आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)
लेखनप्रकार
आयटीच्या गोष्टी - नमन
आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
शिक्षण संपलेलं असतं. नोकरीलाही आता जवळपास दोन वर्ष होत आलेली असतात. इथे आता कामात मन लागत नसतं, डोळ्यांना तिकडचे वेध लागलेले असतात. मॅनेजरला तसं आडून आडून सुचवणं चालू असतं. मनात आशा निराशेचा हिंदोळा झुलत असतो. कारण, आयटीत नोकरीला लागल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीसाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेले असतात ती गोष्ट वास्तवात उतरण्याची वेळ आलेली असते. दोन वर्ष ऑफशोअरला (म्हणजे भारतात) काम केलं आता मला कंपनीने ऑनसाईटला पाठवायलाच हवं असं तो ठामपणे इतरांना सांगत असतो.
काय असतं एव्हढं ऑनसाईटमध्ये की ज्यामुळे आयटी इंडस्ट्री जॉईन करणारा जवळपास प्रत्येक कॉलेज पासआऊट अगदी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून एक दिवस ऑनसाईटला जाण्याची स्वप्नं पाहू लागतो? काय असतं एव्हढं ऑनसाईटमध्ये की ज्यामुळे प्रत्येक अनुभवी आयटी ईंजिनीयर नविन नोकरीसाठी मुलाखत देऊन झाल्यानंतर "हाऊ अबाऊट ऑनसाईट?" असा प्रश्न मुलाखतकाराला न चुकता विचारतो?
काय असतं एव्हढं ऑनसाईट असाईनमेंटमध्ये? ऑनसाईट म्हणजे बरंच म्हणजे बरंच काही असतं.
आपण ऑनसाईटबद्दल अगदी सविस्तर माहिती घेऊया.
या आधीच्या लेखात आपण दोन प्रकारच्या आयटी कंपन्यांची ओळख करुन घेतली, एक प्रोडक्ट बेस्ड आणि दुसरा प्रकार सर्व्हीस बेस्ड. प्रोडक्ट बेस्ड कंपनीची एक किंवा अनेक संगणक प्रणाली उत्पादने असतात. आणि ही उत्पादने ती कंपनी आपल्या ऑफीसमध्ये डेव्हलप करुन ईतर नित्योपयोगी वस्तूंसारखी संगणकाच्या दुकानांमार्फत किरकोळ विक्री करत असते. ही सारी उत्पादनं एका सीडीत किंवा अनेक सीडीच्या संचात मिळतात. आपण सीडी घरी आणायची, त्यातला सेटप प्रोग्राम रन करायचा, सेटप प्रोग्रामच्या सुचनांनुसार माहिती द्यायची की झालं. जेमतेम पंधरा वीस मिनिटांत ते सॉफ्टवेअर आपल्या संगणकामध्ये वापरण्यास उपलब्ध होतं. विंडोज सारखी संचालन प्रणाली संगणकावर स्थापित करायची असेल तर दिड दोन तास लागतात. अर्थात हे झालं वैयक्तिक वापरातील सॉफ्टवेअरबद्दल.
