जाणकार परीक्षण टाकतीलच, पण..
योगायोगाने आज अचानक मनात विचार आला की बरेच दिवसात चित्रपट पाहिला नाही, तर आज एखादा टाकावा. रोज दूरचित्रवाणीवर पाहिल्या जाणार्या प्रोमो'झ मुळे बर्फीबद्दल मनात उत्सुकता होतीच, म्हणून गेलो.
पिक्चर छान जमला आहे.. अंजाना अंजानी च्या अनुभवामुळे मनात थोडी धाकधूक होती, आणि ते आला बर्फी गाणे पाहताना अस वाटायलाही लागले होते.. पण नन्तर हलकेफुलके विनोद, मध्येच काही बोलके प्रसंग यातून मध्यंतर कधी झाले ते कळलेच नाही.
पिक्चर ला कथा अशी काही नाहीच, आणि त्यात हीरो मूकबधीर म्हणजे डायलॉग्स पण नाहीत, मग २ १/२ तास दाखवणार काय असा प्रश्न मनात होता, पण पिक्चर ने नंतर अशी पकड घेतली की हे प्रश्न आलेच नाहीत.
काही प्रसंग खरेच न बोलता खूप काही संगून जातात.. विशेषतः इलियाना गाव सोडून जात असताना तो रेल्वेच्या खांबावर आपटण्याचा प्रसंग, किंवा शेवटी बर्फी प्रियांकाला शोधत मुस्कान मध्ये जातो तो प्रसंग.
बर्फीचे वडील आजारी पडतात तो तर अप्रतीम!
यातले कोणतेच प्रसंग 'अंगावर' येत नाहेत, पण अपेक्षीत परिणाम साधून मात्र जातात.
बराच पिक्चर समजला नाही अस वाटतय, पुन्हा एकदा पहावा लागेल.
रणवीर कपूर अपेक्षेप्रमाणे निरागस वाटला, पण प्रियांकाची अॅक्टिंग तेव्हढी पटली नाही. कदाचीत राणी मुखर्जीने या रोलचं सोनं केलं असतं..पण सांगणे कठीण.
जिंदगी ना मिलेगी दोबारा आवडला असेल, तर हा पण नक्कीच आवडेल.. आणि तुम्ही दबंग च्या कॅटेगरीतले असेल तर मात्र जाताना विचार करून जा! अगदीच 'गोड' आहे. :)
वाचने
5317
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता तर बगायला पायजे
छानच लिहिलय......
मलाही बघायचं...एकंदर
गोड' बर्फी
एक्झॅक्टली..मला तो
In reply to गोड' बर्फी by सुजित पवार
छान !
कोल्हाला द्राक्ष आंबट
In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार
ऑ ?
In reply to कोल्हाला द्राक्ष आंबट by जाई.
तू रणबीर नाहीस दँटस इट
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
कपूर
In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार
परा भाऊ ....
In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार
श्या श्या !
In reply to परा भाऊ .... by विनीत संखे
बघायला हवा....!
बर्फी मस्तच
अत्यंत 'तरल' की काय म्हणतात
आजच एक मस्त sms वाचण्यात आला
(No subject)
(No subject)