पुणे आणि अमेरिकेत एक साम्य आहे...
दोन्ही ठिकाणी तुम्ह्चे सारख्या पद्धतीने स्वागत होते....
How long you are planning to stay in US?
What you are gonaa do here?
तसेच जर तुम्ही पुण्यात कोणाच्या घरी गेलात तरी तुम्हाला अशाच प्रश्नान्ना सामोरे जावे लागते...
आज कसे काय येणे केले...?
कधी पर्यंत मुक्काम आहे?
वाचने
10676
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहज करमणुक म्हणून केलेला हा लेख आहे...
यात पुण्याला किंवा अमेरिकेला नावे ठेवण्याचा इरादा नाही...
आपल्याला किंवा आपल्या
In reply to सहज करमणुक म्हणून केलेला हा लेख आहे... by चिम् चिम् मामा
आपल्याला किंवा आपल्या 'लेखाला' नावे ठेवण्याचा उद्देश नाही पण हा खरोखर लेख होवू शकतो यावर तुमचा विश्वास आहे काय?
आपण स्व:ता 'हा लेख उडवण्यात यावा' ही मागणी संपादकांकडे करावी ही विनंती. यातच आपले मोठेपण सामावलेले आहे.
+१
In reply to आपल्याला किंवा आपल्या by भरत कुलकर्णी
अगदी अगदी... लेख(म्हणता येत असेल तर, नाहीतर ललित का काय ते) काही झेपला नाही.
(मूळ वाईचा असून, पुण्याबद्दलही जाज्वल्य अभिमान असणारा, आणि वरचे प्रश्न फक्त 'व्हिसा अधिकार्यांकडून' ऐकलेला, तरिही एक देश म्हणून अमेरिका आवडलेला) मी आहे ना..इथेच, पुण्यात.
+२
In reply to +१ by मी_आहे_ना
लेख(म्हणता येत असेल तर, नाहीतर ललित का काय ते) काही झेपला नाही.
सहमत.
एव्हढे विद्वत्ताप्रचुर लिखाण मिपाकरांच्या पचनी पडणे अवघड आहे.
+२
In reply to +१ by मी_आहे_ना
लेख(म्हणता येत असेल तर, नाहीतर ललित का काय ते) काही झेपला नाही.
सहमत.
एव्हढे विद्वत्ताप्रचुर लिखाण मिपाकरांच्या पचनी पडणे अवघड आहे.
खिक... अमेरिकेचा व्हिसा काढला
खिक...
अमेरिकेचा व्हिसा काढला असे सांगण्याची ऐड्या आहे ही.
खिक करु नका. आजकाल खिक केले
In reply to खिक... अमेरिकेचा व्हिसा काढला by नितिन थत्ते
खिक करु नका. आजकाल खिक केले की बरे नाही दिसत असे कुणीतरी सांगत होते.
मग त्याऐवजी काय करावे म्हणजे
In reply to खिक करु नका. आजकाल खिक केले by नाना चेंगट
मग त्याऐवजी काय करावे म्हणजे बरें दिसेंल?
हॅ हॅ हॅ (काय वाईट आहे )
In reply to मग त्याऐवजी काय करावे म्हणजे by इनिगोय
हॅ हॅ हॅ (काय वाईट आहे ;) )
हॅहॅहॅ
In reply to हॅ हॅ हॅ (काय वाईट आहे ) by नाना चेंगट
हॅहॅहॅ
हं.. दिसतेंय हे बरें
In reply to हॅहॅहॅ by यकु
हं.. दिसतेंय हे बरें ;)
हुम्म्म्म...
कंपनीला घाइ झाल्यामुळे दोन महिन्यात दोन वेळा युएस व्हिसा रिजेक्ट झालेला (खरी उत्तरं दिल्यामुळे)
सुंदर व ओघवती लेखनशैली. एवढा
सुंदर व ओघवती लेखनशैली. एवढा लांबलचक लेख असूनही कुठेही कंटाळवाणा झाला नाही, हे विशेष.
एकच सूचना करावीशी वाटते.. पुढच्या वेळी इतके मोठे लेख २-३ भागात टाकलेत तर जरा बरं होईल.
सहमत. लेख क्रमश: असेल असे
In reply to सुंदर व ओघवती लेखनशैली. एवढा by श्रीरंग
सहमत. लेख क्रमश: असेल असे वाटले होते.
हे बहुधा दुसरे साम्य.. :ड
हे बहुधा दुसरे साम्य.. :ड
तुमचा हा 'लेख' चेपूवर स्टेटस
तुमचा हा 'लेख' चेपूवर स्टेटस म्हणून जास्त शोभेल. :)
??
