Skip to main content

शिआयडी गंमत

लेखक दशानन यांनी गुरुवार, 16/10/2014 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज डोकं फार दुखतं आहे. आई गं! - दशानन मेली, मी कधी पासून सांगत होते, तो दळभद्री टीव्ही पाहू नका, पाहू नका! - दशाननची बायको अगं, मला काय माहिती असा त्रास होईल.. - दशा. पण मला का त्रास? नेमकं कुठले डोके दुखत आहे, ते तरी सांगा.. अमृतांजन लावते थोडे... - दशा.बाय दहाच्या दहा, ठणाना करत आहेत.... - द. मेले गं! नेमकं काय पहात होता टीव्हीवर? ऑ? ते इंग्लिश चेनेल का? - द.बा. अगं, ते मोदी आले तेव्हाच, बंद झाले. आज सोनी पहात होतो सिआयडी - द. अगं बाई, अजून तुम्ही मेला नाय? ते सीआयडी पाहून तर किमान १०००००००००० लोकं गेली असतील वर.. - दबा म्हणजे? तुला म्हणायचे काय आहे? - द अहो, तुमचा जीव घ्याचा प्लान करते मी असे वाटत नाही ना तुम्हाला? - दबा हो, तशीच शंका येत आहे, मगापासून.. तू डोके सोडून माझा गळा दाबत आहेस बये..... - द अग्ग्गो...बाई..चुकलेच माझे! सीआयडी परत नीट बघून अभ्यास करायला हवा.. -दबा त्यांनी आज एका टीव्ही रिमोट वापरून जग मुंबई वाचवली.. मला तो रिमोट हवा, मी शिकवेन रामाला धडा- द गप्प रे मेल्या, म्हणे शिकवेन रामाला धडा, आधी वाचायला आणि बघायला शिक.. तो टीव्हीचा नव्हता.. एसीचा होता रिमोट - दबा अगं, पण तू पाहिले का नाय, तो दया कसे दरवाजे तोडतो.. धडाधड.. - द त्याला म्हणावे, माजा घराचा दरवाजा तोड! - दबा का? तोडलं कि तो आरामात.. - द अरे हाड.. आपला दरवाजा आत नाही उघडत, सगळे दरवाजे बाहेर... बसं म्हणावे मुसंडी मारत..- दबा :D
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4846
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

"अरे हाड.. आपला दरवाजा आत नाही उघडत, सगळे दरवाजे बाहेर... बसं म्हणावे मुसंडी मारत..- दबा" हे बेष्ट!

+1 =))

अस्मिता..... झी मराठीवर... परवाच एक एपिसोड पाहिला आणि सीरियल पाहणं सोडलं.... ही डिटक्टिव बाई रिकामटेकड्यांची फौज घेउन एका उभ्या असलेल्या रिक्षामधे बसून त्या टोळभैरवाना तिने रिक्षा दोन्ही बाजूने गदागदा हलवायला सांगितलं. साधारण ५ मिनिटं मुकाट ते काम केल्यावर त्यातल्या एकाने "आपण हे का करतोय" असा प्रश्न प्रेक्षकांतर्फे विचारला..... त्यावर बाईने जे उत्तर दिलय ते शायडीला लाजवणारं आहे... ती म्हणते..."वेगात असताना रिक्षा कशी रस्त्यावरून जात असेल ह्याचा अंदाज लावतेय....!!!."

सीरियल्स हा प्रकारच भयानक असतो एकंदरीत!

चायला ते गोख्ले गृहोद्योग, देव टुर टुर ट्रॅव्हल्स, रेशीमगुंता, शेरलॉक होम्स ला लाजवणारी अस्मिता वगैरे येता जाता कानावर बळचं पडत असतं. नुसतं ऐकुनचं वैताग येतो. त्यात ती ओव्हरअ‍ॅक्टींग करणारी आणि किंचाळुन बोलणारी बर्‍याच बायकांच्या घराची सुन तर पार डोक्यात जाते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

देवा, तुम्ही हे सर्व पाहता कधी? मी चुकून आपले सीआयडी पाहिले तर एवढा त्रास झाला... =))

In reply to by दशानन

पाहत नाही. घरामधे चालु अस्तं ते कानावर पडत असत की :( :( :( मला कानावर पडत आणि अधुन मधुन दिसतं तर केवढा त्रास होतो. =))

विंग्रजी सीरियल्स पहा. खरंच चांगल्या असतात. विषयांची विविधता बी असते आन् सासू-सून वगैरे लफडी नसतात. हां, आता चारचौघात जरा तोंडाला तोंड देतात, पण ते चालत असेल तर कथा आणि अभिनय लंबर येक!

In reply to by बोका-ए-आझम

सहमत. फ्रेंड्स, हाऊ आय मेट युअर मदर, टु अँड हाफ मेन, बोस्टन लिगल, गेम ऑफ थ्रोन्स हे सगळं लै भारी आहे.
आता चारचौघात जरा तोंडाला तोंड देतात, पण ते चालत असेल तर कथा आणि अभिनय लंबर येक!
=)) =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तीची "हेअरस्टाईल" कधीपासून बघायला लागलात??? बाकी बरेच "बघणेबल" आहे की त्यात (आणि तिच्यातही ;) )