"नमस्कार मनीभाय!"
"राम राम ! पक्या, आज हिकड कस्स काय आलास?"
"काय नाय मनीभाय सहजच आलतो."
"तु काय सहज येणार न्हाईस. बोल काय काम काढल."
"मनीभाय एक शंका विचारायची होती."
"हां आता आलास ना लाईनीवर...ईचार काय शंका हाय तुला?"
"मनीभाय,स्टॉक स्प्लिट म्हणंजे काय?"
"कसला ष्टॉक!!! ड्राय डे च ईचरतोस काय?"
"नाही.स्टॉक म्हंणजे.कंपनीचा स्टॉक..शेअर..समभाग."
"अर आस बोल की,आता शेअर स्प्लिट मंजे बघ...हां ...हा माझा खंबाच घे की उदाहरण म्हनुन."
"मनीभाय,खंबा नको..दारुच उदात्तीकरण होईल."
"आता काय तुझ्यासाठी काय येगळी भाषा शोधु का मी? पटल तर आईक नायतर निघ."
"चिडु नको मनीभाय,सांग तुझ्याच भाषेत."
"तर आईक..हा माझा खंबा..तुला एकदाच विकत घेण जमणार हाय का ?"
"नाही.ते माझ्या खिशाला नाय परवडत."
"तर,तुझ्या सारख्या लोंकासाठी,या खंब्याचे समान भाग करायचे.आणी विकायचे.त्यामुळे काय होत..तुझ्या सारख्या लोंकाची सोय होते.आन माझा खंबा पण विकला जातो.पण यामुळे खंब्याची किमंत आणी साईज आज्याबात कमी होत नाय.
कळतय का मी काय सांगतो ते.
"कळाल मनीभाय,किरकोळ गुंतवणुकदाराला आर्कषीत करण्यासाठी कंपनीचा समभाग लहान रुपात विभागला जातो.यामुळे
कंपनीची किंमत कमी होत नाही आणी प्रत्येक समभागा मागील मिळकत ही कमी होत नाही."
"शाब्बास पक्या !! कळाल तुला..आता एक सल्ला,दारु आणी शेअर घ्यायचा सल्ला कुणाला द्याचा नाय."
"मनीभात ते कळत आपल्याला...शेअर आणी दारु..सगळ्यालाच पचत नाही.त्यामुळे कुणाला सल्ला द्यायचा नाही.
पचल नायतर आपल्याला शिव्या घालताय."
"आर..त्याच्यामारी! हुशार हाईस की....ये नंद्या दोन ग्लास आन..सोबत चखणा बी आन,हा खंबा फोडु आज."
.
.
.
(काहि दिवसापुर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया चा शेअर १:१० या प्रमाणात विभागला गेला..सकाळी ३००० च्या आसपास असलेला शेअर संध्याकाळी ३०० च्या आसपास बंद झाला (किमंती अचुक नाहीत).त्या दिवशी नेमक काय घडल हे जाणुन
घेण्यासाठी बराच वेळ फोन वाजत राहीला.समजावुन सांगताना,तोंडाला फेस आला.नंतर पंजाब नॅशनल बँकेचा समभाग विभागला गेला.एक हि फोन आला नाही आणी पुर्वीची बडबड व्यर्थ गेली नाही हे कळाल.)
लेख वाचा आणी सोडुन द्या.चर्चा अपेक्षीत नाही.
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
इतकेही न समजणारे लोक असु शकतात , हे समजले
इतकेही न समजणारे लोक असु
In reply to . by hitesh
सहमत +११११११११११११११
साधी सुधी किंवा थोडीशी तांत्रिक बाब मनोरंजक करुन का सांगायला लागते?
नाही हो खरंच आहेत.
In reply to . by hitesh
नाही हो खरंच आहेत. अस्मादिक उदाहरण आहेत. इतके दिवस नव्हतं कळत स्टॉक स्प्लीट करतात म्हणजे नेमकं काय करतात ते. पण आता जरा नीट समजले. असे शेअर मार्केटमधले फंडे जरा नीट विस्कटून सांगितले तर आमच्या सारख्या पामरांना बरे होईल हो.
- स्टॉक मार्केट शिकत असलेला
ICICI
नुकतेच ICICI चे समभागदेखिल दहा रुपये दर्शनी मूल्याऐवजी २ रुपये दर्शनी मूल्याचे झाले.
मनोरंजक!
मनोरंजक प्रकारे लिहिलंय! आवडलं!
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
समजलं सगळ च्या सगळ.
समजलं सगळ च्या सगळ.
छान !
छान ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
China builds lighter tanks for Tibet border
Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF
Russia looks to boost defence ties with India
Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B
Auto bailout cost the US goverment $9.26B
Analysts foresee bad year for U.S. government bonds
Google Fiber services may launch in India soon
Telcos to make tough calls as spectrum war heats up
.
अरे वा ! जेपी म्हणजे जयंत फाटक का?
नाय वो...जयप्रकाश नारायण
In reply to . by hitesh
नाय वो...जयप्रकाश नारायण
अरे वा ? तुम्ही कसं वळंकलंत ?
In reply to . by hitesh
अरे वा ? तुम्ही कसं वळंकलंत ?
प्रत्येक समभागा मागील मिळकत
EPS अर्धा का नाही होणार?
चर्चा अपेक्षीत नाही तरी
In reply to प्रत्येक समभागा मागील मिळकत by अनुप ढेरे
EPS टक्केवारीत काढतात.
उदा.3000/-च्या शेअर वर EPS 100 रु. असेल,तर 1:10 स्प्लिट शेअर नंतर 300/- च्या शेअर वर 10 रु.असेल त्यामुळे मिळकतीवर टक्केवारीत फरक नाही पडणार.