काही संगणक प्रणाली उत्पादनं मोठमोठया उद्योगसंस्थांमध्ये त्यांचा पुर्ण कारभार संगणकीकृत करण्यासाठी वापरली जातात. अशा संगणक प्रणालींना उद्योग संसाधने नियोजन प्रणाली (ईआरपी - एंटरप्राईज रीसोर्स प्लानिंग सिस्टीम) म्हणतात. आणि या सिस्टीम बरेच वेळा ग्राहकाच्या गरजेनुसार बनवल्या जातात किंवा आयटी कंपनी जी ईआरपी सिस्टीम बाजारात विकते तिच्यात ग्राहकाच्या गरजेनुसार फेरफार (कस्टमायझेशन) केले जातात. हे अर्थात उपलब्ध असलेल्या ईआरपी सिस्टीम मध्ये फेरफार करुन ती ग्राहक कंपनीच्या कर्मचार्यांच्या वापरायोग्य करण्यासाठी किंवा पुर्णतः नविन ईआरपी सिस्टीम बनवण्यासाठी संगणक प्रणाली विकासकांना (सॉफ्टवेअर डेव्हलपर्स) ग्राहक उद्योगाची सखोल माहिती (डोमेन नॉलेज) असावी लागते. त्या ग्राहक उद्योगाचे वेगवेगळे विभाग एकमेकांशी कशा पद्धतीने जोडलेले आहेत, त्यांच्यात कशा पद्धतीने माहितीची देवाण घेवाण होते ही माहिती गोळा करणे आवश्यक असते. तसेच एकदा हवी तशी संगणक प्रणाली बनवून झाली, तिच्या आवश्यक त्या चाचण्या झाल्या की ती प्रणाली ग्राहक उद्योगासाठी वापरात आणावी लागते. अर्थात आता ही प्रणाली एकाचवेळी त्या उद्योगाचे शेपाचशे किंवा हजारो कर्मचारी वापरणार असल्याने ती वापरात आणणे एक सेटप प्रोग्राम रन करुन होणार नसते. त्यासाठी सेवादाता (सर्व्हर), विदागार (डेटाबेस) अशा उच्च शक्तीच्या संगणक यंत्रणा बसवाव्या लागतात. आणि ही सारी कामे करण्यासाठी आयटी कंपनीला आपली काही माणसे त्या ग्राहक उद्योगाच्या कार्यालयात पाठवावी लागतात. संगणक प्रणालीच्या निर्मितीचं किंवा तिच्या स्थापनेचं किंवा तिच्या देखभालीचं काम ग्राहकाच्या कार्यालयातूनच करणे म्हणजे ऑनसाईट असाईनमेंट.
सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांमधल्या कामामध्ये काही वेळा थोडासा फरक असतो. बरेच वेळा प्रोजेक्टच्या सुरुवातीला एक दोन माणसे ग्राहकाच्या कार्यालयात संगणक प्रणालीच्या गरजांची माहिती (रिक्वायरमेंट गॅदरींग) मिळवण्यासाठी जातात. त्यानंतर ती संगणक प्रणाली पुर्णपणे आयटी कंपनीत विकसीत केली जाते. काही ग्राहक कंपन्यांचे स्वतःचे संगणक विभाग असतात. अशावेळी आयटी कंपन्यांचे काही विकासक ग्राह्काच्या कार्यालयातून ग्राहक कंपनीच्याच संगणक तज्ञांच्या देखरेखीखाली काम करतात. कामाचा व्याप जास्त असेल तर जोडीला आयटी कंपनीच्या कार्यालयातूनही काही माणसे काम करतात. म्हणजे आता एकाच प्रोजेक्टवर काम करणार्या दोन टीम तयार झालेल्या असतात. ग्राहकाच्या कार्यालयातून काम करणारी ऑनसाईट टीम आणि आयटी कंपनीच्या कार्यालयातून काम करणारी ऑफशोअर टीम. ऑनसाईट टीममधला आयटी कंपनीचा ज्येष्ट विकासक ऑफशोअर टीम आणि ऑनसाईट टीम मधला दुवा (ऑनसाईट कॉऑर्डीनेटर) म्हणून काम करतो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठून तरी कामच करायचे आहे. मग ते ग्राहकाच्या कार्यालयातून केले काय किंवा आयटी कंपनीच्या कार्यालयातून केले काय. काय फरक पडतो.
फरक पडतो. ग्राहक जर परदेशातील असेल तर खुपच फरक पडतो.
एव्हाना तुमच्या हे लक्षात आले असेल की मोठया संगणक प्रणालींचे दोन प्रकारचे ग्राहक असतात.
१. देशांतर्गत ग्राहक (डोमेस्टीक क्लायंट)
२. आंतरराष्ट्रीय ग्राहक (ईंटरनॅशनल क्लायंट)
जर देशांतर्गत ग्राहकाच्या कार्यालयात जाऊन विकासकांना काम करावयाचे असेल आणि हे ग्राहकाचे कार्यालय दुसर्या शहरात असेल तर आयटी कंपनी आपल्या विकासकांना प्रवासभत्ता देते. विकासकांची त्या शहरात राहण्याची सोय करते. पगार मात्र जो आहे तोच चालू राहतो.
