इज्या ! ...........
हि मुठी मानस बिड्या वडून नाकात्न कसा धूर काडत असतील र ....... पक्या, हनम्या ,दिल्या आन मी रानात्न येताना पक्या म्हणाला ! हे बेन दुसर्याला झाडव चढवायचं आन मग आपुन मजा बगायची खालन ह्यात लय तरबेज हुत इचार करून हान्म्या म्हणाला यक डाव बिडी वडून बगायला पायजे ! मी म्हनालू आयला खरच्कि गड्या माजा आज्या पण मस्त धूर काढतो नाकात्न आयला इज्या तुजा आजा दुपारी झोपल्याव यक बिडी आणकी हळूच काढून बंडलात्न मी जरा इचार केला आन म्हनालू जर घाव्लू बिव्लु तर वल्या फोकाटीन आय मारल सांच्याला .
आर घाव्ल्यावर मारलं पण घावल तर पायजे ना... पक्या म्हणाला मी म्हणालो आर पर पेटवायची कुठ आन कुणी बगितल तर ! तवा पटकन हान्म्या बोलला आर मारुतीच्या देवळात दिवा जळत असतुया आन त्याच्या मागच बसून पेटवायची दुपारी गुर्विण पण नसती देवळात आन कुणी येत पण न्हाय ! त्या मूळ कुणाला कळणार पण नाय .
हे बेन लय बारा**चं हेला कुणाची कोंबडी कुठ अंडी घालती कुणाच्या रानात वाळक हायती कुणाच्या फपया च्या फपया पिकल्या याची बराबर खबर असायची .
दुसऱ्या दिवशी शाळत्न येतान चिचा पाडता पाडता परत पक्या म्हणाला इज्या बग की र जमतंय का बाकीच्या कुणाच्याच घरात कोण बिड्या वडत नाही लेका थोड डेरिंग करायला काय हरकत हाय ..आन मी इचार करायला लाग्लू कस जमवायचं ........... हान्म्या आन दिल्या माझ्या तोंडाकड बगत हुती मी म्हणल बगा गड्यानो जमल तर करतो तुमी आंब्याखाली दुपारी थांबा .
घरी गेलो तर आय बाजूच्या काकी बर वाकाळ शिवत हुती तीन मला जेवाया वाडल आजा जिउन डोळ मिटून पडला हुता पण जागा हुता. मी जिव्लु आन पुस्तक घ्यून हळूच आजाक्ड चोरून बगत हुतु तवर इट्टला… पांडुरंगा … करत आजान डोळ उगड्ल आन उठून बसला दंड्कीच्या खिशात्न बिडी बंडल काढल यक बिडी भाईर काढली आन तिचा हिरवा दोरा दातात धरून तोडला आन मला म्हणाला इज्या जर चुलीत इंगूळ असला तर दिकी .
मी चुलीतली राख वरखाली केली आन यक इंगूळ लाकडावर घिउन आजाला दिला आजान बिडी पेटवली आन यक लांब झुरका घेतला आन डोळ मिटून लाब धूर नाकात्न काढला बग्ताना माझ डोळ अपोआप मोठ झाल हुत .आजाची बिडी वडून झाल्यावर आजान यक खाकरून बेडका काढला आन तीत्नच उब्र्या भाईर टाकला बिडी बंडल उठून फळी वर ठेवला आन इट्टला..... पांडुरंगा ..... म्हणत तिथच हातावर डोक ठीउन पडला माझ बारीक लक्ष हुत .
थोड्या येळान आजा घोरायला लागला आन मी सावध झालू हळूच आज्याच्या उशाला जाऊन हात वर केला पण फळी काय हाताला इना झाली. भाईर अंगणात येउन बघितल तर आय आन काकी दुसऱ्या वयनी बर हळूच काय तरी बोलत होत्या आन वयनी लाजून लाल होत होती आन मग माझ्याक्ड बगत म्हणाली जावा तिकड इज्या आयुक्तुय कि .आय तीत्नच वाराडली काय र मी म्हनालू काय नाय जर चिपाड न्याला आलू हुतु ती परत डोळ मोठ करून म्हणाली जाळ बीळ करू नको चुलीत न्हाय तर घर पेटवायचा !
चिपाड घेऊन आत गेलो आज्याच्या डोक्याच्या बाजूला उभा राहिलो पण फळी वरच्या बिडीला चिपाड काय लागणा मग शेंड्याकड जरा मोडल आन गडबडीत वर ढकललं तर आलुमिनियामच्या टोपाला थटल आन खुड खुडू वाजलं तेवढ्यात खालन आवाज आला. इट्टला.... पांडुरंगा ..... आमचा पांडुरंग उठला हुता आन डोळ उघडून मला बगत म्हणाल इज्या.... काय कर्तु र ! मी पटकन म्हणल पेंसल वर फिकली ती फळीवर पडली म्हणून काडत हुतो .
माझा पयला प्रयत्न फसला होता आन आता ग्यांग ला कस सांगाव ह्येचा इचार करत मी पाय वडत आंब्याकड निघालो सगळी वाटच बगत हुती पण माझ तोंड पडल्याल बगितल आन दिल्या बोलला काम झाल का र ! मी फक्त नाय म्हणून मुंडी हलवली .तवा हान्म्या म्हणाला कस झाल तेनला सगळ सांगितल पक्या म्हणाला चीपडान कधी बिडी बंडल पडतंय व्हय पायाखाली काय तरी घ्याच ............ पण जाव दे पायला डाव भुताला ! बघ उद्या जमतंय का ......
वाचने
4260
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच...
आनी मी दुश्शल्ला!
In reply to मस्तच... by जेपी
तु दु दु
In reply to आनी मी दुश्शल्ला! by अत्रुप्त आत्मा
तू हू..हू..हू!
In reply to तु दु दु by टवाळ कार्टा
हू..तू..तू..तू
In reply to तू हू..हू..हू! by अत्रुप्त आत्मा
"मी पयला" संघटनेच्या समस्त
In reply to मस्तच... by जेपी
लेख वाचुन माझ्या गावच्या
In reply to "मी पयला" संघटनेच्या समस्त by टवाळ कार्टा
धन्यवाद जे.पी.
In reply to मस्तच... by जेपी
आमी आन सुटाबुटातले.
In reply to धन्यवाद जे.पी. by Vijay Shankar Mane
जे पी. मला म्हणायचं होत
In reply to आमी आन सुटाबुटातले. by जेपी
कदितर बोलवतो आमच्या वाड्यावर.
In reply to आमी आन सुटाबुटातले. by जेपी
निळू फुलें 'या सांच्याला
In reply to कदितर बोलवतो आमच्या वाड्यावर. by टवाळ कार्टा
आवडलं. पुभाप्र!
धन्यवाद !
In reply to आवडलं. पुभाप्र! by आदूबाळ
फारच मजा आली वाचताना!
खरच का .............
In reply to फारच मजा आली वाचताना! by असंका
आमचा काळ जरा बरा होता
हि ४ थित असतानाची हाय !
In reply to आमचा काळ जरा बरा होता by विलासराव
मस्त...
खरच का .............
In reply to मस्त... by मुक्त विहारि
छान!
तुमचं नाव मी विजय दिनानाथ
कसच कसच .................
In reply to तुमचं नाव मी विजय दिनानाथ by कॅप्टन जॅक स्पॅरो
छान .........