अभिनेता फारुख शेख काळाच्या पडद्या आड....
लेखनप्रकार
एक धक्कादायक बातमी आपल्या सहज अभिनयाने प्रत्येक प्रसंग सुंदर करणारे फारुख शेख काळाच्या पडद्या आड गेले. र्हदयविकाराने त्यांचे दुबईत निधन झाले.
त्यांची प्रथम ओळख सई पराम्जपेंच्या "चश्मेबद्दूर" या चित्रपटाने झाली त्यापूर्वी त्यानी चित्रपट केले होते मात्र त्याना खरी ओळख या मुळे मिळाली. "किसीसे ना कहना, नूरी , बाजार , उमरावजान या चित्रपटांमधून त्यानी आपली वेगळी ओळख प्रस्थापीत केली. कथा सारख्या चित्रपटातील त्यांची वेगळी भूमिका देखील प्रेक्षकाना तितकीच भावली
दीप्ति नवल आणि फारुख शेख ही जोडी पडद्यावर असेल तर लोकाना सुंदर अभिनयाची आणि निखळ निर्व्याज करमणूकीची खात्री असायची.
फारुख शेख यांच्या चित्रपटानी प्रेक्षकाना निखळ आनंदच दिला.
इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.......
वाचने
4401
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
खरच खूप वाईट बातमी
सगळी उत्कृष्ट कलाकार मंडळी जातायत एक उत्कृष्ट दिग्दर्शक, नट गेल्याचे दुखः अजून ओसरत नाही तोपर्यत अजून एक नटहि जावा ???!!!!
मृत्युंजय यांनी कथा बद्दल लिहिलेला लेख अजून ताजा आहे. त्या कथा चा नायक आज हरपला.
हा उत्तम अभिनेता त्याच्या साध्या हलक्या फुलक्या चित्रपटांमुळे लक्षात राहिला.
अनेक उत्तम गाणी त्याच्यावर चित्रीत झाली आहेत. खालची काही त्यातीलच
फिर छिडी रात बात फुलो की - बाजार
सीने मे जलन आखोंमे तुफान सा क्यु है - गमन
आजा रे आजारे मेरे दिलबर आजा - नुरी
या गुणी अभिनेत्याला श्रध्दांजली.
अगदी शांघाय मधे देखील किती तजेलदार अभिनय केला फारुखने. कथा चित्रपटातला ससा तर अगदी चपखल वठवला.
जिंदगी जब भी तेरी... :(
रेस्ट इन पीस सर.
या एकसोएक इंटर्व्यूजमुळे तो कायम स्मरणात राहील.
आताच त्यांचा "ये जवानी है दीवानी" हा चित्रपट पाहिला होता. तसेच त्यांचे जीना इसी का नाम है हा मुलाखतीपर कार्यक्रम खूप आवडायचा.
आदरांजली.
मध्यमवर्गीयांना आपला चेहरा वाटणारा एक कलाकार गेला. :(
In reply to आदरांजली. by प्यारे१
मध्यमवर्गीयांना आपला चेहरा वाटणारा एक कलाकार गेला.
अगदी अगदी! अत्यंत सहज अभिनय आणि तो देखील निवडक भुमिकांमध्ये... या संदर्भातून त्यांचे चष्मेबद्दूर, कथा, किसी से ना केहना सारखे चित्रपट परत परत बघण्यासारखे आहेत. शतरंज के खिलाडी, बाजर आणि अर्थातच उमरावजान ह्या १८० अंशाने वेगळे असलेल्या चित्रपटात तितकाच समर्थ अभिनय दिसतो.
जे काही तोलामोलाचे कलाकार हिंदी चित्रपटसॄष्टीने दिले त्यातील हे एक दिग्गज नाव.
त्यांना आदरांजली.
In reply to +१ by विकास
आदरांजली
In reply to आदरांजली. by प्यारे१
...... तत्कालीन प्रस्थापित हिरोंपेक्षा आणि त्यांच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला....... भावपूर्ण श्रद्धांजली!!!......
आदरांजली.
