✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बडबड

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Wed, 09/12/2012 - 20:36  ·  लेख
लेख
"ए हळू रे!" "काय हळू? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी फास्ट चालवायची?" "नाही तर काय? ही काय बैलगाडी आहे का?" "ही बैलगाडी नाहीये... मात्र तू बैल आहेस हे नक्की!" "आणि तू माझी गाय" "पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना." "नक्को... आधीच तू सारखे ब्रेक मारतो आहेस ते काय कळत नाहीये का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप स्पीड वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... वळणावर तरी हळू कर ना. प्लीज!" "काही नाही होत गं... माझा कंट्रोल................. आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . "बघ तरी तुला सांगत होते... हळू चालव, हळू चालव." "हो गं! ओव्हरकॉन्फिडन्समधे गेलो मी." "आता समजून काय उपयोग! त्या दिवशी समजलं असतं तर आज हे असं रोज याच वेळी याच वळणावर येऊन हीच बडबड करायची अंतहीन पाळी नसती आली आपल्यावर."
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
10276 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

लोकांनी कोणत्या हॉस्पिटलमध्ये

यकु
Wed, 09/12/2012 - 20:40 नवीन
लोकांनी कोणत्या हॉस्पिटलमध्ये यायचं बिका?
  • Log in or register to post comments

शुभ बोल नार्‍या तर म्हणे

रेवती
Wed, 09/12/2012 - 20:47 नवीन
शुभ बोल नार्‍या तर म्हणे मांडवाला आग लागली! काय हे यकु! आँ? हॅलोविन जवळ येतोय एवढाच बोध घ्यायचा, बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

मला वाटलं वैनी व बिका

यकु
Wed, 09/12/2012 - 22:30 नवीन
मला वाटलं वैनी व बिका गाडीवरुन पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पडल्यापड्ल्या बिकांनी हे लिहिलंय. बाकी तशीही बिकांना गाडी नीट चालवता येत नाहीच ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मला वाटलं वैनी व बिका

श्रावण मोडक
Wed, 09/12/2012 - 23:09 नवीन
मला वाटलं वैनी व बिका गाडीवरुन पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पडल्यापड्ल्या बिकांनी हे लिहिलंय.
"पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!"
! हे राम!!! वय काय, बोलतंय काय... छ्या...खातंय आता मार बिकाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हिंदी शिरियली फार पह्याला

गणपा
Wed, 09/12/2012 - 21:03 नवीन
हिंदी शिरियली फार पह्याला लागला का हो काका? ;)
  • Log in or register to post comments

+१. असेच म्हणतो.

बॅटमॅन
Wed, 09/12/2012 - 21:48 नवीन
+१. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

लेखु आवडला.

शिल्पा ब
Wed, 09/12/2012 - 21:45 नवीन
लेखु आवडला. मला आधी वाटलं लोकं कशी बडबड करतात, मग काय गमतीजमती होतात असं कैतरी लिहिलंय की काय ! ही एक्दम भुताची स्टोरीच लिहिली की तुम्ही.
  • Log in or register to post comments

बाईची बडबड

आदिजोशी
Wed, 09/12/2012 - 21:47 नवीन
बाईने बडबड केली नसती तर त्याचे चित्त विचलीत होऊन दोघे गचकले नसते. डाण्या न सांगता परदेशी गेल्याचे बिकाने फारच मनाला लाऊन घेतलेले दिसतेय.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/13/2012 - 06:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

तरी सांगत होते!

पैसा
Wed, 09/12/2012 - 22:13 नवीन
तरी सांगत होते, जास्त वेळ माणसांच्या जगात राहू नको म्हणून!
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/12/2012 - 22:19 नवीन
भयकथांना सुरुवात म्हणायची का ? ष्टोरी मस्त जमली आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आवड्ल.....

पक पक पक
Wed, 09/12/2012 - 23:18 नवीन
आवड्ल..... :)
  • Log in or register to post comments

साधी शिम्पल भयकथा... मस्त...

भडकमकर मास्तर
Wed, 09/12/2012 - 23:34 नवीन
साधी शिम्पल भयकथा... मस्त... सोप्या भयकथंचा जॉनर एष्टाब्लिश केल्याबद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments

जरा विसावू या वळणावर?

नंदन
Wed, 09/12/2012 - 23:59 नवीन
मरणोत्तरही बडबड थांबत नाही, हेच ह्या कथेतले 'भय इथले संपत नाही' असावे :)
  • Log in or register to post comments

सही प्रतिसाद

सहज
गुरुवार, 09/13/2012 - 08:15 नवीन
भयकथा आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

छान...

मन१
गुरुवार, 09/13/2012 - 00:40 नवीन
अपेक्षित, सोपे पण छान. वरील सर्वाम्शी( यकु, आदिजोशी,नंदन ह्यांच्याशी विशेष करुन) सहमत.
  • Log in or register to post comments

ष्टोरी!

Nile
गुरुवार, 09/13/2012 - 01:33 नवीन
ष्टोरी वळकीची वाटतीए! ;-)
  • Log in or register to post comments

मस्तच पण...

विकास
गुरुवार, 09/13/2012 - 01:52 नवीन
गोष्ट एकदम आवडली पण त्यामुळे आपण अंधश्रद्धा प्रसार तर करत नाही आहात ना असा प्रश्न पडला आहे. ;) Image removed.
  • Log in or register to post comments

भय-कथा आवडली

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/13/2012 - 07:07 नवीन
सुटसुटीत व मिश्किल भयकथा आवडली.
  • Log in or register to post comments

भयकथा आवडली

मी_आहे_ना
गुरुवार, 09/13/2012 - 09:40 नवीन
भयकथा आवडली
  • Log in or register to post comments

छोट्या भयकथेतुन चांगला संदेश..

अक्षया
गुरुवार, 09/13/2012 - 09:39 नवीन
छोट्या भयकथेतुन चांगला संदेश..:)
  • Log in or register to post comments

छोट्या भयकथेतुन चांगला

विजुभाऊ
गुरुवार, 09/13/2012 - 11:44 नवीन
छोट्या भयकथेतुन चांगला संदेश. काय संदेश मिळाला ते आम्हालाही सांगाकी तै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षया

गाडी जोरात चालवु नये आणि चालवताना बडबड करु नये हा संदेश. :)

अक्षया
गुरुवार, 09/13/2012 - 12:45 नवीन
गाडी जोरात चालवु नये आणि चालवताना बडबड करु नये हा संदेश. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अनुभव

निखिल देशपांडे
गुरुवार, 09/13/2012 - 10:19 नवीन
अनुभव कथन आवडले.
  • Log in or register to post comments

+१

अमोल खरे
गुरुवार, 09/13/2012 - 10:34 नवीन
तरी बिकांना सांगत होतो की भारतात दुबईसारखी बाजुला अरबी मुली घेऊन फास्ट गाडी / बाइक चालवत जाऊ नका, पण ऐकतील ते बिका कसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

ठीक

स्पा
गुरुवार, 09/13/2012 - 10:23 नवीन
ठीक
  • Log in or register to post comments

ही गोष्ट नाई आवडली! काका,

कवितानागेश
गुरुवार, 09/13/2012 - 10:30 नवीन
ही गोष्ट नाई आवडली! काका, दुसरी गोष्ट सांगा ना.... :) (हाच प्रतिसाद पुढच्या कथेला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही)
  • Log in or register to post comments

ही गोष्ट लई आवडली! बिका,

शुचि
Fri, 09/14/2012 - 07:54 नवीन
ही गोष्ट लई आवडली! बिका, दुसरी गोष्ट सांगा ना.... (हाच प्रतिसाद पुढच्या कथेला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही) पण आधीचा संवाद जरा अजून फुलवला असता तर ...... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

सुरुवातीची पाच-सहा वाक्य

किसन शिंदे
गुरुवार, 09/13/2012 - 10:52 नवीन
सुरुवातीची पाच-सहा वाक्य वाचून जरा सरसावूनच बसलो होतो. ;)
  • Log in or register to post comments

त्याच असं आहे.. बाइकवर जर

शैलेन्द्र
गुरुवार, 09/13/2012 - 11:54 नवीन
त्याच असं आहे.. बाइकवर जर बसायच असेल, त्यातही डबल्सीट, त्यातही मागे किलबिलती मैना असेल, तर मागच्या मैनेने आपल्या हाताचा उपयोग करुन पुढच्या राघुला घट्ट सीट्बेल्ट घालावा.. अस केलं की वेगावर नियंत्रण आपसुक येत.. उगा जोरात पळवुन ब्रेका मारायची गरज पडत नाही.. :)
  • Log in or register to post comments

