टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
"मिसळ"णारी कोण कोण??? - इस्ट कोस्ट मध्ये??
नमस्कार मंडळी,
आता जरा उन्हाळा मस्त चालू झाला आहेच इथे... तर आपणही जबरदस्त मिसळकट्टा भरवू. काय म्हणता?? इस्ट कोस्ट ला कोण कोण आहे?? छोट्या डॉनची बहीण शोभाव्या अशा वरदाबाई कट्टा भरवायचं पिल्लू सोडून आता स्वतःच 'जमणे अवघड आहे असे सांगताहेत." तेव्हा आता ही जबाबदारी आपण सगळे मिळून घेऊ.. कसं?? इस्ट कोस्ट ला मी, शितल, संदीप चित्रे, चतुरंग.. आणखी कोण कोण आहे?? केव्हा जमूया, कुठे जमूया?? कोणाच्या घरी की एखाद्या बीच वरच जमायचं?? इस्ट कोस्ट वाले तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांचं मत घेऊन निर्णय घेऊ? घरी जमायचं असेल तर सगळ्यांसाठी कोल्हापूरी मिसळ मी करण्याची जबाबदारी घेते?? काय गं शितल.. तू करशील ना मदत?
- प्राजु
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


मी आहे.. पण
मी आहे इस्ट कोस्ट मधे पण थोड्याच दिवसाचा सोबती.
जाणार जुलै महिनाअखेरीला परत पुण्यास...
पुण्याचे पेशवे
मी आहे.
अग प्राजु आपण कोल्हापुरी मिसळ सगळ्याना चाखायला देऊच
आपण एखाद्या बीच वर जाऊ मस्त पैकी
मिसळ करू तेथे.
बारबेक्यु करू
मस्त फोटो टाकु आणि मिपाकराना जळवु.
मी तर तयार आहे.
तारीख ठरवु.
जुलै मध्येच करू . शुभच्य शिघ्रम!
२६ जुलै..
वरदाला २६ जुलै ला जमते आहे... बाकिच्यांचे काय??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
त्या आधीच करू ..
पेशवे.. आपण जाण्या आधीच करू कट्टा.. कुठे आहात आपण?? आपल्याला कुठे जमेल?? न्यूजर्सी, हार्टफर्ड की मॅस मध्ये?/
ठरवा लवकर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
न्यू जर्सी मधे जमेल
मी न्यू जर्सी मधे येऊ शकतो.
पुण्याचे पेशवे
अग
आपल्या जवळ एक बीच आहे तुला माहित आहे ना
किवा मग जास्त मिपाकर कोठुन आहेत ते पाहु आणि मध्य ठरवु.
सदीप काय तुला म्हणायचे आहे
हो माहीती आहे..
क्लिंटन मॉलच्या थोडा पुढे आहे तो बीच ना..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मी तयार आहे.
हो मला चालेल
२६ ला.
अग
हो पण तो आपल्याला जवळ आहे. बाकीच्याचे काय.
मला वाटते ...
बरेचसे ईस्टकोस्ट वाले उत्तर भागातच आहेत. डिसी च्या दक्षिणेला कुणी आहे की नाही ते माहीत नाही. या दृष्टीने, जर्सी-न्युयॉर्क ही ठिकाणे सर्वाना सोयीची होतील. कुणालाही ४-५ तासांपेक्षा जास्त प्रवास करावा लागू नये असे मला वाटते.
अर्थात, डीसी ला सगळ्याना येता येणे शक्य असेल तर आमचा गरीबखाना उघडा आहे. चाळीत असताना गच्चीत खेळलो ; ग्यालरीत झोपलो. इथे लोकांनी आमच्या बेसमेंट ची डॉर्मेटरी करावी अशी विनंती.
मला कुठेही चालेल
जमलं मला तर कुठेही यायला काहीच प्रॉ. नाही...पेशव्यांना लिफ्ट देईन मी...चालेल ना रे?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
चालेल ना! जरूर..
लवकर लवकर ठरवा.
पुण्याचे पेशवे
न्यू यॉर्क-- न्यु जर्सी..