आपले घर- दार, शहर सोडून आधी लोकाच्या दारात बोंबलत जावेच कशाला ? हाटेलात रहावे की, आणि अगदी राजासारखे आदरातिथ्य करून घ्यावे.
हेच ना...
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
इच्या मायला.. एकतर तुम्ही पाहुणे म्हणून येणार, त्यामुळे तुमची बडदास्त ठेवा. चांगलं-चुंगलं खायला प्यायला द्या.. तुमच्यासाठी वेळ काढा, तुमची करमणूक होईल असं आदरतिथ्य करा.. तुम्हाला फिरवा. बरं काही कमीजास्त झालंच तर तुमचे टोमणे खा.. सांगितलंय कुणी !? जा, र्हावा की हाटीलात नी करा जे करायचंय ते..
आपलं ढाण्ण ऽ ऽ कण अनुमोदन हाये पराला ! :-)
कधी नव्हे ते पराशी सहमत
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
कधी नव्हे ते पराशी सहमत व्हावे लागत आहे.
काय हो चिमा, नाही आवडत पुण्यात यायला तर कोणी आमंत्रण दिलय का?
आणि दिलच कोणी तर तुम्हाला घटनेनं 'नाही' म्हणायचा अधिकार दिलाय की!
तिथं मोह सुटत नाही अन् दुसर्याला नावं ठेवतायत.
ही नावं ठेवायची पद्धत तुमच्या गावची वाटतं?
हे परासाहेब
जेव्हा जेव्हा "बोंबलत" हा शब्दप्रयोग करतात तेव्हा मला का कोण जाणे "सुक्या बोंबलांची ", "पाट्यावर दाबुन मग तांदळाच्या पिठात तळलेल्या ओल्या बोंबलांची", "भाजलेले सुके बोंबील", "सुक्या/ओल्या बोंबलांच्या कालवणाची" जबरदस्त आठवण येते
अरे..
In reply to हे परासाहेब by इरसाल
असे मन मारु नका इरसाल शेठ.
चेन्नईमध्ये एखादी महाराष्ट्रीयन बाई ठेवा स्वयंपाकाला.
काय श्लेष मारलाय वा:!!!
In reply to अरे.. by परिकथेतील राजकुमार
काय श्लेष मारलाय वा:!!!
यक्क दुरुस्ती हाये बगा
In reply to अरे.. by परिकथेतील राजकुमार
चेन्नईमध्ये एखादी महाराष्ट्रीयन बाई ठेवा स्वयंपाकाला.
आम्ही केरळात पडिक आहोत. प्राब्लेम काय साल नाय व्हनार झालं......
हा सल्ला सोकाजीरावांना उपयोगी पडेलसे वाटते.
आणखी एक साम्य
आणि आणखी एक साम्य पुणे आणि अमेरिकेत आहे की. दोन्ही ठिकाणच्या (बहुसंख्य) लोकांना त्यांच्या ठिकाणाविषयी अतोनात अभिमान असतो आणि आपले ठिकाण सोडून जगात दुसरे काहीच नाही असे वाटत असते.
दोन्ही ठिकाणच्या (बहुसंख्य)
In reply to आणखी एक साम्य by पुण्याचे वटवाघूळ
बहुसंख्य उत्तर/दक्षिण भारतीयांना असेच वाटत असते. या बाबतीत पुणेकर अग्रेसर वगैरे नाहीत.
कूपमंडूक म्हणालो असतो, पण
In reply to आणखी एक साम्य by पुण्याचे वटवाघूळ
कूपमंडूक म्हणालो असतो, पण तुम्ही वटवाघूळ आहात!! ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या ठिकाणाबद्दल अभिमान असतो.....एक मुंबई सोडली तर.
अभिमान नसण्याचादेखील एक
In reply to कूपमंडूक म्हणालो असतो, पण by सूड
अभिमान नसण्याचादेखील एक अभिमान असतो की काय मुंबैकरांना ;)
अजून एक
In reply to आणखी एक साम्य by पुण्याचे वटवाघूळ
दोन्ही कडे बाहेरील व्यक्ती त्या त्या ठिकाणांना नावे ठेवतात आणि तरी तेथे स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात अथवा होतात. :-)
फरक इतकाचः अमेरीकेत परमनंट रेसिडेंन्सीनंतर नॅचरलाईझ्ड अमेरीकन नागरीक होता येते. पुण्यात तुम्ही परमनंट रेसिडंट होऊ शकाल पण नॅचरलाईझ्ड पुणेकर होणे शक्य आहे असे वाटत नाही! ;)
तसेच जर तुम्ही पुण्यात
तसेच जर तुम्ही पुण्यात कोणाच्या घरी गेलात तरी तुम्हाला अशाच प्रश्नान्ना सामोरे जावे लागते...
आज कसे काय येणे केले...?
कधी पर्यंत मुक्काम आहे?
अस्सं?
मी तर ह प्रश्न ठाण्यात देखील ऐकला आहे.
ग्लोबलायझेशन इफ्फेक्ट ... दुसरं काय?
मी तर ह प्रश्न ठाण्यात देखील
In reply to तसेच जर तुम्ही पुण्यात by मनीषा
मी तर ह प्रश्न ठाण्यात देखील ऐकला आहे.
ठाणे काय पुणे काय........ शेवटी एकारान्त च की
अप्रतिम लेख... तुम्ही असेच
अप्रतिम लेख... तुम्ही असेच लिहत रहा (जिलब्या टाकत रहा)
पु. जि. प्र. (जि -जिलबीच्या)
:)
माहितीबद्दल धन्यवाद. :)
मला वाटलं काही तुलनात्मक अभ्यास, काही गृहितके, काही संशोधन, काही निष्कर्ष. काही साम्य-भेद असलेला एखादा अभ्यासपूर्ण लेख आहे की काय ? लेख सुरु झाला आणि लगेच संपला इतकेच बाकी काही नाही.
बाकी, तुम्ही पब्लिकचं काही मनावर घेऊ नका. लिहित चला. :)
-दिलीप बिरुटे
+१. तेच ना. एवढ्याशा
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१.
तेच ना. एवढ्याशा पुण्यातील इतकेसे पुणेकर, त्यांच्या कमेंट्स मनावरती का घ्याव्यात हे एक न उलगडलेले कोडे आहे.
हायला !
In reply to +१. तेच ना. एवढ्याशा by बॅटमॅन
'मनावर' असा शब्द आहे होय तो. मी भलतेच काहितरी वाचले आणि अनावर झालो.
असो...
+१००
In reply to +१. तेच ना. एवढ्याशा by बॅटमॅन
एवढ्याशा पुण्यातील इतकेसे पुणेकर,
'इतकेसे' या शब्दात मला काही तरी 'संखेचा' बोध होतो. त्याऐवजी दुसरा शब्द नै वापरता येणार का ? ;)
-दिलीप बिरुटे
पण तोच बोध होणे तर अपेक्षित
In reply to +१०० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण तोच बोध होणे तर अपेक्षित है ना प्राडॉ ;)
हम्म्म
In reply to +१०० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्पार्टन्स पण इतकेसेच होते म्हणतात.
बाकी चालू द्या..
ह्म्म्म. ३०० मध्ये तीनशे
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
ह्म्म्म. ३०० मध्ये तीनशे पुणेकर* असते तर काय झाले असते असा एक रंजक विचार मनात चालू आहे. कुणीतरी कल्पनाविस्तार करायला मदत करा रे.
* म्हणजे आत्ताचे, ते पण शक्य असल्यास सदाशिवपेठी पुणेकर, बाजीप्रभूंच्या काळातील नाही .
कल्पनाविस्तार पाऊल क्रमांक १
In reply to ह्म्म्म. ३०० मध्ये तीनशे by विश्वनाथ मेहेंदळे
प्रतिस्पर्धी सैन्य कोणतं?
नवा धागा काढा.. नाय त्या
In reply to कल्पनाविस्तार पाऊल क्रमांक १ by बिपिन कार्यकर्ते
नवा धागा काढा..
नाय त्या मैदानात शतक नको.
हा धड कमब्याक देखील नव्हता
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
हा धड कमब्याक देखील नव्हता पराशेठ :) असो.
बाकी या उपमेचा एकूण इतिहास पाहता मूलनिवासी शक्तींना पाचारण करावे म्हणतोय ;)
(मूलनिवासी हीरो) बॅटमॅन.
म्हणजे ? हा लेख अभ्यास पूर्ण नाही ?
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणजे ? हा लेख अभ्यास पूर्ण नाही ? असे आपण म्हणता की काय ?
आता प्रॉ. डॉ.नींच दुधारी
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तलवार चालवली म्हटल्यावर दुसर कोण काय बोलणार.
शेवटी त्यांची सही बघा दुधारी हटवलेली आहे. ;)
उथळ
उथळ धाग्याला प्रतिसाद फार!
धन्यवाद
बॉम्बे जिलेबी >>> ह्ही ह्ही
In reply to धन्यवाद by स्पा
बॉम्बे जिलेबी >>> ह्ही ह्ही ह्ही....!
काय काय असतं ना एकेक. ;-)
मज्जा आली.
अजूनही MH 12 प्रभागातील 'त्या' अस्मिता टिकून आहेत, अन कितीही उथळ धागे काढले तरी तितक्याच कडव्या अन कडवट प्रतिक्रीया येतात हे पाहून करमणूक झाली.
'सारेगम'मधे अवधूत गुप्ते सलील कुलकर्णींना 'एमेच्च बारा' म्हणून जे काय खिजवतो त्यावर टिपिकल एमेच्च बारा चेहरा (चेहर्यावर एमेच बारा वाजलेले) झालेला सलील आठवला अगदी..
रच्याकने : हाटेलीत जायची ऐपत सग्ळ्यांचीच असते हो. इथे प्रॉब्लेम असा आहे, पुण्यात आलात तर तुम्ही हॉटेलात रहा, पण आम्ही पुण्याबाहेर तुमच्याकडे आलो, तर तुम्ही मात्र 'गावाकडचा' वगैरे पाहुणचार 'आपुलकीने' करा अशी अपेक्षा दिसते...
(अनुभवी) गोपाळ
अजूनही MH 12 प्रभागातील
In reply to मज्जा आली. by आनंदी गोपाळ
अगदी अगदी. बाकी करमणूक टॅक्सफ्री होते हेवेसांनल:) जामोप्यास्टाईल प्रतिक्रिया इथे देणे सुरू केले तर कित्ती कित्ती मज्जा येईल असे वाटून डोळे पाणावले ;)
अगदी अगदी. या काडीशी आपलं कडेशी बाडिस.
रच्याकने:
फेबुवर ही कम्युनिटी पाहिली, हहहहहहपुवा झाली नाव वाचून - "MH-12=आम्ही बाराचे" :D :P
द्येवा!
In reply to अजूनही MH 12 प्रभागातील by बॅटमॅन
जामोप्यांची स्टाईल मारायची गरज नाही हो! ते स्वतः आहेत की मिपावर?
बाकी ब्याटम्यान, तुम्ही अन ते पुणेरी वटवाघूळ एकच का हो? (दोघांत ब्याट आहे म्हणुन विचारले..)
पन तरिही या धाग्यावर 'काय तो धागा आन काय ते पर्तीसाद!' अस्ली परस्तीती हाये!
(दोघांत ब्याट आहे म्हणुन
In reply to द्येवा! by आनंदी गोपाळ
(दोघांत ब्याट आहे म्हणुन विचारले..)>> ख्याक!
मी ''दोघात एक(च) ब्याट'' वाचले... ;-)
माहिती आहे हो जामोप्या इथे
In reply to द्येवा! by आनंदी गोपाळ
माहिती आहे हो जामोप्या इथे आहेत ते! बाकी पुणेरी वटवाघूळ आणि अस्मादिक हे एक नव्हेत. ते पुण्याचे, तर मी गॉथमचा :)
नाही
In reply to द्येवा! by आनंदी गोपाळ
नाही. माझी इतर नावे स्वाक्षरीत दिली आहेत. त्यात "बॅटमॅन" या नावाचा समावेश नाही :) आणि मी "पुण्याचे वटवाघूळ" आहे "पुणेरी वटवाघूळ" नाही.
स्वारी बर्का!
In reply to नाही by पुण्याचे वटवाघूळ
पुण्याचे चे पुणेरी झाले, क्षमस्व!
बाकी माझी आय्डी नेक्ष्ट संस्थळावर 'दारूडा साप' अशी घेणारे मी. (मी दारू प्यालेल्या सापासारखा नेहेमी सरळ चालतो म्हणून.)
द्येवा!
In reply to अजूनही MH 12 प्रभागातील by बॅटमॅन
द्विरुक्त..
हे असे
हे असे काही पुणेकर अमेरिकेत गेल्यामुळे झाले ही काही अमेरिकन्स पुण्यात आल्यामुळे झाले , यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
किमान शब्दात कमाल आकर्षित
किमान शब्दात कमाल आकर्षित करणारा धागा , सध्या अश्यात मीपा वर पहिला नाही... आपण चिम् चिम् मामा चे फॅन झालो राव !
बाकी पुणेकरांच्या विषयी बोलण्यची काही सोय राहिली नाही :)