ग्राहक जर परदेशातला असेल तर आयटी ईंजिनीयर्ससाठी ती सुवर्णसंधी असते. कामानिमित्त का होईना, कंपनीच्या खर्चाने परदेशवारी घडते. काम जास्त दिवस चालणार असेल तर कंपनीच्या खर्चाने सहा महिने वर्षभर त्या देशात राहताही येते. पगार मात्र दोन प्रकारे दिला जाऊ शकतो. एक म्हणजे कंपनी भारतातलाच पगार देते परंतू परदेशातला राहण्याचा आणि जेवणाचा खर्च कंपनी करते. म्हणजे भारतातला पगार पुर्णपणे बचत करता येऊ शकतो. दुसरा प्रकार म्हणजे आयटी कंपनी आपल्या आयटी ईंजिनीयर्सना ग्राहकाकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून पाठवते. ग्राहक कंपनी आयटी कंपनीला प्रत्येक कंत्राटी कर्मचार्याच्या कामाचा मोबदला महिना अखेरीस देते. आयटी कंपनी त्या रकमेतून आपले खर्च, फायदा वगैरे वजा करुन एक ठराविक रक्कम (त्या देशातील चलनात) आपल्या त्या देशातल्या कर्मचार्यांना देते. या पद्धतीत राहण्याची आणि जेवणाची सोय कर्मचार्यांनी आपली आपण करायची असते. तसेच तो कर्मचारी जेव्हढे दिवस परदेशातून काम करेल तितके दिवस भारतातील पगार बंद असतो. कामाचा कालावधी एक वर्षापेक्ष जास्त असेल तर बर्याचशा आयटी कंपन्या अकरा महिन्यानंतर आपल्या कर्मचार्यांना एक महिन्याची बिनपगारी सुट्टी घेऊ देतात. या सुटटीत त्या कर्मचार्याला भारतात येऊन परत जायचे असेल तर प्रवासभाडयाचा खर्च कंपनी करते.
देशांतर्गत ग्राहकाकडे ऑनसाईटला जाऊन काम करण्यास आयटी ईंजिनीयर्स तितकेसे उत्सुक नसतात. कारण एक दुसर्या शहरात जाऊन राहण्याचा अनूभव सोडला तर त्यात विशेष काही फायदा नसतो. कंपनी जरी प्रवासभत्ता देत असली आणि राहण्याची सोय करत असली तरी काही काळासाठी स्थलांतरीत होण्याच्या दगदगीमुळे आयटी ईंजिनीयर्स या प्रकाराला नाक मुरडतात.
परदेशात ऑनसाईट जाण्यासाठी मात्र आयटी कंपन्यांमध्ये गळेकापू स्पर्धा असते. कंपनीच्या खर्चाने परदेशवारी, वर्ष दोन वर्ष परदेशात राहावयास मिळाल्यास होणारी दहा वीस लाखांची बचत, परत आल्यानंतर मिळणारा "फॉरीन रीटर्न्ड" टॅग आणि आयटी मार्केटमध्ये मिळणारा भाव असे अनेक फायदे असल्यामुळे बरेच वेळा एखादया ऑनसाईट जागेसाठी आयटी ईंजिनीयर पाठवताना कधी कधी राजकारणाईतकेच गलिच्छ राजकारण खेळले जाते. मॅनेजर लोक आपल्या चमच्याचा नंबर लावण्यासाठी कधी कधी अनाकलनिय कोलांटया उडया मारतात. तसेच एकदा कोण जाणार हे नक्की झाले की तो जाणार्या पहिल्यांदाच त्या देशात जाणार असेल तर व्हिजा ईंटरव्ह्यू नावाचं एक दिव्य जाणार्याला पार पाडावं लागतं.
या सार्या गमती जमती आपण पुढच्या भागात पाहू.
वाचने
32998
वाचनखूण
प्रतिक्रिया
127
बाबौ!
In reply to बाबौ! by दादा कोंडके
कै च्या कै !!!! तद्दन बकवास..
