मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक मोहक संध्याकाळ...

डॉ सुहास म्हात्रे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अश्याच एका सामान्य संध्याकाळी घराशेजारच्या बागेत रपेट मारून झाल्यावर एका बाकावर हवा खात बसलो होतो. संध्याकाळी तेथे येणार्‍या समवयस्कांचा कट्टा जमला होता. निवडणूकांचे वारे वाहत असल्याने हवामानातिल वाढणार्‍या तापमानाच्या बरोबरच दर दिवशी राजकारणाच्या गप्पांचे तापमानही वर वर जात नसले तरच नवल नाही का? रोज होणार्‍या पावसाच्या आणि गारपिटीच्यामुळे गप्पा राजकारणावरून हवामानावर केव्हा घसरल्या आणि नजर सहजपणे आकाशाकडे केव्हा वळली ते कळले नाही ...

निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही ! .

वाचने 14328 वाचनखूण प्रतिक्रिया 49

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 17:01
काका.. फक्त पुण्यवानांनाच कळाणारे का की नक्की काय आहे ह्या धाग्यात?!! मला फक्त रिकामी जागा आणि शेवटी एक . दिसत आहे.... ओ संपादक.. करा न काहीतरी..

In reply to by दिपक.कुवेत

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 17:52
हे बघा मल काय दिसतय.. . अद्वेयच्या धाग्यावरचे फोटोही मला दिसत नाहीत.. तेव्हा असं दिसतं.. advey बाकी दिपकच्या धाग्यावरचे फोटो दिसत आहेत मला..

पैसा Tue, 04/22/2014 - 19:15
मला एक्का आणि मृत्युंजय दोघांचेही फोटो दिसताहेत आणि आवडले आहेत.

In reply to by पैसा

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 19:21
+१११ @पि रा, एक आठवडा निरहंकार उपास केलास तर तुला फटु दिसतील बघ!

मराठे Tue, 04/22/2014 - 19:27
मला वाटतंय की एक्का-साहेबांच्या फोटोची इमेज हाईट-विड्थ सेटिंग्ज थोडी गंडलेली आहेत. त्याचा कोड मला असा दिस्तोय  त्याची विड्थ थोडी मराठीत आणि थोडी ईंग्रजीत अशी आलेली आहे. त्यामुळे काही जणांना फोटो दिसत नसावा. जर हा धागा मी क्रोम मधे उघडला तर मला फोटो दिसतात पण इंटर्नेट एक्प्लोरर मधे दिसत नाही. म्हनजे जुन्या ब्राउजर्स ना हा कोड नीट वाचता येत नाही. म्हणून असं होत असावं. हाच धागा जर मोबाईल मधे उघडला तर कोड दिसू शकेल.

सर्व प्रतिसादकांसाठी धन्यवाद ! आणि कोड धेडगुजरि भाषेत पडल्याने झालेल्या गैरसोईबद्दल क्षमस्व ! कोड अचूक केल्याबद्दल संपादकांचे आभार.

मुक्त विहारि Tue, 04/22/2014 - 23:56
आणि "निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही !" हे वाक्य आवडले.

तुमचा अभिषेक Tue, 04/22/2014 - 23:58
प्रतिसादातील नदीकाठचाही मस्त. मलाही एकदा ढगात सुस्पष्ट असा स्त्रीच्या चेहर्‍याचा आकार दिसला होता. साईडव्यूने. योगायोगाने ती नवरात्र होती, जणू देवीच प्रकटली होती. फोटोही होता, आहे, असेल माझ्याकडे तो. शोधावा लागेल. बाकी इथे फोटो कसा टाकतात? कुठे अपलोड करावा लागतो?

In reply to by मीता

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 22:28
कलर, ब्लॅक अँड व्हाईट, सेपिया, ग्रे शेड, सर्वच इफेक्टसची उधळण एकाच फोटोत. अशी कमाल निसर्गच करू शकतो. सही आहे !

In reply to by खटपट्या

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 00:41
मस्तच. नटलेल्या संध्याकाळ्सनी धागा सुरू झाला :) यात तर मंद रोमँटीक फील देणारे इंग्लिश कलर दिसत आहेत. हे कुठल्या पाश्चात्य देशातील गाव आहे का?

In reply to by मराठे

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 23:24
मस्तच, हा फोटो बघून लहानपणीची एक आठवण जागी झाली. बल्बच्या समोर हात धरून त्याची सावली आणि कडेने पसरलेला प्रकाश अशी वातावरणनिर्मिती करून अनुभवणे.

In reply to by सानिकास्वप्निल

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 00:40
सहिये, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक रंग कुठल्या ना कुठल्या भावनेची छटा दाखवतोय .. मलाही शोधायला हवे, घरच्या खिडकीतूनच काढलेत काही फोटो..

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 01:05
नाही हो, टॉवर्स कसले, नाक्यावरची बिल्डींग आहे. कसलातरी स्टे आलाय आणि अडकलीय. बहुतेक अतिरीक्त मजले चढवलेयत, पाडले तर बरे होईल, सुर्यनारायणांचे थेट दर्शन होईल ;) असो, तरी काय कसला स्टे आणि कोण बिल्डर ते उद्या वडीलांना विचारून सांगतो, मी फक्त नावालाच सिविल इंजिनीअर आहे पण मला यातले फारसे काही कळत नाही, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 01:10
एक लिमिट, तुम्ही त्या मागच्या ट्विन टॉवरबद्दल बोलत असाल तर मग इथे बघा.... http://en.wikipedia.org/wiki/The_Imperial_%28Mumbai%29