Skip to main content

अनाहीता रॉक्स इन ठाणे कट्टा...

अनाहीता रॉक्स इन ठाणे कट्टा...

Published on गुरुवार, 25/12/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
खुप दिवसांपासुन अनाहीतांनी कट्टा करायचे ठरवले होते, सगळ्यांच्या वेळा जुळवुन २१ डीसेंबरला ठरले. अनाहीता म्हणजे झाशीच्या राण्या काही अनाहीता म्हणजे त्रिवेणी, मितान आणि मिता पुण्याहुन येणार होत्या अन मी ही जरा लांबुनच येणार होते बाकीच्या मुंबईतल्याच होत्या. घोडबंदर रोडवरच्या आर मॉलमध्यल्या व्हिलेज सोल ऑफ इंडिया मध्ये १२.३० वाजता प्रवेश मिळत असल्याने सर्वांनी दुपारी १२ वाजता मॉल मधे जमुन एकत्रच प्रवेश करायचे ठरले. सानिका स्वप्निल , सविता, स्नेहांकीता, अजया, मितान, त्रिवेणी, मिता, हेमा, उमा, सुर, कस्तुरी, स्वप्नांची राणी आणि मी अशा सर्व जणी तयारीला लागलो. अखेर कट्ट्याचा दिवस उजाडला, पुणे झाशीच्या अनाहीता सकाळी ७.३० वाजता पुण्याहुन निघाल्या मी ही लांबच राहत असल्याने लवकर निघाले. आणि एकेक करुन १२.३० पर्यंत आर मॉल मधे जमलो. पहिल्यांदाच भेटत असलो तरीही अनाहीता अनोळखी वाटत नाहीत हेच खरं, एकेकींना सर्वांनी लांबुनच ओळखले आणि इतकं छान वातावरण निर्माण झालं की लहानपणापासुन एकत्रच राहीलोत असंच वाटु लागलं. सुर तिच्या दोन छोट्या गोड बाहुल्यांना घेउन आली होती. उमा , हेमा, आणि कस्तुरी यांना थोडा वेळ लागणार होता म्हणुन बाकी सर्वांनी एकत्रच प्रवेश केला. "विलेज" ची थीम मस्त होती , अजयाने आधीच टेबल बुक करुन ठेवलं होतं पाहीलं तर ती जेल ची थीम होती आम्हाला सर्वांना बराक मधे ठेवण्यात आले होते. मग पुन्हा ओळख परेड झाली, सानिका स्वप्निल आणि स्वप्नांची राणी यांनी सर्वांसाठी चॉकलेट्स आणली होती तर त्रिवेणीने सर्वांसाठी खास खानदेशी मसाला आणला होता. सर्वांनी उठुन पेटपुजा करण्यास सुरुवात केली. सर्वात आधी पाणीपुरी राउंड झाला, मग सर्व थोडं थोडं करुन सर्व पदार्थ चाखायला सुरुवात केली. त्यावेळात कस्तुरी, उमा यांनी प्रवेश केला. पाणीपुरी, रगडा पॅटीस, वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या, १०-१२ प्रकारचे सॅलेडस् , पापड, दाल बाटी चुरमा, पाव भाजी, डोसे, गरमागरम जिलेबी, गुलाब जामुन, खीर, बिर्यानी, पनीरची भाजी, पालक, छोले, आंबट गोड कढी, वालपापडीची भाजी, चायनीज असे विविध पदार्थांची चव चाखल्यावर आम्ही डान्स फ्लोअरवर गेलो. डान्सफ्लोअरवर आधी संगीत खुर्ची ला सुरुवात झाली, तिथे ही अनाहीता रॉक्स, त्रिवेणी अन मिता ह्यांनी भाग घेतला होता आणि बाकीची आलेली मंडळी असा गेम सुरु झाला आणि आपल्या त्रिवेणीने अनाहीतांच्या जीत चा झंडा गाडला. लव यु त्रिवेणी.. त्यानंतर मिक्स डान्स ला सुरुवात झाली .