लेखाचे शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलंच असेल कि लेखाचा विषय किती मोठा आहे .
तुम्ही कधी माणूस चरताना बघितलाय का हो ? आणि नुसता गुरासारखा चरत असून परत स्वतःला खवैय्या म्हणताना … लवकर या गावात या … भाई काकांचाच एक वाक्य आहे , खूप गाणी गाणारा गावैय्या नव्हे तसे खूप खाणारा खवैय्या न्हवे.
काल अभिषेक ला ….किंवा बेडेकर किंवा अगदीच त्यातल्या त्यात आम्ही पण 'तसले' खातो असे सांगण्यासाठी म्हणून कुठल्यातर पेठेत जाऊन जेवलेले "अस्सल कोल्हापूर हं" असे म्हणत प्यायलेला ( ताक पितात तसा ) पांढरा रस्सा नामक पावडर ने बनवलेला रस्सा हीच या खाद्यसंस्कृतीची सुरवात आहे व शेवट ही …
ठिकाणे मात्र इथे खूप कारण 'खात सुटणारे' ( व आता कितीही पैसे मोजून ) खूप … काय ती नावे व काय त्यांची वर्णने … अहाहा ! … बादशाही ??? एक जुनाट वाडा, लोकांना जुन्याचाच मुद्दाम फील देण्यासाठी ठेवलेले ते साहित्य , लोक कसे मुर्ख बनत आहेत हे आनंद लपवत बघणारे ते मालक व अत्यंत घरगुती व कुठेही कमी पैशात मिळेल असले बरेच महागडे जेवण सगळ्यात कहर म्हणजे 'बादशाहीत असंच असतं' याचा अभिमान बाळगून कसल्याही जेवणासाठी रांगा लावणारे लोक बघितले कि खरंच 'अहो धन्यास्मीन ( असेच कायसे !) ओरडावेसे वाटते …
खाणारे अनेक लोक असतात . काही आनंदासाठी खातात काही आरोग्यासाठी खातात काही फुकट मिळते म्हणूनही . कोणी , किती , कुठे का व कसे खावे याबद्दल आमचा राग नाही . राग आहे तो त्याला खाद्यसंस्कृती वगैरे गोंडस नावे देऊन जाहिरातबाजी आणि आमच्या या गावात न कसं सगळं सगळं मिळत , इथल्या श्री ची मिसळ ना ( किंवा त्या जागी कुठल्याही गाजलेल्या जागेचे नाव घालावे) तुलनाच नाही हो … वगैरे बाष्कळ बडबड करून आपले खोटे नाणे खरे करण्याच्या प्रयत्न. बाकी या शहराचाच तो स्वभाव आहे … त्याला इलाज नाही. प्रिय व्याक्तीनो , एकदा , भारत सोडा पण किमानपक्षी आपला महाराष्ट्र फिरून या , तिथे खरच काय चांगले आहे ते समजून घ्या व नंतर तुमची संस्कृती जपा …
सर्वत्र मेणाचेच पुतळे … आणि परत सांगणे काय कि मेणाचे पुतळे हेच खरे पुतळे . कशासाठी?
असो … कसलाही फालतू व चुकीचा अभिमान बाळगणे हेच एकमात्र वैशिष्टय असलेल्या शहरातील लोकांवर मी पामराने काय ( आणि किती ) लिहावे …
तुम्ही सुज्ञ असा …
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
हां हा हा.....
**
=))
बादशाही ??? एक जुनाट वाडा,
बादशाही ??? एक जुनाट वाडा, लोकांना जुन्याचाच मुद्दाम फील देण्यासाठी ठेवलेले ते साहित्य , लोक कसे मुर्ख बनत आहेत हे आनंद लपवत बघणारे ते मालक व अत्यंत घरगुती व कुठेही कमी पैशात मिळेल असले बरेच महागडे जेवण सगळ्यात कहर म्हणजे 'बादशाहीत असंच असतं' याचा अभिमान बाळगून कसल्याही जेवणासाठी रांगा लावणारे लोक बघितले कि खरंच 'अहो धन्यास्मीन ( असेच कायसे !) ओरडावेसे वाटते …
ओ म्हाराज. बादशाही ची खासीयत म्हणजे तेथील घरगुती जेवण.ते जेवण रास्त किमतीत मिळते.गेली इत्येक वर्षे बादशाहीची जेवणाची चव त्यानी कायम राखलेली आहे.
क्वालीटी इज कस्टमर्स मोस्ट डीलाईट हे इथे आल्यावर कळते.
असो........ पॉपकॉर्न घेवुन बसतो
हात्तेरिकी...
In reply to बादशाही ??? एक जुनाट वाडा, by विजुभाऊ
काय विजुभाऊ, लागलात गळाला? मिपावर नव्यानेच आलात का?
विजुभाऊ हे चिर'नवसदस्य' आहेत.
In reply to हात्तेरिकी... by प्रभाकर पेठकर
विजुभाऊ हे चिर'नवसदस्य' आहेत. ;)
हलके घ्या हो!
