सदर गोष्ट आहे दहा वर्षापुर्वीची. त्यावेळी मी नुकताच डिप्लोमाच्या दुसर्या वर्षात प्रवेश घेतला होता. पहिले वर्ष मी मित्राच्या खोलीवर रहायला होतो. यावेळी मी होस्टेल्मधे राहायला लागलो.
तसा होस्टेलला भीतभीत प्रवेश घेतला. कारणही तसेच होते. कॉलेज शहरापासुन थोडे लांब होते. मनुष्यवस्तीही खुप तुरळक होती. होस्टेल ज्या जागेवर बांधलेले होते तीथे पुर्वी मेलेली मानसांना पुरण्यात येत असे. इमारत बांधत असताना किमान २ सांगाडे सापडले होते.
तसा भुताखेतांवर माझा विश्वास नव्हता पन होस्टेलमधील काही मुलांना विचीत्र अनुभव आले होते.
त्यातले दोघे माझ्याच वर्गातले. एकाने होस्टेलच्या लॉबीत पहाते चार वाजता एका फासावर लटकलेल्या बाईला पाहीले. बिचारा लघूशंकेकरता टॉयलेट्कडे चालाला होता. तिथेच बेशुद्ध पडला.बाकीच्या पोरांनि त्याला सकाळि उठउन काय झाले ते विचार्ले तर त्याने झालेला प्रकार सांगितला. मग काय् अफवेचे एकुन पेवच फुटले. रोज नवीन नवीन घटना ऐकायला येवु लागल्या. एकाला तर रात्रि बाई हाका मारत असल्याचा भास झाला. त्याची सुद्धा टरकली.
हे सर्व माहीत असुनही मी होस्टेलला गेलो. तो माझा पहिला दिवस होता.कॉलेजचे ते सुरुवातीचे दिवस होते. इमारत तशी मोठी होती. रात्री एकदम शांतता असाय्ची.
मि, माझा रूमपार्टनर धिरज आनी दोन मित्र असे एकुन चार जन आमच्या रूममधे झोपायचे ठरले. चौघात मि नविन होतो. मग काय धिरजला हुक्की आली आनी त्याने भुताटकीचे किस्से सांगायला चालु केले. रात्रीचे साधारण ११:३० झाले होते.
त्याच्या एकापेक्षा एक किस्स्यांनी एकदे माझी टरकत होती. तसे मी रूमच्या बाहेर येउन पाहीले तर सर्वत्र एकदम सन्नाटा. कोणिच लॉबीत दिसत नव्हते. कशे दिसनार. ६०पैकी ४च रूममधील मुले आली होती. पण मला वाटले भुताट्कीमुळे असतील सगळे आपापल्या खोल्यात.
झोपन्यापुर्वी लघवी करुन यावी असे ठरवले होते. तसे टॉयलेट आणि माझ्या रूममधे १५ पावलांचे अंतर असेल. पन आज तेच १५ किमि वाटत होते. कायकरावे काही कळेना. बाकीचे मित्रपण सोबत यायला तयार नाही. धिरज तर बोलला खिडकितुन कर. बाहेर जाउ नको.
पण मन राजी नव्हते. भितीतर जबर्दस्त.
सगळे भुते एकदम आठवायला लागली.
शेवटी देवाचे नाव घेउन एकटा निघालो टॉयलेटकडे. टॉयलेटमधेपन अंधार! भितभितच शू करायला लागलो, तोच
पाठीवरती कुनीतरी हात ठेवला आणि एकडे कळजाचा ठोका चुकला. सगळे अंग थरथरर्त होते.
मेलो आता. मागे वळुन बघायचि हिम्मत होईना. घशाल कोरड पडली आवाज निघता निघेना .
तोच मागुन हस न्याचा आवाज आला. आवाज परिचयाचा होता. तो हात आणि आवाज होता महाशय धिरज यांचा.
साल्याने जबर्दस्त घेतली होती माझी.
वाचन संख्या
3808
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा... मी पण प्रथम वर्षात
एकाच गोष्टिला वेगवेगळि नावे
@लघुशंका, लघवी आणि शू... >
In reply to एकाच गोष्टिला वेगवेगळि नावे by उदय के'सागर
जबरदस्त...
बाकी डिप्लोमाला होता कुठं
प्रकाटाआ
In reply to बाकी डिप्लोमाला होता कुठं by ५० फक्त
+१
In reply to बाकी डिप्लोमाला होता कुठं by ५० फक्त
हा हा हा .....
मजेशीर!
अच्छा भुताचा जन्म असा होत
In reply to मजेशीर! by पैसा