Skip to main content

अमेरिका , महाराष्ट्र आणि परप्रांतीय

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 27/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र आणि अमेरिका दोन्ही मध्ये सध्या परप्रांतीय , त्यांचे आक्रमण आणि लोकल माणसाचा रोजगार याविषयी बरीच चर्चा चालू असते. सहज गंमत म्हणून त्यामध्ये काही साम्य आहे ते बघितले तर मला खालील मुद्दे सापडले. मुद्दे गंमत म्हणून आहेत आणि ते खालील छोट्या गृहीतका वरून काढले आहेत . ते माझे कार्यक्षेत्र ,अनुभव , ज्ञान यानुसार असल्याने तपशीलात चुका असतील तर सांभाळून घावे ---------------------------- महाराष्ट्र --> भारत ( जास्त करून उप्र,बिहार, राजस्थान ) --> गवंडी, शेतात मजुरी करणारे , हॉटेल आधील कामगार रिक्षावाले, भाजीवाले थोडक्यात कामगार वर्ग अमेरिका --> सारे विश्व ( जास्त करून भारत,चीन, फिलिपिन्स ) --> सोफ्टवेअर मधील बरीच कामे करणारे लोक ----------------------- रोजगार : अमेरिकेमधील कंपनी ला नफा वाढवणे महत्वाचे असते त्यामुळे स्वस्ता मध्ये कोणी काम करत असेल तर ते लगेच घेतात. महाराष्ट्र मध्ये पण शरीरकष्टाची कामे जर कोणी स्वस्ता मध्ये करत असेल तर लगेच काम दिले जाते . या अश्या गोष्टीमूळे स्थानिक लोकांचा रोजगार जातो पण शेवटी नफा महत्वाचा असल्याने कंपनी/मालक आणि पर्यायाने सरकार दोघेही गप्पा बसतात. राजकारण : दोन्ही ठिकाणी परप्रांतीयाचे आक्रमण हा निवडणुकीचा मुद्दा आहे कामाची वेळ/मिळणारा पैसा : अमेरिकेमध्ये आईटि मधील बरेच परप्रांतीय लोक ऑफिस मध्ये, घरातून, शनिवार रविवार , ओंन काल कायम काम करायला /सपोर्ट करायला तयार असतात .महाराष्ट्र मध्ये पण बाहेरचे कामगार सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत पण काम करतात. या गोष्टी स्थानिक लोकांना अजिबात शक्य नसतात . परप्रांतीय लोक लोकल माणसापेक्षा काम स्वतामध्ये करतात . लोकल माणूस आधी तेच काम निवांत आणि जास्त पैसे घेवून करत असतो .पण अचानक त्याचा रोजगार जावून तो रस्त्यावर येतो इतर टाइमपास मुद्दे राहणे : परप्रांतीय कायम एकत्र राहून पैसे वाचवायचा प्रयत्न करतात . अमेरिकेमध्ये जाणारी बरीच आईटी मधील मंडळी बेचलर असतात किव्वा फेमिली ला इंडिया मध्ये सोडून गेलेली असतात . महाराष्ट्र मध्ये सुद्धा बाहेरून येणारे लोक असेच राहतात . त्यामुळे सुरक्षितताहि मिळते जेवणे : बरेच परप्रांतीय स्वताचे जेवण स्वत बनवतात . अमेरिकेमध्ये रोज बाहेर जेवण झेपत/आवडत नसल्याने आणि परवडत नसल्याने घरी जेवण करणे आणि ऑफिस मध्ये डब्बा घेवून जाणे असे बरेच लोक करतात . महाराष्ट्र मध्ये पण सेम.प्रत्तेक कामगार डब्बा आणतो सणसमारंभ : परप्रांतीय हे त्यांचे सण समारंभ एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा प्रयत्न करतात . त्यामधून ते लोकल समाजाला एक संदेश पण देत असतात कि आम्ही एक आहोत. जसे कि अमेरीकेमधली दिवाळी, १५ ऑगस्त . महाराष्ट्र मधील छटपूजा , होळी .. या दोन्ही स्थानिक लोकांना खुपतात . अजून तुम्हाला काही मुद्दे मांडता येतील का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3986
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

दोघांमध्ये थोडे साम्य काही फरक आहे. बिहार , यु. पी मधून येण्याचा त्यांना घटना दत्त अधिकार आहे. अमेरिकेमधील भारतीयांना तो तसा नाही. जगात भारत व अमेरिका ही दोन प्रमुख लोकशाही राष्ट्रे आहेत म्हणून काही प्रमाणात ही तुलना शक्य आहे. जगात काही राष्ट्रे धर्मा वर आधारित आहेत व तेथे परप्रांतीय परराष्ट्रिय व परधर्मियांना कशी वागणूक मिळते ते काही पुरोगामी व विचारवंता ना विचारूया !