आयडी सुज्ञ अन असा कसा गळा
आयडी सुज्ञ अन असा कसा गळा काढलात म्हणते मी!
आता सोमवारी फुल्ल फाईट होणार येथे.
@ लोक कसे मुर्ख बनत आहेत >>
@ लोक कसे मुर्ख बनत आहेत >>
बरं झालं बादशाहीची आठवण करुन दिलीत.. आज मेस बंद असते. आज मी परत 'मुर्ख' होणार.. *DANCE*
याच साठी केला आहे का अट्टाहास?
असो........मै भी पॉपकॉर्न घेवुन बसतो .. ;)
सगळेच पॉपकॉर्न घेऊन बसलेत .कस
सगळेच पॉपकॉर्न घेऊन बसलेत .कस होणार? असो .
पॉपकॉर्न विक्रेता -
तथास्तु
ते बादशाही बिदशाही पेशवाई
ते बादशाही बिदशाही पेशवाई वगैरे सोडा हो पण मिसळ पण पाव भाजीच्या ब्रेड बरोबर खाणाऱ्या शहराला कसली आलेय डोंबलाची खाद्य संस्कृती?
खाणारे अनेक लोक असतात . काही
मग एव्हढा लेखन प्रपंच कशासाठी
सल्लागार बदला !
अहो तुमचे सल्लागार जरा पुरेशा कुवतीचे वाटत नाहीत. अन्यथा इतक्या एकाहुन एक जबरदस्त खाण्याचे ठीकाण असतांना तुम्हाला या जागा च का दाखविल्या कुणास ठाउक?
यापेक्षा सल्लागार बदला
तुम्हाला खरच चांगला अनुभव येईल
अहो एकाहुन एक सुंदर हॉटेल आहेत या शहरात आणि डीशेस तर विचारु च नका. !
खरंच ?
खरंच ?
अनेक ठिकाणी ( याच शहरात नाही तर इतर अनेक गावातही ) फिरून तेथील ठिकाणे बघितल्यानंतर हा अनुभव आहे
लेख या शहरातील फक्त अमुकच एका ठिकाणांबद्दल नाहीये तसा उद्देशही नाहीये. पण काही विशेष नसताना त्या ठिकाणांचा नको तेवढा प्रोपोगंडा करत राहणे ही गोष्ट मला याच शहरात घडताना दिसली . कारण तो त्या शहराचा स्वभाव( जो त्याला तेथील जानासामुहाच्या स्वभावामुळे मिळतो )
लेखात ओघाने एक उदाहरण आले आणि त्या उदाहर्णावारच चर्चा चालू झली ?
असो … जरा समजून घ्या
अवांतर :- कुणाला मिरच्या झ्होमब्ल्या असल्यास क्षमस्व .. चालायचेच …आम्हीही समजून घेऊ .
आम्हीही याच शहराचे रहिवासी हे अती अवांतर
आम्हीही याच शहराचे रहिवासी हे
In reply to खरंच ? by सुज्ञ
"ते" शहर फारच संसर्गजन्य आहे असे म्हणतात . तुम्ही कसे वाचलात?
नशिब
In reply to आम्हीही याच शहराचे रहिवासी हे by विद्युत् बालक
नशिब
सुखी रहा.... देव आपणास येथेच
In reply to आम्हीही याच शहराचे रहिवासी हे by विद्युत् बालक
सुखी रहा.... ;) देव आपणास येथेच पोट्भर देवो.. :)
गेला बाजार २०० ला मरण नाही.
गेला बाजार २०० ला मरण नाही. आमच्या त्रिशतकासाठी शुभेच्छा :)
केवळ आमचं ते खरं
केवळ आमचं ते खरं हि एक जानासामुदायिक भावना या शहरात तयार झली आहे . आता मी या लेखात एकदाही या शहराचे नावही न लिहिता केवळ काही खाण्याची ठिकाणे लिहिली तरीही कुणालाही या शहराचे नाव लगेच कळेल. कशामुळे घडला असेल असं .
किती जणांना 'गणेश नाष्टा सेंटर' असा लिहिल्यावर ते सांगलीतील एक अत्यंत उत्कृष्ट नाश्ता मिळण्याचे ठिकाण आहे हे माहित्ये ( सांगलीकर सोडून ). किती जणांना औरंगाबाद मधील काही उत्कृष्ट ठिकाणांची नावे माहित्येत. किती लोकांना कोकणातील अशी ठिकाणे माहित्येत फार कशाला मुंबईतील … ( वरची सांग्लीकारांसाठीची अट गावानुसार सर्वत्र लागू ) .
केवळ जाहिरातबाजी व प्रोपोगंडा करून खरंच ठिकाणे चांगली होत नसतात त्यासाठी चांगलीच असावी लागतात.
हे सत्य उघड करून दाखवल्यावर प्रतिक्रिया ( कुणेकारांच्या ते महित्येच !) येणारच . त्याला इलाज नाही.
बहुत काय लिहिणे.
पटले
In reply to केवळ आमचं ते खरं by सुज्ञ
पटले
'गणेश नाष्टा सेंटर'
सांगलीच्या विश्रामबाग मधील काय हो?
कशाला आठवण करून दिलेत भाऊ तुम्ही ? पाच वर्षांपूर्वीच्या स्मृती जाग्या झाल्या व तोंडाला पाणी सुटले
काय ते शिरा पोहे , कट वडा , बासुंदी मधील दुधा सारखा आटवलेला चहा आणि काय तो गुरुवारचा फ़ेमस शाबुवडा … खल्लास !!
वालचंदवासियांचे नाश्ता वजा मेस च!
अजूनही सुरु आहे काय?
या शहरात खवैय्ये एक से एक आहेत.
खिलवणारेच कमी आहेत! मग दुधाची तहान ताकावर म्हणत कशाचाहि ऊधो ओदों सुरु! अर्थात या श्रातिल मिपाकर्स याला अपवाद बरका.
....
(No subject)
काय सुज्ञ बुवा? काय होतंय?
काय सुज्ञ बुवा? काय होतंय?
baakar wadi
Bakar wadi war ghasarala asata naa, century fast zali asti.. abhyas kami padala tumcha
होय 100 पैकी 70 वेळा खारटच चव जिभेवर आणणारी
In reply to baakar wadi by कपिलमुनी
प्रसिध्द बाकरवडी हां सुध्दा खाद्य संस्कृतीचा महान ठेवाच आहे!
खारट बाकरवडी, चितळ्यांची!
In reply to होय 100 पैकी 70 वेळा खारटच चव जिभेवर आणणारी by अग्निकोल्हा
माझ्या अनुभवाप्रमाणे पुण्यात चितळ्यांच्या दुकानातुन घेतलेली बाकरवडी मऊसर आणि अजिबात खारट नसते.
पुण्याबाहेर मिळणारी बाकरवडी जास्त दिवस टिकावी म्हणुन त्यात कृत्रिम मसाले आणि रंग घातलेली असल्यामुळे ती खारट आणि गडद पिवळ्या रंगाची दिसते. पुणेकर या माहितीत भर घालतीलच.
बाकरवडी पॉप्युलर करणारे चितळे
बाकरवडी पॉप्युलर करणारे चितळे हे मुळचे सातार्याचे. नंतर ते सांगली /भिलवडी कडे सरकले. ते मूळ पुणेकर नव्हेत.
फक्त दगडूशेठ हे मूळचे पुणेकर. काका हलवाई हे काही फार मोठे प्रस्थ नव्हे. त्यांचे नाव फक्र रीक्षावाल्याला पत्ता सांगण्यासाठी उपयोगी पडते
खोडसाळ लेख आहे. पुण्यातले
खोडसाळ लेख आहे. पुण्यातले सगळे लोक असे नसतात.
तुमच्या ह्या लेखा मुळे एक
तुमच्या ह्या लेखा मुळे एक भारी लेख लिहील्या गेला.. वाचायला मिळाला.. धन्यवाद..
बाकी तुमचा लेख ठिक आहे..
+१
In reply to तुमच्या ह्या लेखा मुळे एक by पिलीयन रायडर
ऐसेच बोल्ता...
प्रत्येक
+१. प्रत्येक शहरात काही शहराभिमानी लोक असतात.बेंगळूरुत एम्.टी.आर. नामक बरेच जुने हॉटेल आहे.साधे शाकाहारी जेवण जेवायला ४५/६० मिनिटे थांबायची लोकांची तयारी असते.काही जुने राजकारणी/कलाकार जेवताना/ढेकर देतानाचे मोठे फोटो लावले असतात.जगात ह्यांच्याशिवाय चांगली कॉफी कोणालाही बनवता येत नाही असे स्थानिकांचे म्हणणे असते.
दुसरे एक विद्यार्थी भवन नामक उपाहारगृह आहे. येथे फक्त केवळ पाच पदार्थ मिळतात्.त्यामुळे मालक अभिमानाने 'आम्ही मेनु कार्ड ठेवत नाही' असे सांगतात.
वर म्हंटल्याप्रमाणे बादशाही सारखे 'एम्.टी.आर्./विद्यार्थी भवन जेवून तृप्त झालो' असे सांगण्याचे पद्धत आहे.
सहमत!!!
In reply to प्रत्येक by चिरोटा
सहमत!!!
कर्नाटकाचे पुणे!
In reply to सहमत!!! by बॅटमॅन
बंगळूर, मैसूर इ. शहराना कर्नाटकाचे पुणे म्हणता येईल त्यामुळे असल्या गोष्टी तिथे घडत असल्यास नवल नाही.
;)
कर्नाटकाचे मुंबई म्हणता येईल असे एकही शहर नाही हे प्लीजच नोटा.
--- कर्नाटकच्या गडचिरोलीत रहाणारी - साती.
अगदी सहमत!!! बंगळूर म्हैसूर
In reply to कर्नाटकाचे पुणे! by साती
अगदी सहमत!!! बंगळूर म्हैसूर हे कर्नाटकचे पुणेच!
अन कर्नाटकची कशाला, अन्य कुठल्याच राज्याची मुंबै नाही. :) लिटरली अन फिगरेटिव्हली सुद्धा.