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
सालं वाईट वाटतंय :(
-दिलीप बिरुटे
In reply to श्रद्धांजली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी नेमकं.. सालं वाईट वाटतंय.. :(
फार आवडायचा सगळ्याच सिनेमामध्ये - चश्मेबद्दूर, कथा, किसीसे ना कहना, बाजार, उमराव जान, साथ साथ
कितीतरी अप्रतिम गाणी..
आज न राहवून शोधून गाणं पाहिलं -- काली घोडी द्वार खडी..
३:१६ -- काली घोडी पे गोरा सैंया चमके पाहून फार वाईट वाटलं की हा माणूस आता नाही..
उत्तम गाणी आहेत जिथे त्या उत्तम मेलडी किंवा स्वरांबरोबर फारूक शेख नक्कीच आठवतो..
जिंदगी जब भी तेरी बज्म में, तुमको देखा तो ये खयाल आया..
उमदा अभिनेता आणि माणूस.. काही फार छान मुलाखती आहेत जेव्हा या वर्षी चश्मेबद्दूर पुनर्प्रदर्शित झाला.
श्रद्धांजली..
सगळे चांगले लोक असे का जातायत..
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र...........! 
मला माझा वाटणारा एक कलाकार गेला. आपल्याच आयुष्यातील अजुबाजुचा एक मित्र असावा असे पात्र रंगवणार्या फारुख शेखना आदरांजली...
- वाट्या
आपल्याकडे अमोल पालेकरांचा अपवाद वगळता मध्यमवर्गीय भुमिका साकारु शकेल असा हिन्दी चित्रपटातील दुर्मिळ अभिनेता गेला. "गमन" मधील त्यांचा अभिनय विसरणे अशक्य. वाडकरांचे "सीने मे जलन आंखो में तुफान सा क्यु है" सुरु होते आणि ती जलन आणि तुफान फारुख शेखच्या नजरेत दिसते.
भावपूर्ण श्रद्धांजली!!!
जाता जाता :- च्यामारी जे खपले पाहिजेत असं मनापासुन वाटतं... त्यांच्या अजुन नंबर लागत नाही ! जी काही चांगली मंडळी आहेत ती मात्र अशी पटापटा जात आहे याचं जास्त दु:ख होत.
चांगल्या कलाकार गेला
श्रध्दांजली
अमोल केळकर
त्यांचे चित्रपट तर चांगले होतेच. शबाना बरोबर त्यांचे 'तुम्हारी अमृता' बघितले आणि एका जागी बसून, कुठलेही हातवारे न करता इतका उत्तम आणि उत्कट अभिनय करता येतो, हे याचि देही याचि डोळा पहायला मिळाले.
असे माणुसकी जपणारे कलाकार थोडेच!
आदरांजली.
इंडीयन एक्स्प्रेस मधील बातमी वाचण्यासारखी आहे... थोडक्यात खालील प्रमाणे:
राजन कांबळे हे ताजमधील कर्मचारी. २६/११ च्या धुमष्चक्रीत हॉटेलमधील पाहुण्यांना बाहेर काढण्यात मदत करत असताना अतिरेक्यांना दिसले आणि त्यांना गोळ्या मारल्या गेल्या - शहीद झाले... पश्चात पत्नी शृती आणि २ मुलगे होते. त्या वेळेस २ वर्षाचा धाकटा मुलगा होता ज्याने पायलट व्हावे आणि मोठ्या मुलाने सैन्यात जावे अशी त्यांची इच्छा होती असे इंडीयन एक्स्प्रेस मधे छापून आले होते.
दुसर्या दिवशी इंडीयन एक्सप्रेस मधे एस एम एस आला ज्यात दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचललेली होती (जरी ताज ची मदत होती तरी देखील). अट एकच नाव जाहीर करायचे नाही. इंडीयन एक्स्प्रेस ने ती अट मान्य केली आणि दर वर्षी त्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा चेक घरी जायचा, पाकीटावर फक्त "शेख साहेब" इतकेच लिहीलेले असायचे. या कुटूंबाला कधीच समजले नाही.
शृती कांबळ्यांना आता हुरहूर लागली आहे की त्या कधीच या शेखसाहेबाचे आभार मानू शकल्या नाहीत...
उफ्फ