In reply to कै च्या कै !!!! तद्दन बकवास.. by विश्वनाथ मेहेंदळे
ऑनसाईट बद्द्लच एक गोष्ट
In reply to ऑनसाईट बद्द्लच एक गोष्ट by धन्या
धन्या शी सहमत !!
In reply to धन्या शी सहमत !! by सुहास..
सहमत
In reply to बाबौ! by दादा कोंडके
आँ?
In reply to आँ? by मन१
अनुभव
एका प्रॉग्राम म्याणेजर
In reply to एका प्रॉग्राम म्याणेजर by रेवती
विषयांतर करणारे प्रतिसाद
In reply to विषयांतर करणारे प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
असहमत
In reply to विषयांतर करणारे प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
धनाजीरावांनी या विषयावर आख्खी
In reply to धनाजीरावांनी या विषयावर आख्खी by रेवती
कोणते सुख जास्त महत्वाचे हे
In reply to कोणते सुख जास्त महत्वाचे हे by राजेश घासकडवी
हम्म
In reply to हम्म by पैसा
इथे सुख कोणाला कशाला वाटेल
In reply to हम्म by पैसा
मुद्दा जबाबदाऱ्यांचा नसून
In reply to मुद्दा जबाबदाऱ्यांचा नसून by राजेश घासकडवी
कसय ना.. प्रत्येक गोष्टीमध्ये
In reply to कसय ना.. प्रत्येक गोष्टीमध्ये by पिलीयन रायडर
बाळाला दुध पाजणे ही आईची पण
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
नेस्ले कंपनी दुधाची जबाबदारी
In reply to नेस्ले कंपनी दुधाची जबाबदारी by पिलीयन रायडर
अपत्याला दूर ठेऊन काम करत
In reply to नेस्ले कंपनी दुधाची जबाबदारी by पिलीयन रायडर
सहमत आहे
In reply to नेस्ले कंपनी दुधाची जबाबदारी by पिलीयन रायडर
अगं पिलियन रायडर, एवढच असतं
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
ज्याचा त्याचा प्रश्न हे खरेच पण
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतर
In reply to अवांतर by मन१
आईचे दूधही विकत घ्यायची गोष्ट
In reply to आईचे दूधही विकत घ्यायची गोष्ट by शुचि
अर्थात अदितीचा मुद्दा मला
In reply to आईचे दूधही विकत घ्यायची गोष्ट by शुचि
"ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" मध्ये
In reply to "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" मध्ये by धन्या
गरज/ सोय
In reply to अवांतर by मन१
गरज निर्माण करणे आणि तिचे
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
अशी पेशंट जर माझ्या ओपिडीत आली तर केपाटात लाथ घालुन हाकलुन देइल.
In reply to अशी पेशंट जर माझ्या ओपिडीत आली तर केपाटात लाथ घालुन हाकलुन देइल. by बाबा पाटील
केपाटात?.?
In reply to केपाटात?.? by आनन्दिता
आनंदिता ताई माफ करा...
In reply to अशी पेशंट जर माझ्या ओपिडीत आली तर केपाटात लाथ घालुन हाकलुन देइल. by बाबा पाटील
बाबा पाटील सर, एक नंबर आहे
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
LOL!
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
हं
In reply to हं by नगरीनिरंजन
सहमत व्हावं की होउ नये या
In reply to सहमत व्हावं की होउ नये या by ५० फक्त
+१
In reply to सहमत व्हावं की होउ नये या by ५० फक्त
+१
In reply to हं by नगरीनिरंजन
काही उदाहरणे
In reply to हं by नगरीनिरंजन
बा निरंजना
In reply to हं by नगरीनिरंजन
या अशा शोधांमुळे मानवजात
In reply to या अशा शोधांमुळे मानवजात by नाना चेंगट
=)) =)) =))
In reply to या अशा शोधांमुळे मानवजात by नाना चेंगट
काय सांगता येत नाही. माझ्यापण
In reply to हं by नगरीनिरंजन
उत्तम तिरकस प्रतिसाद
In reply to उत्तम तिरकस प्रतिसाद by शुचि
मी तिरकस लिहीलेलं असलं तरी हे
In reply to कसय ना.. प्रत्येक गोष्टीमध्ये by पिलीयन रायडर
तुम्ही कधीतरी पिलिअन सीट
In reply to तुम्ही कधीतरी पिलिअन सीट by प्रसाद१९७१
अग बाई.. का ते?? मजेत बसलेय
In reply to मुद्दा जबाबदाऱ्यांचा नसून by राजेश घासकडवी
सहमत
In reply to मुद्दा जबाबदाऱ्यांचा नसून by राजेश घासकडवी
सदर प्रतिसाद स्वतःच्या
In reply to सदर प्रतिसाद स्वतःच्या by विश्वनाथ मेहेंदळे
जरूर वापरा.