तितक्यात हेमा तिच्या मुलाला घेउन आली. थोडा वेळ बराक मधे गेली तोवर आम्ही डान्स फ्लोअर वर थिरकायला सुरुवात केली होती. सर्वात आधी फनी संता बंता डान्स झाला आणि अनाहीतांनी नाचायला सुरुवात केली , धम्माल धम्माल केली नुसती , नंतर राजस्थानी डान्स सुरु झाला आणि अनाहीता हेमा ने तर कमालच केली , अतिशय सुंदर राजस्थानी डान्स केला, अश्या गिरक्या घेत होती की हेमा राजस्थान मधेच जन्माला आलीये का अशी शंका आली मला, आजुबाजुची दुसरी मंडळी ही कौतुकाने पाहु लागली. दुसर्‍या बर्‍याच मंडळींनीही राजस्थानी नाचात भाग घेतला, नंतर गरबा सुरु झाला तिथेही आपल्या अनाहीता पुढे, मग डी. जे. डान्स, त्यात ही अनाहीता रॉक्स, हेमा ने तर "रायता फैला दिया यार" काय नाचलीये, अगदी प्रोफेशनल सारखी, तिचे हावभाव आणि तिचा नाच अगदी एखादा रीयॅलीटी शो पाहतोय असं वाटत होतं. त्यादरम्यान थोडा वेळ सविता, स्नेहांकीता, मितान, सुर बक अप करत होत्या, थोडा वेळ त्या सुर च्या पिल्लु शी खेळल्या नंतर बराक मधे परत गेल्या कारण सर्व अनाहीतांचे सामान तिथेच होते म्हणुन तिथे कुणाला तरी बसणे आवश्यक होते. मग त्यांनी छान गप्पांचा फड जमवला. ऑफीस, काउन्स्लिंग , ध्यानधारणा आरोग्य, मिपाकर्स, अनाहीता अशा विषयावर न थकता गपा रंगल्या. नाचता नाचता ३ कधी वाचले हे कळलंच नाही, ३.३० वाजता विलेज बंद होणार असल्याने पुन्हा खादाडीसाठी पळालो. नंतर आईसक्रीम खाल्लं थोड्या वेळाने चहा घेतला. पुन्हा गप्पा टप्पा, बर्‍याच अनाहीतांना पाहुन त्यांना मोठी मुलं आहेत हे वाटत नव्हतं, मलाही कॉम्प्लीमेंटस् मिळाल्या की माझ्या पदयात्रेच्या धाग्यावरुन मी वयाने मोठी असेन असं सर्वांना वाटलं होतं पण प्रत्यक्षात तसं नाहीये. थोड्या गप्पा झाल्या. सर्व अनाहीता खुपच साध्या आणि दिलाच्या सच्च्या वाटल्या , कुठेही अ‍ॅटिट्युड हा प्रकार जाणवला नाही , कुठेही आत एक आणि बाहेर एक असं जाणवलं नाही, कुठेही कुणाची बरोबरी , हिणवणे हा प्रकार जाणवला नाही आणि हीच तर खरी अनाहीतांची खासियत आहे, अनाहीता बरोबर मनाच्या सौंदर्य हुडकुन काढतात, बाहेरच्या थाटाकडे अनाहीताला काहीच ओढ नाही. शेवटी काय तर अनाहीता रॉक्स !!!!!!!!!!!!!!!!!!! शेवटी ग्रुप फोटोजचा कार्यक्रम झाला, ३.३० वाजले आणि आम्ही 'विलेज' च्या बाहेर पडलो तरीही मॉल मध्येच होतो, सर्व जणी इथे तिथे विखुरल्या, जड मनाने सर्वांचा निरोप घेतला आणि परतलो.
लेखनप्रकार

