उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?
उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते.
कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे.
उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे.
युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू.
(१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या.
(२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते.
(३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता.
(४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया.
(५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे.
(६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो.
जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?
(७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३.
(८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५.
(९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०.
(१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२.
(११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे.
(१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते.
पुन्हा घोडचुकीकडे
(१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही.
(१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही)
(१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ?
-जीएस
वाचने
54679
प्रतिक्रिया
186
मिसळपाव
प्रतिक्रिया
झोपलेल्याला जागं करता येतं
अतिशय छान आणि उत्तम विश्लेषण
+१
In reply to अतिशय छान आणि उत्तम विश्लेषण by खटपट्या
लैच इंटेलिजन्ट..
In reply to +१ by शिद
:D =)) :D =)) :D =)) :D
In reply to लैच इंटेलिजन्ट.. by चिगो
हा हा हा...धन्यवाद.
In reply to लैच इंटेलिजन्ट.. by चिगो
छान लेख..! विश्लेषण आवडलं...
विश्लेषण आवडलं...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernदिवाळीपर्यंत शिवसेनेने
दुश्यन्त यांनी येथे दिलेल्या
In reply to दिवाळीपर्यंत शिवसेनेने by आनन्दा
अतिशय उत्तम विश्लेषण. खर तर
पवरांची खेळी
चायला हे झाले तर हैट्ट असेल..
In reply to पवरांची खेळी by अमित मुंबईचा
गोलमाल
In reply to चायला हे झाले तर हैट्ट असेल.. by टवाळ कार्टा
तरीही भाजप दूरान्वयेदेखील
In reply to चायला हे झाले तर हैट्ट असेल.. by टवाळ कार्टा
जर भाजप शिवसेना युती १३०:१४०
शरद पवार आणि सत्ता असे समिकरण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernशरद पवार नावचे ग्रहण
In reply to शरद पवार आणि सत्ता असे समिकरण by मदनबाण
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद
In reply to शरद पवार नावचे ग्रहण by समीरसूर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernह्या गोष्टी मोठ्याने बोल्य नये ! खर्या असल्या तरी....
In reply to शरद पवार नावचे ग्रहण by समीरसूर
खरे आहे
In reply to ह्या गोष्टी मोठ्याने बोल्य नये ! खर्या असल्या तरी.... by सामान्यनागरिक
मधे कोकणात गेलो होतो तेव्हा
In reply to खरे आहे by समीरसूर
"अरे बाबा सुईणीला पोटात
In reply to मधे कोकणात गेलो होतो तेव्हा by जयंत कुलकर्णी
नवीन म्हण माहित झाली !!
In reply to मधे कोकणात गेलो होतो तेव्हा by जयंत कुलकर्णी
प्रतिसाद नीट वाचा!
In reply to नवीन म्हण माहित झाली !! by सूड
हे कोल्लापूर आमच्या कोकनाला
In reply to प्रतिसाद नीट वाचा! by बॅटमॅन
आमचे गाव अस्सल कोकणात देवगड
In reply to हे कोल्लापूर आमच्या कोकनाला by खटपट्या
भौगोलिक दृष्ट्या जो भाग
In reply to आमचे गाव अस्सल कोकणात देवगड by llपुण्याचे पेशवेll
ओह अच्छा. माहितीकरिता धन्यवाद
In reply to आमचे गाव अस्सल कोकणात देवगड by llपुण्याचे पेशवेll
अवश्य. कोल्लापूर कोकणाला
In reply to हे कोल्लापूर आमच्या कोकनाला by खटपट्या
आय मीन कोल्लापुर शहर.
In reply to अवश्य. कोल्लापूर कोकणाला by बॅटमॅन
खराय
तुमि मौतैच्य दुअयदि क?
In reply to खराय by मनिमौ
ऐम आय ऐम चा प्रवेश
उत्तम विश्लेषण
उत्तम
आकड्यांच्या आधारे केलेले
माहितीपूर्ण विश्लेषण
उठसुठ कोणताही पक्ष फुटेल
उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे
In reply to उठसुठ कोणताही पक्ष फुटेल by दुश्यन्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernअश्या उलट सुलट बातम्या येतातच
In reply to उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे by मदनबाण
येस्स.. मी माझे शब्द मागे घेत
In reply to अश्या उलट सुलट बातम्या येतातच by दुश्यन्त
पक्ष फोडणे एवढे सोप्पे असते
खरेतर दोन्ही शिवसेना भाजप
१) सेनेने विरोधी पक्ष नेते पद
In reply to खरेतर दोन्ही शिवसेना भाजप by दुश्यन्त
हुश्श!!!
महागाई कमी झाली? नाही! उलट
In reply to हुश्श!!! by अन्नू
बर्र...
In reply to हुश्श!!! by अन्नू
मला वाटतं
In reply to हुश्श!!! by अन्नू
>>> अहो ज्यावेळी कर्नाटकच्या
In reply to हुश्श!!! by अन्नू
मात्र सरकार ज्याला बनवायचं
गमती जमती !!
?
In reply to गमती जमती !! by सुहास..
जॉर्ज फर्नांडिस वाढत्या
In reply to ? by क्लिंटन
समजले नाही
In reply to जॉर्ज फर्नांडिस वाढत्या by सुहास..
आपल्या कडे येणार्या इतर
In reply to समजले नाही by क्लिंटन
आयला असे पण असते???
In reply to आपल्या कडे येणार्या इतर by सुहास..
आमदार फोडायचा एक मार्ग
In reply to आयला असे पण असते??? by टवाळ कार्टा
सोडून द्या हो. मोदीद्वेशाचि
In reply to आमदार फोडायचा एक मार्ग by क्लिंटन
>>> भाजपाची साथ मग नितीश ने
In reply to जॉर्ज फर्नांडिस वाढत्या by सुहास..
लवकर बरे व्हा !!
In reply to >>> भाजपाची साथ मग नितीश ने by श्रीगुरुजी
सुहास, ते बाकीच्या पक्षांचे
In reply to लवकर बरे व्हा !! by सुहास..
+१
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सतिश गावडे
सुहास, ते बाकीच्या पक्षांचे
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सतिश गावडे
वाह! काय बोललात!! पण नक्की
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सुहास..
म्हणुनच लिहित नाही
In reply to वाह! काय बोललात!! पण नक्की by सूड
कळळं!!
In reply to म्हणुनच लिहित नाही by सुहास..
>> फिरकी घेतोयस की खरच !
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सुहास..
धन्स यार !!
In reply to >> फिरकी घेतोयस की खरच ! by सतिश गावडे
अवांतर जाऊ द्या..
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सुहास..
ही ही ही !
In reply to अवांतर जाऊ द्या.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हायलाईट मधे काहीच नाही
In reply to ही ही ही ! by सुहास..
थट्टा वाटते का बिरुटे सर ? असो ..
In reply to हायलाईट मधे काहीच नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वडगाव शेरी का?
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सुहास..
+१
In reply to सुहास, ते बाकीच्या पक्षांचे by सतिश गावडे
>>> लवकर बरे व्हा !!
In reply to लवकर बरे व्हा !! by सुहास..
मच्याकडे काहीच मुद्दा उरला
In reply to >>> लवकर बरे व्हा !! by श्रीगुरुजी
प्रतिसादाबद्दल आभार!
In reply to मच्याकडे काहीच मुद्दा उरला by सुहास..
धन्यवाद !
In reply to प्रतिसादाबद्दल आभार! by श्रीगुरुजी
नमोरुग्ण
In reply to धन्यवाद ! by सुहास..
उन्माद म्हणा किंवा अजून
In reply to धन्यवाद ! by सुहास..
कांदा आयात/निर्यात हा
In reply to उन्माद म्हणा किंवा अजून by श्रीगुरुजी
>>> कांदा ग्राहकाच्या ,
In reply to कांदा आयात/निर्यात हा by सुहास..
कांदा आयात करणे म्हणजे शेतकर्
In reply to >>> कांदा ग्राहकाच्या , by श्रीगुरुजी
पण त्याचा उपाय म्हणजे
In reply to कांदा आयात करणे म्हणजे शेतकर् by सुहास..
परफेक्ट. यासाठी तुम्ही चांगली
In reply to पण त्याचा उपाय म्हणजे by काळा पहाड
हे पूर्वीही असेच सुरू होते व
In reply to कांदा आयात करणे म्हणजे शेतकर् by सुहास..
तसेच केले पाहिजे ....
In reply to उन्माद म्हणा किंवा अजून by श्रीगुरुजी
@सुहास, तुम्हाला कळकळीची
In reply to जॉर्ज फर्नांडिस वाढत्या by सुहास..
फारच आशावादी ब्वा तुम्ही. राज
In reply to @सुहास, तुम्हाला कळकळीची by प्रसाद१९७१