In reply to जरूर वापरा. by राजेश घासकडवी
न जज करण्याचाही अतिरेक वाईटच.
In reply to न जज करण्याचाही अतिरेक वाईटच. by शुचि
तू बायबलात लिहीलेलं सगळं खरंच
In reply to जरूर वापरा. by राजेश घासकडवी
आवेशात मर्यादाभंग झाला असेल
In reply to हम्म by पैसा
टाळ्या....
वाचतोय
In reply to वाचतोय by राजेश घासकडवी
सहमत...
पैसा आणि अनुभव मिळविणे
In reply to पैसा आणि अनुभव मिळविणे by येडा अण्णा
आमची कंपनी २ आठवड्याच्यावर
In reply to आमची कंपनी २ आठवड्याच्यावर by धन्या
आणि तरीही तुम्ही दुसरी नोकरी
In reply to आणि तरीही तुम्ही दुसरी नोकरी by येडा अण्णा
आणी दुसरी नोकरी ऑनसाईट्ला असे
बर्याच वेळा ऑनसाईटला जायला
> > एक प्रोडक्ट बेस्ड आणि
In reply to > > एक प्रोडक्ट बेस्ड आणि by नर्मदेतला गोटा
>> एक प्रोडक्ट बेस्ड आणि
In reply to >> एक प्रोडक्ट बेस्ड आणि by धन्या
दोनी उदाहरण बेस हयता ........
In reply to >> एक प्रोडक्ट बेस्ड आणि by धन्या
>> म्हणून तर भारतीय आयटी
या प्रकाराच्या अर्थकारणाबद्दल
वाचतोय. जबर्या मज्जा येते
दोन गमतीदार अनुभव
In reply to दोन गमतीदार अनुभव by प्रसाद१९७१
वर उल्लेखलेल्या बायकाच त्या
In reply to वर उल्लेखलेल्या बायकाच त्या by परिकथेतील राजकुमार
पूर्ण कपडे घातले असतील तर
In reply to दोन गमतीदार अनुभव by प्रसाद१९७१
प्रेसिडेन्शियल टॉवर्स का?
In reply to प्रेसिडेन्शियल टॉवर्स का? by समीरसूर
प्रेसिडेन्शियल टॉवर्स
In reply to दोन गमतीदार अनुभव by प्रसाद१९७१
वर उल्लेखलेल्या बायकाच त्या
सेवादाता (सर्व्हर), विदागार
इथुन पुढचे सर्व भाग इनो घेऊनच
हा भाग रंगतदार.
मालिका चांगली..
ऑनसाईट
In reply to ऑनसाईट by समीरसूर
जनरलायझेशन
In reply to जनरलायझेशन by मैत्र
+१
In reply to जनरलायझेशन by मैत्र
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by नगरीनिरंजन
ऑनसाईटवर असताना एका देशातून
In reply to ऑनसाईट by समीरसूर
मस्त प्रतिसाद!
ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू
In reply to ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू by शुचि
ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू
In reply to ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू by धन्या
अरे वा !
In reply to ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू by धन्या
चाटु
In reply to चाटु by चिरोटा
ते मी नाकारत नाही.
In reply to ते मी नाकारत नाही. by धन्या
नकारात्मक टोन
धागा आय टी चा आहे की
In reply to धागा आय टी चा आहे की by शुचि
हा हा