Skip to main content

घरगुती फेसपॅक व अन्य टीप्स

लेखक शुचि यांनी रविवार, 31/03/2013 05:51 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाला त्वचेसाठी पोषक अशा घरगुती फेसपॅक ची माहीती आहे का? मला माहीत असलेले ३ फेसपॅक पुढीलप्रमाणे- (१) कोरड्या त्वचेसाठी - व्यवस्थित फेटलेले अंडे + २ चमचे ओटमील हा फेसपॅक १०-१५ मिनीटे ठेवला तर अंड्यामुळे त्वचा छान ओढली जाते व एज-डिफाइंग क्रीमचा इफेक्ट मिळतो असा अनुभव. (२) एक चमचा मध व साय न काढलेले नीरसे दूध - त्वचा मुलायम होते हा अनुभव (३) लिंबाचा अथवा संत्र्याचा रस व मध - लिंबू/संत्र्याच्या रसाने त्वचा कोरडी झाली. हा फेसपॅक फारसा आवडला नाही. या धाग्यावर आपण आरोग्याची अथवा त्वचेची अन्य कोणती व कशी काळजी घेता, केसांची निगा कशी राखता वगैरेबद्दल उहापोह होणे अपेक्षित जसे भरपूर पाणी पीते/पीतो. आठवड्यातून तीनदा व्यायाम करते/करतो वगैरे. कृपया आपण जे उपाय अमलात आणले असतील तेच विस्तृत रीतीने उधृत करावे. छान छान टीप्स मिळतील अशी आशा करते. *गृहशोभिका छाप लेख वाटल्यास क्षमस्व पण खरच मोलाच्या सल्ल्यांच्या अपेक्षेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 49592
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

In reply to by श्रीरंग_जोशी

तुला बर्‍या बातम्या लागतात रे
कुणीतरी डोळे मिटून काहीतरी पिते. त्याला वाटते जग आंधळेच आहे. असं काहीतरी म्हणतात ना गुरुजी? ;) तुम्ही गुपचुप करा हो काहीपण. हमारे जासूस चारो ओर है. =)) =))

माझ्या एका जालीय मैत्रीणिने एका फेसपॅकची रेसिपी दिली आहे, जी फक्स्त महिलांकरीता आहे, त्यातपण तरूण महिलांसाठी. तरीबी आपापल्या जाबाबदारीवर आजमवून बघावी. अर्धी वाटी कांद्याची पेस्ट + १ चमचा लसूण पेस्ट एकत्र करावं आन त्वांडाला लावून धा मिन्टं ठेवावं. तोंड लई भारी होतयं म्हणे.