वरील निष्कर्ष मर्यादीत अनुभव अथवा निरीक्षणावरून वाटले... फक्त एक समान मुद्दाच म्हणायचा असला तर तो इतकाच की जगाच्या पाठीवर कुठेही (केवळ अमेरीका-महाराष्ट्रच नाही) स्थलांतरीत (इमिंग्रंट) हा बहुतांशी वेळेस अधिक कष्टाळू असतो. तसेच तो स्वत:च्या आप्तस्वकीयांपासून दूर असल्याने (विशेष करून) सुरवातीच्या काळात तो जास्त वेळ देऊ शकतो... स्थानिकांचे तसे नसते. अमेरिका --> सारे विश्व ( जास्त करून भारत,चीन, फिलिपिन्स ) --> सोफ्टवेअर मधील बरीच कामे करणारे लोक अमेरीकेत जे कुठल्याही प्रोफेशनल कामासाठी येतात ते बहुतांशी कायद्याने येतात. ते केवळ सॉफ्टवेरर्स अथवा इंजिनियरींग क्षेत्रातलीच असतात असे नाही. मात्र येथे जो वाद होत आहे तो त्यांच्या मुळे नाही तर तो विशेष करून "लॅटीनो" अथवा "हिस्पॅनिक" जनतेमुळे होत आहे जी दक्षिण अमेरीकेतील आहे. बहुतेक वेळेस ते मोलमजुरीकरता सीमा रेषा पार करून बेकायदेशीरपणे येतात. अर्थात त्यांना काम देणारे स्थानिकच असतात कारण तशी मोलमजुरी स्थानिकांना नको असते. (यात शेतमजुरी खूप असते). रोजगार : अमेरिकेमधील कंपनी ला नफा वाढवणे महत्वाचे असते त्यामुळे स्वस्ता मध्ये कोणी काम करत असेल तर ते लगेच घेतात. हे प्रोफेशनल्सना लागू नाही. त्यांना नोकर्‍या मिळतात कारण स्थानिक त्या क्षेत्रात जास्त (लागणार्‍या संख्येने) शिकलेले नव्हते म्हणून. आता ते चित्र बदलत आहे. पण तरी देखील शिक्षणसंदर्भात इतर अनेक समस्या या समाजापुढे आहेत. पण तो येथे मुद्दा नाही. राजकारण : दोन्ही ठिकाणी परप्रांतीयाचे आक्रमण हा निवडणुकीचा मुद्दा आहे काहीच राज्यांमधे हा मुद्दा आहे. आणि त्यासंदर्भातील आवाज स्थलांतरीत (हिस्पॅनिक मतदार) जास्त करत आहेत. हा देखील फरक आहे. कामाची वेळ/मिळणारा पैसा :.... याच्याशी काहीअंशी सहमत. पण प्रोफेशनल क्षेत्रातील स्थानिक पण तसेच कष्ट करत असतात. सणसमारंभ : परप्रांतीय हे त्यांचे सण समारंभ एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा प्रयत्न करतात . या दोन्ही स्थानिक लोकांना खुपतात . अमेरीकेत पाहीलेले नाही, अपवाद नक्कीच असतील पण हे खुपत नाही असेच म्हणेन. महाराष्ट्रात देखील छटपुजेला आक्षेप होण्याचे कारण हे केवळ परप्रांतिय म्हणून नसावे. तसे म्हणाल तर इतर अनेक परप्रांतिय सण साजरे केले जातात. उ.दा. बंगाल्यांची दुर्गापुजा, गुजरात्यांचा नवरात्रातील दांडीया, शोधल्यास दाक्षिणात्यांचे देखील सण मिळतील जे साजरे केले जातात. परप्रांतिय म्हणून नव्हे पण अल्पसंख्य असलेल्या मुस्लीम आणि ख्रिश्चन जनतेचे सण देखील ते आनंदाने साजरे करतात आणि ते कधी कुणाला खुपल्याचे जाणवत नाही अथवा त्यावरून राजकारण होताना दिसत नाही. (राजकारण म्हणून इफ्तार पार्ट्या होतात, पण विरोधात काही होताना दिसत नाही.)

महाराष्ट्रातून विटा, माती घेऊन जाऊन तयार भिंती / इमारती (अजूनतरी) परप्रांतीय आणून देत नाहीत. तसेच अमेरिकेच्या 'आऊटसोर्सिंग'मुळे भारतात रोजगार निर्मिती होते तशी महा.च्या परप्रांतीय कामगारांमुळे उर्वरित भारतात होत नसावी... नाहीतर राजसाहेब म्हणतात तसे 'लोंढे' आले नसते. ह.घ्या. ;)

आणखी एक साम्य मराठी माणसाचा महाराष्ट्रापलिकडे(त्यातही मुंबई,पुणे) भारत आहे ह्यावर विश्वास बसत नाही. अमेरिकन माणसाचा अमेरिकेपलिकडे जग आहे ह्यावर विश्वास बसत नाही.

In reply to by चिरोटा

पल्लवी जोशी मोड ऑन> या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पल्लवी जोशी मोड ऑफ>

In reply to by चिरोटा

कैक उत्तर भारतीय/दक्षिण भारतीयांनादेखील (त्यांचा त्यांचा रीजन सोडोन)अस्सेच वाटत असते हो अगदी. आहात कुठे? बाकी मुंबई/पुणे यापलीकडे काही नाही असे वाटण्याचा मुद्दा बाडीस.

In reply to by रेवती

तमिऴ लोक एक नंबरला असतील तर तेलुगु हे क्लोज सेकंडला आहेत. आजचीच गोष्ट, कोणत्यातरी बॉलीवुड पिक्चरला तेलुगु हीरॉईन सिलेक्ट केल्याची महद्वार्ता एक तेलुगु मित्र अशा प्रकारे सांगत होता की जणू त्यात त्याचा आणि आंध्राचा लै कैतरी मोठ्ठा विजय झाला आहे. हास्यास्पद होता तो सर्व प्रकार निव्वळ!