+१

आनंद भातखंडे
गुरुवार, 09/13/2012 - 14:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

बि.का. कं लिवलय कायच कल्ल नाय

पियुशा
गुरुवार, 09/13/2012 - 12:43 नवीन
बि.का. कं लिवलय कायच कल्ल नाय ;)
  • Log in or register to post comments

"ए हळू रे!" आमची गाडी थोडा

पांथस्थ
गुरुवार, 09/13/2012 - 12:44 नवीन
"ए हळू रे!"
आमची गाडी थोडा वेळ इथेच अडकली :)
  • Log in or register to post comments

हीहीही !! भारी टाकला राव, पंच

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/13/2012 - 14:12 नवीन
हीहीही !! भारी टाकला राव, पंच !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ

ह्म्म

स्पा
गुरुवार, 09/13/2012 - 14:16 नवीन
हीहीही !! भारी टाकला राव, पंच !!! विमे आता स्वतः पंच टाकायचं वय झालंय तुमच.. दुसर्यांच्या "टाकलेल्या" पंच वर काय हीही करत बसला हात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

विमे आता स्वतः पंच टाकायचं वय

प्रचेतस
गुरुवार, 09/13/2012 - 20:21 नवीन
विमे आता स्वतः पंच टाकायचं वय झालंय तुमच..
वैयक्तिक आणि अवांतर प्रतिसाद. संपादक मंडळ श्री. स्पा यांना समज देईल काय? - (उगाच) कावणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सगळे प्रतिसाद

इरसाल
गुरुवार, 09/13/2012 - 12:52 नवीन
१. घ्या २. आय्ला ३.खरच काय ४. आम्ही बघतोय हं ५. काय तरीच काय ? ६. कोण म्हणे ७. संदेश का.. बरं बरं कोणता ? ८. काही कळलं असेल तर शपथ. ९.ह्यांच आपलं वेगळंच. १०. आवडला/नाय आवडला इति समर्पित.
  • Log in or register to post comments

मस्त कथा. 'भयकथा' म्हणणे

सस्नेह
गुरुवार, 09/13/2012 - 13:15 नवीन
मस्त कथा. 'भयकथा' म्हणणे योग्य वाटत नाही. बिका, अजून जरा खुलवा ना कथा. वाचे-वाचेपर्यंत संपली !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पप्पु अंकल
गुरुवार, 09/13/2012 - 15:15 नवीन
भावना पोचल्या. वळणावर सांभाळू
  • Log in or register to post comments

शेवट

विनायक प्रभू
गुरुवार, 09/13/2012 - 15:57 नवीन
शेवट आल्यावरच भयकथा असल्याचे कळ्ळे. मला तर बॉ सुरुवातीला वेगळेच वाटले.
  • Log in or register to post comments

तुमचं असंच आहे. आधी तुम्हाला

नाना चेंगट
गुरुवार, 09/13/2012 - 19:16 नवीन
तुमचं असंच आहे. आधी तुम्हाला वेगळं वाटतं नंतर कळतं सेमच आहे ;) लेखन छान :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

अरेच्चा??????? रोज बल्ल्या का

प्यारे१
गुरुवार, 09/13/2012 - 21:17 नवीन
अरेच्चा??????? रोज बल्ल्या का आता? ;)
  • Log in or register to post comments

गाडी बदला नशीब बदलेल. -ररा पै

रमताराम
गुरुवार, 09/13/2012 - 21:29 नवीन
गाडी बदला नशीब बदलेल. -ररा पै
  • Log in or register to post comments

+१

पिवळा डांबिस
Fri, 09/14/2012 - 02:14 नवीन
च्यामारी, विडंबन करायच्या उत्साहात अभिप्राय द्यायचा राहूनच गेला की!!!! उत्तम लघुभयकथा! साधी, सोपी, उगाच फापटपसारा नाही!!! पण कितीहि परिश्रम करून रिपोर्ट पुढ्यात ठेवला तरी आमचे खवचट प्रोफेसर जसं म्हणायचे त्याप्रमाणे, "इट्स अ गुड स्टार्ट!" नाही म्हणजे या वर्षी भयालीताईची शिव-ब्रूम उचलायचीये तुम्हाला!!! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा