विशेषत: जुन्या बनियनच्या) तुकड्याने मस्त होतं. त्यातही जर दोन स्टेन मिक्स करून जर एक मधलीच शेड द्यायची असेल तर ब्रशपेक्षा कापडी बोळ्याने अफलातून येते...
ट्राय करून बघा...
क्षणाचा नवरा आणि अनंत काळचा रंगारी,
पिडां
:)
रंगवलेल्या ग्रीलचा एक फोटो
रंगवलेल्या ग्रीलचा एक फोटो टाका ना ?
+१
In reply to रंगवलेल्या ग्रीलचा एक फोटो by खटपट्या
ग्रिल रंगवतानाचा + रंगवलेल्या ग्रिलचा.
-(बारीकसारीक कामं स्वतः कशी करता येतील या विचारात असलेला) पैलवान
किंवा
In reply to +१ by तुषार काळभोर
किटलेल्या कानाने..."तुझे नस्ते उद्योग."....वगैरे वगैरे ऐकतांना
आणि
आणि हे सगळे रंगोद्योग करताना 'मल्हारचा एखादा प्रकार' गुणगुणत होता का हो ?
बारीक सारीक कामे स्वत:च करावीत
केलेला प्रयत्न स्तुत्त्य आहे . माझा नेहमीचा एकच प्रश्न असतो , " करुन पहायला काय हरकत आहे ? चुकले किंवा नाहीच जमले तर शेवटी कारागिर करणारच ना? पण आपण त्यातल्या त्यात पहावे ! फार झाले तर काय होइल? " उडाला तर कावळा, बुडला तर बेडूक " परवा फ्लश टाकीतील लिव्हर च्या दांडीला क्रॅक गेला आरल्डाइट लावून पाहिले, तर गुळगुळीत प्रुष्ठ्भाग असल्याने जमले नाही, मग एम सिल लावून पाहीले , त्याची ही तीच गत ! मग ड्रील मशीनने एक छिद्र पाडले आणि एक कडक तारेने छानपैकी पीळ दिला आणि काय सांगू ? कावळा उडायला लागला की जोरात ! चाळीस रुपये वाचले ना ?
हाहाहा!
भारीतला शोध. कोणाला सांगू नका, मला सुतारकाम बघत बसायला फार आवडते. कोणा मुलीला करताना कधी पाहिले नाही म्हणून, नाहीतर मी पण करवत आणि रंधा घेऊन काहीतरी तयार करायला बसले आते आतापर्यंत!
लग्गेच सुरू करा.
In reply to हाहाहा! by पैसा
आमचा सोफा जुना झालाय. घेता का ऑर्डर? :-)
मलाही
In reply to हाहाहा! by पैसा
पैसा, मी ही घरातील सर्व फरनिचर करताना बघत होते. त्या सुतारांना आवडत नव्हते हे कळत होते तरीही. त्याची आठवण झाली. मला वाटत होते की मी एकटीच असेन अशी आवड असणारी.
हाहा!
In reply to मलाही by प्रियाजी
थांबा थांबा, आधी एक बॉक्स तरी तयार करून बघते. मग आड्डरीचं बघू! :D
लगे रहो
घरची अापली कामे स्वत: करण्याचा अानंद न्याराच! शेअर केल्याबद्दल धन्यवाद!लोक चिक्कू म्हणाले तरीही चालू ठेवा.
- स्वधर्म