कुठेही चालेल...- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
चालेल
हो कोठे ही
पण मिसळ हाच खादाडीचा मेन मेनु
ईस्ट अफ्रिका चालेल का?
हो कोठे ही
पण मिसळ हाच खादाडीचा मेन मेनु
अहो ईस्ट कोस्ट वाले .. ईस्ट अफ्रिका चालेल का ? आयला आमच्या तोडाच्या बादल्याभर लाळा पाडून मिसळ पार्टी करताय राव.
ईस्ट अफ्रिकेचे बिच अमेरिकेपेक्षा फार सूंदर आहेत हो.. प्लिज याना ईकडे.
(स्वगतः मरूदे खविसा .. कोणी ऐकणार नाही तुझं
ते एन्जॉय करत आहेत त्यांना शूभेच्छा दे ! नेहमी चे स्पेक्टेटर ना तू? )
एकांतवासी )
कु,ख,
http://picasaweb.google.com/prashants.space
प्रस्ताव
एक प्रस्ताव मांडतो. एकूण प्रतिसाद लक्षात घेऊन निर्णय घेता येईल.
प्रस्ताव : डीसी भागात भेटायचे. आमच्या घरी सगळ्यानी यायचे. शुक्रवारी रात्री सगळ्यानी पोचायचे. सर्वानी रविवार पर्यंत एकत्र रहावे. (ज्याना रविवार नंतर रहाता येणे शक्य आहे त्यानी जरूर रहावे)मी डिसीची सफर जमेल तितपत घडवून आणेन. बार्बेक्यु ग्रिल आहेच. कोल्लापुरी लोकानी त्यांचा मिसळ मसाला/रेसिपि आणावी. बाकीची व्यवस्था मज गरीबाकडे लागली. २६ जुलाय चा विकांत मोकळा आहे आम्हालासुद्धा.
बोला. कोणकोण येतंय ?
एका अटीवर..
मी पण इस्टकोस्टचाच!
पण मी एका अटीवर येण्यास तयार आहे: ह्याला कट्टा न म्हणता - अखिल भारतीय इस्टकोस्ट अमेरिका मराठी साहीत्य संमेलन असे म्हणले पाहीजे
हा हा हा...
पण मी एका अटीवर येण्यास तयार आहे: ह्याला कट्टा न म्हणता - अखिल भारतीय इस्टकोस्ट अमेरिका मराठी साहीत्य संमेलन असे म्हणले पाहीजे
म्हणजे सर्किट रावांना टवाळकीसाठी आणखी एक विषय मिळेल.. (ह्.घ्या.)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
चालू द्या
अभाईकोअमसासं ला शुभेच्छा.
म्हणजे सर्किट रावांना टवाळकीसाठी आणखी एक विषय मिळेल.. (ह्.घ्या.)
अहो, हल्ली विषय अनेक आहेत. त्यामुळे तुमच्या संमेलनाची टवाळकी सप्टेंबरापर्यंत तरी करायला जमणार नाही.
- सर्किट
माझी हरकत नाही..
नवर्याला विचारते. हार्टफर्डवरून डि.सिला यायला किती वेळ लागेल?? आम्ही नक्की जमवू. आणि मिसळही नक्की करू.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
बोला
अहो आमची पोर ढोर ही साधाळावी लागतील त्याची तयारी आहे का.
पोरवडा
मला दोन मुले आहेत. तेव्हा आमचे घर किड्स्-फ्रेंडली आहेच. काळजी नको. (तुमच्या मुलाबद्दलचे किस्से वाचले आहेत.
)
बघा बाबा ...
आत्ता होय म्हणाल आणि नंतर "हरे राम" म्हणायची वेळ येईल ...
तुमच्याकडे पण "नॉईज कंप्लेंट" होते का ? हो असेल तर दंड भरायची तयारी करा ...
अवांतर : जर "बेंगलोर - डीसी तिकीटाचे" निम्मे पैसे अनुदान म्हणुन मिळत असतील तर आम्ही येऊ ...
म्हणजे "हो" म्हणुन नेहमीप्रमाणे शेवटी" काडी टाकुन पळुन" जाऊ ...
तुमच्या "डी सी कट्ट्यास शुभेच्छा" !!!
ऐश करा लेको, शिकरण खावा, मटार उसळ खावा !!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
काळजी नको
डॉन भाऊ तुअम्चं हो म्हणून काडी टाकून पळायचं काम मी करणार यंदा असं दिसतय.....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
हो का ?
तरी मला शंका आलीच होती ...
मगापासुन मी ह्या वाक्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होतो वरदाताई ...
"जमलं मला तर कुठेही यायला काहीच प्रॉ. नाही...पेशव्यांना लिफ्ट देईन मी...चालेल ना रे?"
आणि
"बाकी माझं नक्की नाहीच त्यामुळे तुम्ही ठरवा मी शेवटच्या क्षणाला सांगते...."
आता आपणच सफाई दिलीत, प्रश्नच मिटला ...
आधीच सांगितले बरे केलेस, नाहीतर पुणेकर जसे माझ्या नावाने खडे फोडत होते तशी वेळ तुझ्यावर यायची...
जोक्स अपार्ट, तुम्ही सगळे जमा, मस्त मज्जा करा, काय केले ते आम्हाला सांगा, यातच आम्हाला आनंद आहे ...
आद्य काडीसम्राट छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
हा हा हा
नाहीतर पुणेकर जसे माझ्या नावाने खडे फोडत होते तशी वेळ तुझ्यावर यायची...
))))
अरे प्राजुच्या लेखाची सुरुवातच पहा ना..तिने ऑलरेडी फोडलेत थोडे खडे...
(काडीसम्राटाची बहीण)
वरदा
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
तुमच्या मुलाबद्दलचे किस्से वाचले आहेत
तो झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार करायला नकी मदन करेल....
शितल
का गं माझ्या पोटावर पाय आणते? मी २०० पानांची वही आणलेय कालच १०० पानं भरली सुद्धा खाऊची यादी लिहून....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
मला एवढे दिवस रहाता येईल
असं नाही वाटत पण शनिवारी दुपारी येऊ शकेन्..मला साधारण ५ तास तरी लागतील मी नॉर्थ न्यू जर्सी ला आहे....
बाकी माझं नक्की नाहीच त्यामुळे तुम्ही ठरवा मी शेवटच्या क्षणाला सांगते....
(स्वगतः नक्की नाही तरी किती बडबडतेयस? जरा लोकांना ठरवू देत की)
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
अजुन
मानस, चतुरंग, धनंजय, लंबूटांग आणि मीनल हे लोक आहेत इस्ट कोस्ट वर पाहू ते काय म्हणतात
http://www.misalpav.com/node/887 इथे तयार होते बरेचजण.....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
२६ जुलै :(
माझा नायगारा ला जाण्याचा प्लॅन ऑलमोस्ट ठरला आहे
.. बदलल्यास नक्कीच येईन. कुठे डी.सी. ला जमणार आहात का? कुणी बॉस्टन हून जाणार आहे का? कारण माझ्याकडे गाडी नाही आहे. अर्थात हे सगळे पुढचे प्रश्न आहेत म्हणा.
मी नवीन
मी नवीन आहे मिपावर.. मी येऊ शकतो का??
जरूर..
आपण अमेरिकेत इस्ट कोस्ट ला रहात असाल तर जरूर सहभागी व्हा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
डीसी भागात
कट्टा असेल तर जरूर येऊ शकेन. (पण जुलै पहिले तीन आठवडे जरा व्यस्त आहेत.)
धनंजय
आम्ही शेवटचा आठवडाच म्हणतोय्..म्हणजे जमेल ना तुम्हाला?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
शुभेच्छा
इस्ट कोस्ट कट्ट्यासाठी "इष्ट"शुभेच्छा!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
आतापर्यंतचे प्रतिसाद
येणार :
प्राजू
शीतल
विकास
धनंजय
अनामिक
अधांतरी :
चतुरंग
वरदा
मानस आमच्या भागातले. ते असणारच.
बाकीच्यानी आपापले प्रतिसाद कळवावेत.
येणार्या मित्र्-मैत्रिणिनो , आपापले इमेल्स मला पाठवा. मी डिरेक्शन्स पाठवतो आहे .....
धन्यवाद .
अधांतरी --
मिसळीने तोंडाल पाणी सुटतंय पण मी आधांतरी आहे.
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
शुभेच्छा.. :)
तरी म्हंटलच..
अजून मालकिणबाई कशा नाही आल्या..! - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
ऑं...
अनुष्का अभ्यंकर? हे काय? कधी? इथं काहीही घोषणा न करताच? पत्रिका द्यायची वगैरे पद्धत? अहो केला असता ना आहेर... किंवा आहेर तुम्हाला न देता त्या सोहळ्याला येणाऱ्यांसाठी आम्ही काही समव्यसनी मित्रांनी मिसळीची सोय वगैरे केली असती... नुसतंच हादडून नसतो गेलो आम्ही!!! दिलदार माणसाला शोभत नाही हे विसोबा (लक्षात घ्या आम्ही दिलदार शब्दाला पेठेतल्या पुणेकरासारखं अवतरण टाकलेलं नाहीये)...
बाकी एरवी मालक-मालकीण आम्ही आनंदानं स्वीकारलेलं आहेच की (तुम्ही कोण स्वीकारणारे, अस प्रश्न ऐकू आलाच)... तरीही ही छुपे-रुस्तमगिरी नाही पटली... याचा दंड करावा लागेल. समस्त मिपाकरांनो, यावर तुमचे मत द्या. अर्थात, कोणीतरी कष्ट घेऊन स्वतंत्र धागा सुरू करा...
कट्ट्याला मात्र शुभेच्छाच...
पण आमचा कट्टा
तर वहिनी एवढ्या का बरं लाजतायत बॉ?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
मी मेरीलॅन्डला राहतो
प्राजु,
मी मेरीलॅन्ड कोलंबीयाला राहतो. कटटयामधे भाग घ्यायला आवडेल. पण २६ जुलईला जर्सीला जायचे ठरवीले आहे. काही फरक पडला तर जरूर सागेन. कोणाला विचारावे लागेल. नम्बर मिळाला तर बर होईल.
कळवावे.
भेटी लागी जीवा लागली समाधी....
स्वागत
आयत्या वेळी प्लान्स बदलले तर कधीही या. इमेल कळवा. डिरेक्शन्स पाठवितो.
emailid
john_rambo111970@yahoo.com
काय एकेक एमेल असतात बॉ
आमच्या शेजारच्या गोडबोलांच्या कुत्र्याचं नाव होतं रँबो.. ही हि ही.. ह. घ्या नक्की...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
मग
जर्सीला कट्टा असेल तर जमेल का तुम्हाला? तुम्ही आणि चतुरंग दोघांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर्सीला करुयात
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
ईष्ट कोष्ट
मी बॉस्टनजवळ आहे. मला कनेटीकटला जमेल (प्राजू, शीतल तुम्ही कोणता बीच म्हणताय तो ऑप्शन चांगला आहे). न्यू जर्सी थोडे लांब आहे पण २६ तारखेला जमू शकेल.
डि.सी. मात्र बरेच लांब पडेल (९-१० तासाचे ड्रायविंग) त्यामुळे जमेल असे वाटत नाही.
तुमचे काय ठरेल त्याप्रमाणे कळवा. त्याप्रमाणे काय पदार्थ आणायचे ते ठरवता येईल.
चतुरंग
मलाही
मलाही यायला आवडेल. पण मी राहातो Detroit मध्ये. तेंव्हा हा कट्टा मला भलताच लांब पडणार...तरीपण शुभेछा....वृतांत्त नक्की कळवा...
अवांतर : आज तात्या एकदम खुष दिसतात. आपल्या कट्ट्यामुळे मालकीण बाई गाणं वगैरे म्हणतायत वाट्टं.... साडी नेसुन..
ह. घ्या...मध्ये एखादं झाड ठेवा म्हणजे एकदम फिल्मी श्टाइल....
आपला,
मुकुल
बघते
घरी घरचेच लोक आले असल्याने सर्वांना घेऊन २६ जुलै ला येणे जमणे कठीण वाटते आहे, पण आयत्या वेळी बेत बदलले तर नक्की येऊ.
प्राजू, आणि वरदा, तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेलच.