Skip to main content

एक मोहक संध्याकाळ...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 22/04/2014 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
अश्याच एका सामान्य संध्याकाळी घराशेजारच्या बागेत रपेट मारून झाल्यावर एका बाकावर हवा खात बसलो होतो. संध्याकाळी तेथे येणार्‍या समवयस्कांचा कट्टा जमला होता. निवडणूकांचे वारे वाहत असल्याने हवामानातिल वाढणार्‍या तापमानाच्या बरोबरच दर दिवशी राजकारणाच्या गप्पांचे तापमानही वर वर जात नसले तरच नवल नाही का? रोज होणार्‍या पावसाच्या आणि गारपिटीच्यामुळे गप्पा राजकारणावरून हवामानावर केव्हा घसरल्या आणि नजर सहजपणे आकाशाकडे केव्हा वळली ते कळले नाही ...

निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही ! .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14353
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही ! १००% सहमत

सुंदर, मनोहारी.......

In reply to by प्रभाकर पेठकर

+१

काका.. फक्त पुण्यवानांनाच कळाणारे का की नक्की काय आहे ह्या धाग्यात?!! मला फक्त रिकामी जागा आणि शेवटी एक . दिसत आहे.... ओ संपादक.. करा न काहीतरी..

In reply to by पैसा

कोरी जागा आणि टिंबच दिसतय.

In reply to by दिपक.कुवेत

हे बघा मल काय दिसतय.. . अद्वेयच्या धाग्यावरचे फोटोही मला दिसत नाहीत.. तेव्हा असं दिसतं.. advey बाकी दिपकच्या धाग्यावरचे फोटो दिसत आहेत मला..

In reply to by पिलीयन रायडर

@ कोरी जागा आणि टिंबच दिसतय. >> मला पण (ऑफिसमधुन) फक्त एवढच दिसत होतं. मग मोबाईलवर फोटो दिसला.

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/big-thumbs-up-smiley-emoticon.gif

मला एक्का आणि मृत्युंजय दोघांचेही फोटो दिसताहेत आणि आवडले आहेत.

In reply to by पैसा

+१११ @पि रा, एक आठवडा निरहंकार उपास केलास तर तुला फटु दिसतील बघ!

मला वाटतंय की एक्का-साहेबांच्या फोटोची इमेज हाईट-विड्थ सेटिंग्ज थोडी गंडलेली आहेत. त्याचा कोड मला असा दिस्तोय  त्याची विड्थ थोडी मराठीत आणि थोडी ईंग्रजीत अशी आलेली आहे. त्यामुळे काही जणांना फोटो दिसत नसावा. जर हा धागा मी क्रोम मधे उघडला तर मला फोटो दिसतात पण इंटर्नेट एक्प्लोरर मधे दिसत नाही. म्हनजे जुन्या ब्राउजर्स ना हा कोड नीट वाचता येत नाही. म्हणून असं होत असावं. हाच धागा जर मोबाईल मधे उघडला तर कोड दिसू शकेल.

In reply to by पैसा

ल्ल्ल्ल्ल्स्स्स्स्स्स्स्स्स्स ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा .. आता अज्जुन क्लास दिसतोय!

In reply to by मराठे

सुरेख आलाय फोटू! हे असं छायाचित्रात चांगलं दिसेल याची कल्पना करायची म्हणजे भारी काम आहे.

सर्व प्रतिसादकांसाठी धन्यवाद ! आणि कोड धेडगुजरि भाषेत पडल्याने झालेल्या गैरसोईबद्दल क्षमस्व ! कोड अचूक केल्याबद्दल संपादकांचे आभार.

आणि "निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही !" हे वाक्य आवडले.

प्रतिसादातील नदीकाठचाही मस्त. मलाही एकदा ढगात सुस्पष्ट असा स्त्रीच्या चेहर्‍याचा आकार दिसला होता. साईडव्यूने. योगायोगाने ती नवरात्र होती, जणू देवीच प्रकटली होती. फोटोही होता, आहे, असेल माझ्याकडे तो. शोधावा लागेल. बाकी इथे फोटो कसा टाकतात? कुठे अपलोड करावा लागतो?

In reply to by मीता

कलर, ब्लॅक अँड व्हाईट, सेपिया, ग्रे शेड, सर्वच इफेक्टसची उधळण एकाच फोटोत. अशी कमाल निसर्गच करू शकतो. सही आहे !

In reply to by शुचि

धन्यवाद शुचि आणि अभिषेक..

In reply to by खटपट्या

मस्तच. नटलेल्या संध्याकाळ्सनी धागा सुरू झाला :) यात तर मंद रोमँटीक फील देणारे इंग्लिश कलर दिसत आहेत. हे कुठल्या पाश्चात्य देशातील गाव आहे का?

क ड क - लई भारी राव

In reply to by मराठे

मस्तच, हा फोटो बघून लहानपणीची एक आठवण जागी झाली. बल्बच्या समोर हात धरून त्याची सावली आणि कडेने पसरलेला प्रकाश अशी वातावरणनिर्मिती करून अनुभवणे.

In reply to by सानिकास्वप्निल

सहिये, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक रंग कुठल्या ना कुठल्या भावनेची छटा दाखवतोय .. मलाही शोधायला हवे, घरच्या खिडकीतूनच काढलेत काही फोटो..

In reply to by शुचि

नाही हो, टॉवर्स कसले, नाक्यावरची बिल्डींग आहे. कसलातरी स्टे आलाय आणि अडकलीय. बहुतेक अतिरीक्त मजले चढवलेयत, पाडले तर बरे होईल, सुर्यनारायणांचे थेट दर्शन होईल ;) असो, तरी काय कसला स्टे आणि कोण बिल्डर ते उद्या वडीलांना विचारून सांगतो, मी फक्त नावालाच सिविल इंजिनीअर आहे पण मला यातले फारसे काही कळत नाही, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज

In reply to by शुचि

एक लिमिट, तुम्ही त्या मागच्या ट्विन टॉवरबद्दल बोलत असाल तर मग इथे बघा.... http://en.wikipedia.org/wiki/The_Imperial_%28Mumbai%29