याद्या 17465
प्रतिक्रिया 117

कट्ट्यासाठी इतका उत्साह होता की घरातुन सर्वात आधी मीच सकाळी ६.०० ला घरातुन निघाले आणि सर्वांच्या शेवटीही मीच पोहोचले रात्री ८.३० ला घरी, पुणेकर्स ही माझ्या १०-१५ मि. आधी पोहोचल्या . ट्रॅफीकमुळे बसला ठाण्यातुन निघायलाच उशीर होतो नॅशनल हायवे नं ८ ला पोहोचायला.

...नुकताच धडाक्यात साजरा झाला वा तशी आमची समजुत करुन दिल्याबद्दल आम्हा तमाम मिपाकर 'अनाहिता माता-भगिनींचे' हार्दिक हबिनंदण व फुडच्या कट्ट्याला शुभेच्छा....!!! *yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo:

In reply to by विनोद१८

तशी आमची समजुत करुन दिल्याबद्दल आम्ही जे लिहु ते तुम्ही खरं मानाच असा काही आग्रह नाही हं... तुम्हालाही ते "खयाली पुलाव" वाटले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही येवढं जरी समजलं तरी पुरे...

काही काका लोक्स आनी बन्धुच्या आडव्या / तिडव्या प्रतिक्रिया पाहुन खात्री पट्ली किती जळजळ असेल बिचार्यान्ची : p यातच यश आहे कट्टयाचे ;)

अनाहिता बरोबर मनाच्या सौंदर्य हुडकुन काढतात, बाहेरच्या थाटाकडे अनाहीताला काहीच ओढ नाही.
अगदी बरोबर .. आणि यासाठी स्वत:कडे सुंदर मन असावं लागतं ... आणि ते आमच्या अनाहितांकडे भरभरून आहे ... गर्व से कहो हम अनाहिता हय !!!

एक कट्टा काय झाला, उजव्या बाजुच्या लिस्टीत उपस्थित महिलांची संख्या लै म्हण्जे लैच वाढली.

In reply to by रेवती

पण बहुसंख्य नाव आताच काही दिवसात दिसायला लाग्लीत आणी तशीच गायब पण होतील पुढील २/३ दिवसात. नाय झाली तर आज्जीला एक कोल्ड कॉफी, एक वेज सँडविच नी एक आईसस्क्रीम माझ्याकडुन.

In reply to by इरसाल

अहो भौ, माझी जळजळ झाली हो, तुम्हाला नाही म्हणत. या मुली आगत्याने बोलावत होत्या पण नै जमलं. बरं, ते जौ द्या, आय स्क्रीम खायला कुठं नेताय?

माई मोड ऑन अरे पुरुषांनो, हा अनाहिताचा म्हणजे खास बायकांचा धागा ना रे ! का उगाच दंगा करताय ? आता चूकून तो धागा अनाहितामधे प्रकाशित होण्याऐवजी इथे जन्रल फोरमवर पब्लिशला तर आले मेले तडमडायला. तरी मी आमच्या ह्यांना नेहमी सांगते की "बायकांत पुरुष लांबोडा भाजून खातो कोंबडा" माई मोड ऑफ

In reply to by धर्मराजमुटके

"माईंचे हे" मोड ऑन आणि पुरुष जर शुद्ध शाकाहारी असला तर मग ? "माईंचे हे" मोड ऑफ +D

और ये हुए पुरे १०० रन्स.

रायता फैलाना म्हणजे केलेल्या चांगल्या कामावर पाणिी फिरवणे

कट्टा दणक्यात झाला ह्यात वादच नाही. तुम्हा सगळ्यांना भेटून खूप आनंद झालाय :) अनाहितांना भेटून नेहमीच छान वाटते, प्रत्येक कट्ट्याला फोनवरून सहभागी होत पण प्रत्येक्षात भेटण्याची मजा वेगळीच :)

मस्त वृत्तांत ! कट्टा खरेच झाला असेल अश्या शंकेला वाव आहे असे प्रामाणिकपणे वाटते. रच्याकने ... "ते झाशीच्या राणी पुण्याहून ...." म्हणजे काय ते कळ्ले नाही. झाशीच्या राण्या पुण्यात काय करत होत्या? की बालगन्धर्वच्या जवळचा झाशीच्या राणीचा पुतळा उठून कट्ट्याला गेला होता की काय ? ( पण तसे नसावे ... सकाळला बातमी आली असती.) कट्टा वृत्तान्त लेखिका खुलासा करतील काय ?